महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
एक वाटी दूध गरम करून त्यात अळीव भिजत घालावे. दोन तासाने तुपावर रवा भाजून घ्यावा, त्यात खोबरं, चिमूटभर मीठ, अळिवासकट दूध आणि उरलेलं दूध घालून रवा शिजवावा, त्यात गूळ घालून मऊ सांजा करावा, जायफळ घालावं. कणकेमध्ये चवीला मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून सैलसर कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने कणकीच्या पारीत सांजा भरून, लाटून पोळ्या भाजाव्या. हा पराठा खायलाही चविष्ट आणि पौष्टिकही असतो.
January 16, 2017
साहित्य: पाव किलो चिकन, पाव कप घोटलेली मलई १ कप दूध, २ टीस्पून कॉर्नफ्लोअर, पाव टीस्पून किसलेले आले, पाव टिस्पून गरम मसाला - लवंग, दालचिनी, काळेमिरे यांची पावडर मीठ, मिरेपूड चवीप्रमाणे.
कृती: वेळ: ४५ मिनिटे चिकन स्वच्छ धुवून घ्या. ३-४ कप पाण्यात आल व गरम मसाला घालून शिजवून घ्या. थंड झाल्यावर चिकन पिसेस मधील हाडे बाजूला काढून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. नंतर हे एकजीव झालेले मिश्रण मोठ्या गाळणीने गाळून घ्या. गाळलेल्या मिश्रणात मीठ घालून ते उकळत ठेवा. दूध व कॉर्नफ्लोअर यांची पेस्ट करून त्यात टाका व हे मिश्रण उकळू द्या. सूपाचा घट्टपणा कमी करण्यासाठी अंदाज घेऊन थोडे पाणी टाका.
गरम सूप बाऊलमध्ये वाढल्यानंतर वरून थोडे क्रीम किंवा घोटलेली मलई घाला, थोडी मिरेपावडर पसरवा.
September 10, 2026
चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते.
February 3, 2017
काजूचे पकोडे – Recipe
September 11, 2026
टॉमेटोला चिरा द्याव्यात, कांद्याचे मोठे तुकडे करावे, टॉमेटो, कांदा, कोथिंबीर काड्या, लसूण एकत्र करून वाटीभर पाणी घालून कुकरमध्ये १ शिटी करून वाफवून घ्यावे, पाण्यातून उपसून मिक्सर / ब्लेंडर मध्ये बारीक वाटून घ्यावे, चाळणीतून गाळून घ्यावे, भांड्यात तूप गरम करून त्यात हिंग, जिरे, दालचिनीची फोडणी करावी, त्यावर गाळलेले मिश्रण घालून त्यात शिजविण्यासाठी वापरलेले पाणी घालावे, मीठ घालून १ उकळी आणावी.
March 9, 2017
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० - १५ मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: ३०-३५ मिनिटे
४ व्यक्तींसाठी
आवरणासाठी लागणारे साहित्य: १ वाटी मैदा, ३/४ वाटी बेसन, हळद, मीठ चवीनुसार, १/४ छोटा चमचा हींग, १ मोठा चमचा तेल.
सारणासाठी लागणारे साहित्य: १/२ वाटी किसलेले सुखे खोबरे, १ मोठा चमचा खसखस, हळद, लाल मिरची पूड, १ मोठा चमचा पांढरे तीळ, १/२ छोटा चमचा धणे पूड, १/२ छोटा चमचा जिरे पूड, १/४ छोटा चमचा हींग, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, पीठी साखर १ छोटा चमचा, चिंचेचा कोळ.
आवरण बनविण्याची कृती: एका भांड्यात मैदा, बेसन, हळद, मीठ, हींग व तेल घालून एकजीव करून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडासे घट्ट पीठ मळुन घ्यावे. झाकण ठेवून १० मिनिटे बाजूला करून ठेवावे.
सारण बनविण्याची कृती: सर्व प्रथम एका भांड्यात किसलेले सुखे खोबरे, खसखस, हळद, पांढरे तीळ, लाल मिरची पूड, धणे पूड, जिरे पूड, मीठ व साखर घेवून चांगले एकजीव करून घ्यावे. मिक्सरला लावून थोडेसे जाडसर वाटून घ्यावे व या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावि.
या पुढील कृती: तयार पीठाचे समान भाग करून घ्यावे. पोळपाटावर थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यावी. तयार पोळीवर चिंचेचा कोळ चमच्याने पसरून घ्यावा त्यावर सरणाचे मिश्रण पसरावे आणि घट्ट रोल करावा. रोल घट्ट झाला नाही तर सारण बाहेर येते. सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे. तेल गरम करावे व तयार भाकरवडी गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत. बाकरवडी थंड झाली की हवाबंद डब्ब्यात ठेवाव्यात.
August 23, 2018
नारळ फोडून खवून घ्यावा. खवा भाजून घ्यावा. केळ्याचे पाव इंचाचे गोल काप करावे. एका पसरट भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र कालवावे. पुडिंग लहान मूद पाडून सर्व्ह करावे.
May 10, 2017
गव्हाच्या कुरडया करताना ओले गहू भरडले जातात. त्याचा चीक वापरात येतो, मात्र वर जो कोंडा शिल्लक राहतो
December 24, 2016
कांदा, आले व लसूण वाटून तेलात परतून घ्या. त्यात टोमॅटोपेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट व धनेपूड मिसळून व्यवस्थित परतून घ्या. यात बेबी कॉर्न व एक कप पाणी घालून उकळा व पाच मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. नंतर गरम मसाला, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या व कोथिंबीर मिसळा. क्रीमने सजवून खाण्यास द्या.
December 21, 2016
भावनगरी मिरचीला उभे कापून आतल्या बिया काढाव्यात. एका भांडय़ात पनीर, बटाटे, तिखट, काजू- बेदाणे, मीठ टाकून एकजीव करून घ्यावे.
March 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti