(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कृष्णा

    मम चित्ती तुझे रूप गोपाळा, यशोदानंदन जगत्पालका,
    जगदाधिशा प्रतिपाळा,
    आठवती किती नावे कृष्णा,---

    देवकीनंदना वसुदेवसुता,
    राधेच्या कृष्णा, रुक्मिणी- भ्रतारा,
    तुझं आठवते मी घननिळा, द्वारकाधीशा,
    विष्णू अवतारा मनमोहना तू बाळकृष्णा,--!!!

    गोपिकांमधील तू श्रीरंगा,
    श्रीहरी तू जगदोद्धारा,
    नटवर तू अनादि अनंता,
    उभा राहशी प्रसंगी सारथ्या,--!!!

    कधी भासशी नुसती कल्पना,
    पण विहरशी आत्मी मनोहरा, सत्यभामा तुझीच कांता,
    लुब्ध तिच्यावर तू मुरलिधरा,---!!!

    सुभद्रावर, तू तिच्यावरी भाळता, सुभद्राहरण करशी नंदकिशोरा,
    काय म्हणू तुझ्या स्वरूपा,
    असशी, भासशी अनेक रुपा,
    वात्सल्यमूर्त तू हे नंदबाळा,
    स्मरते मी तुज कितीदा गिरिधरा,--!

    हिमगौरी कर्वे ©

      August 21, 2019


  • उमलणारी फुले

    चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या
    फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या
    निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं
    स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं
    चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची
    प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची
    आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें
    मधू शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे
    सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी
    जागे करीती जगास, चैतन्यमय त्या लहरी
    हास्यमुखानें समर्पण

    होती, प्रभूचे चरणावरी
    क्षणिक असले जीवन सारे, सार्थकी लागते तरी.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail - bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

      March 15, 2014


  • वचन

    वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।

    मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।

    दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।

    प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।

    स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।

    राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।

    प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।

    पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।

    आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।

    बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।

    मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।

    स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।

    अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।

    ‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 18, 2021


  • पंख फुटता !

    ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
    आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी

    माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
    हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती

    जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
    नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी

    परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
    टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 29, 2017


  • ऋतूचे चक्र आणि मन

    कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,

    हात-पाय गार, काटे अंगी येती

    नकोसा वाटतो, मजला हिवाळा,

    वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा

    सुकूनची जाते, हिरवे रान

    शरिर राहते, घाम निथळून

    लाही लाही होता, त्रस्त होई जीव,

    शोधण्या ढग, मन घेई धाव

    थांबवितो कामे, वादळी वारा,

    पर्जन्याचा मारा, पडताती गारा

    पाणी चहूकडे, वाटते सुकावे,

    वर्षा जावूनी, सुक्यात खेळावे

    आपल्या जे हाती मन नसे त्यात

    सुख त्याच्यांत पाही, नसे जे हातात

      September 2, 2020


  • वरात

      May 21, 2011


  • अर्थ

    "अर्थ"

    चांदण्याही विझलेल्या
    चंद्रही जणू निजलेला
    सावळले नभ सारे
    गाती वाहते वारे
    ------------------तू कुठे?!!१

    थेंब थेंब शिडकावा
    कुठूनसा हळु व्हावा
    वाऱ्याच्या कुणी पाठी
    झाडे का झिंगताती
    ---------------------तू कुठे?!!२

    कसली ही झाली नशा
    धुंद जशा दाही दिशा
    पंखाविन तरल तनु
    अवकाशी झेप जणु
    ---------------------तू कुठे?!!३

    जिवनाचा अर्थ नवा
    चराचरा उमगावा
    या हळव्या क्षणी जरा
    स्पर्श हवा प्रेमभरा
    --------------------तू कुठे?!!४

    -- ..... मी मानसी

      June 24, 2019


  • शक्य आहे का ते ?

    आज हे आकाश मजला, थोटके का भासते

    झेप घेण्या पंख फूटतां, हाती येईल काय ते ?

    उंच हा गिरीराज देखूनी, शिखर चढावे वाटते

    चार पावले टाकतां क्षणी, चढणे सोपे काय ते ?

    अथांग सागर खोल जरी ती, डूबकी घ्यावी वाटते

    जलतरण कला अवगत होता, सूर मारणें जमेल कां ते?

    काव्य सरिता वाहात आहे, ज्ञान गंगोत्री भासते

    केवळ कविता चार रचूनी, त्यात डूबनें शक्य कां ते?

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      November 30, 2019


  • मी न काही भुललो

    तू माळल्या बकुळीचा गंध
    अंतरात दरवळतो अजुनही

    आली कित्येक बेधुंद वादळे
    स्मरण तुझे अंतरी अजुनही

    सारेसारे आजही तसेच आहे
    मी न काही भुललो अजुनही

    जिथे जिथे जाते नजर माझी
    तुझेच ते ध्यासभास अजुनही

    तूच रुजलिस अशी हृदयांतरी
    स्पंदनी चैतन्य तुझेच अजुनही
    ********
    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. ३०३

    २४/११/२०२२

      December 2, 2022


  • मग्न असलेले जग

    मलाच वाटे - -
    जग मजलाच हांसते
    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।। धृ ।।

    वेगांत चालते जग, क्षुल्लक तुमचा सहभाग
    ह्या अथांग जनसागरीं, कुणी न पुसती तुम्हांपरी
    आपल्यातच जग जगते
    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।। १।।

    प्रत्येकांचे प्रश्न निराळे, गर्क आहेत सोडविण्या सगळे
    उगाच होई भास मजला, मनाचा हा खेळ जहाला
    बघण्या तुमचेकडे, वेळ नाही कुणाते
    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।।२।।

    श्रीमंतीची कुठे झलक, गरीबीत उघडी अनेक
    गाण्याच्या तालावरी नाचती, दुःखीता समोर कांही रडती
    कोण जाणतो, शेजारीच काय घडते
    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।।३।।

    संकल्पित कार्ये प्रचंड पुढती, धांवतो प्रत्येक पूर्ण करण्या ती
    कोठून मिळेल अवधी त्यास, करण्या दुजांची विचारपूस
    वाहून जातो, जीवनाच्या प्रवाहाते
    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।।४।।

    एक इच्छा राही मनीं, तुलना करावी यशाची कुणी
    डोकावतो किंचित् इतर जीवनीं, परत वाचतो आपलीच कहाणी
    बघतो "परंतु क्षणिक" इतराते विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।।५।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      November 12, 2012