मुरब्बी

लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर ।

आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर....१,

विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार ।

परिपक्वता त्यांच्यातील, देई आनंदाला धार...२,

परिपक्वता येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी ।

ज्ञान चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही....३,

विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो ।।

अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पाऊल टाकतो...४

डॉ. भगवान नागापूरकर



लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर ।

आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर….१,

विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार ।

परिपक्वता त्यांच्यातील, देई आनंदाला धार…२,

परिपक्वता येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी ।

ज्ञान चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही….३,

विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो ।।

अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पाऊल टाकतो…४

डॉ. भगवान नागापूरकर

Author