(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दृष्टीची भ्रमंति

    बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं
    लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १

    चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे
    फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २

    वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले
    भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३

    मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला
    स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४

    दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे
    व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५

    प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे
    रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६

    राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते
    अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७

    दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला
    शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८

    तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी
    आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९

    वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली
    दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०

    फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता
    डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११

    आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते
    आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 29, 2016


  • भातुकली

    बालपणीची मैत्रीण माझी
    भातुकलीतील ती सवंगडी
    निरागस तो खेळ आगळा
    मी राजा, ती राणी भाबडी ।।

    कितीतरी हा काळ हरवला
    पण आज तीच राणी मनी
    ती दूर, दूर तर मी हा इथे
    आठवण, तिची नित्य मनी ।।

    मला वाटते, भेटावे तिजला
    अन बोलावे सारे गुज मनीचे
    जे घडले ते आता घडुनी गेले
    पुनर्जन्मी! खेळ खेळू मनीचे

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २४.

    २४ - १ - २०२२.

      February 3, 2022


  • रोपाचे बनता झाड

    रोपाचे बनता झाड,फांदी अन् फांदी डंवरे,
    सडा पडे खाली फुलांचा,
    जणू गालिचाच पसरे,
    फांद्या फुटण्याआधी कसे,
    धुमारे तिथे फुटती,
    बघतां बघतां आकार वाढून,
    तिज फांदी म्हणती,
    किती बहर येई फुलांचा,
    ती भरे *नखशिखांत
    बघणारा हरखून जाई ,
    कुठे फांदी-? याच भ्रमात,
    फूल अन् फूल उमले,
    जागा नाही कुठे उगवण्या लेकुरवाळ्या फांदीलाही,
    अभिमान वाटे मिरवण्यां,
    फुले माझी, किती ताजी,
    टवटवीत आणि सुरेख ,
    जो येतो तो बघत राही,
    अगदी अगदी प्रत्येक,
    काय ईश्वराने दिले मजला,
    वरदानच म्हणते की, --!!!
    मुले माझी सारी,---
    इतुकी सुंदर वाटती,
    या सगळ्या जगालाही,--!!!!

    हिमगौरी कर्वे.©

      April 2, 2019


  • भावनांची घरें

    घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।।

    वास्तुकला सुंदर रंग त्याचे बहारदार

    आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी,

    घ्याहो निरखूनी ।।१।।

    ही घरे भावनांची त्यांत छटा विचारांची

    भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी,

    घ्याहो निरखूनी ।।२।।

    राग लोभ अहंकार मद मत्सर हे विकार

    ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी,

    घ्याहो निरखूनी ।।३।।

    दया क्षमा शांति प्रेम आनंद उल्हासती

    आदर भावांची वसती विवेक बुद्धीने शोधा जाणूनी,

    घ्याहो निरखूनी ।।४।।

    प्रत्येक शोधतो आपले घर तसेच करी जीवन साकार

    सुख दुःखाची फळे घेणार हीच जीवनाची खरी कहाणी,

    घ्याहो निरखूनी ।।५।।

    घरें बांधली निरनीराळी घ्याहो निरखूनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 1, 2020


  • कुणास नकळत

    कुणास नकळत कसे टाकतो निसर्ग ऐसे अगम्य फासे

      July 12, 2026


  • कुणाकुणासाठी कोठपर्यंत…. कुणी का रडावे

    कोण होतो, आहे कुठे, कुठे हा जाईन
    कोण जाणे, किती वळणे कशी मी पाहीन
    कुणाकुणाचे कोण जाणे कसे कधी नाते जडावे
    कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे!

    आगीने हृदयस्थ माझ्या सागर टाकावा गिळून
    मस्तकाच्या ठिकऱ्या - ठिकऱ्या काळीज माझे छेदून
    शून्यातल्या सुरुवातीने पुन्हा शून्यात का विरावे
    कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?

    मनी जन्मलेल्या स्वप्नाने का मला पोरके करावे
    दबकत्या उमेदीचे स्वप्न पुन्हा कसे ठाकावे
    अंधारातले धागे हे कसे मला सापडावे
    कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?

    काळापलीकडच्या वेदना या कशा कधी संपाव्या
    ओल्या पापण्यामागील हास्यात किती त्या दडाव्या
    व्याकुळ आर्ततेने गुदमरले मन भरावे
    कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?

    चांदण्या वेचीत कुणी ओल्या उन्हात तृप्त न्हावे
    सूर्याकडे नजर माझी का पोकळीशी नाते जडावे
    दैवाचे फासे माझ्याच का उलटे पडावे
    कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?

    शमावे वादळ आभाळ फाटके मागे ठेवून
    विरावा वणवा जखमी खुणा जाग्या ठेऊन
    संपून ही आग वेड्यापरी मन का धुमसावे
    कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?

    विझावेत कढ - सल उरी जागते ठेवून
    उरावे तरी का हे हृदय विदीर्ण होऊन
    दुबळ्या हातांनी अनाहूत अश्रू कसे रोधावे
    कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?

    -- यतीन सामंत

      October 9, 2022


  • माझं काही.. उरलं नाही.

    माझं काही......... उरलं नाही.'

    जीवनांत या जगण्यासारखं,
    फार काही राहिलं नाही....
    निराश झालं आहे मन,
    आत्ता काही उरलं नाही....
    नाही नोकरी - नाही पैसा,
    फक्त होता आधार तुझा....
    पण.... तुझ्या जाण्यानं,
    तो - ही आत्ता राहिला नाही....
    जीवनांत मी इतरांसारख,
    फार असं काही केलं नाही....
    फक्त तू.. अन् तुझा विचार,
    तुझ्याविनं काही पाहिलं नाही....
    माझं माझं म्हणावं असं,
    माझं काही राहिलंच नाही....
    एक - होतं प्रेम माझं,
    ते ही तुला कळलं नाही....
    "जीवनात या जगण्यासारखं,
    माझं काही राहिलं नाही "

    -- गजानन साताप्पा मोहिते

      March 23, 2019


  • स्वागत नववर्षाचे करत

    स्वागत नववर्षाचे करत, सुखदुःखांच्या संकल्पना, आज नवीन दिन उगवला,
    प्रार्थित अजोड नव- अरुणां,--!!!

    कल्पना सुखाच्या करत,
    दुःखांचे डोंगर मागे सोडा,
    साजरा करत आनंद,
    समर्थ होऊनी खडे रहा,--!!!

    काय दडले काळाच्या पोटात,
    तोंड उन -पावसा देण्यां,
    सिद्ध असतो हरेक माणूस,
    संकटावरती मात करण्यां,---!!!

    काय शिकवी गतकाळ,
    सुधाराव्यात आपल्या चुका, नियतीचे जे होती लक्ष्य,
    त्यांना हात द्यावा नेमका,---!!!

    कुरवाळतो आपण अहम्
    बाजूला ठेवू या थोडा,
    दृष्टी आपली संकुचित,
    मोठा दृष्टिकोन ठेवावा,--!!!

    माणुसकी आज दुर्लभ,
    स्वस्त अस्वच्छतेच्या जागा,
    परिसर काय, आपले मन,
    लख्ख करत मोकळे जगा,--!!!

    निसर्गराजाची नाही किंमत,
    माणूस दाखवत स्वार्थ,
    हेतू आपले सारे लपवत,
    उगीच स्वीकारे परमार्था,---!!!

    असती देव - वर्तमान भविष्य,
    करू त्यांची यथासांग पूजा,
    प्रेमास फक्त प्राधान्य देत,
    मनुष्यजन्म नाहीच दुजा,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

      January 1, 2020


  • दिस कलतीला आल्यावर

    दिस कलतीला आल्यावर
    ओढ लागते घराची
    माय बाप पोरं ढोर
    आसेसुन असतात कवाची

    येणार बा, येणार मा
    तोंडात साय दुधाची
    उरफाट जग हाय
    उलघाल उराची

    थांब जरासा पुरा कर
    झाली का येल
    केकावतो लमंढीचा
    म्हणतो फुकाचा तेल

    -- शरद शहारे, वेलतूर

      November 19, 2019


  • तुझे माझे नाते

    तुझे माझे नाते,
    दुःखाचे दुःखाचे,---
    पोळलेल्या जिवांचे,
    व्यथित अशा हृदयांचे,--!!!

    तुझे माझे नाते,
    एकाच अखंड बंधाचे,
    अगदी जन्मोजन्मीच्या,
    गोड ऋणानुबंधाचे,
    विचरशी तू सहचरे,
    पण वेगळेच हे धागे,
    काळजाच्या विणींचे
    समसुखाचे, समदु:खाचे,--!!!

    ओघळलेल्या अश्रूंचे,
    आत लपलेल्या समुद्राचे,
    खोलवरच्या भोवऱ्याचे, उसळणाऱ्या लाटांचे,
    तुझे माझे नाते,
    दुःखाचे दुःखाचे,---!!!

    कधी भरतीओहोटीचे,
    दोघातल्या ओढीचे,
    वाचणाऱ्याला बुडवणारे, बुडणार्‍याला वाचवणारे,
    पाण्याशी जीवनाचे,
    निष्ठूर या जगातले, ---!!!

    तुझे माझे नाते,
    दुःखाचे दुःखाचे,
    अंतरात्म्यांतील आवाजांचे
    आत्मिक एकरुपतेचे, ऐहिकापल्याड अलौकिकाचे, लौकिकातील असामान्यतेचे,-!!!

    तुझे माझे नाते,
    सुखाचे सुखाचे,
    हवेशी गारव्याचे,
    पावसाशी पाण्याचे,
    झाडांशी टवटवीचे,
    दवांशी थेंबांचे,
    देठाशी फुलांचे,
    सुगंधाशी कळीचे,
    तुझे माझे नाते ,----
    सुखाचे सुखाचे,--!!!

    बालपणीच्या दोस्ताचे,
    सहवासातील मित्रांचे,
    सवंगड्यांशी हृदयाचे,
    जिवाशी सगळ्या मनांचे,
    तुझे माझे नाते,
    सुखाचे सुखाचे,--!!!

    आरपार जाणारे,---
    जन्म मृत्यू पलीकडले,
    आत्म्याशी आत्म्याचे, परमात्म्याशी आत्म्याचे,
    चैतन्याशी परमात्म्याचे,
    तुझे माझे नाते,
    सुखाचे सुखाचे,---
    सुखाचे हे सुखाचे,--!!!

    हिमगौरी कर्वे.
    ©

      August 13, 2019