(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • व्यक्तता

    शब्द थकले, मौनही आज थकले
    सांगा नां, आज व्यक्त कसे व्हावे
    भावनांचा श्वास आज गुदमरलेला
    सांगा नां, जगणे सुलभ कसे व्हावे
    कधीतरी सहज मनमोकळे करावे
    कां उगा ? सांजवेळी साशंक व्हावे
    अव्यक्ताचे, जीवनी अर्थ वेगवेगळे
    मनीचे सारे सत्य बोलुनी मुक्त व्हावे
    आज नां, कुठलीच याचना अपेक्षा
    तरीही, जीवनी निश्चिंत कसे व्हावे
    तड़जोड जीवनी, हीच मन:शांती
    हेची समजुनी, उमजुनी मुक्त व्हावे
    सत्य ! ओढ दिसते नेत्री तरळताना
    कां ? या वास्तवालाही पारखे व्हावे
    वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १३३.
    ९ - ५ - २०२२.

      June 2, 2022


  • कृपाळू

    दिलास जन्म मानवी
    देवा! काय याचू मी
    कृपाळू, तूची दाता
    तुलाच काय मागू मी...।।

    दिलेस, तू सारे काही
    तृप्त, तृप्त कृतार्थ मी
    सर्वार्थी तुझ्यात रमता
    सांगनां काय मागू मी...।।

    अनंता! तूच कृपाळू
    तव छायेत नित्य मी
    नांदतोस मनहृदयी
    देवा! काय मागू मी...।।

    तव अदृश्य परिस्पर्शी
    सुखावतो अंर्तआत्मा
    अमृतयोग अमरत्वाचा
    चिरंजीव हा जीवात्मा..।।

    – वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २२२

    १/९ /२०२२

      October 1, 2022


  • श्रीमंती

    स्मृतीलहरींच्या झुल्यावरती
    मी नित्य सुखात झुलतो आहे

    आठव सारेच गगनभारले
    भावशब्दातुनी गुंफीत आहे

    सुखदुःखांची संमिश्र सावली
    अजुनही ती साथसंगती आहे

    मनांतर कधी नाही बदलले
    संवेदना नैसर्गी तीच आहे

    जढणघड़ण सुंदर संस्कारांची
    जीवन आज कृतार्थी आहे

    मैत्र नात्यांचे छान लाभले
    हीच जन्माची श्रीमंती आहे

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. ३०९

    २८/११/२०२२

      December 8, 2022


  • मुलगी होणं इतकं सोप्प नसतं…

    ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने, समाजाच्या अपेक्षा आणि तिच्या स्वतंत्रतेच्या संघर्षाचे चित्रण केले आहे. तिच्या प्रत्येक कृतीला समाजाच्या विविध दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं, हे स्पष्टपणे व्यक्त केले आहे

      May 18, 2025


  • एकाग्रतेने जगा

    जगण्या झाले कठीण क्षण,

    अन्यायाने सीमा गाठली ।

    चक्र आहे दैव गतीचे,

    समजूत कुणीतरी मना घातली ।।

    जीवन मार्ग सरळ असता,

    फेरे पडती नशीबाचे ।

    अनेक वाटा दिसून येता,

    भटकणे मग होई जीवाचे ।।

    विसरूनी जातो मार्ग आपला,

    तंद्रीमध्ये भटकत असता ।

    बोलफूकाचे देत राही,

    नशीब दैव म्हणता म्हणता ।।

    असंख्य वाटा अनेक ध्येये,

    मिळेल एकची विश्वासानी ।

    नशीबाला परी दोष न देता,

    चालत राहा एकाग्रतेनी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      May 24, 2016


  • गर्दीत माणसांच्या

    गर्दीत माणसांच्या लोटून हाय! मजला
    स्वप्नात पाहिलेला माझा गुलाब गेला
    त्या मखमली सुखाला मी स्पर्शिले न होते
    अजुनी; तरीही त्याच्या का पाकळ्या गळाल्या?
    शहरात आज साऱ्या ही 'ईद' चाललेली
    त्याच्या स्मृतीत माझा सारा सुना मुहल्ला
    त्या जायचेच होते निघुनी नवीन देशा
    का शुभ्र हा दुपट्टा इष्कात रंगविला?

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

      April 10, 2023


  • वेडा चंद्रास्त

    केशरी क्षितिजी
    त्या चंद्राची कोर
    सोबत चांदणी
    फिरते सभोवार
    दाटलेल्या सांजवेळी
    परतून येई सारी पाखरं
    नसे उजेड संपूर्ण
    नाही काळोख फार
    सोबती निघे तो चंद्र
    जिथवर जाई नजर
    जणू सखा सोबती
    प्रेमळ मृदू अलवार
    निर्मळ नितळ मनी
    उगी उठे हुरहूर
    कातळास का कधी
    सांग फुटेल पाझर
    रेंगाळू नकोस तेथे
    तू वेळी सावर
    आता मनास वेड्या
    तू वेळी आवर
    बहकेल हे बहाण्याने
    तू नको जाऊ पार
    उगी काळजाशी भिडते
    ही लोभस चंद्राची कोर!!
    -- वर्षा कदम.

      March 5, 2022


  • कृष्णा

    मम चित्ती तुझे रूप गोपाळा, यशोदानंदन जगत्पालका,
    जगदाधिशा प्रतिपाळा,
    आठवती किती नावे कृष्णा,---

    देवकीनंदना वसुदेवसुता,
    राधेच्या कृष्णा, रुक्मिणी- भ्रतारा,
    तुझं आठवते मी घननिळा, द्वारकाधीशा,
    विष्णू अवतारा मनमोहना तू बाळकृष्णा,--!!!

    गोपिकांमधील तू श्रीरंगा,
    श्रीहरी तू जगदोद्धारा,
    नटवर तू अनादि अनंता,
    उभा राहशी प्रसंगी सारथ्या,--!!!

    कधी भासशी नुसती कल्पना,
    पण विहरशी आत्मी मनोहरा, सत्यभामा तुझीच कांता,
    लुब्ध तिच्यावर तू मुरलिधरा,---!!!

    सुभद्रावर, तू तिच्यावरी भाळता, सुभद्राहरण करशी नंदकिशोरा,
    काय म्हणू तुझ्या स्वरूपा,
    असशी, भासशी अनेक रुपा,
    वात्सल्यमूर्त तू हे नंदबाळा,
    स्मरते मी तुज कितीदा गिरिधरा,--!

    हिमगौरी कर्वे ©

      August 21, 2019


  • भविष्यातील अमृत !

    भविष्यात ‘पाणी’ अमृत ठरणार आहे,
    मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे !
    आतापासूनच तरतूद करून ठेवावी लागणार आहे,
    रेन वॉटर हार्वेस्टिंग उपयोगी पडणार आहे !

    शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॅकेजने सुटतील?
    समस्येच्या मुळाशी जाऊन सोडवाव्या लागतील !
    कदाचित जलशिवार आणि नद्या जोडणीने
    शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सुटील !

    अवर्षणग्रस्तांना ‘अमृता’चे आमिष दाखविले,
    बिचारे ‘जलाचे’ दोनथेंब पिऊन जगले !
    ‘अमृत’ प्राशनाने अमरत्व मिळतं म्हणतात,
    ‘अमृता’ ऐवजी नशिबी दगडगोटेच आले !

    बळीराजा सगळ्या बाजूने गांजला आहे,
    अमुतापेक्षा विषाला जवळ करत आहे !
    बळीराजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
    वसुंधरेवरील जालामृतात आहे !

    वसुंधरेवर पहिले ‘अमृत’ सिंचन
    परमेश्वराने केले !
    सागराच्या पाण्याचे ढगात रुपपांतर करून
    वसुंधरेवर सर्वत्र ‘अमृत’ बरसले !

    -- जगदीश पटवर्धन

      August 25, 2015


  • कुठल्या वाटेवर या

    कुठल्या वाटेवर या
    पाऊल अलगद पडते
    ही वाट कुठे हरवून
    अनामिक मग होते..
    फुलतील फुलांचे मळे
    फुलपाखरे फुलात बागडे
    गंधित मन होईल अलगद
    सुवास अंतरी मोहक दाटे..
    ही वाट अशी मग चालता
    रमते क्षणभर मन हसरे बावरे
    पाहूनी निसर्ग फुलतील गात्रे
    नयनी साठविते हे फुलांचे ताटवे..
    किती किती मन हरखून जाई
    सुखद क्षण आनंद हृदयात भावे
    मोहरुन जाईल अबोल काया
    चुंबीता फुलास भुंगा कळी ती लाजे
    हरवते या वाटेवर पाऊल माझे
    किती रंगुन जाईल मनाचे धागे
    उरतील पाऊलखुणा या वाटेवरती
    ते धागे असतील धुंद रेशमी लडीचे..
    फुलतील फुले मोहक सारे
    फुलांचे गालिचे अलगद अंथरले
    मन तृषांत अधिर आल्हाद ओथंबले
    फुलात गंधाळून लाजले फुलपाखरे..
    -- स्वाती ठोंबरे.

      November 14, 2021