(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लाटांवर लाटा उसळत

    लाटांवर लाटा उसळत,
    तयार होते भिंत,
    अगणित थेंबांच्या रेषा,
    अशा, कोसळती अविरत,

    सोनसळीप्रकाश त्यावरी त्यांच्यावरी बघा खेळतो,
    जलथेंबांचे अखंड नाच,
    पाहुनी तो चमचमतो,

    खालवर जाऊन पाण्यात,
    जादूगार तो किमयाकरे
    रंग सोनेरी हिरवे निळे,
    जांभळे पांढरे त्यात पसरे,

    लाटांची खळबळ ऐकून,
    हसे तटस्थ तो किनारा,
    चलबिचल"त्यांचीपाहत राही
    विस्तीर्ण दूरवर पसरलेला,-!

    लाटांचे चढउतार चालू,
    एक दुसरीवरी उसळे,
    प्रत्येकीचे प्रताप" वेगळे,
    सामर्थ्यबघता ते निराळे,

    भरती ओहोटी असो वा,
    रुद्रतांडव रत्नाकराचे,
    लाटांवाचून अस्तित्व" नाही, किती या विशाल सागराचे,!

    थेंबाथेंबांचे अस्थिरहोणे,
    खालवर वरखाली पुढेमागे,
    लाट होऊनी काय दर्शवे,
    जगणे आपुले तसेअसावे,!

    थेंबाथेंबाने जीवन चाले पुढे,
    खाली-- वरती पुढेमागे,
    असे असूनही परस्परांशी,
    जोडायचे ना प्रेमधागे,--?

    असंख्य जलबिंदू दाखवती, जीवनातील भंगुरता
    चंचल स्वरूप हे यांचे ,
    अन् टोकाचीअस्थिरता,--!

    थेंबाना किनारा गाठणे,
    कितीअप्राप्यवाटते, कधीतरी या यात्रेला,पण, मुक्तीही दैवीचअसते,--!!

    हिमगौरी कर्वे

      February 15, 2019


  • तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता

    आपलं कधी असं ठरलं नव्हतं
    आपण बोलताना
    हा असा अमुक अमुक विषय काढू
    तमक्या विषयावर तू तुझं मत मांड
    हा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून
    घेऊया का चर्चेस
    हा एक इतका महत्वाचा विषय आहे
    तू तुझे विचार ऐकव
    आणि मग मी माझे मत मांडते
    मग तुझ्या वाट्याला एवढी वाक्ये आणि
    एका वाक्यात अमके एवढेच शब्द बसण्याची मर्यादा
    आपलं अस काहीच नव्हतं ठरलं
    हे आज आठवलं म्हणजे मग
    आताशा माझ्या लक्षात येतंय की
    फक्त मीच तर बोलायचे...
    मी बोलायचे आणि तू ऐकायचास
    असही नाहीच म्हणू शकत मी
    मी बोलायचे आणि मला तू ऐकत
    असल्याचा निदान आभास तरी व्हायचाच
    मी बोलायचे
    काही जुन्या आठवणी निघायच्या
    काही आवडती गाणी सांगायचे
    मी आजूबाजूच्या
    प्रत्येक गोष्टीवर बोलायचे
    मला पडलेल्या स्वप्नांवर
    माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर
    तू काय केले पाहिजेस सांगायचे
    तू आज कसा छान दिसतोस हे देखील
    बोलूनच सांगायचे
    आपण भेटलो ना की मी बोलायचे
    उधानलेल्या पावसाने
    उधानलेले पाणी जणू
    तसे कसेही आणि कुठेही वळायचे माझं बोलणे
    आणि ...
    माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद म्हणून
    तू हसायचास..
    मग मीच अर्थ लावायचे या हसण्याचे
    तू खळाळून हसलास की
    तुला पटल किंवा तू तुझ्या हास्याच्या धबधब्यात
    माझं बोलणं उडवून लावलंस
    तू फक्त बुद्धासारखं पुसटस हसलास की
    मला वाटायचं तुला नाही बोलायचं या विषयावर
    हे असे नेमके हेच आहेत का अर्थ
    असही मी विचारलंच नाही तुला कधी
    पण आज ....
    प्रत्येक गोष्ट बोलून का दाखवतेस?
    या तुझ्या एका प्रश्नासरशी
    तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता जाणवली
    'नाहीच बोलणार मी आता'
    आता हे देखील नसते बोलले तरी चाललं असतंच म्हणा
    असो.....

    ©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
    १८/०८/२०१८

      August 20, 2018


  • सुखाचा छंद

    सुखाचा छंद,न लागो जीवाला
    आहे तो निवारा, अपुला बरा
    मोहविते कायम, सुखाची जरतार
    वेदनेचे ठिगळ, मिरवूया जरा
    सुखावते सारे,फुलणारे रंगपिसारे
    एकचि रंग सावळा, अपुला बरा
    दुखावते मन, यातना कठीण
    गोंजारु तयाला, लाडाने जरा
    सुख हे क्षणिक, मृगजळ जाण
    शोधावा निवारा, समाधानी खरा
    तुझे माझे काही, कमी नि अधिक
    आहे त्यात सुख, मानावे जरा!
    -- वर्षा कदम.

      November 12, 2021


  • मानवता धर्म

    परमेश्वर अगाध । त्याच्या शक्तीचा नसे वाद ।।
    मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक ।।

    नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।।
    प्रभु निराकार । निर्गुण असुनी होई साकार ।।

    आस्तिक प्रभु मानती । नास्तिक समजती शक्ति ।।
    ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।।

    ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।।
    वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती ।।

    धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक ।।
    हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां ।।

    झगडे मार्गासाठीं । ध्येय मात्र विसरती ।।
    धर्मासाठीं भांडण । मुर्ख त्याहूनी कोण ।।

    भांडतो करवंटीसाठी । विसरुनी खोबरे वाटी ।।
    होता अतिरेकी । बनती सर्व दुःखी ।।

    वाद करती विद्वान । सामान्यांस विचारी कोण
    समजून घ्यावे सर्व धर्म । हेच मावतेचे मर्म ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      May 11, 2014


  • हे दगडांच्या देशा

    हे दगडांच्या देशा तुजवर हिरवाईच्या रेषा

      July 12, 2026


  • मराठा

    Maratha

      June 18, 2021


  • प्रदूषण (९)- कैन्सर ट्रेन

    शेतात टाकले
    विषाक्त रसायने
    तिकीट कैंसर ट्रेनचे
    एडवान्स काढले.

    टीप : रोज बठिंडा पंजाब येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला जाते. त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये कैंसरग्रस्त शेतकरीच असतात.बीकानेर येथे कैंसरचे मोठे हॉस्पिटल आहे. आता बठिंडायेथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.

      January 24, 2018


  • कळलेच नाही

    “तक्रार करता करता प्रेम कधी झाले .. कळलेच नाही … बेसूर वाटता वाटता , सूर कधी जुळले .. कळलेच नाही …”

      August 26, 2021


  • आठवांचा पाझर

    मी अजूनही तुझ्याच आठवात दंगतो
    बेजार, प्रीतभावनांनाही कुरवाळीतो

    मिटलेल्या पापणीतही अस्तित्व तुझे
    तरीही लोभस चराचरी तुला शोधितो

    गुलाब, जाईजुई, बकुळ, मोगरा चाफा
    तुझ्याच स्मृतीतुनी,अजूनही दरवळतो

    सृष्टीत साऱ्या हिरवळलेले चैतन्य तुझे
    पाहता, भावनांचा बहार उमाळून येतो

    अवखळ निर्झर,तुझ्या ओल्या स्मृतींचा
    माझ्याच भाबड्या अंतरातुनी पाझरतो

    आज सामोरी झाकोळलेले हे तारांगण
    तरीही, मी तुझ्याच आठवासंगे जगतो

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १८.

    १७ - १ - २०२२.

      January 31, 2022


  • संत संगती

    ललाटी ज्यांच्या जे जे लिहिले,

    संत जाणती दिव्य दृष्टीने,

    नियतीच्या ह्या हलचालींना,

    दिली जाती आवाहने ।।१।।

    जाणून घेता भविष्यवाणी,

    जीवन मार्ग हे ज्यांना कळती,

    तपशक्तीने संत महात्मे,

    योग्य मार्ग ते दाखवूनी देती ।।२।।

    कर्माने जरी भाग्य ठरते,

    सुख दुखःच्या गुंत्या भोवती,

    त्या गुंत्यातील धागा शोधूनी,

    सुसाह्य त्याचे जीवन करीती ।।३।।

    कृपा होता संत जनाची,

    चुकला-मुकला जाई ठिकाणी,

    घनदाट त्या जंगलामधली,

    पाऊलवाट ते देई दाखवूनी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      December 4, 2017