(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री सरस्वतीची तसवीर

    जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले

    जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१।

    सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची

    श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२।

    शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे

    शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३।

    रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे

    सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४।

    ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक ठिकाणी असे

    प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला, अडचण येत नसे ।५।

    शक्ति, युक्ति, बुद्धी एकटवूनी, परिश्रम केले

    धनराशीचे अल्प भांडार, त्याने जमविले ।६।

    तेज चमकले त्याच्या जीवनीं, धन लक्ष्मीचे

    समजूं लागला फार सुखी, क्षण कर्तृत्वाचे ।७।

    माहीत नव्हते लक्ष्मी असते, चंचल स्वभावी

    केव्हां येईल जाईल कशी, भंरवसा तो नाहीं ।८।

    चालत असतो खेळ नियतीचा, गमतीनें सदा

    कुणाचे फांस कसे पडतील, कळेना अनेकदां ।९।

    कमाईस त्याच्या ओहोटी लागली, व्यवहारामध्यें ती

    प्रयत्न सारे फोल ठरूनी, अपयश येती ।१०।

    निराश बनले जीवन सारे, अंध:कार झाला

    दु:खाच्या त्या चटक्यामध्यें, जीव होरपळला ।११।

    मार्ग बदलले पूर्ण तयानें, आपल्या जीवनाचे

    धन कमविणें लक्ष नव्हते, त्याच्या प्रयत्नांचे ।१२।

    वाचन करूनी चिंतन केले, मन रमविण्या चित्ताला

    ध्यान साधना देवूं लागली, आनंद त्याला ।१३।

    विसरूनी गेला हलके हलके, दु:ख निर्धनतेचे

    काव्य लेखनानें उघडले द्वार, नव जीवनाचे ।१४।

    चकीत झाला एके दिवशीं, बघूनी तसबिरीला

    श्री लक्ष्मीचे ठिकाणी सरस्वतीचा, बदल कुणी केला ? ।१५।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

      August 5, 2015


  • मीच शोधात होतो

    मीच शोधात होतो
    मीच शोधात होतो सत्याच्या वेड्यागत कित्येक वर्षे
    पण जे सापडले ते मला कधी कळलेच नव्हते
    मीच शोधात होतो खर्याक प्रेमाच्या त्या वर्षानुवर्षे

    जेंव्हा सापडले ते मलाच नको झाले होते
    मीच शोधात होतो मोल्यवान वस्तुच्या कित्येक वर्षे
    ती सापडता माझे कस्तुरीमृग झाले होते
    मीच शोधात होतो ज्ञानसागराच्याच वर्षानुवर्षे

    ते दिसणार मज तव माझे नयन मिटले होते
    मीच शोधात होतो माझ्याच प्रतिभेच्या कित्येक वर्षे
    ती सापडली तेंव्हा जगणे नको झाले होते

    कवी – निलेश बामणे ( एन. डी. )

    -- निलेश बामणे

      May 2, 2014


  • निघून जरी जाशी

    निघून जरी जाशी,---
    मम आयुष्यातुनी तू ,
    तरी सारखा मागे उरशी,
    लपलेल्या अंत:करणी तू ,---
    तीर जसा वेगे शिरतो,
    घायाळ करत अचानक,
    तसा तू बाण बनतो,
    छेद आरपार देत,--!!!
    तो जसा बंबाळ करी,
    पर्वा ना त्याला कुठली,
    कोण त्याला थोपवी,
    न कुणी त्यावर मात करी,
    तसेच तुझे घुसणे,--
    मम हृदयी, आंत आंत,
    कितीदा नव्याने पुन्हा जगावे मरणच पाहे अगदी वाट,--!!! मुखवटे सुखाचे घालून सगळे,
    आता थकावयांस होते,-- मुखवट्यामागे काय दडले ते, कुणास काय ठाऊक असते,--? रात्रंदिन तुझे असे छळणे,
    कुठवर मी आता सहावे,?
    बरसात पोकळ सुखांची होता, त्यात किती कोरडे राहावे,--
    तू स्वतःत नाहीस राहिला,
    तितुका माझ्यात सामावला,---
    दूर तरी कसे जावे,--
    प्रश्न अनुत्तरीत राहिला,--!!!

    हिमगौरी कर्वे ©

      August 31, 2019


  • जंगलचा राजा !

    एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.

    जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.

    अस्वलाला वाटलं…

    ‘आपण ही जंगलचा राजा व्हावं.

    सिंहासारखं रुबाबात फिरावं.’

      September 14, 2010


  • उत्सव माझ्या कवितेचा

    हे असेच मी बनावे..
    नी असेच मी घडावे..
    शब्दांनी ही रे माझ्या,
    माणसासाठीच लढावे.

    विष प्यावे अन शंकर व्हावे,
    शब्द माझे पैगंबर व्हावे..
    फकिरा लिहावी इथे साठे नी
    शब्दांनीच आंबेडकर व्हावे..

    आगरकर सुधारक हे दिवाने यावे,
    खरा धर्म सांगण्या गुरुजी साने यावे..
    जोतिबा होऊन समाजाचे सृजन करावे,
    कवितेत मिराने प्रेमाचे भजन करावे..

    पाजावे नाथाने गाढवास काशीचे पाणी,
    माणसाला माणुसकीचे दर्शन व्हावे ..
    गावे तुकाने जे का रंजले गांजले
    ज्ञानदेवांनी जगासाठी पसायदान घ्यावे ..

    देश भक्तीची मदिरा घ्यावी,
    आणि नशेत असे झिंग व्हावे.
    पेटावे असे मग रक्ताने माझ्या,
    क्रांतिकारक भगतसिंग व्हावे.

    मातीसाठी कधीही अव्वल,
    शर्थ माझ्या जिवाची व्हावी..
    बघावे मी परस्त्रीस जेंव्हा
    नजर माझी शिवाजी व्हावी ,,

    अहिंसक गांधी यावा इथे ,
    विचारांनी माझ्या शुद्ध व्हावे
    षड्रिपूंशी व्हावी सुटका,
    मन हे माझे बुद्ध व्हावे..

    सोडून सारे द्वेष मनीचे,
    सारेच प्रेमात अधीर व्हावे,..
    कालिदास व्हावे शब्द काही,
    काही शब्दांनी कबीर व्हावे..

    एक उत्सव माझ्या कवितेचा,
    मला असा भरवायचा आहे.
    मलाच माझ्यामध्ये एक,
    माणूस असा घडवायचा आहे...

    -- लतीफ शेख सारोळकर
    लातूर
    8975071158

    https://www.facebook.com/shaikh.latif.988

    ( “आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन )

      November 23, 2018


  • निवांत मी

    किती मिळाले तरी कमी हे
    हे माझे अन ते माझे
    जग सगळे हे पुढे धावू दे
    निवांत मी अन घर माझे...

      August 18, 2026


  • छत्री…आणि तुझी आठवण

    पावसाच्या पहिल्या सरीत,
    हातातली छत्री अलगद उघडली...
    आणि नकळत तुझी आठवण
    मनाच्या उंबरठ्यावर येऊन थांबली.

    छत्री अजूनही पावसापासून जपते,
    पण तू नसल्यापासून
    मनाला भिजण्यापासून
    कोणीच वाचवू शकलं नाही.

    एक दिवस वाऱ्याच्या झोताने
    छत्री उलटी झाली...
    काड्या मोडल्या, कापड फाटलं,
    आणि तेव्हाच समजलं
    जगात काहीच कायमचं नसतं.

    आजही पाऊस तसाच बरसतो,
    हातात छत्रीही तशीच असते.
    फरक एवढाच...
    आता अंग भिजत नाही,
    पण मन मात्र प्रत्येक सरीसोबत
    चिंब भिजून जातं.

    छत्रीची सावली अजूनही मिळते,
    पण तुझ्या प्रेमाची ऊब
    कुठेच सापडत नाही.
    पावसाचा प्रत्येक थेंब
    तुझ्या आठवणींचं नाव घेऊन
    डोळ्यांत अलगद दाटून येतो.

    आयुष्याच्या या अखंड पावसात
    एकच इच्छा अजूनही जिवंत आहे,
    एकदा तरी पुन्हा
    तुझ्यासोबत एका छत्रीतून चालावं...
    शब्द नकोत, स्पष्टीकरण नको.
    फक्त तुझा हात हातात असावा,
    आणि पाऊस मनमोकळा बरसत राहावा.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 24, 2026


  • शोधूं कोठें त्यास ?

    शोधत होतो रुप प्रभूचे, एक चित्त लावूनी ।
    अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी ।।१।।

    शांत झाले चंचल चित्त, शांत झाला श्वास ।
    ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश ।। २।।

    पचन शक्ती हलकी झाली, जठराग्नीची ।
    शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्याची ।।३।।

    देहक्रियांतील प्राणबिंदू , असे ईश्वर ।
    समरस होतां त्याच शक्तिशीं, होई स्थिर ।। ४।।

    शोधामध्यें चिंतन करतां, ध्यान परी लागते ।
    समाधी स्थितीत येतां प्राण, अनंतात मिसळते ।।५।।

    नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे ।
    विश्वमंडळ तोच असतां, शोधू तयास कोठे ? ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 4, 2019


  • निसर्ग व्याप्ती

    उंच चढूनी हिमालयी, झेंडा तो रोविला
    गीरीराजाचे शिरावरी, विजय संपादिला ||१||

    उंचाऊनी बघे मानव, अथांग जगताला
    विज्ञानाच्या जोरावरती, अंतराळात गेला ||२||

    युगा युगाचा चंद्रमा, केला अंकित त्याने
    त्याच्या देही ठेवी पाऊल, मोठ्या अभिमानाने ||३||

    अगणित दिसती गृहगोल, त्याचा दृष्टीला
    सीमा न उरली आता मग, चौकस बुद्धीला ||४||

    चकित होतो प्रथम दर्शनी, विज्ञाना बघता
    दिसून येती अनेक गुढे, एक एक उकलता ||५||

    किती घेशी झेप मानवा, उंच उंच गगनी
    वाढत जातील क्षितिजे, तितक्याच पटींनी ||६||

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      September 22, 2019


  • महिला दिन साजरा होतो

    महिला दिन साजरा होतो..
    पण महिला होतात व्यक्त मनातून,बोलतात अंतरातून, मोकळ्या होतात सहजतेतून ???
    खरच महिला दिन साजरा होतो का शुभेच्छा देऊन ???
    तिच्या मूक वेदनेची हळवी सल
    की निःशब्द भावनांची जखम
    तिच्या हास्यमागे करुण दुःख
    की हसऱ्या डोळ्यांत दुःखद ओल
    तिच्या अव्यक्त मनात असंख्य काहूर
    की तिच्या खोट्या आनंदात दुःखी चाहूल
    सहन करतीये ती आज वर्षानुवर्षे अंतरातून
    स्त्री आहे भारतीय होतात संस्कार
    तिच्यावर मग लहानपणापासून
    मनाच्या तळात साचलं काही तर भाव
    विरतात तिचे नाजूक निःशब्द बंधात..

    -- स्वाती ठोंबरे.

      November 25, 2021