महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य: १ वाटी चणा डाळ, २ वाटी किसलेला गूळ, पाव वाटी साखर, चिमूटभर मीठ, वेलची, जायफळ पावडर, तेल, २ वाटी बारीक रवा (झीरो नंबर), केशर किंवा केशरी रंग, २ चमचे तेल, दूध पाणी, चिमूटभर मीठ, पोळी लाटण्यासाठी पोळीचा पत्रा, तवा, पोळपाट लाटणे
कृती: पुरण - चणाडाळ दोन ते चार तास चांगली भिजवावी, डाळ कुकरमध्ये घालून शिजवून घ्यावी शिजलेल्या डाळीतील पाणी काढावे. व त्यात चिमूटभर मीठ घालावे. गुळ व साखर घालावे मधून मधून हलवत राहावे. पुरण घट्ट झाले की उतरवावे. पुरण गरम असतानाच पुरणयंत्रातून पुरण बारीक करावे. त्यांत वेलची जायफळ पूड घालावी.
रवा भिजवणे - २ वाटी बारीक रवा घेणे. त्याला दोन टेबलस्पून तेल घालून व चिमूटभर मीठ घालून कोरड्या रव्याला चोळून घेणे.
नंतर दूधपाणी केशरी रंग किंवा केशर घालून कणकेसारखा भिजवावा. खूप घट्ट भिजवू नये हा रवा चार ते पाच तास भिजवावा. नंतर त्याला तेल लावावे. जास्त तेलात ठेवू नये. रवा भिजला की रव्याचे दोन पुरी ऐवढे गोळे करावे व त्याच्या पुऱ्या कराव्यात. पत्र्यावर एका पुरीवर पुरणाचा गोळा घ्यावा. व दुसरी पुरी त्यावर ठेवावी व सर्व बाजूने बंद करावी. दोन्ही बाजूने भरपूर तेल लावावे व लाटण्याने हलके पोळी लाटावी व बाजूच्या कडा सुरीने कापाव्यात व तव्यावर हलकेच टाकावी व त्यावर तेल सोडावे. पोळी उलथताना हलकेच उलथावी व चांगली भाजावी. ही पोळी साजूक तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबर खावी.
- सौ. शिल्पा रोहित मेढेकर
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
रव्याला दूध व पातळ तूप चोळून ठेवावे व काही वेळ दडपून ठेवावे. (मोगरी देणे असे या प्रक्रियेस म्हणतात.) मग मिश्रण कोरडेच मिक्सरमधून काढावे.
March 6, 2017
सामग्री
१ कप दूध,
२चम्मच मैदा,
१ चम्मच बटर,
१ चम्मच चिली फ्लेक्स,
१/२ चम्मच काली मिरी पावडर,
१/२ चम्मच मिक्स हर्बस,
१/४ कटोरी स्वीट कॉर्न के दाने,
१/४ कटोरी गाजर के टुकडे,
१/४ कटोरी सिमला मिर्च के टुकडे ,
१/४ कटोरी प्याज के टुकड़े,
५ क्यूबज चीज के,
नमक स्वाद अनुसार
विधी
१) एक नॉनस्टिक पॅन में बटर गरम कर ले၊
२) अब उसमें मैदा डालकर अच्छे से धीमी आंच पर भून ले၊
३) एक मिनट बाद उसमें दूध डालकर अच्छे से मिक्स कर ले၊
४) अब इसमें सब सब्जियाँ ,बची हुई सामग्री और चीज
कद्दूकस करके डाल दे और अच्छे से मिक्स कर ले၊
५) अब पॅनके उपर ढक्कन ढककर सब्जी को पका ले၊
६) दूध पूरा सब्जी में मिक्स होने के बाद आंच बंद कर दे और
ठंडा होने के लिए बाजू में रख दे၊
७) सब्जी ठंडी होने के बाद, ब्रेड स्लाइस ले , उसके उपर बटर
लगा दे और उसपर मिक्स व्हेज का मिश्रण रखकर , अच्छे
से सब जगह पर फैला दे၊
८) अब इसके उपर बटर लगाई हुई ब्रेड की दुसरी स्लाइस
रखे और सॅन्डविच टोस्टर में रखकर टोस्ट कर ले
July 19, 2018
साहित्य :
सारणासाठी : १ मध्यम आकाराचा नारळ,
२ कप दुध, ३/४ कप साखर, २ टे स्पून गुलकंद,१ टी स्पून वेलची पावडर, ५-६ काजू (तुकडे करून), ५-६ बदाम (तुकडे करून)
पारी साठी : २ कप रवा (बारीक), १ टे स्पून तूप (मोहनसाठी) मीठ चवी प्रमाणे,
१/२ कप दुध व लागेल तसे पाणी, मोदक तळायला तूप.
कृती :
नारळ खवून घ्या, त्यामध्ये साखर व दुध मिक्स करून शिजवायला ठेवा. मिश्रण घट्ट होई परंत शिजवावे मग त्यामध्ये वेलची पावडर गुलकंद, काजू, बदाम घालून मिक्स करावे.
बारीक रवा थोडा मिक्सरमध्ये थोडा ग्राईड करून घ्या. मग त्यामध्ये मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालून मिक्स करा. दुध व पाणी मिक्स करून रवा थोडासा सैल सर भिजवावा. (खूप सैल झाला तर मोदक खूप तुपकट होतील.) रवा भिजवल्यावर १० मिनिट झाकून बाजूला ठेवा. नंतर भिजवलेल्या रव्याचे एकसारखे मोठ्या लिंबा एव्ह्डे गोळे बनवावे. एक एक गोळा पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून गोळा बंद करावा. आपल्याला पाहिजे तो आकार द्यावा.
कढई मध्ये तूप गरम करून विविध आकाराचे मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
हे मोदक चवीला उत्कृष्ट लागतात.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
September 5, 2016
मेथी दाणे रात्रभर भिजवा. सकाळी उपसून ठेवा. फडक्या्त बांधून मोड येऊ द्या. आता तुरीची डाळ व मेथ्या पाणी घालून शिजवा. खूप जास्त शिजवू नका. तेलाची फोडणी करा. त्यात ठेचलेला लसूण व मिरच्यांचे तुकडे घाला. कडीलिंबाची पाने, तिखट, मीठ, हळद, चिंचेचा कोळ, गूळ, गोडा मसाला घाला.
April 17, 2017
साहित्य:- शेवग्याची पाने (ताजी फुले मिळाल्यास घालावीत) तांदूळ पीठ, चणाडाळीचे पीठ, तिखट, हळद, गरम मसाला, नारळाचे बारीक काप, काजूचे कूट, मीठ, चिंच, तेल, रवा इ.
कृती:- चिंच पाण्यात भिजवावी. तेल वगळून इतर साहित्य एकत्र भिजवावे. पीठ खूप घट्ट वा पातळ नको, अशा अंदाजाने तांदूळ पीठ व बेसन घालावे. चपट्या टिक्क्या रव्यात घोळवून शॅलो फ्राय कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 20, 2017
मैदा १ कप, बेकिंग पावडर १ चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, अमूल बटर पाव कप, पायनापल इसेन्स पाव चमचा, कन्डेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, पिठीसाखर १ मोठा चमचा.
December 30, 2016
साहित्य: १ कप भक्याचे ओले दाणे (उकडलेले), १ टोमॅटो, १ कांदा चिरलेला, २ कांद्यांची पात चिरून, १ कप दूध, २ कप पाणी, चवीपुरते साखर, मीठ, १ टे. स्पून तूप.
कृती: वेळ: २० मिनिटे प्रथम कांदा व टोमॅटो बारीक चिरा. चांगल्या तुपावर कांदा परतून घ्या. त्यातच टोमॅटो व मक्याचे दाणे घालून जरासे परता. थोडे पाणी घालून शिजवा. मक्याचे थोडे दाणे बाजूला ठेवा. नंतर हे सर्व मिक्सरवर बारीक करा व पाणी (बेताचे) घालून गॅसवर उकळत ठेवा. त्यात मीठ, साखर व दूध घाला. कांद्याची हिरवी चिरलेली पात घालावी. बाजूला ठेवलेले मक्याचे दाणे सूप देताना बाऊलमध्ये घालावेत. हे सूप फारच रुचकर लागते.
September 10, 2026
थंडीच्या मोसम चालू झाला या मोसमात बाजारात मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. जेवणात हिरव्या मटारच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. मटार-पनीर, मटार-पुलाव, आलु मटार, मटाराचे कटलेट यासारखे विविध खाण्याचे स्वादिष्ट प्रकार मटारापासून बनवता येतात. लो कॅलरी आणि अनेक पौष्टिक तत्वे असलेल्या मटाराचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्याचा गुणधर्म असलेल्या मटाराचे लठ्ठ व्यक्तिंनी अवश्य सेवन करावे. मटारातील तत्वे कॉलेस्ट्रॉलची मात्रा कमी ठेवण्यास मदत करतात. यात मोठ्या प्रमाणावर अढळून येणारे अँटीऑक्सिडेंट्स ब्लड वेसल आणि आर्टरिजला ब्लॉक होण्यापसून परावृत्त करतात. मटारचे सुप प्यायल्याने रक्तदाब कमी ठेवण्यास मदत होते. मटारामध्ये असलेली फायबरची अधिक मात्रा बध्दकोष्ठतेवर गुणकारी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही मटारच्या कृती.
मटार उसळ
मटार करंजी
मटार चटणी
मटार पॅटीस
मटार पराठा
मटार पनीर
मटार सामोसा
मटार रोल विथ चीज
मटार भात
मटार चीज पॅटिस
मटार चाट
December 26, 2016
तांदूळ, रवा, शेवयांची खीर हे आपण पारंपरिक प्रकार नेहमी करतो, पण भोपळा, मका, गहू, मूग पनीर. यांची खीर कधी बनवत नाही, या खीरी चवीला तर त्या छान असतातच, पण पौष्टिकही.
January 19, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti