(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माती असशी मातीत मिळशी….

    माती असशी मातीत मिळशी, हे तत्वच आहे सृजनी,---
    दया करुणा उपकार करिती,---
    तेच होती विलीन पांडुरंगी*--!!!!

    © हिमगौरी कर्वे

      December 30, 2019


  • मक्षिकेचे आत्मसमर्पण

    उडत उडत एक मक्षिका,
    देवघरांत शिरली,
    पूजा- साहित्य आणि मूर्तीवरी
    स्वच्छंदानें नाचूं लागली ।।१।।

    धुंदीमध्ये बागडत होती,
    मूर्तीच्या बसे शिरावरी,
    धूप, गंध आणि सुमनावरूनी,
    जाई मध्येच प्रभू चरणावरी ।।२।।

    पंख चिमुकले हलवीत ती,
    मूर्तीपुढें गांऊ लागली,
    प्रसाद दिसतां पंचामृताचा,
    प्रभू अर्पिण्यासी झेपावली ।।३।।

    नैवेद्याच्या क्षीर सागरीं,
    आत्मसमर्पण तिने केले,
    प्रभू सेवेत तल्लीन होऊनी,
    जन्माचे सार्थक केले ।।४।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 20, 2016


  • हव्यास

    हव्यास जीवाला किती असावा
    माझे तर माझेच एकटयाचे आहे
    इतरत्र देखील माझा हक्क आहे
    सांगा कोण काय घेवून जाणार आहे।।
    बेताल व्यर्थ वक्तव्ये काय कामाची
    उपकारांची जाणीव संस्कार आहे
    जनाची नाही मनाची लाज असावी
    संस्कारहीन स्वार्थ, दुर्बुद्धीच आहे।।
    माणुस म्हणुनी थोडेसे तरी जगावे
    जन्म मानवी विवेकी लाभला आहे
    हव्यासी, लालसी वृत्तीच विनाशी
    सारे सारेच इथे सोडूनी जायचे आहे।।
    जे भाळी आहे ते सहज चालत येते
    जे नाही ते सारे दुर्लभ असणार आहे
    अंतिम, सत्य जसे आहे तसे पुढे येते
    दयाघनी घाव अनाहत अटळ आहे।।
    सत्कर्म, निरपेक्ष सदा करीत रहावे
    दुष्कर्म इथेच फेडावे लागणार आहे
    जीवाचाच क्षणाचाही भरवसां नाही
    नि:स्वार्थी प्रेमभाव निर्मळ शांती आहे।।
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १३५.
    १८ - ५ - २०२२.

      June 4, 2022


  • स्मृति

    जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं

    विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी ।।१।।

    बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना

    देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना ।।२।।

    काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती

    परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ।।३।।

    प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी

    पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 1, 2018


  • खेळ..

    तू ध्यास, तू भास,
    तू न्यास हव्या प्रेमाचा !
    तुजसवे खेळते सारा
    ....खेळ कल्पनेचा !!

    ....मी मानसी

      November 3, 2019


  • डाग!

    कितीही देशी शीतल चांदणे

    आनंदाचा ठरुनी मेरुमणी

    काट्यापरि हा मध्येंच ब

    डाग तुझा लक्ष्य खेचूनी

    ठाऊक नाहीं कधीं कुणाला

    कसा लागला डाग उरीं

    पडला असेल चुकून देखील

    कुणी रंग उधळतां वेड्यापरि

    शुभ्रपणाचा मानबिंदू हा

    डागरहित जीवन त्याचे

    केवळ एका डागापायीं

    सत्य झांकाळते कायमचे

    मिटून जातां डागही मिटतो

    उरते मागें सत्य तेवढे

    परि पुसण्यासाठी डाग एक तो

    मिटणे उपाय जहाल केवढे

    जोवरि जीवन चंद्रा तुझे

    डाग दिसेल माथ्यावरचा

    दुग्धामृताच्या घटांमधला

    असेल थेंब तो विरजणाचा

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 14, 2020


  • छुन्नुक छुन्नुक (दोन शब्दी)

    छुन्नुक छुन्नुक,
    पैंजण वाजती,
    थिरक थिरक,
    पावले नाचती,
    प्रेक्षक आपुले,
    भान विसरती,
    नृत्याच्या तालावरी,----
    रेषेला मिळे,
    रेषा आणखी,
    कसब आपुले,
    चित्रकार दाखवी,
    प्रतिमा काढे,
    कशी हुबेहूब,
    बोटांची जादुगिरी,----
    कंठातून मंजुळ,
    सुस्वर निघती,
    मधुर गायने,
    मंत्रमुग्ध होती,
    तालबद्ध गाणे,
    गायिका गाई,----
    सहजसुंदर अभिनयाची,
    श्रेष्ठ अदाकारी,
    पाहून सर्वांचे,
    डोळे पाणावती,
    नाट्यकला आगळी,----
    अन्न सुग्रास,
    सुगरण पकवी,
    चोचले जिभेचे,
    ती पुरवी ,
    ढेकर तृप्तीची ,
    देत उठती,
    पाककला वेगळी,----
    सुंदर मेंदी,
    हातावरी रेखती,
    गोरेपान हात,
    शोभिवंत दिसती,
    किमया कलाकारीची,----!!!!

    ©️ हिमगौरी कर्वे

      March 25, 2020


  • महिला दिन (दीन?)

    अलार्म वाजला कानी, म्हणून आली मला जाग
    तशी ही म्हणे, उठा लवकर, आठ मार्च आज |

    मनी म्हटल चला नवरोजी, एक दिवस हा बयकोचा
    चहा-नाश्ता-डब्यासाठी, ताबा घेतला किचनचा |

    मुले बाहेर पडेस्तवर, ही खुशाल पडली लोळत
    मीच सगळ आवरुन सवरुन, ऑफीस गाठल पळत |

    घरकामवाल्यांची रजा होतीच, आजच्या महिला दिनाला
    ऑफीसांतही महिला वर्ग, येणार नव्हता कामाला |

    घरची दारची कसरत करत, फेस आला तोंडाल,
    खरेदी-हॉटेल-सिनेमा उरकून, हिला उशीर झाला यायला |

    हुश: करतोय तोच परिचित, शब्द आले कानी
    आठ वाजून गेले, अहो उठताय नं तुम्ही?

    खर सांगतो त्याच क्षणी
    जाग आणली स्वप्नानी
    Hats off to you
    बायकोस म्हटलं महिला दिनी |

      March 8, 2018


  • मनसंवेदना

    जीवनामध्ये जेंव्हा जेंव्हा
    कधीही विश्रांतीसाठी...
    थोडसं हळूच पहुडावं...!
    एकांतात डोळे मिटावेट....
    अन फक्त तूच दिसावीस....!
    असं सततच घडत असतं...
    प्रितीत अनावर ओढ़ असते...!
    हेच मात्र खरं ....!!
    तू जरी असलीस दूरदूर...!
    तरीही तुझा स्पर्शभास जाणवतो ...
    मनांतरांची मुक्तमुग्ध भेट होते ....!
    खरच किति विलक्षण असते निर्मल सत्यप्रितीची ओढ...
    अनाहत , अलवार , ध्यास, भास, मानसस्पर्श , भावनां ....!!
    दयाघनांन या संवेदना दिल्या आहेत हे खरं ....!!
    पण जर या प्रीतमनभावनांबरोबरच...!
    सत्यस्पर्शभासाचे वरदान दिले असते तर ...?
    हा प्रीत दुरावा कधीच जाणवला नसता ....!
    जरी कुठेही असलो आपण तरी एकत्रच असतो .....!
    पण या साऱ्याच मनासक्तीच्या कल्पना आहेत..!
    या साऱ्या क्षणांवर फक्त एक अनामिकाची अदृष्य सत्ता आहे..!!
    आणि केवळ त्या दयाघनाची आहे..!!!
    पण आपण इदं न मम असे म्हणत ,
    सत्कर्माचे संचित रचता रचता
    केवळ त्याच अनामीकला भजत रहावे एवढेच आपल्या हातात आहे...!!!
    हे मात्र खरं...!!!!

    ©️ वि.ग.सातपुते (भावकवी)
    रचना क्र. ६० (मुक्तरचना)
    दिनांक ३-४-२०२१
    ?9766544908

      May 24, 2021


  • सांजवेळा

    आजही स्मरते ओंजळ तुझी
    बकुळ फुलांनी ओसंडलेली

    तूच गे माझ्याच हाती दिलेली
    प्रीती ,भावगंधात गंधाळलेली

    तेंव्हा नुमजला अर्थ प्रितीचा
    आज तीच प्रीत गहिवरलेली

    अव्यक्त! साक्षात तू सामोरी
    स्पंदनांना ओढ तुझी लागली

    तळहातीच्याच या भाग्यरेखां!
    अनामिक हीच लीला आगळी

    प्रीतीविना कां ? जीवन असते
    सांग तूच मला गे या सांजवेळी

    आज हरविले जरी ते दिन सारे
    तूझीच मूर्ती अंतरिच्या राऊळी

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ३

    ३ - १ - २०२१.

      January 19, 2022