May 7, 2013
गौरी, अभाव्या अहंकारा, अग्निज्वाला.. अनेकशस्त्रहस्ता ईतकी सामर्थ्यशाली असूनही दक्षाच्या अपमानामुळे यज्ञकुंडात समिधे सारखी जळत..राहीली.. उमा-पार्वती ..तीचा उद्वेग कवितेतून मांडायचा प्रयत्न मी केलाय .. मागच्या वर्षी केलेली कविता थोडी वाढवली आहे .. चंद्रचूडासाठी पुन्हा गौरी, अपर्णा
September 1, 2019
पुस्तकांच्या वनात शब्दांचा खजिना शोधतात,
कुंचला अन् लेखणीद्वारे पंचरत्न लुटतात,
अनुभवाची शिदोरी कव्यरुपी माळेत गुंफतात,
म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात !
कईक प्रश्नतर यांच्या गजल व चारोळी नेच सुटतात,
छोट्याश्या लेखातून हिरे मोती लखलखतात,
पॉलिश करण्यासाठी हे पुन्हा साहित्यच वाचतात,
म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात!
नकळत मानवी हृदयावर अक्षर रत्नांची झालर घालतात,
रोजच्या रटाळ दिनक्रमातुन चार शब्द पाचू विणतात,
साहित्य शृंगाराला सर्वस्व बहाल करतात,
खरंच आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात !
– श्वेता काशिनाथ संकपाळ.
August 20, 2018
थांबव गंगा यमुना मुली आपल्या नयनातल्या
हंसण्यात जन्म घातला मग ह्या कोठूनी आल्या ? //
हांसत गेले जीवन तुझे फूलपाखरा परी
तसेच जाईल भविष्यातें आशिर्वाद देतो शिरीं //
समजतील दुःखी तुजला नसता तो तुझा स्वभाव
हासून खेळून आनंदाने फूलवित रहा भाव //
जाणून घे स्वभाव सर्वांचे रमुन जा संसारी
चाली रितीचे पालन करावे तुझ्याच नव्या घरी //
आई बाबा दुरावले बाळगु नकोस खंत
पाहशील आम्हाला सासू सासऱ्याच्या रुपांत //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 10, 2018
वडील, या शब्दात सगळ काही सामावलेले असते. ते कसे बघुया. वडील म्हणजे आधार. प्रत्येक व्यक्तीला जीवनात आधाराची गरज असतेच आणि जर त्या वेळेस त्या व्यक्तीला त्याच्या वडिलांचा आधार भेटला तर तो पूर्ण जग जिंकू शकतो. बाप हा त्याचा मुलाला जन्म देण्या पासून ते त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला यश कस प्राप्त होईल ते बघत असतो. मुलं पण जर स्वतःच्या बापाचे कष्ट समजून घेणारे असतील तर बाप नक्कीच यशस्वी होतो.
April 12, 2024
विसर म्हणणे सोपे, विसरता येत नसते,
मनातले गाव कधी सोडता येत नसते.
ज्यांच्यासाठी आयुष्य वणव्यात जाळले आपण,
त्यांनाच नाव आपले आठवता येत नसते.
चेहऱ्यांवर हास्याचे मुखवटे लाख असतात,
डोळ्यांतले सत्य मात्र लपवता येत नसते.
सावलीही सोडून जाते, ऊन कलायला लागले की,
माणसांना माणूसपण जपता येत नसते.
म्हणून आता कुणाकडून अपेक्षा नकोच ठेवू,
या जगाला कुणाचे दुःख पेलता येत नसते.
कुणासाठी कितीही जगलात, शेवट एकटाच असतो.
चार दिवस अश्रू वाहतात... आणि पाचव्या दिवशी जग पुन्हा हसतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 18, 2026
दीपक दादाची फियाट हिरवी
करवली मिरवी सुनीता ताई
मांडवाच्या दारी कसली खट्पट्
नेहमीची कटकट गाडीची ती
मांडवाच्या दारी अडली मोटार
उठ धक्कामार प्रदीप बाळा
मांडवाच्या दारी कसली फट्फट्
गाडी झाली स्टार्ट दिपकाची
October 12, 2018
गर्द आणि इतर व्यसनांच्या मी पूर्ण आहारी गेलो होतो व आता माझी घरातील पैश्यांची मागणी वाढली होती , ती प्रत्येक वेळी पूर्ण होणे शक्यच नव्हते तेव्हा मग घरात छोट्या मोठ्या चोऱ्या सुरु झाल्या वडील पक्षाघातातून बरे होऊन आले होते आणि पुन्हा त्यांनी कामावर जाणे सुरु केले होते मात्र ते जरा विसरभोळे झाले होते त्याचा फायदा घेऊन मी त्यांच्या पाकिटातून पैसे गुपचूप काढत असे ,
May 28, 2020
पण आणि परंतु,
मध्ये सारखे येती,
निर्माण करती किंतू ,
जीवनही ते बिघडवती --!!!
गोष्ट कुठली सरळ ,
आयुष्यात होत नाही,
प्रत्येकाचे त्यांच्यावाचून ,
पदोपदी अडत राही,--!!!
सुख-- दु:खांची असो भेळ,
असो अडसर भोवती,
मार्ग नसण्यात निव्वळ
चोख भूमिका निभावती,--!!!
ते नसते तर आयुष्याची,
मग न्यारी नसती कुठली गंमत, त्यांच्याशिवाय भाषा अडतसे, सतत सारखी केव्हाही अविरत,--!
अस्तित्व त्यांचे जन्म देई, आभाळाएवढ्या कर्तृत्वाला, मातीतून वर उठत,
काही स्पर्शती आभाळाला,--!!!
सुखदुःखामधील रेषा,
पण परंतु सदैव आखती, अहंकाराचे पाय कापावया, अविश्रांत ते तयार असती,--!!!
अमर्याद सगळ्या दुःखांची, परिभाषा तिथूनच सुरू होई,
पण परंतु आणखी किंतू ,
शब्द महत्व राखत जाई,--!!!
ते नसते तर जीवनच बेचव, असल्यामुळे किती खोळंबा,? मानत नाही त्यांना मानव,
नीट समजून त्यांचे मर्म बा,--!!
© हिमगौरी कर्वे
October 18, 2019
ओलेत्या स्वराने गाती
ओल्याचिंब श्रावणधारा..
मन तरंग उठती नवेच
तनमनात बेधुंद शहारा..
पावसाचे थेंब बरसले
स्पर्शाने केली कुजबूज..
मनातल्या लाटेचे ऐकले
जणू त्यांनी मधुर गुज..
बहरल्या धरेचा रंग
सरीतेच्या डोही जलधारा..
पदराची खोड काढतो
अवेळीच उनाड वारा..
बंधनांची वादळे किती
आभाळ दाटले पुन्हा
आभास तुझा म्हणूनी
भिजण्याचा केला गुन्हा
घन व्याकूळ होऊन
येतील वाऱ्या सवे..
विरहाची सांगतील व्यथा
पुसतील माझी आसवे..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
July 26, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti