महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य: २ कप ताजे दही १ कप पुदिन्याचा रस मीठ मिरेपावडर १ हिरवी मिरची
कृती: वेळ: २५ मिनिटे रात्री दूध गाळून नेहमीप्रमाणे स्वच्छ भांड्यात दही लावा. दही लावतांना त्यात किंचित् साखर, दोन पुदीन्याची पाने व १ मिरची मधोमधे चिरून घालून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे दही रवीने चांगले घुसळा. जरूर असल्यास थोडे पाणी वापरा. ताज्या पुदिन्याचा रस घाला व पुन्हा दही एकजीव करा. हिरवट रंगाचे मिश्रण तयार होईल. त्यात मिरेपावडर व मीठ घालून फ्रिझमध्ये गार करत ठेवा. सर्व्ह करतांना बाऊलमध्ये हे सूप घालून मधोमध पुदिन्याची छोटीशी १-२ पाने अलगद सोडावी. हे सूप चवीला रुचकर व दिसायलाही सुंदर होते. विशेषतः उन्हाळयात हे थंडगार सूप प्यायला फारच आवडेल.
September 10, 2026
आज दिवाळी फराळातील शेवटचा प्रकार कडबोळी व डाएट फराळ
कडबोळी प्रकार एक
साहित्य : तांदळाचं पीठ २ वाटय़ा, हिंग पाव चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, लोणी पाव वाटी, मीठ चवीप्रमाणे, पीठ भिजविण्यासाठी निरसं दूध, तिखट अर्धा चमचा, कलौंजी (कांद्याचं बी) अर्धा चमचा, तळण्यासाठी तेल.
कृती : तांदळाच्या पिठात हिंग, जिरेपूड, तिखट, कलौंजी, मीठ व लोणी घालून हाताने मिसळून घ्या. जरुरीप्रमाणे दूध घालून पीठ घट्ट भिजवा. कडबोळी वळून तेलात तळा.
टीप : चकलीच्या सोऱ्याबरोबर कडबोळ्यासाठीही एक ताटली येते. त्यातून कडबोळी केल्यास आतून छान पोकळ कडबोळी होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कडबोळी प्रकार दोन
साहित्य:- पाव किलो तांदळाचे पीठ, चार-पाच चहाचे चमचे लाल मिरची पूड, अर्धी वाटी दुधाची साय, ५० ग्रॅम लोणी, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप, थोडे दूध.
कृती:- तांदळाच्या पिठात अर्धी पळी उकडते तेल ओतावे. नंतर साय, तिखट, लोणी, मीठ वगैरे घालून पीठ चांगले फेसून दुधात मळून घ्यावे. पोळपाटावर पेढय़ाएवढी गोळी घेऊन त्याची कडबोळी करावी व तेलात किंवा तुपात तळावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सातुच्या पिठाची कडबोळी
साहित्य:-१ वाटीभर सातुचे पिठ, १ टी-स्पून जिरे, १ टी-स्पून ओवा, २ चमचे तेल, चवीपुरते मीठ
कृती:- प्रथम सातुचं पीठ, जिरे आणि ओवा एकत्र करुन घ्यावं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालावं. नंतर थोडं पाणी घालून घट्ट्सर आणि एकजीव भिजवुन घ्यावं. नंतर एका पॅन मधे एक चमचा तेल घालुन ते संपुर्ण पॅनभर पसरवुन घ्यावं. हवं असल्यास जास्त ही घालू शकता पण एवढं पुरेसं होतं माझ्या अंदाजानुसार. भिजवलेल्या पिठाची कडबोळी वळुन ती पॅनमधे ठेवा. कडबोळ्यांवर १-२ थेंब तेल घाला. आता गॅस वर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवुन एक वाफ येऊद्या. नंतर एकदा सगळी कडबोळी उलटुन पुन्हा एकदा झाकण ठेवुन एक वाफ आणा. हवं असल्यास पुन्हा थोडसं तेल घाला आणि परतुन घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
August 11, 2018
साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, दोन वाट्या किसलेला कोबी, दोन वाट्या किसलेले गाजर, अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, एक लिंबाचा रस, मीठ व साखर चवीप्रमाणे, तेल, हिंग, मोहरी.
कृती : मेथी, गाजर, कोबी, खोबरे व कोथिंबीर एकत्र करावे. त्यात चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस घालावा. वरून हिंग, मोहरीची फोडणी द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 20, 2017
साहित्य : बर्फाचे चार तुकडे, चार अननसाचे तुकडे, एक केळे, एक कप अननसाचा ज्यूस किंवा सफरचंदाचा ज्यूस.
कृती : सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे. ऑरेंज गाजर स्मूदी साहित्य : एक कप ऑरेंज ज्यूस, अर्धा कप दही, अर्धा कप ओट्स, एक केळे. कृती : सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 28, 2017
फळे कमी तापमानाला आणि योग्य आर्द्रतेला साठवल्यास फळांमधील जैवरासायनिक क्रियांचा वेग मंदावतो फळांचे आयुष्य वाढते. कमी तापमानाच्या फळांच्या साठवणीला शीतगृहातील साठवण“(कोल्ड स्टोरेज ) म्हणतात.
October 24, 2015
सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.
September 8, 2016
सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे व ते कुस्करून एकजीव करावे. यीस्टला थोडय़ा गरम पाण्यात, साखर व कणीक घेऊन काचेच्या ग्लासात फुगण्याकरिता ठेवा. कणकेत बटाटय़ाचे मिश्रण, १ चमचा बारीक चिरलेला लसूण, मीठ, साखर, फुगलेला यीस्ट आणि पाणी मिसळून एकत्र करून घेणे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात तूप घालून पुन्हा हे मिश्रण चांगले मळून घ्यावे व १ तास झाकूण ठेवावे.
December 29, 2016
साहित्य : खिमा पाव किलो, २ कांद, आलं-लसूण पेस्ट, २ अंडी, दही अर्धी वाटी, १ बटाटा, हळद, तिखट, मीठ, सिकेपी मसाला एक चमचा, तेल पाव वाटी, थोडी कोथिंबीर
कृती : खिमा धुवून त्याला हळद, तिखट, मीठ, सीकेपी मसाला आलं-लसूण पेस्ट, दही चोळून ठेवावे, कांद्यावर परतून खिमा कुकरमध्ये शिजवून घ्यावा. दुसऱ्या भांड्यात मोकळा होईपर्यंत परतावा. थोड्या तेलात कांदा ( उभा बारीक चिरलेला) व बटाट्याच्या उभ्या फोडी तळून घ्याव्या
पसरट बुडाच्या पातेल्यात तेल लावून खिमा हलक्या हाताने पसरावा. २ अंडी मिक्सरमधून फेटून घ्यावी व त्याची बारीक धार खिम्यावर ओतावी. हळूहळू अंड्याचे मिश्रण खाली झिरपेल. वरती डिप फ्राय केलेला कांदा व बटाट्याया चिपस् पसरावे. कोथिंबीर घालून गॅसवर सेट करायला ठेवावे. १०-१५ मिनीटात वड्या तयार चौकोनी कापून गरम गरम वड्या सर्व्ह कराव्यात.
- सौ. उज्वल चित्रे
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
हिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते. पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर, मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली.
साहित्य: गाजर २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी, चुकुंदर(बीट) १ मोठे. , हळद, हिरवी मिरची २, लसूण, अदरक, तिखट २ चमचे (चवीनुसार), गरम मसाला (१ चमचा), कसूरी मेथी (२ चमचे) शिवाय कणिक (किती परांठे बनवायचे, याचा अंदाज घेऊन (आम्ही दिल्लीकर परांठ्यात भरपूर मिश्रण भरतो, मुंबईकर बहुतेक कमी भरतात) मळून घ्यावी. शुद्ध गायीचे तूप किंवा लोणी पराठ्यांवर लावण्या साठी. अदरक, लसूण, हिरवी मिरचीचे पेस्ट करून घ्यावे. मीठ चवीनुसार.
March 3, 2015
एक वाटी दूध गरम करून त्यात अळीव भिजत घालावे. दोन तासाने तुपावर रवा भाजून घ्यावा, त्यात खोबरं, चिमूटभर मीठ, अळिवासकट दूध आणि उरलेलं दूध घालून रवा शिजवावा, त्यात गूळ घालून मऊ सांजा करावा, जायफळ घालावं. कणकेमध्ये चवीला मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून सैलसर कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने कणकीच्या पारीत सांजा भरून, लाटून पोळ्या भाजाव्या. हा पराठा खायलाही चविष्ट आणि पौष्टिकही असतो.
January 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti