(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ऋतूचे चक्र आणि मन

    कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,
    हात-पाय गार, काटे अंगी येती
    नकोसा वाटतो, मजला हिवाळा,
    वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा

    सुकूनची जाते, हिरवे रान
    शरिर राहते, घाम निथळून
    लाही लाही होता, त्रस्त होई जीव,
    शोधण्या ढग, मन घेई धाव

    थांबवितो कामे, वादळी वारा,
    पर्जन्याचा मारा, पडताती गारा
    पाणी चहूकडे, वाटते सुकावे,
    वर्षा जावूनी, सुक्यात खेळावे

    आपल्या जे हातीं मन नसे त्यांत
    सुख त्यांच्यांत पाही, नसे जे हातात

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 18, 2017


  • गांधीजयंती ची सफाई मोहीम ! ( नशायात्रा – भाग १३ )

    पहाटे पहाटे गांजाचे दम लावून आमची गँग सफाई मोहिमेवर निघाली काही जणांच्या हातात झाडू होते , तर काहींनी खराटे आणले होते मात्र दोन जणांनी काहीच आणले नव्हते त्यांना विचारले तर म्हणाले घरचे झाडू , खराटे सकाळी घरी लागतात म्हणून नाही आणले , मात्र हे दोघेही एकदम झकपक कपडे घालून आले होते त्यापैकी एकाने नवा ‘सफारी ‘ आकाशी रंगाचा तर दुसऱ्याने झब्बा आणि पायजामा घातला होता क्रीम कलरचा , मला त्यांचे ते कपडे पाहून जरा नवल वाटले हे असे कपडे घालून हे कसले झाडू मारणार ?

      January 30, 2020


  • शांत असे हे

    शांत असे हे तळे थंडसे त्यात निवांत बदक पिले

      July 12, 2026


  • जातीची दांडगाई आणि ज्ञानेश्वरांची मराठी

    ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे.

      September 25, 2016


  • गाणारी बोटे.. गोविंदराव पटवर्धन

    गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी गुहागर जवळ असलेल्या अडूर या कोकणातल्या गावी , त्यांच्या आजोळी झाला. ते १९३० च्या सुमारास मुंबईला आले . त्यांचे शिक्षण मुबईतील आर्यन एज्युकेशन स्कुलमध्ये झाले. १९४२ साली मॅट्रिक झाल्यानंतर ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजिवेकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली परंतु त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती.

      February 28, 2024


  • शून्याचे गणित

    समजण आणि असणं
    याच्यात तिनशे साठ
    अंशाचा कोन होतो

    त्यांच्या समीकरणातून
    माणूस शून्यात जाऊन पोहचतो ||

    कर्तबगारीच्या जमेतून
    प्रौ़ढीची वजाबाकी करतो
    त्यावेळी माणूस परत
    शून्याकडेच वळतो ||

    सत्कर्माच्या गुणाकराला
    अनितीने भागतो त्यावेळी
    माणूस परत शून्याकडे वळतो ||

    हरिस्मरणाचे बीजगणीत
    श्रध्देने सोडवत जातो त्यावेळीही
    माणूस शून्याकडे जाऊन पोहचतो ||

    -- चंदाराणी कोंडाळकर

      January 5, 2016


  • तुझंच नाव घेता गझल होत आहे

    तुझ्या सुंदरतेसाठी शब्द शोधत आहे,
    मनाच्या ओंजळीत स्वप्नं वेचत आहे.

    नाहीतर कविता-शायरी मला कुठे येते,
    तुझ्याच आठवांनी कागद भिजत आहे.

    पहाटेच्या दवासारखी तुझी ती निरागसता,
    तिच्याच उजेडात जीव न्हाऊन निघत आहे.

    तुझ्या हास्याची सर नाही फुलांच्या बहराला,
    तोच गंध श्वासागणिक दरवळत आहे.

    तुझ्या डोळ्यांच्या त्या शांत गहिऱ्या सरोवरात,
    माझं प्रतिबिंब हळूच हरवत आहे.

    मी ना कवी, ना शब्दांचा कुठला जादूगार,
    तुझ्यामुळेच ओठांवर गीत उमटत आहे.

    तुझ्या सहवासाची आस मनात जपून,
    प्रत्येक क्षण तुझीच वाट पाहत आहे.

    तुझ्या सुंदरतेसाठी शब्द शोधत आहे,
    शब्द संपले तरी प्रेम बोलत आहे...

    नाहीतर कविता-शायरी मला कुठे येते,
    तुझंच नाव घेता गझल होत आहे...

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 12, 2026


  • कृतज्ञता

    अगणित आकाशगंगा तुझ्या.
    त्या सगळ्याला व्यापून उरलेलं,
    तुझं अस्तित्व, मला परीपूर्ण करणारं .....

    तुझ्या असंख्य सौरमालेतल्या,
    एका छोटूश्या ग्रहावर मी.
    तरी माझी दखलं घेणं तुझं.
    कृतज्ञ करतोस मला..

    दाखवतोस तुझं असणं मला नेहमीच.
    ही अथांग निळाई, खेचुन काढते माझ्यातलं काहीतरी...
    गुंतुन जातं भान, निळाईच्या नवलात.....
    असशील का तु या निळाईत!! की त्याच्याही पार विहरणारा
    की माझ्यात स्थिरावणारा....

    शोधत रहाते नजर, आरपार निळाईच्या ....
    तूही बघतच असशील ना,
    तिथून माझ्याकडे
    क्षणभर चमकुन जा ना....
    तुला शोधताना ......
    डोळे भरुन येतात, पण मन कसं भरत नाही ...

    तुझ्या महाप्रचंड उर्जेचा, एक अंश ओततोस माझ्यात.
    आणि धावत यावं वाटत मग तुझ्याकडे.

    फोलपणा उमजतो इथला.
    फक्त तुझं असणं अनुभवायच असतं

    गुढ संहितेचा अर्थ उकलायचा असतो.

    ओतप्रोत भरलेला तु सर्वत्र..
    फक्त एका हाकेची अपेक्षा तुला,
    की ती देखिल नसतेच .....

    -- स्मिता मिलिंद

      October 8, 2019


  • II चहा II

    तो क्षण फार मस्त असतो
    जेंव्हा चहा उकळत असतो
    सुगंध सार्‍या घरभर पसरतो
    किचनमधून कपबशांचा आवाज येतो

    अमृतरुपी चहाला कधी स्वाद आल्याचा
    गवतीचहा कधी, तर कधी सुगंध वेलचीचा
    तुलसीचहा मसालाचहा - रंग नाना रुपांचा
    उत्तेजित करे,क्षमता वाढवे-आनंद देई जीवनाचा

    मग चहा संगे बिस्कीटे येती
    कुणी पोहे त्यात बुडवून खाती
    तर कुणी गरमागरम भुरके मारुन पिती
    बशीत ओतून पिणारे पण असती

    मित्रांची मैफिल चहाविना नाही
    पाहुण्यांचे स्वागत त्याच्याशिवाय नाही
    आस्वाद घ्यावा कधीही,वेळेचे बंधन नाही
    दुःख असो,आनंद असो,चहासारखी साथ नाही

    श्री सुनील देसाई
    २२/०५/२०२२

      May 23, 2022


  • पुरेसं

    कालपर्यंत
    पावसाच्या एका सरीसाठी
    डोळे आभाळाकडे लागले होते.
    आज मात्र त्याच सरींच्या रौद्र रूपाने
    मनात भीतीचं वादळ उठलं आहे.

    आयुष्य इतकंच शिकवतं
    अभाव दुःख देतो,
    पण अतिरेकही सुख हिरावून घेतो.

    जिथे "पुरेसं" थांबतं,
    तिथेच समाधान फुलतं.
    जिथे हव्यास वाढतो,
    तिथे आनंद हरवत जातो.

    भाकरी पुरेशी असेल,
    तर ती अमृताहून गोड लागते.
    छप्पर पुरेसं असेल,
    तर पावसाचं गाणंसुद्धा मधुर वाटतं.

    श्रीमंती म्हणजे
    अफाट संपत्ती नव्हे.
    "आहे ते पुरेसं आहे,"
    असं मनापासून म्हणता येणं
    हीच माणसाची खरी श्रीमंती आहे.

    कारण...

    अति पाऊस पूर आणतो,
    अति ऊन दुष्काळ घडवतो.
    निसर्ग असो वा आयुष्य
    "पुरेसं" हाच सुखाचा खरा समतोल असतो.

    ज्याला पुरेसं कळलं,
    त्याला समाधान लाभलं.
    आणि ज्याला समाधान लाभलं,
    त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 14, 2026