May 28, 2022
चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या
फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या
निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं
स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं
चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची
प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची
आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें
मध शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे
सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी
जागे करीती जगास, चैतन्यमय त्या लहरी
हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणावरी
क्षणिक असले जीवन सारे, सार्थकी लागते तरी.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 14, 2020
सम्मेलन भरली गेली पाहिजेत
एकमेकांना मीठी मारून रडण्यासाठी
एकमेकांना मीठी मारून हसण्यासाठी
एकमेकांची सुख दुःख जानून घेण्यासाठी I
सम्मेलन भरली गेली पाहिजेत
जातिवाद मिटवण्यासाठी
धर्मवाद मिटवण्यासाठी
एकमेका बद्दलचे द्वेष मिटविण्यासाठी l
सम्मेलन भरली गेली पाहिजेत
सर्व धर्म समभावासाठी
अज्ञानाचा अंधकार मिटविण्यासाठी
गुणी गोविंदाने कसे रहावे ते सांगण्यासाठी l
केवळ आपला मोठेपणा मिरविने
स्वताचा मान सम्मान कमवीने
इतर सम्मेलन भरवीता कशासाठी
बाकीचे विषय उगाच कोणासाठी l
October 30, 2018
मग्न राही सतत आपल्याच कामीं
अन्नासाठी तूं फिरे दाही दिशानी
जमवितेस कणकण एकत्र करुनी
दूर द्दष्टीचा स्वभाव दिला तुज कुणी
सुंदर तुझी वास्तूकला वारुळ केले छान
सहस्त्रांच्या संखे राहतेस आनंदानं
कष्ट करण्याचा गुण दाखवी साऱ्याना
कष्टाला पर्याय नसे ह्या जीवना
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 13, 2019
May 28, 2022
आर्त तन हे, आर्त मन हे,
करुणानिधे,तुला साद रे,
शांती, प्रेम, आस्था,
गेल्या भावना कुठे रे,--!!!
उगा काळीज उलते,
मन किती धास्तावते,
का मम अंतरातुनी,
अस्वस्थपण छळते रे,--!!!
सांग तुझ्याविना माझा,
असेल कोण त्राता रे,
कोलाहल दाटे मनी,
ही जीवनाचीच करणी,
घायाळ हृदया, न वाली,
जावे कुठे,विधात्या रे,--!!!
सुखाची कशी वानवा असे,
दुःख, अमोज अगणित रे
जीवनाचेच गणित चुके,
ही भल्याभल्यांचीच कथा रे,--!!!
जे हवे ते मिळत नाही,
नको तेच वाट्यास येई,
जे मिळे,ते पुरत नाही,
समाधान मानावे कशात रे,--!!
प्रेम कुणालाच कळत नाही,
नात्यात विफलता येई,
ताणतणावां माप नाही,
जीव सदैव बेचैनी राही,
आधारच नच कोणी,
सांगू कोणा व्यथा रे,-!!
भोवताली माणसांचे रान,
वाटा वाकड्या, सुनसान,
जिवाची फक्त उलघाल, अंतरात्मा किती रडे रे,--!!!
शोधिते मी पहा तुला,
इकडून तिकडे, सगळीकडे,
कुठे असशी तू ,
कुठे का न दिसशी तू ,
आत,जीव कसानुसा रे,--!
हिमगौरी कर्वे ©
June 20, 2019
शब्दांविना संवादू,
असंभव"" तो वाटतो,
किमया त्यांची न्यारी",
अर्थ मर्म दाखवतो,
शब्दांवाचून किती भाषा,
मानव नेमका वापरतो,
परंतु त्यांच्यासम हा ,
म्हणत म्हणत कसा,
वर्चस्व त्यांचे मानतो,--
स्पर्श बोले कधीकधी,
मात्र शब्दांसारखा,
तान्हुल्यांची खास सोय,
जाणे बाळ ममता, माय--!!!
, हाच स्पर्श जादू करे,
प्रेमभावना व्यक्त करे,--!!
आबालवृद्धां आधार वाटे ,
इतुका बोलका अगदी भासे,--
खाणा-खुणा करत लोक,
बोलती काही एकमेकांशी,
मूक सांकेतिक भाषा जणू,
मदत करे सार्थ अशी,--!!
चित्रलिपी केव्हातरी,
आंतरिक संवाद साधे,
मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
हृदयांशी हृदये जुळवे,
कित्येक कलाही बोलती,
आत्मिक संवाद साधती,
खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
नयनांची भाषा आगळी,
फक्त डोळ्यांमधुनी बोले,
कधी अनेक शब्द हारती,
असे भाव प्रदर्शित करे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 20, 2019
January 15, 2022
मैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते
September 12, 2021
जगातील वस्तू, वाटे आकर्षक
देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१
प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२
चमक बेगडी, फसवी सर्वाला
काय डब्यामध्ये, कळेना कुणाला...३
झाकण उघडा, दुःख दिसे आंत
लपून बसले, प्रत्येक गोष्टीत...४
हात लावताच, दुःख हाती येई
भासलेले सुख, नष्ट होत जाई...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti