(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सौंदर्यचा चकवा

    लता वृक्ष वेली सा-या
    नटल्या घालून आभूषणे
    निसर्ग निर्मित हे दागिने
    मोहक रत्नजडीत देखणे

    स्वर्गातील भासती जणू
    आल्या अप्सरा धरणीवर
    गर्भरेशमी वस्त्र हिरवे
    घाली त्यांच्या सौंदर्यात भर

    कुंतल मोकळे तलम
    रेशमी झुलती वा-यावर
    पदन्यास करत धरती
    ठेका झाडे तालावर

    झुबे डुलते कानातले
    थिरकती पायीची पैंजणे
    करी गारुड मनामनावर
    यांच्या या रुपाचे चांदणे

    पांथस्थाला घाली भूल
    हा सौंदयाचा चकवा
    डोळ्यांचे फेडतो पारणे
    शृंगार नित्य नवा

    प्रज्ञा करंदीकर
    बंगळुरु
    र.स.९ः००

      January 5, 2024


  • श्रीकृष्णासी कृष्णकमळ अर्पण

    वाहूनी कृष्णकमल तव शिरी,
    अर्पितो भाव माझे श्रीहरी....।।धृ।।

    तू आहेस ईश्वर,
    करी सारे साकार
    नशिब माझे थोर
    मिळे तुझा आधार
    सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी....१,

    अर्पितो भाव माझे श्री हरी....
    विविधतेने नटलेले
    कृष्णाचे जीवन गेले
    लय लागूनी जगले,
    कसे जगावे शिकवले
    जीवन सारे असूनी रूप ईश्वरी, दाखवी स्वानूभवे तो हरी….२

    अर्पितो भाव माझे श्री हरी,
    रंगीबेरंगी कोमल
    कृष्णकमळ फूल
    पाकळ्या बघता निल
    प्रसन्न चित्त होईल
    दरवळू दे कृष्ण कमळा परि, सेवा भावाचे समाधान उरी.....३,

    अर्पितो भाव माझे श्री हरी
    राही न्यूनता काही
    ही अज्ञानाची ग्वाही
    मज क्षमा ती व्हावी
    परि आशिर्वाद तू देई
    उकलन तव जीवनाची करी, यशासाठी जावे त्याच वाटेवरी....४

    अर्पितो भाव माझे श्री हरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      October 15, 2019


  • मातीचा पुतळा

    मातीचा पुतळा एक

    फोडला कुण्या वेड्यानी

    जीवंत पुतळे अनेक

    जाळून टाकले शहाण्यानी ।।

    एक करि तो पिसाट

    ठरवी वेडा त्याला

    अनेकाची उसळता लाट

    धर्माभिमानी ठरविला ।।

    अशी आहे रीत

    नाहीं समजली मना

    करुन विचारावर मात

    श्रेष्ठ ठरे भावना ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      October 5, 2016


  • मानवता आहे जगात

    मानवता आहे जगात,-?
    प्रश्न खूपदा पडे,
    आई बापा टाकून देतात,
    कोणते पुण्य मग मिळे,--?

    संसारी रममाण होतात, भूतकाळाचा पडे विसर,
    उभे ज्यांनी केले ते,
    वृद्धाश्रमी सापडतात,--!!!

    हेच संस्कार मुलांवर,
    का बरे करतात,--?
    आईबापाला अंतर देऊन,
    कोणते समाधान मिळवतात,?

    वरील चित्रफितीतुनी,
    कोणता मिळे संदेश,
    वागणे प्राण्यांचे पहा,
    प्रेम केवढे हे विशेष,--!!!

    जिने त्यांना सांभाळले,
    माया ममता दाखवून,
    इतकी वर्षे गेली मध्ये,
    तरी ना गेले ते विसरून,--!!!

    हिंस्त्र प्राणी म्हणत म्हणत,
    जग त्यांना हिणवते,
    माणसांहून भावना थोर प्राणिजगत सांभाळते,--!!!

    *प्रेम त्यांचे असते मूक,
    तरीही किती बोलके,
    अनुभव घ्यावा त्यांचा,
    ठरतील श्रेष्ठ ते शेलके*,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      August 11, 2019


  • दोन क्षणिका : सुगंध

    वासंतिक सुगंध
    वार्‍यासवे आला
    बंद दरवाज्या समोर
    दम त्याने तोडला.

    एसीच्या वार्‍यात
    कृत्रिम सुगंध
    रोग केंसरचा
    असा पसरला.

    टीप: बंद दरवाजा, घरात एसी. मातीचा सुगंध असो किंवा फुलांचा सुगंध घरात येऊ शकत नाही. रासायनिक कृत्रिम सुगंध, केंसरला कारणी भूत आहे.

      July 25, 2018


  • पोशिंदा

    दिनरात कष्ट करी
    शेतामधे राबतो मी
    धनधान्य पिकवितो
    तुम्हा सर्वा पोसतो मी
    ।।१।।
    लोक म्हणती पोशिंदा
    उभ्या जगाला तारतो
    कष्ट दैवत बळीचे
    भार नित्य उचलतो
    ।।२।।
    खांद्यावरी लाकडाची
    मोळी माझी सखी झाली
    विकुनिया चार पैसे
    मिळताच सुखं आली
    ।।३।।
    घर्म धारा गळतात
    गालफडं बसतात
    डाव सारे फसतात
    कर्ज फार असतात
    ।।४।।
    नाही खंत मला त्याची
    फेडणार सर्व राशी
    नक्की सुदीन येणार
    मनोमनी सदा खुशी
    ।।५।।

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 12, 2020


  • घोषणा

    स्वातंत्र्यदिनानिमित्त


    स्वतंत्र-भारत सत्तरीचा

    अन् मीही सत्तरीचा

    दोघांचें वय एकच . १

    मी म्हातारा झालो

    पण देशाचें लोकतंत्र

    अजून बाल्यावस्थेतच आहे.

    हजारो वर्षांच्या इतिहासात

    सत्तर वर्षें ती काय ! २

    माझ्यासारख्या अनेकांना

    हा देश पुरून उरेल.

    माझ्यासारख्या अनेकांना

    गाडून, ‘पुरून’,

    हा देश उरेल ? ३

    आम्ही तर देशासाठी

    कांहीं पुण्यकर्म

    केलें नाहीं म्हणा ;

    पण पूर्वसूरींचें पुण्य

    या देशाला कितपत पुरेल ?

    कुणाकुणाच्या कुकर्मांचा

    घडा कधी भरेल ?

    त्यातून कांहीं धडा मिळेल ? ४

    सत्तरी, शंभरी,

    अन् शतकानंतरची सत्तरीही येईल

    पण आतां तरी कांहीं भलें होईल कां ?

    की, अशी वर्षेंच फक्त मोजत बसायची

    देशाच्या ‘असण्याची’ ? ५

    आमच्यासाठी नाहीं, पण,

    पुढल्या पिढ्यांसाठी तरी

    हा देश पुढे पुढे, वर वर जावो

    पुढलं शतक, पुढलं सहस्त्रक

    माझ्या देशाचं असो.

    सत्तरीतल्या देशासाठी

    सत्तरीतल्या माझी

    एका नागरिकाची

    हीच घोषणा भलीमोठी .

    खरीखोटी !

    वांझोटी ?

    -- सुभाष स. नाईक
    Subhash S. Naik

      August 15, 2017


  • सागर आणि नदी

    सागराला गळामिठी मारताना
    नदीचा पाय क्षणभर मागे सरतो I

    पर्वतशिखरापासून सुरु झालेला,
    वाटेतल्या जंगलांना, खेड्यांना
    वेढे घालत इथवर झालेला
    प्रवास ती वळून बघते म्हणे –

      July 25, 2021


  • कन्येस निराश बघून

    कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं

    समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं

    झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी

    चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी

    तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी

    खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी

    उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं

    झेप तुझी आणि झेप आमची, विसंगत राही

    असे उमलणारे फूल उद्याचे, तूं एक कळी

    धन संपत्ती परकिया करतां, आम्हा जवळी

    होऊं शकते उणीव त्यांत, कधीं असता आपले

    हेच मग दुजाचे समजतां, मन चरकले

    प्रयत्न होतील सुखी ठेवण्या, राहून अर्धपोटीं

    आशिर्वाद तरी निश्चित असतील, सदैव तव पाठीं

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 27, 2020


  • जपमाळ कशास हवी, सखये ? (स्मृतिकाव्य )

    जपमाळ कशास हवी, सखये ? न हवे रुद्राक्षमणी, सखये
    जप करतो आहे तुझाच, माळेविणाच मी सखये ।।

    ईशप्राप्तिसाठी ऋषीमुनी जपतप करती खूप
    ऋषी न मी, करि तुजसाठी जपतप परी, सखये ।।

    जप केल्यानें प्रसन्न होउन, देई दर्शन देव
    तुझ्या दर्शना मी आतुर, देशील कधी, सखये ?

    उघड्या नेत्रीं वसतें कायम तुझेंच रूप, प्रिये
    जपात, मिटल्या नयनां दिसते मूर्ति तुझी, सखये ।।

    ओढुनही जपमाळ, न येणें मरणाचें थांबे
    माळेवाचुन ना अडलें स्मरणाचेंही सखये ।।

    जप करि मी, तूं ‘ज़प’ म्हणशी, पण तुजविण काय ज़पूं ?
    ‘जीवन झपझप संपो’ , एकच आस मनीं, सखये ।।
    ११.०७.२०१६

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      July 16, 2016