(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • hadga-paane-fule-300

    हादग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी

    हादग्याची ताटभर फुले चिरून (फुले चिरत असतांना फुलांच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो) ,दोन कांदे चिरून,एक टोमॅटो बारीक चिरून ,चवीनुसार हिरव्या मिरच्या ,मीठ व साखर, मोहरी, चिमूटभर हिंग,हळद,दोन टेबलस्पून बेसन पीठ.

      January 21, 2017


  • नूडल्स कचोरी

    नूडल्स कचोरी – Recipe

      September 11, 2026


  • लाल भोपळा आणि सफरचंदाचं सूप

    लाल भोपळा आणि सफरचंदाचं सूप

    साहित्य: अर्धा किलो लाल भोपळा, १ सफरचंद, मीठ-मिरपूड-जिरेपूड चवीनुसार, अर्धा कप दूध

    कृती: लाल भोपळा आणि सफरचंदाच्या साली काढून तुकडे करा. हे तुकडे कुकरला बेताचं पाणी घालून शिजवा. मिक्सरमधून काढा. त्यात मीठ-मिरपूड-जिरेपूड आणि दूध घाला. चांगली उकळी काढा.

      September 1, 2018


  • p-3735-tomato-saar-2

    टोमॅटोचं सार २

    साहित्य: २ टोमॅटोंचा रस, १ टोमॅटो बारीक चिरून, ३-४ कढीपत्त्याची पानं, २ टीस्पून तिळाचा कूट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून साखर, १ टीस्पून तूप, १ टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून तिखट, २ कप पाणी

    कृती: तूप गरम करा. जिरं घालून तडतडलं की त्यात कढीपत्ता घाला. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घाला. मिनिटभर परतून टोमॅटोचा रस घाला. उकळी आली की पाणी घालून मंद आचेवर शिजवा. शिजत आलं की त्यात तिखट, मीठ, साखर आणि तिळाचा कूट घाला. चांगलं उकळा.

      September 3, 2018


  • सांबार मसाला

    सांबार मसाला

    साहित्य :- धणे पाव किलो, जिरे 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, 1 टी स्पून काळे मिरे, हळद 2 टी स्पून, सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, पाव वाटी कढीपत्त्याची पाने, अर्धा वाटी सुके खोबरे.

    कृती :- प्रथम डाळी वेगवेगळ्या भाजून घ्या. (करपू देऊ नका.) उरलेले सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर सर्व एकत्र करून मिक्सरवर बारीक करा व हवाबंद बरणीत भरून ठेवा.

      July 10, 2019


  • डाळमेथी

    साहित्य- एक वाटी तुरीची डाळ, दोन वाट्या बारीक चिरलेली मेथीची पाने, एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, आवडीप्रमाणे तिखट पूड, मीठ, साखर, दोन ते तीन आमसुले, फोडणीसाठी चमचा भर तेल, मोहरी, हिंगपूड, तीन-चार लाल सुक्याे मिरच्या, १०-१२ लसूण पाकळ्या.

    कृती- तुरीची डाळ व चिरून घेतलेली मेथी एकत्रितपणे कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
    मेथीमिश्रित डाळ शिजल्यावर घोटून घेऊन त्यात धनेपूड, जिरेपूड, तिखटपूड, मीठ, साखर व आमसुले घालावीत. आमटी जशी घट्ट वा पातळ आवडत असेल त्याप्रमाणे पाणी घालावे व उकळून घ्यावे.
    नंतर त्यावर मोहरी, हिंगपूड, १०-१२ लसूण पाकळ्या, ३-४ लाल सुक्याघ मिरच्या घालून तेलाची फोडणी द्यावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 19, 2017


  • p-3132-vegetable-sandwich

    व्हेजिटेबल सँडविच

    साहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे ३ चमचे भरून, मोठा टोमॅटो, १ तासलेली काकडी, १ उकडून सोललेला बटाटा, थोडेसे मीठ, अर्धा चमचा मिरपूङ

    कृती : सुरी वापरता येत असेल तर टोमॅटो, काकडी, बटाटा यांचे पातळ पातळ तुकडे करा. ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने अमूल बटर लावून नीट पसरवून घ्या. थंडीचे दिवस असेल तर अमूल बटर एका वाटीत घालून ती वाटी गरम पाण्यात ठेवा म्हणजे ते पातळ होऊन सर्व ब्रेडला नीट लावता येते. आता त्यावर काकडीचे तुकडे ठेवा व अगदी थोडे मीठ वरून घाला. नंतर टोमॅटोचे तुकडे ठेवा व त्यावर बटाटयाच्या चकत्या ठेवा पुन्हा अगदी थोडे मीठ वरून टाका आणि मिरपूडही टाका, त्यावर दूसरा ब्रेडच्या स्लाइस घालून दोन्ही हातात मिळून ते जरा दाबा. सुरीने सॅडविचचे एकसारखे दोन किंवा दोन त्रिकोण होतील अशारितीने तुकडे करा. याच पध्दतीने चारी सॅडविच तयार करा. खायला घेताना बरोबर टोमॅटो साँस घ्या.

      August 3, 2018


  • कर्नाटकी लोणचे

    साहित्य:- लोणच्याची कैरी 3 किलो, काळी मोहरी 250 ग्राम, जिरे 50 ग्राम, मिरी , लवंग प्रत्येकी 10,15 मेथी , शाजिरं प्रत्येेकी साखरेचा 1 चमचा, लसूण सोलेल्या पाखळ्या मूठभर, शेंगदाणे तेल एक बॅग, मीठ.

    कृती:- कैरी घेतानाच कापून घ्यावी आणि घरी त्याच्या अजून लहान फोडी कराव्या. स्वच्छ करून म्हणजे त्यातील कोय, पातळ पापुद्रा काढून टाकून स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन त्यात मूठभर मीठ , एक चमचा हळद घालून मिक्स करावे. एका बरणीत हे सगळे भरून बरणी एका कोपऱ्यात ठेऊन द्यावी रात्रभर. काही कारणाने लगेच लोणच्याचा मसाला नाही करता आला तरी हे मिश्रण असेच मुरत राहते सो फिकर नोट.लोणचं करताना बनवून ठेवलेले कैरीचे मिश्रण चाळणीत काढून सुटलेलं पाणी निचरून टाकावे. मोहरी ,जिर, अर्ध्या लवंगा न मिरी भाजून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. तेल उकळून घ्यावे त्यात लसूण पाकळ्या तळून त्यातच अक्खी मोहरी, मिरे , लवंगा, शाजिरे,मेथी एकत्र तळून गॅस बंद करावा आणि हे मिश्रण थंड करायला ठेवावे. एका मोठ्या परातीमध्ये मिक्सरमधून काढलेल बारीक मिश्रण ,100 ग्राम लाल तिखट ( मी 150 ग्राम घेतले जास्त तिखटासाठी) 4 मोठे चमचे मीठ एकत्र करून त्यात सर्व तळलेल्या मिश्रण सकट तेल घालून नीट एकत्र करावे. मीठ , तेल थोडे जास्तच घालावे ज्याने लोणचे टिकते. हे मिश्रण चांगले थंड झाले की बरणीत भरून झाकण लावून त्यावर स्वच्छ सफेद कापड बांधावे(बहुतेक हवा जाऊ नये म्हणून असेल).रोजच्या रोज लोणच्याला बरणीतच खालीवर करून परत मिश्रण एकत्र करावे.

    वि.सु.:- लोणचे पूर्णपणे बुडेल एवढे तेल वरती असायला हवे.

      November 28, 2024


  • भेळपुरी

    साहित्य : ३ वाट्या चुरमुरे , १०० ग्राम बारीक १ नंबर शेव, लिंबू किंवा कैरी, ३ मोठे कांदे , २ मोठे बटाटे, २ टोमाटो, थोड्या कडक पुऱ्या, तिखट चटणी , गोड चटणी, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर.

    गोड चटणी साहित्य :
    ११ ग्राम खजूर, थोडी चिंच, गुळ व मीठ चवीनुसार

    कृती :

    खजुरातील बी काढून टाकावी ,नंतर गुळ बारीक चिरावा, व चिंचेचा कोळकाढून घ्यावा, खजूर मिक्सर मधे वाटून घ्यावे, त्यात गुळ, चिंचेला कोळ व मीठ टाकून चटणी पातळ करून घ्यावी.

    तिखट चटणी:
    ५-६ हिरव्या मिरच्या, थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार

    कृती :
    मिरच्या ,पुदिना , कोथिंबीरहे सर्व एकत्र करून त्यात मीठ घालून मिक्सर मधे वाटावे.नंतर त्यात आणखी पाणी घालून पातळ चटणी करावी.

    भेळ कृती:
    एका भांड्यात चुरमुरे, बारीक चिरलेला बटाटा, कांदा, टोमाटो, कैरीचे बारीक तुकडे, मीठ , कुस्करलेल्या कडक पुऱ्या एकत्र घ्याव्यात, त्यात तिखट व गोड चटणी टाकावी, मग सगळे एकत्र करावे, मग त्यावर बारीक शेव व कोथिंबीर टाकावी. भेळ तयार !

      April 14, 2016


  • p-984-Rajma

    राजमा आणि भाज्या

    साहित्य - 2 वाट्या रात्रभर भिजवून सकाळी शिजवून घेतलेला लाल राजमा, 1 कांदा बारीक चिरून, 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (अथवा 2 मोठे टोमॅटो गरम पाण्यात अर्धा मिनीट ठेवून बाहेर काढावेत, म्हणजे त्याची साले निघतील. साले काढून टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.), अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ व थोडी साखर, थोडे तेल.

    भाज्या बनविण्यासाठी - फ्लॉवर, राजमा, गाजर, बेबी कॉर्न, मशरूम यांचे तुकडे दोन वाट्या शिजवून घ्यावे. 1 कांदा, एक सिमला मिरची बारीक चिरावी. मीठ, मीरपूड तसेच 1 मोठा चमचा बटर घ्यावे. टोबॅस्को अथवा चिली सॉस एक चमचा घ्यावा.

    व्हाइट चटणीसाठी - 1 चमचा लोणी, 2 मोठे चमचे मैदा किंवा कणीक, 1 ते दीड कप दूध, मीठ, मीरपूड, 1 वाटी किसलेले चीज.

    कृती - प्रथम एका पातेल्यात थोडे तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे सर्व परतून घ्यावे. त्यात टोमॅटोची प्युरी घालून नीट ढवळावे. नंतर त्यात जिरेपूड, मीठ, साखर घालून त्यात शिजवलेला लाल राजमा घालून हे मिश्रण तयार करून ठेवावे.

    दुसऱ्या पातेल्यात लोणी वितळवून त्यात कांदा व सिमला मिरची परतून घ्यावी. त्यात शिजवलेल्या सर्व भाज्या, मीठ, मीरपूड घालावे. थोडा सॉस मिसळावा. नंतर व्हाईट सॉस बनवून घ्यावा. त्यासाठी 1 चमचा लोण्यात मैदा किंवा कणीक परतून घ्यावी. त्यात दूध घालून सतत ढवळावे, नाही तर गुठळ्या होतील. लागल्यास दूध आणखी थोडे घालावे. चवीनुसार मीठ व मीरपूड घालावी. बेकिंग डिशमध्ये थोडे लोणी सगळीकडे पसरून लावावे. प्रथम तयार केलेल्यालाल राजम्याचा थर पसरावा. त्यावर तयार केलेल्या भाज्या घालाव्यात. त्यावर व्हाइट सॉस घालून सगळीकडे नीट पसरावे. शेवटी त्यावर किसलेले चीज पसरून ओव्हनमध्ये 12 ते 15 मिनिटे बेक करून घ्यावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      March 3, 2018