(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • समत्व बुद्धी

    एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,
    विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।

    जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,
    बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।

    समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,
    त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।

    जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,
    दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।

    संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,
    टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।

    मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,
    स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 14, 2017


  • इये मुंबईचिये नगरी .. पूर्वरंग (सन – १९८२)

    मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल.

      October 4, 2025


  • जीवन गुंता

    दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले

    एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले....१,

    गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा

    शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा....२,

    खेच बसता वाढत गेला, होता गुंता

    उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता.....३,

    दोनच पर्याय होते, त्याचे पुढती

    तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती....४,

    वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे

    अवशेष राहतील परि काही, जे न सुटणारे ...५,

    दोन मनांचा असाच होतो, गुंता ह्या जीवनी

    राग-लोभ प्रेमादी भावना, जाती गुंतूनी.....६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 7, 2020


  • आत्मानंद

    नयन मनोहर, संध्येसम गं

      August 24, 2021


  • दसऱ्याचं सोनं

    दसरा सण आनंदाचा
    सोनं द्या प्रेमाचं मोठं
    देऊन पानं आपट्याची
    नका देऊ सोनं खोटं

    आलिंगन देऊन परस्परांना
    सोनं म्हणून वृक्षबीज देऊ
    झाडे जगवा झाडे वाचवा
    वसा आज हा आपण घेऊ

    हर्षाच्या या मंगल समयी
    नका रडवू अबोल वृक्षा
    रक्षण करती आपुले जीवन
    आपण करूया त्यांची रक्षा

    वृक्ष सदैव देतच असती
    पाने-फुले किती संपदा
    होऊ नकोस तू कृतघ्न
    वृक्षाविन ओढवी आपदा

    वृक्ष असती मित्र आपुले
    आपटा, वड, पिंपळ, शमी
    वृक्ष-मानव सहजीवनाने
    करू साजरी विजयादशमी

    - प्रा.अरूण सु.पाटील (असु)

      October 8, 2019


  • भोंडला (फेरीवाल्यांचा) (६)

    अरडी ग बाई, परडी, रस्त्यावरती गर्दी
    ही गर्दी कशाची, ही गर्दी फेरिवाल्यांची
    फेरीवाल्या फेरीवाल्या माल दे, माल दे हा मोल घे
    मोल ठेवला हातावर, गाडी होती नाक्यावर
    आता ह्याला शोधू कशी, बाईसाहेब पडतात अशा फशी

      October 12, 2018


  • मुक्ताफळें

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

      June 15, 2012


  • स्त्री

    लाजेची मशाल नयनी,
    नाकात नाजूक नथनी,
    लाल ओठ गुलाबी छान,
    स्त्री तू सौंदर्यांची खाण...
    झुपकेदार शेपूट कुंतलेचं,
    मुक्त कमरेवरी रुळलेलं,
    शान तूझ्या मोहक स्त्रित्वाची,
    गुंफुनी गजऱ्यामध्ये माळलेलं...
    उडे ऐटीत डौल पदराचा,
    कुंपण घाली मंद वारा,
    झाकाळलेल्या या रुपासमोरी,
    फिक्या त्या लखलखणाऱ्या तारा...
    कामिनी गं तु योवणाची,
    वसुंधरेची अभिमानास्पद मान,
    अंकुश घाली स्त्रिशक्तिवर,
    हे शृंगारिक देह वरदान...

    - श्वेता संकपाळ

      September 9, 2018


  • ती तशी शाळेतली

    ती तशी शाळेतली
    तो ही तसाच
    ती दोघे नेहमी
    बोलताना दिसतात
    संपूर्ण नवखेपण
    जाणवत होते
    त्यांच्या बोलण्यावरून...
    एक दिवशी त्याचा हात
    तिच्या
    हातात आला..
    आणि मग सुरवात झाली..
    नवखेपण जाण्याची ती
    खुण होती......
    त्यानंतर..त्यांनतर
    बरेच काही घडणार होते...
    प्रेमाच्या बाराखडीला
    सुरवात तर झाली....
    पुढे काय झाले....
    तुम्ही विचारणार ना ,
    उत्तर तुमच्याकडेच आहे
    तुमच्या स्वभावात ?
    -- सतीश चाफेकर.

      December 14, 2021


  • दया प्रेम भाव

    दया प्रेम हे भाव मनी,
    जागृत कर तू भगवंता ।
    तुला जाणण्या कामी येईल,
    हृदयामधली आद्रता ।।१।।

    शुष्क मन हे कुणा न जाणे,
    धगधगणारे राही सदा ।
    शोधत असता ओलावा हा,
    निराश होई अनेकदा ।।२।।

    पाझर फुटण्या प्रेमाचा ,
    भाव लागती एकवटूनी ।
    उचंबळणारे ह्रदय तेथे,
    चटकन येईल मग दाटूनी ।।३।।

    दया प्रेम या भावांमध्ये,
    दडला आहे ईश्वर ।
    मनांत येता हेच भाव ,
    घडवी त्याचे दर्शन ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 8, 2016