महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य :
द्राक्षे २५० ग्रॅम, एक मोसंबी, एक लिंबू, मध तीन चमचे, साखर तीन चमचे, थोडीशी मिरपूड, एक ग्लास पाणी.
कृती :
द्राक्षे धुऊन, कोरडी करुन बिया काढून टाकाव्या. मोसंबी सोलावी, लिंबाचा रस काढावा.
नंतर द्राक्षे, मोसंबी, लिंबू रस, मध, साखर, पाणी एकत्र करुन मिक्सर मधून काढून एकजिनसी करावे. मिश्रण गाळून घ्यावे.
थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर त्यात थोडी मिरपूड व पुरेसे पाणी घाला. आणि प्यायला द्या.
April 30, 2016
साहित्य:- १ वाटी उकडलेले मटार, तेल, हिंग, जिरे वा स्वच्छ निवडलेली कोथिंबीर पाव वाटी, पाव वाटी ओले खोबरे, मीठ साखर घाला व मिक्सपरमध्ये घालून व किंचित पाणी घाला व चटणी तयार करा व लिंबू पिळून ढवळून घ्या. ही चटणी सॅंडवीच करता खूप छान लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
December 26, 2016
६-७ टोमॅटो,आल्याचा छोटा तुकडा,१०-१२ काजूच्या पाकळ्या,१०-१२ मकाणे,वाटीभर फ्रेश क्रीम,अर्धी वाटी दूध,चवीनुसार मीठ,अर्धा चमचा जिरे,२-३ टेबलस्पून तेल,एक वाटी दही,२-३ लाल सुक्या मिरच्या,एक छोटा चमचा हळद,एक चमचा गरम मसाला,अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर,सजावटीसाठी फ्रेश क्रीम.
June 8, 2017
साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, दोन वाट्या किसलेला कोबी, दोन वाट्या किसलेले गाजर, अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, एक लिंबाचा रस, मीठ व साखर चवीप्रमाणे, तेल, हिंग, मोहरी.
कृती : मेथी, गाजर, कोबी, खोबरे व कोथिंबीर एकत्र करावे. त्यात चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस घालावा. वरून हिंग, मोहरीची फोडणी द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 20, 2017
साहित्य:- १ कप बेसन, २ मध्यम कांदे उभे पातळ काप १ चमचा धणे ठेचून बारीक केलेले, १ टेस्पून कसूरी मेथी, १ टीस्पून लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून हळद १/४ टिस्पून बेकिंग सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर,
कृती:- एका भांड्यात सर्व साहित्य घालून चांगले ढवळावे आणि ५ मिनीटे झाकून ठेवा. कांद्याला मीठा मुळे थोडे पाणी सुटेल. लागल्यास थोडे पाणी घाला पण ते खूप ओले करू नका त्यामुळे भजी खुसखुशीत होणार नाहीत. आपल्या हाताला किंचित तेल लावून भजी करून घ्या. आता एअर फ्रायर २०० अंश से वर ५ मिनिटे प्रिहिट करा. हलके तेल लावलेली एक अॅल्युमिनियम फॉइल ठेवा, भजी बास्केट मध्ये घालून त्यात ठेवा. ५ मि. एअर फ्राय करा. मग बास्केट बाहेर काढून दुसऱ्या बाजूला भजी उलटी करा थोडेसे तेल ब्रश करा व परत ५ ते ६ मिनिटे एअर फ्राय करा. २ ते ३ मिनिटे फ्रायर मध्येच भजी राहू द्या. नंतर, आपण बास्केट काढू शकता. हिरवी चटणी / चिंचेची चटणी बरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
August 22, 2018
बुंदी की कढी
काही वेळेला पकोडे बनवायला वेळ नसतो, तेव्हा कढी बनवून गॅस बंद करून कढी थोडी गार झाल्यावर खारी बुंदी १ कपभर मिसळा. वर कोथिंबीर व थोडा चाट मसाला पेरा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पनीर की कढी
साहित्य- १ कपभर पनीरचे तळलेले तुकडे, १ कांदा, १ टॉमेटो, आले-लसूण पेस्ट प्रत्येकी १ चमचा, जिरे, हिरव्यामिरच्या, गरम मसाला.
कृती- थोडय़ा तुपावर जिरे, हिरव्या मिरच्या, कांदा परता. आले, लसूण पेस्ट, टॉमेटो घालून तूप सुटेपर्यंत परता. गरम मसाला व पनीर घाला. त्यात तयार कढी घाला व वरून फोडणी द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आलू की कढी
साहित्य व कृती- २ बटाटे व २ कांदे घेऊन चिरा (बटाटे उकडून त्याचे लहान तुकडे करा.). थोडय़ा चिरलेल्या हिरव्या मिरच्या व २ तुकडे दालचिनी, २ लवंगा घ्या. कढी उकळल्यावर थोडय़ा तुपावर लवंगा, दालचिनी, हिरव्या मिरच्या, कांदे परता. त्यात बटाटय़ाच्या फोडी घाला. हे मिश्रण कढीत घाला. नंतर वरीलप्रमाणे फोडणी द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सिंधी कढी
साहित्य- या कढीत बऱ्याच भाज्या घालतात. ८ भेंडय़ा, १० गवारीच्या शेंगा, ८ श्रावण घेवडे- २ इंचांचे तुकडे करा. २ मोठे बटाटे सोलून तुकडे करा. १ वांगं स्लाइस करा. ५ फ्लॉवरचे तुरे, ५ मोठे टोमॅटो.
मसाला- अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथी दाणे, हळद अर्धा चमचा, तिखट, कढीलिंब, पाव जुडी कोथिंबीर चिरून, ३ हिरव्या मिरच्या, तेल ५ टेबलस्पून, ५ टेबलस्पून बेसन, २-३ आमसूलं.
कृती- गवार, घेवडा उकडून घ्या. भेंडी, वांगी, बटाटे, फ्लॉवर तळून घ्या. तेलात जिरे व मेथी घाला. तडतडल्यावर बेसन घालून खमंग भाजा. त्यात टॉमेटोचा रस घाला. गुठळ्या होऊ देऊ नका. हळद, तिखट, मीठ घाला. सर्व भाज्या घाला. आमसूल पाण्यासकट घाला. कढीलिंब व कोथिंबीर घाला. झाकण ठेवून ५ मिनिटांनी गरम भाताबरोबर वाढा. पातळ पिठल्याप्रमाणे करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गुजराती कढी
साहित्य- ५-६ वाटय़ा आंबट ताक, १ पिकलेलं केळं कुस्करून, दीड टेबलस्पून बेसन, हळद, मीठ, २ टेबलस्पून साखर. सर्व एकत्र घुसळा.
मसाला- १ आलं, ३ हिरव्या मिरच्या, २ चमचे धने, १ चमचा जिरे, ५ लसूण पाकळ्या, थोडं ओलं खोबरं, सर्व बारीकवाटून ताकाला लावा. सर्व उकळा. यात आवडत असल्यास मुळ्याच्या, काकडीच्या चकत्याही घालतात.
फोडणी- तुपात कढीलिंब, लाल मिरच्या, पाव चमचा मेथी घालून फोडणी करा. कढीवर ओता. खिचडीबरोबर वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हरे चने की कढी
साहित्य व कृती- १ कप सोलाणे कुकरमध्ये शिजवा. हाताने मऊ करा. तुपावर हिंग पावडर, वाटलेल्या हिरव्या मिरच्या व मऊ केलेले हरभरे घाला. त्यात दही, पाणी, बेसन (कमी घ्या) इत्यादी घुसळून घाला. शिजवून वर फोडणी द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कैरीची कढी
साहित्य व कृती- १ कैरी उकडून, गर काढून घ्या. त्यात ६ वाटय़ा पाणी घाला.
मसाला- २ चमचे धने, १ चमचा तांदूळ, १ चमचा उडदाची डाळ, १० दाणे मेथी, २ सुक्या मिरच्या तेलावर परतून वाटा. हा मसाला वरील पाण्याला लावा. चवीला गूळ, नारळाचे दूध, मीठ, कढीलिंबाची फोडणी द्या. नारळाचे दूध घातल्यावर उकळू नका.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मूगदाल की कढी
या कढीला ‘कतरों की कढी’ असे ही म्हणतात.
साहित्य व कृती- १ लहान वाटी मुगाची डाळ भिजवून, वाटून घ्या. त्यात जिरेपूड, धनेपूड, आमचूर, तिखट, मीठ घालून छोटी भजी तळा (मूगवडय़ाप्रमाणे). तयार कढीत भजी घालून वर फोडणी द्या. कढी पचायला त्यातल्या त्यात हलकी समजली जाते. खिचडीबरोबर खातात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पंचमेल कढी
साहित्य: १०० ग्रॅम बेसन,१५० ग्रॅम पालक,१०० ग्रॅम हरभऱ्याची पालेभाजी,५० ग्रॅम मेथी, दोन ५० ग्रॅम ची पालेभाजी मिळत असेल ती,हिंग,१ तुकडा आले,तूप,मीठ चवीप्रमाणे,लाल तिखट,हळद,धणे,
कृती: सर्व पालेभाज्या निवडून बारीक चिरुन घ्या शिजवून मिक्सरमधून काढा. दह्यात बेसन व सर्व मसाले मिक्स करा. कढईत तूप टाकून कांदा व टॉमेटो परतून घ्या.बेसन मिक्स केलेली पेस्ट व पालेभाजीची पेस्ट टाकून भरपूर शिजवा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
March 16, 2017
साहित्य: अर्धा किलो चिकन, ४-५ कप चिकन स्टॉक, ५-६ बांबूशुटसचे तुकडे, ४-५ बटण मशरूम्स, १ लहान गाजर, अर्धा कप चिरलेला कोबी, अर्धा टी स्पून अजिनोमोटो, पाव टी स्पून काळेमिरे पावडर, १ टी स्पून मीठ, पाव टी स्पून किसलेले आले, पाव कप कांद्याची पात.
कृती: वेळ: ४० मिनिटे प्रथम बांबूशूटस उभे पातळ चिरावे व पुन्हा मध्ये थोडे चिरून थोडा वेळ पाण्यात भिजवावे. गाजर तिरके चिरून पुन्हा छोटे चौकोनी तुकडे करावेत. मशरूम्सचे मध्ये दोन भाग करावेत व चौकोनी बारीक तुकडे करावेत. कोबीचे बारीक चौकोनी तुकडे करावेत. चिकन बोनलेस करून चौकोनी पातळ तुकडे करावेत. पातेल्यात स्टॉक उकळत ठेवावा. प्रथम त्यात चिकनचे तुकडे घालावेत. नंतर सर्व भाज्या एकामागून एक घालत स्टॉक उकळत ठेवावा. २-३ मिनिटे चांगली उकळी आली की मीठ, मिरेपावडर, किसलेले आले इत्यादी घालावे. शेवटी चिरलेली कांद्याची पात घालावी. सूप चांगले उकळवावे व गरमागरम सर्व्ह करावे.
September 10, 2026
मैदा १ कप, बेकिंग पावडर १ चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, अमूल बटर पाव कप, पायनापल इसेन्स पाव चमचा, कन्डेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, पिठीसाखर १ मोठा चमचा.
December 30, 2016
फळातील गराच्या रंगावरून प्रामुख्याने सफेद पेरू व गुलाबी पेरू अशा दोन जाती दिसून येतात. महाराष्ट्रात सरदार या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. या जातीची फळे आकाराने मोठी व गोलसर असून बियांची संख्या कमी असते. फळातील गर चवीस गोड असून तो पांढऱ्या रंगाचा असतो.
November 10, 2016
साहित्य: जव्हाच्या पिठाच्या एक वाटी बोटवे, एक वाटी खवणलेले खोबरे. एक वाटी गरम दूध, पाऊण चाटी साखर, तुप पाच चमचे, वेलची पावडर अर्धा चमचा, ड्रायफ्रुट पावडर एक चमचा (काजु - पिस्ता बदाम)
बोटव्याची कृती: गव्हाच्या पिठांत १ चमचा तुप व भिजवण्यापुरते दुध घालुन पिठ व्यवस्थित मलूल प्यावे. व बोटांनी त्या पिठाच्या बारीक बारीक बोटव्या कराव्यात.
बोटव्याच्या शिऱ्याची कृती: वरील प्रमाणे केलेल्या बोटव्या हलक्याशा भाजून घ्याव्यात त्यानंतर एका कढईत तुप घालून तापलेल्या तुपात बोटव्या घालाव्यात त्यानंतर त्यात वणलेले खोबरे घालावे व हे मिश्रण व्यवस्थित परतुन घ्यावे त्यानंतर त्यात गरम दूध घालावे. घातल्यावर मिश्रण फुलून येईल मग त्यात साखर घालून व्यवस्थित घाटून घ्यावे व निमरत हाकावे. चांगली वाफ आल्यावर त्यात वेलची पावडर व ड्रायफ्रुट पावडर टाकावी. व आपल्या आवडीप्रमाणे सजावट करुन बोटव्यांचा शिरा सर्व्ह करावा.
सौ. प्रिती दिलीप देशमुख
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti