(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • p-1744-Triple Decker Sandwich

    डबल किंवा ट्रिपल डेकर सॅन्डविज

    प्रथम खोबरे, हिरवी मिरची, जीरे, आले, कोथिंबीर, पुदिना, दाण्याचा कूट, मीठ, साखर घालून चटणी करुन घ्या. ही चटणी ब्रेडला लावता येईल अशी पात्तळ करा. ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर ही चटणी लावून घ्या. मग त्यावर चीजची स्लाईस ठेवा. त्यावर कांदा, टोमॉटो, काकडीच्या स्लाईस ठेवा. आता दुसऱ्या ब्रेडलाही ही चटणी लावून घ्या.

      March 6, 2017


  • चीज बटाटे स्कोनस्

    चीज बटाटे स्कोनस् – Recipe

      September 11, 2026


  • p-1547-thalipeeth

    आजचा विषय थालीपीठ भाग दोन

    लाल भोपळ्याचे गोड थालीपीठ
    साहित्य :- दोन वाट्या लाल भोपळ्याचा कीस, एक वाटी गूळ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, आवश्यकतेप्रमाणे कणीक, चिमूटभर मीठ, तेल, पाव चमचा खाण्याचा सोडा.
    कृती :- भोपळ्याचा कीस व गूळ शिजवून घ्यावे.
    त्यात तांदळाचे पीठ, चिमूटभर मीठ, चमचाभर तेल व पाव चमचा खाण्याचा सोडा मिसळावा.
    त्यानंतर हे मिश्रण गार झाल्यावर त्यात मावेल इतकी कणीक घालून मळून घ्यावे व थालीपिठे लावावीत.
    अगदी मंद विस्तवावर भाजावे. थालीपीठ थोडे जाडच ठेवावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    कणकेचे गोड थालीपीठ
    साहित्य :- दोन वाट्या जाडसर कणीक, पाव वाटी तूप, पाऊण वाटी पिठीसाखर, चिमूटभर मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, थोडी वेलदोड्याची पूड.
    कृती :- वरील सर्व जिन्नस एकत्र करून व आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्यावे. तव्यावर तूप वा तेल घालून त्यावर थालीपिठे लावावीत. मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजावे. हे थालीपीठ कुरकुरीत बनते.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    थालीपीठ बर्गर
    साहित्य :- थालीपिठाची भाजणी, तिखट, मीठ, हिंग, थोडा ओवा, तेल, काकडी, टोमॅटो, कांदा, सॅलडची पाने, चीज स्लाइस, टोमॅटो सॉस, उकडलेला बटाटा.
    कृती :- थालीपिठाच्या भाजणीत मीठ, हिंग, थोडेसेच तिखट, थोडा ओवा व तेल घालून मळून घ्यावे.
    काकडी, टोमॅटो, कांदा यांच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. उकडलेल्या बटाट्याचा कुस्करून लगदा करावा. त्यात मीठ, मिरपूड घालावे. सॅलडची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. थालीपीठ भाजणीची पुरीच्या आकाराची छोटी-छोटी थालीपिठे बनवून घ्यावीत. बशीत एक गोल छोटे थालीपीठ ठेवून त्याला टोमॅटो सॉस लावावा. त्यावर काकडीची चकती ठेवावी. त्यावर थोड्या उकडलेल्या बटाट्याच्या लगद्याला गोलाकार आकार देऊन ठेवावे. त्यावर दुसरे गोल थालीपीठ. त्यावर पुन्हा टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो चकती, सॅलडच्या पानाचा तुकडा व त्यावर चीज स्लाइस ठेवावा व त्यावर तिसरे छोटे गोल थालीपीठ ठेवावे. त्यावर थोडे किसलेले चीज भुरभुरावे. हे बर्गर मायक्रोवेव्हमध्ये अर्धे मिनिट ठेवून गरम करून खाण्यास द्यावे. वेगळ्या चवीचा हा बर्गर मुलांना नक्कीच आवडेल.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    थालीपीठ पिझा
    साहित्य :- थालीपीठ भाजणी, मीठ, तिखट, हिंग, ओवा, तेल, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची (सर्व बारीक चिरून), स्वीटकॉर्नचे दाणे, टोमॅटो सॉस, चीज.
    कृती :- थालीपिठाची भाजणी घेऊन त्यात आवश्यकतेनुसार मीठ, थोडे तिखट, हिंग, थोडा ओवा व तेल घालून व थोडे पाणी घालून मळून घ्यावे व नेहमीप्रमाणे मोठ्या आकाराची थालीपिठे बनवावीत.
    प्रत्येक थालीपिठावर टोमॅटो सॉस लावावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची व उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे पसरून घालावेत.
    त्यावर किंचित मीठ, मिरपूड भुरभुरून घालावी व भरपूर किसलेले चीज घालावे.
    ओव्हनमध्ये दहा मिनिटे भाजून घ्यावे. वरचे चीज वितळले, की झाले समजावे. वेगळ्या चवीचा हा पिझा मस्त लागतो.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ
    भाजणी करण्याची कृती :- राजगिरा, साबूदाणा व वऱ्याचे तांदूळ समप्रमाणात घेऊन भाजावेत. त्यात थोडे जिरे घालावेत व सर्व एकत्र दळून पीठ करावे. ही भाजणी बरेच दिवस टिकते.
    साहित्य :- जितकी थालीपिठे बनवायची त्याप्रमाणे भाजणी घ्यावी. एक वाटी भाजणी असल्यास अर्धी वाटी दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, बारीक वाटलेली वा चिरलेली मिरची, थोडे जिरे, कोथिंबीर, तूप.
    कृती :- भाजणी, दाण्याचे कूट, मीठ, मिरची (अथवा लाल तिखट), जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर- सर्व एकत्र करून थोडे पाणी घालून मळून घ्यावे. तव्यावर तूप सोडून थालीपीठ लावावे. मंद विस्तवावर भाजावे.
    याचप्रमाणे शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ बनवता येते. भाजणीऐवजी शिंगाड्याचे पीठ घ्यावे. बाकी सर्व कृती वरीलप्रमाणे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    उपवासासाठी साबूदाण्याचे थालीपीठ
    साहित्य :- दोन वाट्या साबूदाणा, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी दाण्याचे कूट, बारीक मीठ, जिरेपूड, बारीक चिरलेल्या चार हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चमचाभर लिंबाचा रस, तूप अथवा रिफाइंड शेंगदाणा तेल.
    कृती :- साबूदाणा चार तास भिजवून घ्यावा. उकडलेले बटाटे साल काढून कुस्करून मऊ झालेल्या साबूदाण्यात मिसळावेत. त्यात दाण्याचे बारीक कूट, मीठ, मिरची, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घालून सर्व मळून घ्यावे. मिरचीऐवजी लाल तिखट पूडही घालता येईल. प्लॅस्टिकच्या कागदावर थालीपीठ थापून तापलेल्या तव्यावर तूप सोडून त्यावर घालावे. मध्ये भोक पाडून त्यातही तूप वा तेल सोडावे. मंद विस्तवावर दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत भाजून घ्यावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 19, 2017


  • p-1157-methi-parathe

    मेथीचे पराठे

    साहित्य - मेथीची पाने - १ वाटी, बेसन / चणा डाळीचे पीठ - २ चमचे, वाटलेली हिरवी मिरची / लाल तिखट - चवीनुसार, मीठ - चवीनुसार
    तीळ - १ चमचा, हिंग - १/२ लहान चमचा, हळद - १ लहान चमचा, कणिक / गव्हाचे पीठ - १ १/२ वाटी.

    कृती - मेथीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरावीत. त्यात मीठ, हिंग, हळद, मिरची पेस्ट / तिखट कालवावे. त्यात तीळ, बेसन आणि कणिक घालून गोळा मळून घ्यावा. हे पीठ थोडेसे चिकट होते त्यामुळे तेलाचा हात लावून छोटे गोळे बनवावेत आणि कणिक अथवा तांदळाच्या पिठावर लाटावेत. तेल, तूप, लोणी किंवा वनस्पती तुपावर खरपूस भाजावेत. सोबत घट्ट दही किंचित मीठ आणि तिखट भुरभुरून वाढावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 17, 2017


  • मॅक्सिकन भेळ

    साहित्य:- १ कप मका आटा, १/२ कप मैदा, १ चमचा तेल, १/२ चमचा मीठ, तेल.

    इतर लागणारे साहित्य:- १ टोमॅटो, १ मोठा कांदा, १ उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १/४ कप हिरवी चटणी, चिंचेची चटणी स्वादानुसार, मीठ, तिखट व जिरे पूड.

    कृती:- टाको तयार करण्यासाठी मक्याच्या कणकेत मैदा आणि मीठ मिसळावे. यात तेल व आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून कणीक भिजवावी. या कणकेच्या गोळ्याला १/२ तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये कापून तळून घ्यावे. कांदा, टोमॅटो, बटाटा बारीक चिरून घ्यावे. एका मोठ्या बाउलमध्ये टाकोला हाताने कु्स्करून त्यात टाकावे व बाकी उरलेले सर्व साहित्य घालून लगेचच सर्व्ह करावे. ही मॅक्सिकन भेळ खाण्यात फारच रुचकर लागते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 21, 2016


  • कच्चाकेळ्याची भाजी

    साहित्य: ४ मध्यम कच्ची केळी, २ कांदे बारीक चिरलेला, ४ हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, अर्धी वाटी ओले खोबरे, मीठ व साखर चवीपुरते, कढीपत्ता ८ ते १० पाने, कोथिंबीर, फोडणीसाठी २ चमचे तेल, पाव चमचा मोठ मोहरी, पाव चमचा हळद, चिमुटभर हिंग

    कृती: कच्ची केळी साला सकट तुकडे करुन उकडून घ्यावीत नंतर त्याची साले काढून केळ्याचा किस करुन घ्यावा. पातेल्यात तेल तापवून मोहोरी, मिरची, कढीपत्ता हळद व हिंग घालून फोडणी करावी. त्यावर चवीपुरते मीठ, साखर व ओले खोबरे घालावे. सर्व परतल्यावर केळयांचा किस घालून हलवावा. हाताने परतवावे व वरुन कोथिंबीर घालावी..

    ही भाजी मधल्यावेळचे खाणे म्हणून सुद्धा छान लागते.

    -सौ. प्राची हर्षित निमक

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • परतलेले सुरणकाप

    परतलेले सुरणकाप – Recipe

      September 11, 2026


  • Ginger-Cookie-300

    ख्रिसमस जिंजर कुकी

    एका मोठ्या भांड्यात बटर आणि ब्राउन शुगर एकत्रित फेटा. त्यामध्ये मध आणि अंड घालून एकजीव होईपर्यंत फेटत रहा. त्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि बाकीचे मसाले मिसळा. या साऱ्या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या. एका बाजूने साखरेत घोळवून घ्या आणि बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. साखर लावलेला भाग वर राहिला पाहिजे.

      December 26, 2016


  • डाएट पॅन – एक वरदान

    डाएट पॅन हा १८ – १० स्टिल पासून बनवलेला असतो. यात १८% क्रोमियम व १०% निकेल असते ज्यामुळे याचा पृष्ठभाग इतर स्टिल प्रमाणे सछिद्र नसतो तर तो एकसंघ (नॉनपोरस) असतो, त्यामुळे खाद्यपदार्थ या पॅनला सहसा चिकटत नाही.

    या प्रकारच्या स्टिलला सर्जिकल स्टिलपण म्हणतात. हे अत्यंत उच्चदर्जाचे स्टिल असते. सर्व प्रगत देशांत याच स्टिलची भांडी वापरतात. इतर नॉनस्टिक भांड्याप्रमाणे याला टेफलॉनचे कोटींग नसते, त्यामुळे ही भांडी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरता येतात. कारण नॉनस्टिक प्रमाणे या भांड्यांचे आयुष्य मर्यादित नसते.

      April 14, 2016


  • बडीशोप बदाम लाडू

    साहित्य-
    पाव किलो बेसन,
    पाव किलो बडी शोप,
    पाव किलो बदाम किवा 2 वाटी बदामाचा कूट,
    दीड वाटी सोप बारीक करून,
    खडीसाखर बारीक करून 2 वाटी किवा अंदाजे
    इलायची पूड अर्धा चमचा.,

    अंदाजे तूप
    कृती-
    बदाम व खडीसाखर मिक्सरवर बारीक करून घ्या. बडीशोप थोडी भाजून बारीक करून घ्या. कढईत साजुक तुपावर बेसन गुलाबीसर भाजून घ्या. बेसन थंड होऊ द्यावे. सर्व साहित्य एकत्र करून विलायची पूड आवडीनुसार केशर घालून लाडू वळावेत. हे लाडू अत्यंत चविष्ट लागतात.

    -- बावर्ची

      March 2, 2012