पाऊस चिंब चिंबलेला
July 3, 2021
लावूया उजेडाचे रोप
पिकवुया सूर्यप्रकाश
अणु, रेणु उजळेल
सर्वत्र प्रकाश प्रकाश
सरेल अंधार, अंधार
सत्यप्रभा किरणांची
प्रकाशझोत आत्मरंगी
साक्ष निर्मळ जीवनाची
रोपटे, प्रसन्न उजेडाचे
साक्षात्कार चैतन्याचा
सुखावती श्वास निरंतर
हाच दृष्टांत दयाघनाचा
लावावी ज्योत विवेकी
उजळावा, मनप्रकाश
वात्सल्यप्रीत जागवावी
मनी उमलुदे भावप्रकाश
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२६०
१४/१०/२२
October 21, 2022
जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना ।
कांहीं तरी मागत होते, हात जोडूनी चरणा ।।
दयावान ती आहे समजता, गर्दी होते तिजपाशीं ।
कधी न दिले काहींहीं तिजला, मग ही मागणी कशी ? ।।
जावू नका दर्शनास तिच्या, रिक्त अशा त्या हाताने ।
तिला पाहिजे ताट पूजेचे, भरलेले भक्ती भावाने ।।
व्यर्थ होवून जाती ते श्रम, भक्तीभावाच्या अभावी ।
उभे आयुष्य वाऱ्या करूनी, हाती काही न येई ।।
मानव रूप देऊनी तिजला, धनादी वस्तू अर्पिती ।
पूजाविधींचा थाट करूनी, मोठेपणा दर्शविती ।।
भक्तीची ती भुकेली असूनी, काही न लागे तिजला ।
केवळ तुमचे भाव जाणूनी, सर्वच मिळेल तुम्हाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 13, 2020
वृक्ष वेली पाने फुले
पक्षी प्राणी जलाशय..
सुखावते विश्व सारे
देव आहे कृपामय..
दिले दान मुक्तहस्ते
वापरावे समाधानी..
प्राणवायू अन्न वस्त्र
दिले आहे वृक्षातूनी..
प्रदूषण नियंत्रण
करू आपल्या कराने...
कचऱ्याची विल्हेवाट
ओल्या सुक्या फरकाने..
प्लास्टिकच्या टाळण्याने
जलप्रदूषण नष्ट..
झाडे लावून घालवू
वायूप्रदूषण क्लिष्ट..
वाढलेले तापमान
पावसाने झोडपले..
निसर्गाचा अवमान
हिमनग वितळले..
नका करू ऱ्हास असा
रोज पर्यावरणाचा
चला घेऊन वारसा
नैसर्गिक संपत्तीचा..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
July 15, 2026
कवितेच्या मागे धावता - धावता
मी कधी म्हातारा झालो ?
मला कळलेच नाही...
माझे तारुण्य चोरून रोज
अधिक तरुण होणारी माझी कविता
कधी म्हातारी झालीच नाही...
माझी कविता आता रोज
तरुणांना प्रेमात पडल्याशिवाय
क्षणभरही शांत बसत नाही...
तिच्या प्रेमात पडलेले
माझे म्हातारे हृदय आता
फडफडल्या शिवाय रहात नाही...
आता मला तिच्यावर कोणतीच
बंधने घालता येत नाही
आणि स्वैर सोडता येत नाही...
मी तरुणच राहायचे ठरविले
तर माझी कविता आता
तरुण राहणार नाही...
तिचे तारुण्य हेरून मी
आता तरुण झालो तरी
जगण्यात मजा उरणार नाही...
©निलेश बामणे
June 9, 2017
रुजला पाहीजे विचार मनांत
सारेच प्रभुचे असे ह्या जगांत
जो वरी आहे मी माझे येथे असे
त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे
स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे
मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे
बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं
प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 1, 2013
चालला घेऊन तो, श्रीरामाला वनवासाला,
नौकानयन करत करत,
पाण्यातील प्रवासाला,
नौका चालवे नावाडी,
नदी तरुन जाण्या,
श्रीरामासंगे जानकी,
लक्ष्मण रक्षण करण्या,
त्रिकूट' चालले जलप्रवासा,
जसे ओलांडती भवंसागरा,--!!!
नावाडीच श्रीराम ते,
संसार सागरातून तारण्या,--!!
प्रवासीच इथे खरा नावाडी,
अन् नावाडी असे प्रवासी,
संसार सागर उफाळतां,
नावाड्याचे कसब पणाशी,--!!
हिमगौरी कर्वे.©
March 26, 2020
मोहविते मनांस माझिया
क्षितिजावरची सांज सुंदर
जीवनाचे प्रतिबिंब मनोहर
स्मृतीत रंगले केशरी अंबर
किती, काय कसे स्मरावे
अव्यक्त प्रीतीचे नाते सुंदर
रेंगाळलेली, सांज लोचनी
मोहविते मनांस नीळे अंबर
सुख, दु:खांची ऊन सावली
भावनांचेही घुटमळणे सुंदर
ओढ़ मनांतरी सत्य प्रीतीची
हॄदयी, नाचतो मनमोर सुंदर
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४५
२३/९/२०२२
September 26, 2022
हे दगडांच्या देशा तुजवर हिरवाईच्या रेषा
July 12, 2026
आता दुनियेत| होती खूप हाल|
सुकलेत गाल| शोषितांचे||१||
पाहिले अनेक|दु:खी जीव येथे|
चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२||
करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान|
नाही मला भान|देवा आता||३||
थोडी जनसेवा| हातून घडावी|
साथ रे मिळावी| देवराया||४||
भाव पामराचा| समजून घ्यावा|
आशिष असावा| देवा तुझा||५||
पुसू देत डोळे| भरवू दे घास|
जगण्याची आस| वाढो त्यांची||६||
अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता|
बनुनी त्यांचा पिता| देतो ग्वाही||७||
-- महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले(ऋतुराज)
दि. २२/०९/२०१९
September 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti