एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विणा ।
काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।।
शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं ।
कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।।
उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती ।
शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।।
मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता ।
व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची ही दुर्बलता ।।
गोविंदाग्रज नि केशवसूत, आणिक ग.दि.मा. ।
तांबे- बोरकर- यशवंत, सर्वजण आले कामा ।।
ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं, एकत्र ठेवियले ।
शब्द भावना यांची सांगड, मन करुं लागले ।।
द्रोण मुर्तिपरी भासूं लागली, त्यांची ग्रंथ संपदा ।
काव्यामधली स्फूर्ति मिळूनी, आनंदी झालो सदा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 5, 2017
November 26, 2021
बर्याच वेळा आपले अक्षर चांगले नसते आणि एखाद्या परीक्षेत अक्षराला जास्त मार्क असतात आणि तेथे आपण कमी पडतो. चांगले मार्क मिळत नाहीत आणि जे इप्सित साधायचे असते ते साधले जात नाही आणि आपण निराश होतो. सातत्य आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर सगळ्या गोष्टी सहज होतांना दिसतात. मुख्य म्हणजे देवावर, सदगुरुवर आणि स्वत:वर विश्वास पाहिजे. अक्षर मग ते कोठल्याही भाषेचे, लिपीचे असले तरी ते कसे काढावे, त्याचे तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे किंवा सराव करावा.
February 25, 2012
या कातरल्या क्षणांना,सय तुझी येते,--
उन्हाची तप्त काहिली,
चटकन् दूर होते,
वारा धुंद वाही,
ढग जाती प्रवासी,
अधूनमधून बिजलीही,
उगा आपुले दर्शन देई,
अशा वेळी आठवे मज,
सोनेरी प्रभेची सांज,
याच समुद्रकिनारी,
वाजली मिलनाची गाज,
नभ सुंदर सोनबावरे,
होते भेटीस साक्षी,
कूजन करीत बागडती,
पक्षी आनंदें वृक्षी,
किनारा दूरवर तटस्थ,
उभ्याने राखी सागराला,
मिलनाची किती उदाहरणे,
ठेवून समोरी चंद्राला,---!!!
या मंतरलेल्या क्षणांना,
आठवे चांदणी उगवती,
प्रेमाखातर सुधाकराच्या,
नशेत त्या नाचती -गाती,
तिच्यावर चढली धुंदी,
आजही मज नीट स्मरे,
इकडे धरणीवर खाली,
कुणी प्रेमवीर गात फिरे,
अशी चांदणी नाचती-गाती,
इथेच त्याला ओढत आणी,
खळाळूंन उत्तेजित होई,
निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!
© हिमगौरी कर्वे.
March 2, 2020
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।।
बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता
निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।१।।
तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले
बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।२।।
प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी
येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।३।।
जीवनातील प्रत्येक पायरी मजलागी आनंदी करी
परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता देहाचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।४।।
आहे सारे प्रभूचे भाव अर्पा मनाचे
समर्पण करा देहाचे त्याग करा सर्वस्वाचा
तेव्हांच मिळेल खरा आनंद जीवनाचा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 28, 2019
भातुकलीच्या डावांत मांडला, संसार राजा राणीचा,---
इवल्याशा घरात चालला,
सांसारिक प्रवास त्यांचा,--!!!
छोटी छोटी भांडी कुंडी,
छोटे छोटे सामान,
इवली इवली सामुग्री,
करत सुख-रसपान, --!!!
हळूहळू संसार वाढला,
आले सोनुले बाळ,
कळले नाही कधीच,
किती निघून गेला काळ,---!!!
राजाराणी मग्न आपुल्या,
छोट्या चिमुकल्या विश्वात,
बाळ बालीश,वाढे निरंतर,
त्याला तारुण्य आले झोंकात,-!!
नादातच तो आपल्या राही,
वाहन वेगात चालवे,
करता करता पंचविशी,
गाठली बघा बाळाने,--!!!
बाळ कसले तरुण आता,
कर्ता पुरुष होतकरू,
आई-बाबा थकून जाती,
न ऐके त्यांचे लेकरू,--!!!
एक दिवस आक्रीत घडले, नियतीने तोंड फिरविले,
जाताजाता बघता-बघता, वाघिणीने कोकरू नेले,--!!!!
आईबापांचे जग कोसळले,
सारे विश्व उद्ध्वस्त झाले,
कोणते बाळ, कसला संसार,?
सारे सारे वाऱ्यावर गेले--!!!
भातुकलीचा डाव उधळे,
प्राक्तन त्याचे नाव,
आई बापाला पोरके केले,
बुडली संसाराची नाव,--!!!
हिमगौरी कर्वे©
August 8, 2019
आता तरी देवा मला पावशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?
पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ
न्यायासाठी मदतीला धावशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?
चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
लाच घेती त्यांना आळा घालशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?
दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
भलं आमचं करण्याला सांगशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?
March 12, 2017
अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले
जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।। १
निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण
आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।।२
उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी
काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी ।।३
सारे सजिव निर्जिव वस्तू, गुरू सारखे वाटावे
तेच आहेत ईश्वरमय, तुम्हीच समजावे ।।४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 4, 2020
मिळवलेस तूं जे जे काही,
कौतूक त्याचे सारे करतील
स्तुती सुमनातील भाव जमूनी,
हृदयामधले दालन भरतील....१
उचंबळूनी जाशील जेव्हां,
बांध फुटेल नयनामधुनी
ओघळणारे अश्रू सांगतील,
भाग्य तुझे ग आले उजळूनी....२
दरवळू दे सुंगध सारा,
नभांत जातील यश तरंग
स्वर्गांमधुनी 'भावू 'बघतील
भीजव त्यांचे सारे अंग...३
(चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)
-- डॉ. भगवान नागापूरकर
May 17, 2016
निरोप मिळता कुठुन दुरुन धावत ये एकदा
गर्दी जमेल पण गर्दीत मिसळून घे एकदा /
तयारी सुरु असेल शोकाकुल अंतिम यात्रेची
रडतील जीवलग त्यात मिसळ रडणे तुझे एकदा !
कुसकट नजरा तुझ्याकडे वळतील वारंवार
दुर्लक्ष तिकडे करुनी शोक कर जाहीर एकदा !
अनेक असतील तरीही बिनधास्त रडुन घे तू
बोलणे होणारच नाही, पण पाहुन घे मला एकदा!
झोपलो चितेवर दुरुनच चोरुन पाहुन घे
जातील सगळे ,थांबुन घे माझेसाठी जरा एकदा !
शेवटीचे भेट म्हणूनी काय द्यावे समजेना मला
मुठभर राख ऊचलूनी घे, तीच आठवण एकदा!
जा आता वेळ झाला ,किती थांबशील वेडे
मलाही वाटेल उठुन सावरावे, अखेरचे एकदा!
-- श्रीकांत पेटकर
February 24, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti