मोक्षदायी जलधारा

सरिता ही एक पुण्यप्रदा
अखंडित समांतर किनारा
ध्यास सागरी समर्पणाचा
मोक्षदायीनी ती जलधारा...

झुळझुळते संथ अविरत
प्रवाह निश्चिंती वाहणारा
घेते कवेत, सुखदुःखांना
पापक्षालनी ती जलधारा...

तमा न पर्वा तिला कशाची
फुलवीते, दुतर्फा वसुंधरा
नदिकाठ तो सर्वांगी सुंदर
राऊळमंदिर गोपुर गाभारा...

अध्यात्मी,भक्तीभावरंगला
श्रध्येय, मुक्ती गंगाकिनारा...
भगीरथाच्या गंगेचे गंगोदक
जन्मी आत्मशांतीचा निवारा...

--वि.ग.सातपुते .( भावकवी )

9766544908

रचना क्र.२३५

१५ /९/२०२२



सरिता ही एक पुण्यप्रदा
अखंडित समांतर किनारा
ध्यास सागरी समर्पणाचा
मोक्षदायीनी ती जलधारा…

झुळझुळते संथ अविरत
प्रवाह निश्चिंती वाहणारा
घेते कवेत, सुखदुःखांना
पापक्षालनी ती जलधारा…

तमा न पर्वा तिला कशाची
फुलवीते, दुतर्फा वसुंधरा
नदिकाठ तो सर्वांगी सुंदर
राऊळमंदिर गोपुर गाभारा…

अध्यात्मी,भक्तीभावरंगला
श्रध्येय, मुक्ती गंगाकिनारा…
भगीरथाच्या गंगेचे गंगोदक
जन्मी आत्मशांतीचा निवारा…

–वि.ग.सातपुते .( भावकवी )

9766544908

रचना क्र.२३५

१५ /९/२०२२

Author