(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विधी लिखीत

    विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित

    कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।

    राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी

    राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।

    नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे

    परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।

    आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं

    काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।

    दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे

    राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।

    सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन

    सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 9, 2020


  • खरी पूजा

    गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती ।
    श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१।

    भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी ।
    शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२।

    प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती ।
    विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३।

    भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर ।
    पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर ।४।

    गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे ।
    साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते ।५।

    सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत ।
    मनी इच्छीले कमी न पडावे तिच्या सेवेत ।६।

    साडी चोळी बांगड्या आणि पक्वान्नाचे ताट ।
    अर्पण केले जगदंबेला म्हणून स्तोत्र पाठ ।७।

    पूजा अर्चा संपवूनी डोंगर पायथी आला ।
    यथासांग विधीने मनी तोषला ।८।

    संपत असता यात्रा घटना एक घडली ।
    एक दुर्बल भिकारी, चक्कर येऊनी पडली ।९।

    धावून गेला मदत करण्या हा तिजला ।
    औषधोपचार करूनी, अन्न देई पोटाला ।१०।

    आशीर्वाद घेऊनी गेला, त्या दुर्बल बाईचे ।
    समाधान देई आनंद, त्याला या घटनेचे ।११।

    यात्रेमधला खरा आनंद तो यातच मिळाला ।
    श्री देवीच्या पूजेहूनी क्षण हा श्रेष्ठ तो ठरला ।१२।

    केली होती पूजा सेवा जीवंत आईची ।
    अंतर्मनाने पोच दिली खऱ्या समाधानाची ।१३।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 18, 2015


  • लोकशाहीच्या नावाने चांगभलं…!!

    मतदान हा लोकशाहीचा उत्सव... चार दिवसांचा... त्या साठी आपले गावातील संबंध खराब करु नयेत, कर्ज काढून खर्च करू नये... हे सांगण्याचा प्रयत्न....

    `आम्ही साहित्यक फेसबुक ग्रुप'चे लेखक श्री रघू देशपांडे, नांदेड, यांची ही रचना


    गावोगावी वेशीवर
    लोकशाहीचा नगारा
    गल्लीच्या कुशीवर
    भाऊबंदकी नजारा...
    जातीपातीची वाटणी
    गोळाबेरीज मांडली
    गावएकीची चटणी
    सत्तेपायी वाटली...
    गोंधळ जागवला
    स्वार्थी कुरघोडीने
    अख्खा गाव नागवला
    रात्री अफाट खर्चाने...
    क्षणांचे राजकारण
    भिंती घातल्या मनात
    भाऊ भाऊ करीती रण
    कोण किती तें पाण्यात..
    बॅलेटचे मतदान
    बुलेटने ठरु लागलें
    गावोगावी अन्नदान
    मदिरापान झडू लागले...
    आली आली लोकशाही
    गाव नशेने झिंगला
    कुणा एका पाटलाने
    आपला मळा विकला...
    अमाप खर्च करून
    लोकप्रतिनिधी जिंकला
    विकासाच्या नावा वरुन
    बेल भंडारा उधळला...
    यासाठी का दिले भावा
    संविधान भिमाने...?
    मतदान घ्यावे भावा
    आप आपल्या सत्कर्माने...!!
    -- रघू देशपांडे
    नांदेड

      January 4, 2021


  • दगड

    दगड फुटतो, शिल्प बनतो
    दगड रंगतो, रस्ता सांगतो

    दगड घडतो, घर बांधतो
    दगड जमतो, डोंगर बनतो

    दगड बनतो, चंद्रावर जातो
    दगड पळतो, चिंचा पाडतो

    दगड जोडतो , पूल बनतो
    दगड सोसतो, साज सजतो

    दगड बोलतो, नावं सांगतो
    दगड खुलतो , अंक मोजतो

    दगड पळतो, खेळ खेळतो
    दगड कोरतो , गुहा बनतो

    दगड रूळतो, जातं पळवितो
    दगड कष्टतो, उखळ बनतो

    दगड तापतो, भाकरी भाजतो
    दगड डुलतो, कथा सांगतो

    दगड रडतो, अश्रू ढाळतो
    मुलांच्या गाण्याला, सूर लावतो

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि.बीड
    मो.9421442995

      May 16, 2017


  • काजळ गाली

    सख्या, तुझ्या आठवात
    मी, चालते संथ पाऊली
    सांजवर्खी या सांजवेळी
    ओघळले, काजळ गाली....

    संगती तीच वाट निरंतरी
    तुझ्याच स्पर्शात नाहलेली
    नेत्री दाटता अस्तिव तुझे
    ओघळले, काजळ गाली....

    ही नित्याची साक्ष अंतरी
    पाहता, उमललेली कळी
    अनवट मोहक वाटेवरचा
    तूच नटखट माझ्या भाळी....

    तुज मी स्मरता वेळोवेळी
    ओघळले, काजळ गाली
    तुझा असा असह्य दुरावा
    ओघळते, काजळ गाली....

    –वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १८९

    ५/८/२०२२

      September 7, 2022


  • ब्रह्मानंदी टाळी

    मी तुका चाललो पंढरीला पायी
    लोचनी ब्रह्म ते विठ्ठल रखुमायी।।धृ।।

    वेचुनिया संतांच्या सद्गुणी
    गुंफितो मी भावफुलांची वेणी ।।१।।

    रांगलो, खेळलो, धावलो पाऊली
    या साऱ्याच , विश्वाच्या अंगणी ।।२।।

    नुमजली मजला संसाराची खेळी
    मी अज्ञानी ऐकितो संतांची वैखरी ।।३।।

    लावूनी टिळा गंध अबीर कपाळी
    मी दंगतो भारूडी,अभंगी, कीर्तनी ।।४।।

    मी रचिता गाथेत जीवनाची भैरवी
    मजला लागते ती ब्रह्मानंदी टाळी ।।५।।

    -- वि. ग. सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८८.

    १९ - ३ - २०२२.

      April 3, 2022


  • संस्कारा प्रमाणे

    समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई
    सबळ दुर्बल याचा संघर्ष, टळत नेहमी जाई....१,

    मर्दूमकीचा विचार ठेवूनी, मैदानी उतरी
    त्याच स्थरावर सारे घडते, मुरले जे शरिरी....२,

    ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी
    हात घाईची सिमा परि, तो टाळी विचारांनी.....३,

    मस्तावले शरिर असतां, धक्का-बुक्की होते
    देहामधली जमली शक्ती, बाह्य मार्ग शोधते....४,

    दिसून येतो ऊर्जा वापर, देह बुद्धी वा मनी
    संस्काराचे बीज अंकूरते, परिस्थिती बघूनी...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 18, 2017


  • निसर्गाचे मार्ग वेगळे

    मार्ग निसर्गाचे सदा, निश्चित आणि अढळ ।
    चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ ।।१।।

    चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी ।
    करूया काही आगळे ठरवी विचारांनी ।।२।।

    आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे ।
    नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे ।।३।।

    परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती ।
    कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती ।।४।।

    करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे ।
    अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे ।।५।।

    जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी ।
    प्रवास केला वेगळा, हेच येते समजूनी ।।६।।

    मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते ।
    आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते ।।७।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      July 10, 2016


  • हिंमत

    तुला पाहिले चार भिंतीच आड
    मुकपणे अंधार गिळताना
    जन्म सौभाग्य राखण्यासाठी
    जळत्या चित्तेवर चढताना
    जन्मभर तशी तु जळतच होतीस म्हणा
    त्याला मरणाचे सौभाग्य लाभु दिले नाहिस इतकेच !
    त्यानंतर...
    जिवंत रुपात दिसलीस खरी
    पण नजर मेलेली बावचळलेली काहीशी भेसूरही
    त्यापेक्षा देवत्व बकाल करणारे
    ते दिव्य मरण किती बरे होते !
    दुरवरुन खोल पाणी खरवडताना
    शेतात राबताना,धुणी-भांडी करतानाही
    तुला पाहिले कधीच तक्रार नाही केलीस तु
    पण तुझ्या धट्टे असलेल्या हातांचा स्पर्श
    माझ्या पायांना कळतच नव्हता
    असे का वाटते तुला?
    बुरख्याआड चेहरा झाकलेला तुला पाहिले
    तेव्हा व्यथित झालो मीही क्षणभर
    तोंड लपवणे तसे सोपे असते
    पण भावना लपविणे सारेच किती अवघड !
    पाटीवर गिरवताना तुला पाहिले
    तेव्हा तर गंमतच वाटली
    गिरवण्या करता तुझ्यासाठी
    अक्षरेच नव्हती उरली ...
    मला त्यावेळी अक्षर घेता आले असते तर..
    असो...
    आज मात्र तुझ्यापेक्षाही
    अलिये माझ्यात म्हणूनच तर
    धरणे मोर्च्यातून,सभा परिसंवादातून धीटपणे
    माझा उघड निषेध करताना दिसू लागलियेस तू
    त्यावेळी
    तुझ्या परतीच्या वाटेकडे
    डोळे लावून बसलेला असतो मी!

    -- दिनेश अडावदकर

      November 7, 2013


  • एक हळव प्रेम

    आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर
    आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर

    काठी सोडून हाती घेतला
    तिचा सुरकुतलेला हात

    तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ

    नाना-नानी पार्क सोडून
    धरली चौपाटीची वाट

    जूने दिवस आठवले, पाहून झेपावणारी लाट

    ओलसर वाळूचा बसायला घेतला पाट
    दुखत नव्हते आता, कंबर-ढोपे-पाठ

    अहो दात नाहीत तरी घेतले
    चणे-दाणे चघळायला
    गजराही घेतला आजोबांनी
    तिच्या ईवल्या आंबाडयांत माळायला

    आजूबाजूच्या तरुणाईची दखल कुठली दोघांना?
    निसटून नव्हत दयायच नं ह्या मोरपंखी क्षणांना

    बोलता बोलता क्षितीजावर
    चढू लागली लाली

    आणि साक्षीला चंद्राची स्वारी देखील आली

    आता खट्याळपणाला रंग चढला
    आजोबांच्या रोमरोमात

    आजीला म्हणती नभीचा चंद्र , दिसतोय तुझ्या डोळ्यात

    अहो आज नाही तुमचा माझा
    वा वाढदिवस लग्नाचा

    मग शिळ्या कढीला म्हणते मी
    एवढा ऊत आलाय कशाचा?

    अग, फार दिवसाची इच्छा होती
    तुला माहीत नसेल वेडे

    जाण्यापूर्वी वाटल, आपणही साजरा करावा कि
    एखादा व्हॅलेंटाईन डे, एखादा व्हॅलेंटाईन डे

    -- सौ. अलका वढावकर

      February 13, 2016