ॲलिस्टर मॅक्लीन यांच्या ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित, जेली थॉमप्सन दिग्दर्शित हा चित्रपट सुमारे १६० मिनिटांचा असून यात ग्रेगरी पेक, डेव्हिड निवेन, अँथनी क्वीन, अँथनी क्वेल आदी एकापेक्षा एक मातब्बर कलावंत आहेत. या चित्रपटाला ऑस्करची ६ नामांकने मिळाली होती तर २ गोल्डन ग्लोब अवॉर्डसह १ ऑस्कर मिळाले होती.
April 27, 2022
लाजेची मशाल नयनी,
नाकात नाजूक नथनी,
लाल ओठ गुलाबी छान,
स्त्री तू सौंदर्यांची खाण...
झुपकेदार शेपूट कुंतलेचं,
मुक्त कमरेवरी रुळलेलं,
शान तूझ्या मोहक स्त्रित्वाची,
गुंफुनी गजऱ्यामध्ये माळलेलं...
उडे ऐटीत डौल पदराचा,
कुंपण घाली मंद वारा,
झाकाळलेल्या या रुपासमोरी,
फिक्या त्या लखलखणाऱ्या तारा...
कामिनी गं तु योवणाची,
वसुंधरेची अभिमानास्पद मान,
अंकुश घाली स्त्रिशक्तिवर,
हे शृंगारिक देह वरदान...
- श्वेता संकपाळ
September 9, 2018
भारत पर्यटनाला आलेली
ती विदेशी महिला
हातातील चिप्सचे
रिकामे पाकीट फेकण्यासाठी
अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...
आणि तिच्याच समोर
संत्र्याची सोललेली साल मी
बिनधास्त रस्त्यात फेकली...
माझ्याकडे रोखलेली तिची
ती प्रश्नार्थी नजर पाहिली
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!
त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी
माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट
मी हळूच खिशात दाबलं...
आणि त्याच्याच मागून
भिकाऱ्यासारखं हात जोडून
मला विनंती करीत आलेल्या
कफल्लक म्हाताऱ्याला
वयाचा दाखला आणायला
मी बळेच पिटाळून लावलं...
त्याच्या डोळ्यातला
तो अश्रूचा थेंब पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!
रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या
तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची
तिने विनंती करताच
माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार
रक्ताने माखेल की काय या भीतीने
मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून
हळूच टांग मारली...
तिच्या नजरेतली भीक
मी स्पष्टपणे पहिली
तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!
बलात्काराच्या केसमधून
त्याला निर्दोष सिध्द करताना
मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...
बलात्काराच्या बळीची आब्रू
पुन्हा वेशीवर टांगली.
तिच्या डोळ्यातला राग पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!
एअरकंडीशनर मॉल मधून
महागडे कपडे अन शूज खरेदी करून
मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...
फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर
वेटरच्या हातावर
१०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...
मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना
१० रुपयासाठी अपार घासाघिस केली...
त्या गरीब शेतकऱ्याच्या
आर्त विनवणीचा सूर
कानात घुमत राहिला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!
समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून
शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या
मी खूप गप्पा मारल्या...
पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला
त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र
दयनीय अवस्था केली...
शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी
टीव्हीवरती पसरली...
प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या
गडाच्या बुरुजांचा आक्रोश
कानठळ्या फोडू लागला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!
गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स,
३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात
कुणी आरक्षणासाठी तर कुणी
आरक्षणाच्या विरुध्द भांडला...
आदिवासी पाड्यावरचा रुग्ण
वाहतूकसुविधे अभावी अजूनही
झोळीत टाकून आणलेला पहिला...
डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!
२६/११ ला मी मेणबत्त्या लावून
श्रद्धांजली वाहिली...
पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून
देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...
त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट
मी चवीने पहिले...
माझ्याच पैशात मी
कित्त्येक कसाब पोसले
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!
.....
आणि अजूनही मला
लाज नाही वाटत....
माझ्या निर्लज्जपणाची...!!!
February 27, 2017
आणखी एक बॉम्बस्फोट
शांततेच काळीज चिरून गेला
पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
सर्वसामान्यांची झोप उडवून गेला
संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां
आणखी एक बॉम्बस्फोट
पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला
ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
मानवतेला काळिमा फासून गेला
डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
डोक बधिर करून गेलां
जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला
कवी – निलेश बामणे
February 22, 2013
अग्ग बाई!!
सास्सु बाई
सदा त्यांना
अस्से घाई
ओsss!अरेच्चा!
पहा पहा
आधुनिक
पोषाख हा
अय्यो गडे!
इश्श गडे!
माझ्झी सासू
पहा गडे!
त्यांना तुम्ही
हसू नका
नाव मुळी
ठेवू नका
अय्यो रामा!
म्हणू नका
अभ्यासू त्या
ज्ञान ऐका
ज्ञानपिठ
पुरस्कार
त्यांना मिळे
मान थोर
छंद त्यांचा
ओssss!बघा ना
पुस्तकांचा
हा खजिना
नम्र अति
त्या आहेत
हो!मी सुन
भाग्यवंत
(कल्पनेत कल्पिलेल्या सास्सूबाई)
-- सौ. माणिक शुरजोशी
November 26, 2019
दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला
मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला
सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला
उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला
गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं
चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी
कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा
आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 26, 2019
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा,
यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ।।१।।
तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर,
तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ।।२।।
बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी,
एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ।।३।।
मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी,
डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ।।४।।
टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी साऱ्या जमवूनी,
लय लागूनी जातां सारी संसार गेली विसरूनी ।।५।।
राधा तर वेडी झाली तुझ्यावरील प्रेमानें,
लुटून जावे प्रेमामध्यें शिकविले श्रीकृष्णानें ।।६।।
गीतेचे तर ज्ञान आगळे उकलेले जीवन कोडे,
आत्मज्ञान घेतां त्यातील जीवनाचे दर्शन घडे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 29, 2016
जेंव्हा ठरले गावी जाणे हूर हूर होती मनी
बराच काळ गेला होता आयुष्यातील निघुनी
काय तेथे असेल आता सारे गेले बदलूनी
काळाच्या प्रवाहामध्ये राहिलं कसे टिकूनी
चकित झालो बघुनी सारे जेथल्या तेथे
उणीवता न जाणली क्षणभर देखील मानते
बालपणातील सवंगडी जमली अवती भवती
गतकाळातील आनंदी क्षण पुनरपि उजळती
आंबे चिंचा पाडीत होतो झाडावरती चढुनी
आज मिळाला तोच आनंद झाडा खालती बसूनी
मळ्यामधली मजा लुटली नाचूनी गाऊनी
विहिरीमधल्या पाण्यात मनसोक्त ते डुबूनी
ऐकल्या होत्या कथा परींच्या तन्मयतेने बसूनी
आज सांगे त्याच कथा मी काका मुलांचे बनुनी
वाडा सांगे इतिहास सारा पूर्वज जगले कसे
भव्य खिंडारी उमटले होते कर्तृत्वाचे ठसे
बापू, आबा, मामा, काका, मामी वाहिनी जमती
कमी न पडली तसूभरही प्रेमामधली नाती
मीही बदललो, गांवहीं बदलले काळाच्या ओघांत
आनंद मात्र तो तसाच होता पूर्णेच्या परिसरांत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 30, 2020
March 21, 2022
कुठले प्रेम खरे
कुठले खोटे
याचा विचार करतो कोण
तो, ती, का कुणी तिसराच
आपापली फुटपट्टी घेऊन
प्रेम मोजण्याचा
जो कुणी प्रयत्न करतो
किवा करू पाहतो
त्याने एक लक्षात ठेवावे
तिच्या आणि त्याच्या
मधले अंतर जितके मोठे
तितके ते प्रेम खरे..
तिथे सगळ्या फूटपट्या
खोट्या ठरतात...
-- सतीश चाफेकर.
December 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti