महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
स्प्रिंग रोल शीट्स व स्प्रिंग रोल
साहित्य: १ कप मैदा, १ टेस्पून साबुदाणा पीठ किंवा कॉर्न स्टार्च, १ टीस्पून तेल, १/२ टीस्पून मीठ, १/२ कप आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्च.
कृती: मैदा आणि १ चमचा कॉर्न स्टार्च, तेल, आणि मीठ एकत्र करावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. १ तास झाकून ठेवावे. मळलेल्या पीठाचे १८ ते २० लहान गोळे करावे. आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्चवर एकदम पातळ पोळ्या लाटाव्यात. तवा अगदी मंद आचेवर तापवावा. लाटलेल्या पोळ्या तव्यावर अगदी कच्च्या भाजाव्यात (प्रत्येक बाजू ५ सेकंद भाजावी). आपल्याला पोळी जास्त भाजलेली नकोय. जास्त भाजली गेली तर रोल वळता येणार नाहीत. तयार रॅपर्स प्लेटमध्ये ठेवून वर टॉवेल ठेवावा. अशाप्रकारे रॅपर्स कच्चे भाजून घ्यावेत. रॅपर्स त्याच दिवशी वापरावेत. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील ओलसरपणा कमी होतो आणि तुकडे पडतात.
स्प्रिंग रोल्स
साहित्य: स्प्रिंग रोल शीट्स, ३/४ कप कोबीचे पातळ काप, १/२ कप गाजराचे पातळ काप, १/४ कप पातीकांद्याचे पातळ काप, १/२ कप फरसबी, पातळ तिरके काप, १ मध्यम भोपळी मिरची, पातळ उभे काप, १/२ कप शिजलेल्या नुडल्स, २ टीस्पून लसूण, बारीक चिरून
१ टीस्पून आले, बारीक चिरून, २ टीस्पून सोया सॉस, १ टेस्पून तेल, १/४ ते १/२ टिस्पून अजिनोमोटो, १/४ टीस्पून मिरपूड, २ कप तेल स्प्रिंगरोल तळण्यासाठी, चवीपुरते मीठ.
कृती: कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण परतावे. फरसबी, पाती कांदा, गाजर, आणि भोपळी मिरची घालून साधारण ३० सेकंद मोठ्या आचेवर परतावे. सोय सॉस घालावा आणि मिक्स करावे.
नंतर मीठ, मिरपूड आणि कोबी घालून ३० सेकंद ढवळावे. आच बंद करून नूडल्स घालून मिक्स करावे. सारण एका बोलमध्ये काढून ठेवावे. एक स्प्रिंगरोल शीट घेउन त्याच्या एका कडेला १ चमचा सारण ठेवावे. २ वेळा रोल करून डावी आणि उजवी बाजू आत फोल्ड करावी. पुढे रोल करत न्यावी. शेवटी पाण्याने किंवा मैदा+पाण्याच्या पेस्टने कड चिकटवून टाकावे. अशाप्रकारे सर्व स्प्रिंग रोल बनवावे. तेल गरम करून मध्यम आचेवर रोल तळावेत.
स्प्रिंग रोल्स गरमच चिली सॉस बरोबर सर्व्ह करावे.
टीप: स्प्रिंग रोल्स शीट विकतही मिळतात. यामुळे वेळ वाचेल. तसेच विकतच्या शीट्समुळे स्प्रिंग रोल्स जास्त कुरकुरीत होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
April 17, 2017
साहित्य: ५-६ पिकलेले टोमॅटो, १ सोललेले लहान बीट, अर्धा चमचा किसलेले आले, १ टी स्पून कॉर्नफ्लोअर, १ टे. स्पून लोणी, पाव टी स्पून लाल तिखट, १ टे. स्पून साखर, टे.स् मिरे पावडर चवीपुरती.
कृती: वेळ: २० मिनिटे टोमॅटो आणि सोललेल्या बीटचे बारीक तुकडे करावेत. चार कप पाण्यात टोमॅटो, बीटचे तुकडे आणि किसलेले आले. घालून कुकरमध्ये शिजवावे. हे मिश्रण रवीने घुसळून गाळावे. गाळलेले पाणी (स्टॉक) गॅसवर उकळत ठेवावा. त्यात मीठ, साखर, मिरेपावडर, तिखट घालावे. उकळी आल्यावर पाण्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घालावी. चमच्याने सतत ढवळत राहावे. दाट वाटत असल्यास आवश्यक तेवढेच गरम पाणी घालावे. कॉर्नफ्लोअर शिजल्यावर त्यात लोणी घालावे. गरम गरम सूप बाऊलमध्ये देताना त्यावर शोभेसाठी कोथिंबीरीची पाने घालावी.
हे सूप रंगाने छान दिसते तसेच चविष्टही आहे.
September 10, 2026
मुगाचे पीठ पाण्यात मिसळून मिश्रण छानएकजीव करून घ्यावे. कढई मध्ये तूप घेऊन ते तूप तापवावे. बुंदी काढून घ्यावी. तुपात चांगले तळल्यानंतर बुंदीच्या दाण्यांना कढईतून काढून साखरेच्या पाकात भिजवावे. नंतर सर्व बुंदीच्या दाण्यांना पाकातून काढून घ्यावे आणि त्यांचे छानपैकी लाडू बांधावे.
May 10, 2017
सुक्रोज, ग्लुकोज हा फ्रुक्टोरज अशा तीन प्रकारच्या शर्करा असलेले केळे हे फळ जगभरातील खेळांडूचे आवडीचे खाद्य आहे. यामधील उत्तम कर्बोदके, ब जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम या क्षारांमुळे सर्व प्रकारचा स्पोर्टसमनसाठी हे फळ अतिशय फायद्याचे असे प्री वर्कआऊट मिल आहे की एक केळे खाल्ल्याने पुढील दोन तासांपर्यंत तब्बल २०% ने आपली ऊर्जेची पातळी वाढलेली राहते.
January 12, 2017
मशरुम चिली स्प्रिंग ओनियन
साहित्य : मशरुम (एका मशरुमचे चार भाग करून) १ बाऊल, बारीक चिरलेले लसूण २ चमचे, लांब चिरलेले आले १ चमचा, चिरलेली हिरवी मिरची १ चमचा, सोया सॉस २ चमचे, बारीक चिरलेली कांदापात, मीठ चवीनुसार, साखर चिमूटभर, व्हाइट पेपर पावडर चिमूटभर, तेल २ ते ३ चमचे
कृती : एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची परतून घ्या. नंतर सोया सॉस, मीठ, व्हाइट पेपर, साखर टाका. नंतर त्यामध्ये मशरुमचे तुकडे टाकून मोठय़ा आचेवर टॉस करून घ्या. वरून चिरलेला पातीचा कांदा टाकून नीट टॉस करून गरमागरम सव्र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मशरूम सँडविच
साहित्य: २ हॉटडॉग ब्रेड्स, १ चमचा बटर, १/२ चमचा तेल, १५ ते १८ मशरूम, उभे कापून, २ मध्यम कांदे, पातळ उभे कापून, १/२ वाटी किसलेले चीज, १/४ चमचा रेड चिली फ्लेक्स, १ चिमटी मिक्स हब्र्ज, मीठ आणि मिरपूड चवीनुसार, चिमटीभर साखर
कृती: कढईत तेल गरम करून त्यात बटर घालावे. बटर वितळले की कांदा घालून लालसर परतून घ्यावा. कांदा छान परतला की मशरूम घालावे. साधारण ४ ते ५ मिनिटे परतून शिजू द्यावे. मिक्स हब्र्ज, मीठ, मिरपूड आणि साखर घालून मिक्स करावे. आच मंद करून चीज घालावे. चीज वितळेस्तोवर मिक्स करावे. रेड चिली फ्लेक्स घालून ढवळावे. ब्रेड एक बाजूने कट करावा, पण विरुद्ध बाजू कापली जाणार नाही याची काळजी घ्यावी. ब्रेड उघडून त्यात तयार मिश्रण भरून ग्रील करावे. ब्रेड थोडा क्रिस्पी झाला की सव्र्ह करावे. टॉमेटो केचप किंवा इतर आवडीच्या चटणीबरोबर सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मशरूम सॅंडविच प्रकार एक
साहित्य : एक वाटी कापून वाफवलेले मशरूम, पाच-सहा ब्रेडचे स्लाइस, आलं, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट, मिरेपूड, मीठ, लोणी.
कृती : वाफवलेले मशरूम लोण्यावर परतून त्यात मीठ, आलं, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट घालावी. मिरपूड, मीठ घालून परतून घ्यावे. ब्रेडच्या स्लाइसला लोणी लावून त्यावर मशरूमचे सारण पसरावे. त्यावर दुसरा स्लाइस ठेवावा. याप्रमाणे सर्व तयार करावे. तव्यावर लोणी घालून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे. सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पनीर मशरूम शासलिक
साहित्य : पनीर क्युब्स ८ ते १०, बटन मशरूम ७ ते ८, ब्लॅक ऑलीव्ह ५ ते ६, ग्रीन ऑलीव्ह ५ ते ६, रंगीत सिमला मिरची १ इंच कापलेले ५ ते ६ तुकडे, शासलिक स्टिक्स (बांबू स्टिक्स) ५ ते ६,
मॅरीनेशनसाठी साहित्य : मोहरी पूड १ चमचा, मीठ, बाब्रेक्यु सॉस २ ते ३ चमचे, (बाब्रेक्यू सॉस नसेल तर टोमॅटो केचप वापरा) व्हाइट पेपर पावडर चिमूटभर, तेल ३ ते ४ चमचे, बारीक चिरलेली लसूण १ टीस्पून, बारीक चिरलेली बेसील पाने २ चमचे (असल्यास), वरील सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र मिक्स करून मॅरीनेशन तयार करून घ्या.
कृती : तयार मॅरीनेशनमध्ये पनीर व मशरूम, ऑलीव्ह, रंगीत सिमला मिरची, डीप करून बांबू स्टिक्सला एकामागोमाग एक लावून घ्या. नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तेल टाकून या स्टिक्स ग्रिल करून घ्या. गरमागरम बाब्रेक्यू सॉसबरोबर सव्र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
March 10, 2017
गार्डन सॅन्डविच – Recipe
September 11, 2026
पाइनॅपल ज्यूस आइस क्युब ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवावे. ज्यूस गोठला की मिक्सरमध्ये क्युब्ज, नारळाचे दूध, दही, पाइनॅपल इसेंस आणि साखरेचा पाक घालून मिक्सरमध्ये फिरवावे. सव्र्हिंग ग्लासमध्ये सव्र्ह करून पाइनॅपल पिसेसने गर्निश करावे.
February 28, 2017
प्रथम लोखंडी कढईत तेल घालून त्यात सालीचा किस चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा. मग तो काढून घ्यावा. त्यानंतर कढईत तीळ व खोबऱ्याचा कीस चांगला परतावा. एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून ही चटणी चांगली कालवावी. भात- पोळीबरोबर हे तोंडीलावणे चांगले लागते.
June 9, 2017
साहित्य: ५ वाट्या जाड रवा, २ वाट्या खवलेला ओला नारळ, ३ वाट्या साखर, ३ टेबलस्पून साजूक तूप
कृती: एका भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये रवा थोडा भाजून घ्यावा व नंतर २ वाट्या ओले खोबरे घालून चांगले खरपूस भाजून घ्यावे व भाजलेला रवा परातीत काढून ठेवावा, भांड्यात ३ वाट्या साखर घेऊन त्यात साखर बुडेल एवढे पाणी घालून एक तारी पाक करावा नंतर गॅस बंद करुन त्यात रवा वेलची पूड, बदाम, पिस्त्याचे काप घालून सर्व चांगले घाटून घ्यावे व थोडा वेळ झाकून ठेवावे नंतर पाण्याचा हात लावून लाडू वळावे.
(बदाम, पिस्त्याचे काप ऐच्छिक आहेत.)
- मनिषा सुरेश पालकर
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
साहित्य : अर्धा किलो मोठी कोलंबी (झिंगे), २ कांदे, २ चहाचे चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, ४ टे. स्पून तेल, एक मोठ्या लिंबा एवढी चिंच, अर्धी वाटी किसलेले, भाजलेले सुखे खोबरे, १ मोठा कांदा, उभा चिरुन तेलात परतलेला, ७-८ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा मीठ वाटण नं. १: लसूण, कोथिंबीर चाटण नं. २: कोलंबीचे पाय (लहान नांगडे) वाटून गाळून त्याचा रस चाटण नं. ३: तळलेला उभा कांदा, भाजलेले सुखे खोबरे घ्यावी.
कृती : प्रथम कोलंबी साफ करुन (कवच काढणे) पाय तोडून वाटून ठेवणे. कोलंबीला वाटण नं. १ चोळून लावणे. त्याला हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ लावणे. एका भांड्यात तेल टाकून तापवणे. त्यात २ चिमूट हिंग टाकणे, नंतर त्यात खूप बारीक चिरलेला कांदा टाकणे. कांदा ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये मसाला लावलेली कोळंबी चांगली घालून सवताळून चाटण नं. २ घालून परतत रहावी. मधून मधून चिंचेच्या कोळाचे पाणी घालून सवताळत रहावी. झाकण ठेवू नये. मंद आंचेवर झिजत ठेवावी. शिजल्यावर वाटण नं. ३ (तळलेला मसाला) व गरम मसाला टाकावा. पांच मिनिटे उकळी येऊ द्यावी. गॅस बंद करावा. उतरल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- सौ. दिप्ती देशपांडे
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti