संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत ।
जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।।
जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी ।
नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।।
मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी ।
मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।।
पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही संकटे ।
मानव निर्मित युद्ध दंगली, सूड भावना तेथे पेटे ।।
विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे ।
बिघडले घर देईल बांधूनी, विश्वास बाळगी ईश्वराकडे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 27, 2020
एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं
भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी ।।
भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा
जाणीव होई येतां प्रसंग, त्याला कटण्याचा ।।
धरतीवरी कोसळत असतां, दृष्टी टाकी आकाशीं
इतर पतंग बघूनी बोलला, तोच स्वतःशीं ।।
" नभांग मोठे दाही दिशा त्या, संचारा स्वैरपणें
आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळें जगणें " ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 12, 2016
आत्ताचा क्षण सुंदर करा...
कारण येथे
अनंता शिवाय
अनंत काहीच नाही.
जे निघून गेले,
ते काळाच्या ओंजळीत विलीन होत गेले.
जे येणार आहे,
ते अजून नियतीच्या श्वासातही जन्मलेले नाही.
मग उरले काय?
हा एक श्वास...
जो आत येतो,
आणि सांगून जातो
"तू जिवंत आहेस,
कारण तुझ्यात तो अनंत अजूनही धडधडतो."
जग जिंकण्याच्या धावण्यात
माणूस स्वतःलाच हरवून बसतो.
आकाश मोजण्याच्या हट्टात
स्वतःच्या अंतःकरणाचा अथांग सागर
त्याच्या नजरेतून निसटून जातो.
क्षण कधीच साधा नसतो.
तो ईश्वराने लिहिलेली
एक मौन प्रार्थना असते.
ज्याला ऐकण्यासाठी
कान नव्हे,
तर शांत झालेले मन लागते.
फुल उमलताना आवाज करत नाही,
सूर्योदयाला घोषणांची गरज नसते,
नदी वाहताना
तिच्या प्रवाहाचा गर्व नसतो.
अनंतही असाच असतो
निःशब्द...
पण सर्वत्र.
स्वतःला इतके रिकामे करा,
की प्रत्येक श्वासात
त्याची चाहूल लागेल.
इतके नम्र व्हा,
की प्रत्येक भेटणाऱ्या जीवात
त्याचाच चेहरा दिसेल.
कारण प्रेम म्हणजे
दोन हृदयांचा नव्हे,
तर एका अनंताचा
स्वतःलाच दिलेला स्पर्श.
मृत्यूही शेवट नसतो.
तो फक्त
एका श्वासातून दुसऱ्या शाश्वत शांततेत
उतरलेला प्रकाश असतो.
म्हणून...
या क्षणावर प्रेम करा.
यालाच कवटाळा.
यालाच नमस्कार करा.
कारण येथे
ना भूतकाळ आहे,
ना भविष्यकाळ...
येथे फक्त
अनंत आहे.
आणि त्या अनंतात
'मी' विलीन होतो,
'तू' विलीन होतोस,
उरते फक्त एक अखंड सत्य...
*आत्ताचा क्षण सुंदर करा...*
*कारण येथे अनंता शिवाय*
*अनंत काहीच नाही.*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 22, 2026
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.
Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook................
-- श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर)
February 15, 2016
पहाटे पहाटे गांजाचे दम लावून आमची गँग सफाई मोहिमेवर निघाली काही जणांच्या हातात झाडू होते , तर काहींनी खराटे आणले होते मात्र दोन जणांनी काहीच आणले नव्हते त्यांना विचारले तर म्हणाले घरचे झाडू , खराटे सकाळी घरी लागतात म्हणून नाही आणले , मात्र हे दोघेही एकदम झकपक कपडे घालून आले होते त्यापैकी एकाने नवा ‘सफारी ‘ आकाशी रंगाचा तर दुसऱ्याने झब्बा आणि पायजामा घातला होता क्रीम कलरचा , मला त्यांचे ते कपडे पाहून जरा नवल वाटले हे असे कपडे घालून हे कसले झाडू मारणार ?
January 30, 2020
शांत व्हावे, आठवांचे मोहोळ
साठव जागवित काळीज थकले
जगायचे ते सारे जगुनी झाले
भोगण्यासारखे काही न उरले
स्मरणी दिव्यत्वाचे स्पर्श ममत्वी
ते भाग्य कृपाळू जगवित राहिले
ऋतुऋतु भारले दृष्टांत निसर्गी
स्थित्यंतरे सृष्टित घडवित राहिले
भौतिक सुखाला, विटुनी जाता
ध्यास परमार्थाचे जीवास लागले
अंतर्मुख झालो जेंव्हा हॄदयांतरी
सत्यार्थ जीवनाचे उलगडुनी गेले
--वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. २७४
२८/१०/२०२२
November 3, 2022
असले जरी शिक्षण बेताचे
वागलो नाही कधी विचित्र,
चाळीतील मध्यमवर्गी आम्हीं
राहत होतो एकत्र !
चाळीने आम्हांला शिकविले
भेदभाव विसरायला,
प्रसंग कोणावर बिकट आला
शिकविले प्रथम मदत करायला !
चाळीत कॉमन नळाला
पहाटे पाचला पाणी,
सातवाजता पाणी गेल्यावर
मिळणार नाही थेंब पाणी !
ब्रशने दात घासता घासता
भरभर प्रातर्विधी उरकायचे,
दुधासाठी सेंटरवर धावायचे
मध्येच घुसून दुध आणायचे !
पाण्यासाठी सगळ्यांची लगबग
सकाळी भांडणं कायमची,
पाणी जायच्या आत
सगळी आन्हिके उरकायची !
चाळीतील कॉमन नळाने
शिस्त लावली लौकर उठायची
पाण्याची काटकसर करण्याची
पाणी जपून वापरायची !
थंडीचे दिवस म्हणून
उठलो नाही लौकर,
शाळेला उशीर होईल
म्हणून अंघोळी केली भरभर !
देवापुढे जोडून हात
घाईघाईत नाष्टा केला,
पँटीत शर्ट कोंबून
शाळेचा रास्त घराला !
आदल्या दिवशी विसरलो
दप्तरात पुस्तके भरायला,
पहिला तास गणिताचा
भलताच भारी पडला !
येउदे प्रसंग कोणावर काही
एकजुटीने लढणारच,
आमची चाळ आहे म्हंटल्यावर
त्यात वाचाळ काही असणारच !
चाळीतल्या गमतीजमती वेगळ्या
फॅल्याट सिस्टीम मध्ये कुठे दिसायला !
भांडलो जरी किती तरी
शेजारी येती सोडवायला !
-- जगदीश पटवर्धन
January 13, 2017
पूर्वी कसे नवरात्रीला
नऊ दिवस आपण
नऊ रंगाचे कपडे
परिधान करायचो...
तू नाचायचीस मनसोक्त
आणि मी तुझं ते
नाचणं डोळेभरून
पाहत राहायचो...
रंगाच फार काही नाही
पण तू जवळ असल्यावर
मी नेहमीच आनंदात
भरभरून जगायचो...
तुझा आनंद मी माझ्या
हृदयात साठवून तो
साऱ्या जगाला हसत
आनंदाने वाटायचो...
आता फक्त राहतो उभा
तुझी वाट पाहत
तसाच त्या वळणावर
जसा पूर्वी राहायचो...
© कवी - निलेश बामणे
दिनांक - ९ ऑक्टोबर २०२१
October 13, 2021
April 3, 2022
फेसबुकवरुन आलेली एका अज्ञात कवीची सुंदर रचना…
November 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti