(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्वप्ने

    तुझी स्वप्ने तू जग
    माझी स्वप्ने मी जगतो
    भेटूच आपण एकदा
    स्वप्नांचा हिशेब मांडायला
    सारखी स्वप्ने वजा करू
    उरलेली मिळून पूर्ण करू

    ©निलेश बामणे

      June 11, 2017


  • उपयोगीता हेच मूल्य

    चष्मा लावूनी करीत होतां,
    ज्ञानेश्वरीतील पारायण,
    दृष्टीमधले दोष काढले,
    चाळशीचा आधार घेवून ।।१।।

    फुटूनी गेला एके दिवशीं,
    चष्मा त्याच्या हातामधूनी,
    पारायणे ती बंद पडली,
    दृष्टीस त्याच्या बाध येऊनी ।।२।।

    चालत असता सरळपणे,
    दैनंदिनीचे कार्यक्रम,
    खीळ पाडूनी बंद पाडी,
    क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम ।।३।।

    वस्तूचे मूल्य ठरते,
    तिच्या उपयोगिते वरती,
    तोलण्यास धन न लागे,
    मूल्य मापन जेंव्हां होती ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 14, 2015


  • तू लपलास गुणांत

    कृष्ण कमळ –

      August 30, 2013


  • वेळेचे मूल्य

    मूल्य नाही कुणा,
    तूं दिल्या वेळेचे,
    गमावून टाकी,
    जाणूनी फुकाचे ।।१।।

    लागत नसते,
    दाम वेळेसाठीं,
    म्हणून दवडे,
    अकारणा पोटीं ।।२।।

    वस्तूचे मूल्य ते,
    पैशांनीच ठरते,
    परी वेळेची किंमत,
    कुणा न समजते ।।३।।

    वेडे आहोत सारे,
    कसे होई मूल्य
    वेळ जातां मग,
    आयुष्य जाईल ।।४।।

    आयुष्य खर्चणे,
    हेच वेळेचे मुल्य ठरते,
    जीवनांतील यश,
    त्यावरुन कळते ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      May 19, 2017


  • होते पहाट आल्हाद गारवा

    होते पहाट आल्हाद गारवा
    झेडीतो हलकेच शिरशिरी मारवा,
    प्राजक्त उमलतो हलकेच असा
    अंगणी बहरुन गंधित सडा..
    उगवतो रवी केशरी प्रभा
    रंग बावरे किरमिजी आभा,
    उगवत्या रवीस उषेची साथ जरा
    दवबिंदूची दाटी पानोपानी थेंब सजता..
    किलबिल पक्षी थवा आकाशी जसा
    माळ एका लयीत फिरफिरती पाखरे पुन्हा,
    सजले आकाश सजली नटून धरा
    थबकले मन परतुनी वळणावर पुन्हा या..

    -- स्वाती ठोंबरे.

      December 2, 2021


  • गृहित

    रात्र येत राहते
    दिवस येत राहतो
    आपण गृहितच
    त्यांना धरत राहतो

    असेच महिने येत राहतात
    असेच वर्ष जात राहतात
    आपण गृहितच
    त्याना धरत राहतो

    केस पांढरे
    अंगावर सुरकुत्या
    पाठीत बाक
    लटपटणं वगैरे
    होत राहते
    मग
    आपल्याला गृहित
    धरत राहतात ते

    रात्र दिवस माहे साल
    काळाचे घटक येत जात राहतात
    ......आपण कुठे कुठेच गृहित धरायला नसलो तरी

    ~ कौशल

    -- श्रीकांत पेटकर

      March 1, 2019


  • आकाशातील चंद्र

    आकाशातील चंद्र

    आकाशातील चंद्र एकदा अचानक लपूनच बसला

    वेड्यासारखा मी त्याला रात्रभर शोधला

      March 3, 2012


  • नैराश्य

    मी निराश झालो आहे ।।

    खाचखळग्यांतून, दगडधोंड्यातून
    पराभवाच्या अपमानातून
    शल्य मनातले मनातच ठेवून
    त्यातून वाट शोधत आहे ॥
    मी निराश झालो आहे ॥ १ ॥

    आत्मविश्वास तो गडबडे
    ताबा अन् मनावरचा उडे
    येथेच अडकून घोडे पडे
    दुःख चावरे त्याचे मला आहे ॥
    मी निराश झालो आहे ॥ २ ॥

    प्रवास माझा पहाटे धवल यशाच्या
    धुक्याचे पटल मध्येच नि हे वारे झोंबरे
    मन माझे थरथरणारे
    ही काजळी पुसू पाहे ॥
    मी निराश झालो आहे ॥ ३ ॥

    -- यतीन सामंत

      October 16, 2022


  • पाहताना तुला मनात

    पाहताना तुला मनात,बिंब डोळियांत हाले,
    सामावत साऱ्या चरांचरांत,
    हृदयात प्रेमपक्षी बोले,--!!!

    जिथे तिथे तू दिसतेस,
    खाणा-खुणा तुझ्याच ना,
    गंधखुळा वेग मनाचा,
    प्रीत पाखरू उडतेच ना,-!!!

    काळजातच तुझे अस्तित्व,
    जिथे पाहतो तिथे तू,
    हसून बोलाविशी मला,
    जशी खूण करून तू ,--!!!!

    तुझ्या गाली पडे खळी,
    गोड गुलाबी रंग तिचा,
    पाहून तुला कोलमडती,
    मी एकटाच का तसा,--!!!

    कुठून आणलेस लावण्य,
    जिवा करते ते घायाळ,
    पदोपदी तुझीच स्वप्नं,
    किती गेला यातच काळ,--!!!

    *सौंदर्यवती तू देखणी,
    लावण्याची असशी खाण*,
    मी एक साधा भोळा,
    कसे पटवू तुला सांग,--!!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 12, 2019


  • वस्तूतील आनंद

    आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे

    सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे....१,

    प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने

    बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२,

    तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला

    दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३,

    जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत

    वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व ते येई ध्यानात...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      October 1, 2020