महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
कुरमूरे थोडे गार झाले कि आधी त्यात सुके पदार्थ घालावेत. चवीपुरते मिठ, फरसाण, तळलेले शेंगदाणे आणि शेव घालून मिक्स करावे. नंतर मिरच्या, कैरी, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे. खुप जास्त वेळ मिक्स करू नये. लगेच सर्व्ह करावे. भेळ तयार केल्यावर लगेच खावी. भेळ तयार करून ठेवल्यास ती नरम पडेल.
December 23, 2016
काकड्यांची साले काढून घ्या व त्या किसणीवर किसून घेऊन त्या किसात दही, चवीनुसार मीठ व साखर घालून कालवून १० मिनिटे एका बाजूला ठेवा. काकडीच्या किसाला चांगले पाणी सुटेल. मग तो कीस हाताने पिळून त्यातील पाणी एका बाउलमध्ये काढा.
September 5, 2016
साहित्य:
तीन कप - मटार दाणे
चार चमचे - टोमॅटो सॉस
पाव कप - वाटलेला कांदा
दोन कप - तळून घेतलेले पनीरचे चौकोनी काप
एक चमचा - गरम मसाला पावडर
दोन चिमूट - तिखट
एक चमचा - आलं लसणाची पेस्ट
चवीपुरते मीठ
कृती:
एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात वाटलेला कांदा, आले-लसणाची पेस्ट घालून चांगले परता. चांगले परतून झाल्यावर त्यात टोमॅटो सॉस व तिखट घाला. जरुरीइतके पाणी घालून त्यातच गरम मसाला पावडर व मीठ घाला.
मटार शिजवून घ्या. व शिजवलेले मटार यात घाला. एक उकळी आली की तळलेल्या पनीरचे काप त्यात घाला. मंद आचेवर थोडा वेळ ठेवून पातेले खाली उतरवून ठेवा.
अशाप्रकारे लज्जतदार मटार पनीर करी तयार. गरमागरम रोटीबरोबर सर्व्ह करा.
April 30, 2016
साहित्य : पाणीपुरीच्या पुर्या एक पाकीट (सुमारे ५० पुर्या), ३ मोठे उकडलेले बटाटे, दीड वाटी बारीक शेव, दोन कप भरून गोड दही, लाल तिखट २ चहाचे चमचे, मीठ २ चहाचे चमचे, बारीक कापलेला कांदा १ वाटी, धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धी वाटी चिंच आणि गूळ यांची गोड चटणी.
कृती : उकडलेले बटाटे सोलून एका ताटात ठेवून बारीक कुस्करा. त्यात १ चमचा मीठ व १ चमचा जिरे पूड घालून ते छान कालवून घ्या. दही घुसमळून त्यात थोडे लाल तिखट व १/२ चमचा मीठ घाला. आता एक प्लेट घेऊन त्यात पाच-सात पुर्या ठेवा. पुर्या वरून हाताने फोडा, त्यात उकडलेल्या बटाटयाचे तुकडे भरा. त्यावर चमच्याने घुसळलेले दही घाला. त्यावर चिंचेची चटणी थोडी थोडी घाला. त्यावर बारीक शेव घाला, त्यावर थोडा कांदा घाला. हवे असल्यास लाल तिखट व किंचित मीठ टाका. सर्वात शेवटी त्यावर कोथिंबीर घाला.
टीप : सगळया प्लेट्स एकदम भरून ठेवू नयेत. पुर्या मऊ पडतात.
August 3, 2018
प्रथम दही पातळ कपडय़ात ३ ते ४ तास बांधून ठेवावं. मग एका बाऊलमधे काढून त्यात साखर, आलं, मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावं.
June 7, 2017
प्रथम सर्व साहित्य घालून कढी उकळून घ्या. मग हिंग, जिरे आणि मिरच्यांची फोडणी द्या. फार गोड ताक असल्यास कढी फुटते आणि चविष्ट लागत नाही. बदल म्हणून फोडणीत २ लवंगा, १ तुकडा दालचिनी घालता येईल. मेथी दाणे व थोडे धने, लाल मिरच्याही घालतात. कढीच्या फोडणीत हळद न घालता चिमूटभर हळद तशीच घाला, म्हणजे रंग चांगला येईल.
March 15, 2017
लवकरच हिरवा हरभरा बाजारात येईल. हिरवेगार हरभरे पाहून मन तृप्त होते. हुरड्याबरोबर शेतातील ताजे सोलाणे शेकोटीवर भाजून खाण्याची मजा तर औरच असते. हरभ-याचा आकार व रंग यावरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार आहेत. देशी हरभ-याचा रंग पिवळसर, तपकिरी असून दाणे सुरकुतलेले असतात.
January 18, 2017
व्हेज गार्लिक बॉल्स – Recipe
September 11, 2026
चिंच कोळून घ्यावी. नंतर सर्व एकत्र करून चटणी करावी. वरून तेलाची हिंग, मोहरीची फोडणी द्यावी.
November 9, 2016
काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया!
June 22, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti