एकेकटे पाहून झाडं तोडता तुम्ही
दाटी असता वृक्षाची ......
अटकता ,लटकता ,
भटकता तुम्ही ....!
-- श्रीकांत पेटकर.
कौशल
March 24, 2019
May 28, 2022
ध्यानाने काय साधले
ऐका सगळे लक्ष्य देऊनी
हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।।
संसारांत रमलो मोहांत गुंतलो
सुख दुःखात अडकलो
उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।।
हेच साधले ध्यान लावूनी
जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं
समाधानापोटीं
धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।।
हेच साधले ध्यान लावूनी
धानाची समज उपदेशिला मज
ऐक मनाचा आवाज
तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।।
हेच साधले ध्यान लावूनी
एकाग्रतेची स्थिति ही ध्यानाची शक्ति
समाधान मिळविती
शांत करी मन देई चंचला घालवुनी ।।४।।
हेच साधले ध्यान लावूनी
सुख दुःखाची जाण तीव्रता कमी करुन
देऊनी तर्क ज्ञान
करी मनाची समज वाढवूनी ।।५।।
हेच साधले ध्यान लावूनी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 5, 2015
जगण्याची नाहीं शक्ती
मरण्याची आहे सक्ती ।।
कारा जग, मी तडफडतो
पण मिळतच नाहीं मुक्ती ।।
परमेश्वर साह्य करेना
तरि ढळे न माझी भक्ती ।।
काळास चकविण्याची मज
कळली ना अजुनी युक्ती ।।
लढलोही असतो रे, पण
हिंमतच मुळी ना रक्तीं ।।
नर हतबल भाग्यापुढती
मी सार्थ ठरवली उक्ती ।।
स्तुति दो शब्दांतच संपे
त्यातही असे पुनरुक्ती !
जीवन-रहस्य गूढच, पण
उकलिन मरणाच्या वक्तीं ।।
दाविल जो दोष जगाचे
पुरती त्याची कंबक्ती !
June 24, 2016
कुठून आलो, कुठे निघालो,--
कळिकाळाचे पांथस्थ,--
मार्ग दिसो न उमजो,
राहावे लागे तटस्थ,--!!!
जन्मप्रसंगी बाळाच्या,
आईला होती प्रसववेदना,
कोणास ठाऊक म्हणे त्या,
कोणाच्यातरी मरणयातना,---!!! सुखाच्या लागता मागे,
मोहमयी खेळ चाले,
ठरती बघतां बघतां ते,
मायेचे किमयागार सारे,---!!!
आभास दिसती सुखाचे,
जो तो त्यासाठी तडफडे,
हव्यास ठेवून असे,
पदरात शेवटी काय पडे,---!!!
सौंदर्य पाहुनी वरवरचे,
जो तो त्यास भुले,--!!!
अंतराचे नाते कसले,
हे तर आकर्षण देहाचे,---!!!
सत्ता पैसा प्रतिष्ठेमागे,
प्रत्येक जण कसा धावे,
असे धावून धावून सारखे,
देहालाही ठेवायचे मागे,---!!!
हिमगौरी कर्वे.©
February 16, 2019
ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी ।।धृ।।
व्याकूळ होती राम भेटी
रात्रंदिनी नाम ओठी
नाचूनी गाऊनी भजन करी ।।१।।
ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी
बोरे जमवित चाखूनी वेचली
अंबट तुरट दूर फेकली
भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी ।।२।।
ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी
उष्टी बोरे प्रभू चाखती
शोषूनी त्यातील रसभक्ती
शबरी त्यांत जी जमा करी ।।३।।
ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 13, 2018
थांबव मानसी, चक्र वाढीचे
कळ्यातूनी तू फुलताना
हासत खेळत तुरु तुरु चालणे
शिशू म्हणूनी जगताना
कौतुकाने ऐकतो तुज
शब्द बोबडे बोलताना
हरखूनी जातो चाल बघूनी
हलके पाऊल पडताना
आनंद पसरे सभोवताली
इवल्या त्या प्रयत्नानी
बदलूनी जाईल क्षणात सारे
रुळलेल्या तव हालचालीनी
तुझ्यासाठी जे नवीन होते
प्रयत्न तुझा शिकून घेणे
अपूर्णतेची आमुची गोडी
लोप पावेल पूर्णत्वाने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***१३
सुनेच्या रुपांत त्याला स्वतःची मुलगी दिसते
आणि 'मलगी ही परक्याचे घन ' ह्याची जाणीव होते
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
March 25, 2013
शब्दभावनांची झाली उधळण
August 31, 2021
आकाशातील चंद्र
आकाशातील चंद्र एकदा अचानक लपूनच बसला
वेड्यासारखा मी त्याला रात्रभर शोधला
March 3, 2012
चल सखये,जरा विसावू नदी किनारी
बघ आठवांचा खोल डोह या किनारी
गुणगुणते तृप्त प्रीती इथे मनहृदयीची
साक्षी! नयनरम्य दीपमाळ ही किनारी।।१।।
वाळुत झऱ्याझऱ्यातुन उमले प्रिती
ओसंडिते गं पावन गंगेच्या किनारी
ओढ निरंतर, सारितेला मिलनाची
चल सखये, जरा विसावू या किनारी।।२।।
मिठीत घेवू, त्या साऱ्या गतस्मृतींना
भावगंधल्या सुखदुःखांच्याच किनारी
रूप,जीवनाचे प्रीतरंगलेले हृदयस्पर्शी
चल न्याहळू त्या निरव शांत किनारी।।३।।
दरवळ! प्रितीचा बघ गगनी गंधला
इंद्रधनुचे प्रतिबिंब, तरंगते किनारी
भावासक्त! प्रीती दैवी जन्मांतरीची
अखंड वाहते गं बघ या गंगाकिनारी।।४।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १२८
२ - १० - २०२१.
October 8, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti