“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 21, 2012
हे दगडांच्या देशा तुजवर हिरवाईच्या रेषा
July 12, 2026
June 7, 2011
कुणी उधळला क्षीतिजावरती
रंग केशरी हा सांगा
मळवट भरल्या उंच टेकडया
कुठे निघाल्या पर्वत रांगा
भिरभिरणारे पंख चिमुकले
का उधळले चौखूर
कुशीत घेऊन आभाळ सारे
पक्षी उडाले दूर दूर
झाडे वेली होऊनी जागी
फुले कुणाला वाहतात
हिरवी हिरवी तृणपाती
अजूनी दवाने नाहतात
उंचावूनी मान आपुली
माड शोधतो कोणाला
सोवळे नेसून पळस वेचतो
पाने आपुली द्रोणाला
कुणी शिंपडले अत्तर येथे
थंडी गुलाबी कुंद कुंद
बघता बघता सकाळ झाली
उगवताच सूर्य लालबुंद
-- विनायक आभाळे
December 19, 2018
आपापल्या महालात
तुम्ही सर्वेसर्वा असता,
मग तुम्ही पेशवे असा किंवा हुजरे
सरदार असा किंवा शिलेदार.
बाहेर पडल्यावर मात्र
तुम्ही बनता
जगातील कुणीतरी,
लहानमोठे.
कुणापुढे तरी
तुम्हाला
झुकावं लागतं .
पण ,
आणखी कुणाला तरी
तुम्ही
स्वत:पुढे वाकायला लावता .
आणि त्यामुळे ,
फक्त त्यामुळेच ,
तुम्ही
मोठे मोठे
बनत जाता -
डोंगराएवढे
पर्वताएवढे .
पण ,
तें मोठेपण
केवळ दरबारातच असतं
केवळ देवडीवरच रहातं .
रणशिंग फुंकलं जातं
आणि
तलवारी भाले उंचावून
सारेजण
स्वत:ला
लढाईच्या धुमश्चक्रीत
झोकून देतात
तेव्हां ,
शिलेदार काय
अन् पेशवा काय
सारे सारखेच असतात .
पानपतावर
एखादा बारगीर पडतो
तसाच
एखादा विश्वासरावही पडतो,
कुणाची तरी
निनावी गोळी लागून .
एखादा भाऊ सापडतो
दुश्मनांच्या भाऊगर्दीत,
आणि धराशायी होतो
कुणा अनामिकाच्या
तलवारीच्या फटकाऱ्यानं .
रणधुमाळीत
नसतात शिलेदार , नसतात पेशवे,
नसतात हुद्दे , नसतात नावें ;
असतात फक्त -
पेशवे आणि हुजरे यांना
एकाच पातळीवर आणून सोडणारी
अस्ताव्यस्त पडलेली शवें .
बस्स .
हेंच एक चिरंतन सत्य आहे ,
आणि हेंच आपण
ध्यानीं ठेवायला हवें,
यशाची उत्तुंग शिखरें चढतांना ,
जीवनाच्या पानपतावर
प्राणपणानें लढतांना ,
आणि ,
हिरवा चुडा फोडून टाकून
धाय मोकलून रडतांना देखील .
-- सुभाष स. नाईक, सांताक्रुझ, मुंबई .
May 19, 2016
November 26, 2021
सारे जीवन जाते आपले, अन्न शोधण्याकडे ।
काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।।
जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे ।
आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।।
धडपड करी आम्ही सारी, देह सुखापाठी ।
विचार ही मनांत नसतो, इतरांच्यासाठी ।।३।।
वेळ काढावा जीवनामधूनी, इतरांकरीता थोडा,
सार्थकी लावा आयुष्य, जीवन शिकवी धडा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
August 13, 2015
चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा
कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा...१
घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ
क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२
सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते
आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते....३
पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी
वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे राहतील विविध आठवणी....४
हाच हिशोब जीवनाचा, दुजा वाचतो इथेच पाढा
इतरांसाठी जगता जेव्हां, सार्थकी होतो आयुष्य लढा...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 29, 2020
सत्य, दृष्टांत हरिहराचा
शब्द निःशब्द भावनांचे
लोचनीच फक्त साठवावे
रूप, अतर्क्य नियंत्याचे.....
गवाक्षी कवडसे नारायणी
तिमिरीही भाव प्रसन्नतेचे
उघड़ता कवाड़े अंत:चक्षु
ओंजळी शब्द सरस्वतीचे
द्वैत अद्वैताचे मिलन सुंदर
तृप्ततादात्म्य मुग्ध पावरीचे
स्पंदनी झरावी पुण्यपुण्यदा
भाग्य, मंत्रमुग्धी कृतार्थतेचे....
मीत्व व्यर्थची सोडूनी द्यावे
अर्थ ! उमजावे सात्विकतेचे
निर्मोही मैत्रतत्व उरी रुजावे
स्मरावे नित्य नाम भगवंताचे....
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १९६
११/८/२०२२
September 13, 2022
आकाशाला शब्द भिडले, हृदयामधले
भाव मनीचे चेतविता, स्फोटक जे बनले १
देह जपतो हृदयाला, सदा सर्व काळी
धडकन त्या हृदयाची, असे आगळी २
जमे भावना हलके तेथे, एकवटूनी
सुरंग लागता तीच येई, उफाळूनी ३
कंठ दाटता जीव गुदमरे आत
रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात ४
उद्वेग बघूनी शरिर, कंपीत होते
हृदयातील भाव जावूनी, मन हलके होते ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti