तिने कधीतरी विचारलंस,
अरे तुला कुठलं फुल आवडते ?
तेंव्हा मी क्षणात उत्तरलो..
मनात जपायला चाफा आवडेल
आणि ओंजळीत धरायला मोगरा...
वहीत ठेवायला बकुळ आवडेल
आणि धुंद व्हायला केवडा...
बोलायला अबोली आवडेल
आणि फुलवायला सदाफुली...
पण, प्राजक्त मात्र आवडेल तो,
हृदयाशि धरायला..आधारासाठी...
यावर ती थोडीशी नाराज झाली,
मी ते ओळखलं...
पुढे झालो आणि हलकेच हसत म्हणालो,
हे सगळं आवडेल ...... पण कधी
तर निशिगंधा मिठीत दरवळल्यानंतर...!!
तेव्हापासून ती अखंड दरवळत आहेस...
माझ्या मिठीत, मनांत ... हृदयात...!!!
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
May 23, 2021
बघता तुला प्रिया रे ,--
जिवा बेचैनी येते,
कासाविशी होता हृदयी,
आत *मोरपीस* हलते,--!!!
विलक्षण *ओढ* तुझी,
काळजाला किती छळते,
मूर्त माझ्या अंतरीची,
*अढळ अढळ* होतं जाते,--!!!
स्पर्श होता तुझा सख्या,
माझी न मी असते,
बाहूंत तुझ्या विसावण्या,
किती काळ मी तरसते,--!!!
तुझ्यातच सारे *विश्व* माझे,
जगही तोकडे भासे,
तुझ्याचसाठी राजसा,
मन्मनीचा *चकोर* तरसे,--!!!
उषा आणि संध्या,
आपले रंग उधळती,
प्रेम रंगाचाच वर्षाव,
भास्करावरती करिती,--!!!
रात्र येते *चंदेरी* ती ,
जेव्हा जवळ तू असशी,
जिवापाड जाऊन तूही,
प्रीत" माझ्यावर करशी,--!!!
धुंद रात्रीची *मदमस्त* किमया,
प्रेमात नखशिखांत नहाते,
आभाळीची चटोर चांदणी,
*प्रेम--लीलेसाठी* धडपडते'--!!!
©️ हिमगौरी कर्वे
March 23, 2020
नवरंग नवरात्रीचे !
प्रतीक शक्ती-भक्तीचे !!
पिवळा रंग सोन्याचा !
शुद्ध तेजस क्षणांचा !
हिरवा रंग सृष्टीचा !
वृध्दी,सुख-समृध्दीचा !!
करडा रंग भाग्याचा !
निरामय आरोग्याचा !!
केशरी रंग निर्मितिचा !
राजमंगल पताकांचा!!
पांढरा रंग शांतीचा !
एकोपा अन मैत्रीचा !!
लाल रंग कुंकवाचा !
सर्व मांगल्य मांगल्याचा !!
निळा रंग अस्मानाचा !
निर्मळशा हृदयाचा !!
गुलाबी रंग प्रितीचा !
अबोधशा यौवनाचा !!
जांभळा रंग नवलाईचा !
सखी रेणुका अंबाबाईचा !!
-- जयश्री दाणी
https://www.facebook.com/jayshri.dani.14
October 24, 2018
ग्रामीण संस्कृती आणि परंपरा या यात्रौत्सवानिमित्त पहायला मिळते.
March 18, 2017
हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती ।
लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।।
दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें ।
कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।।
दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें ।
उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।।
तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली ।
पकड येईना टिपण्या सौंदर्य, परि या वेळी ।।
जागृत केली मम हृदयांतील, सुप्त जी शक्ति ।
अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह, हे श्री सरस्वति ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 21, 2020
भूकंपाच्या एक एक धक्क्याने
सारं जमीनदोस्त केलं |
पहाता पहाता त्या भेगांनी
होत्याच नव्हतं केलं ||१||
ज्वालामुखीच्या मुखातून
लाव्हा भळभळतअसताना |
प्रत्येक वस्तू खाक होत होती
त्याला अंगावर घेताना ||२||
हे सारं लोभस दिसत होतं
दुरुन पहाताना |
मीच माझा राहू शकलो नाही
हे अनुभवताना ||३||
म्हणून वाटतं या जगात
प्रत्येक माणसाला |
हृदय नावाची चिज तरी
हवी स्वत;चीच असायला ||४||
मग प्रत्येक जण सुखी असेल
सारं जग सुखी असेल |
अरे कुणीतरी जगा असे
हे सारं अनुभवायला ||५||
July 31, 2015
केली मशागत शेतीची
झाली स्वच्छता वावराची
वाट पाहतो पेरणीची
मेघराजाच्या आगमनाची
मे महीना ही गेला
जुन निम्मा हो झाला
एक थेंब ही नाही पावसाचा
कधी येईल पावसाळा
बरसावे पावसाने
शेतीला चिंब करावे
शिवारात पाणी पाणी व्हावे
शेत पेरणीसाठी सज्ज आहे
मग होईल पेरणी जोमात
बिज अंकुरेल कोंबात
तरारेल पीक शेतामधी
हीरवगार रान होईल
पण आहे प्रतिक्षा
मानसुन आगमनाची
वाट पाहतो बळीराजा
पावसाच्या एका सरीची
उमेश तोडकर
June 26, 2023
पाऊस येता मन जाते भाराऊनी
सृष्टीचे रुप जाते हिरवेगार होऊनी
अनेकांच्या मनातले विचार पाऊस घेतो जाणूनी
म्हणूनच ती गाणे गाते संगीतमय होऊनी
तृप्त होते जीवसृष्टी मातीचा गंध घेऊनी
पण हाच पाऊस कधी कधी जातो काळ बनूनी
चातकालाही आवडे पाऊस भारी
तो थकतो पावसाची वाट बघूनी
समुद्र जातो खवळूनी
किनाऱ्यावरील लोक जीव मुठीत बसतात धरुनी
लहान मुले लुटतात मजा पावसात खेळूनी
धबधबाही खेळतो हिरव्यागार सृष्टीतूनी
वाट पाहते तुझी डोळे भरुनी
पण जीवसृष्टीला नको टाकू रडवूनी
- भाग्यश्री सतीश प्रधान
May 13, 2024
चला, आठवणींच्या गावा जाऊ, स्मृतींचे हिंदोळे झुलवत
पुन्हा एकदा लहान होऊ,
हाती हात मिळवत,--!!!
आठवांचे गावच रमणीय,---!!!!
किती नांदती सगेसोयरे,
हासुन आपले स्वागत करती,
त्यात बालपणीचे वडीलधारे,--!!!
शाळेतील शिक्षकांच्या हाती,
मुळीच लागायचे नाही,
त्यांनी केलेल्या कठोर शिक्षा, काहीच आठवायचे नाही,
आठवावा तो निरागसपणा,
निष्पाप कोवळे ते वय ,
अशावेळी हमखास येते,
मैत्रिणींची खूप सय,
कधी लुटूपुटूची भातुकली,
त्यातले खोटेच रुसवे-फुगवे,
आज डोळे गहिंवरती,--!!!!
पण वाहून ना जाती त्या सयी,
लग्न बाहुला-बाहुलीचे,
सासूने मागता हुंडा,
ठाम राहून नकार देत,
मुलगी परतवणे घरां,
बरोबर येई मग सासू,
हीच मुलगी करायची,
दोन तोळे जास्त घालू,
समजूत अशी काढायची,--!!!!
आट्यापाट्या लपंडाव लगोरी, किती त्यांच्या आहारी जाणे,
वेळ काळ विसरत सगळे,
त्यावरून बोलणी खाणे, बालपणीची ही धुंदी,,---!!!!
अजूनही गेली नाही,
भोंडल्याची खरी मज्जा,
आजच्या मुलीला कळत नाही,
पाच दहा पैसे परंतु,
कधी हाती ना लागले,
त्यासाठी किती सायास कित्येकाना पटवावे लागले,--!!!
हिरव्या लाल गाभुळल्या चिंचा, आवळे जाम आणिक बोरे,
त्यांची किंमत सांगा आज,
थोडी आठवून बघा बरे,--!!!
मे महिन्याच्या सुट्टीत कसा,
घरात घालायचा धिंगाणा,
जो येईल तो ओरडे,
पण विचारलेच नाही कुणा,--!!!
पापड पापड्या कुरडया,
पदार्थांची रेलचेल असे,
कामाच्या सांगून नावाखाली, पळवापळवी" ठरलेली असे,
वेळ येता आजोबांचा,
मिळे खंबीर पाठिंबा ,
त्यांच्या प्रेमापुढे गप्प सगळे,
हिंमत"" व्हायची नाही कुणा,--!!!
किती अशा आठवणी,
शब्दच अपुरे पडती,
*स्वप्नातील हे गाव ठरते,
डोळे उघडून बघा भोवती*,--!!!
हिमगौरी कर्वे©
February 7, 2019
*म्हण येरे पावसाला *
जेष्ठा मागून आलास तुझे स्वागत आषाढा
म्हण जरा माझ्या सवे पावसाला ये चा पाढा ॥धृ॥
पिण्यासाठी नाही पाणी बघ रिता माझा घडा
नाही पाणी इथे तिथे पाणी नाही फुलझाडा ॥१॥
आस आता तुझ्या पाशी बरसून जा आषाढा
कढ दाटले आशेचे ओल्या झाल्या नेत्रकडा ॥२॥
यक्ष कालिदासाचा तो मेघ दूत त्याचा बडा
सांग त्याला ही रे जरा यक्षप्रश्न माझा बडा॥३॥
परोपरी विनवणी तुला म्हणूनी आषाढा
म्हण जरा माझ्या सवे पावसाला ये चा पाढा ॥४॥
मधु दारसेवाड....
May 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti