(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माझी मराठी

    माझी मराठी आहे अगदीच साधी सुधी
    लिहिते तशीच सुचते जशी माझी बुद्धी
    माझी मराठी नेसते साधेच सुती लुगडे
    म्हणूनच शब्द असतात माझे जाडे भरडे
    माझा मराठीला नाहीत कसलेच अलंकार
    नाही करता येत तिला साज आणि शृंगार
    तिला आवडते घ्यायला अंगभर पदर
    ती राग मानत नाही कुणीही नाही केली कदर
    पटले तिचे विचार तर घ्या नाहीतर नका घेऊ
    पण आपसात कलह तरी नका होऊ देऊ
    -- सौ. कुमुद ढवळेकर.

      July 6, 2022


  • जल-स्वराज्य!

    पाण्याच्या बिकट परिस्थितीचे वर्णन करण्याचा एक अपूरा प्रयत्न….

      February 10, 2011


  • आईच्या ६३व्या वाढदिवशी

    वाढदिवसाच्या शुभेच्छा सादर प्रणाम शतवार
    शब्दांना पहावा पेलतो का भावनांच्या आपला भार
    लखलखीत रहाव्या उजळीत या आयुष्याच्या ज्योती
    अमोलिक क्षण अनेक उधळीत आनंदाचे मोती

    -यतीन सामंत

      July 31, 2022


  • तवा

    या तव्यावरची भाकरी
    नाही निर्लेपला ऐकायची |
    कारण सरावलेल्या हातांनी
    तीला सवय होती फिरायची ||१||

    ठरावीक ठिकाणी दाबल्यावर
    ती टच्च अशी फुगायची |
    दोनच चिमटीत धरुन
    अलगतशी तुटायची ||२||

    तशीच जीवनाची भाकरी बाई
    तीला लेपनाची गरज नाही |
    कुठे फुगायचे कुठे ओसरायचे
    हे तिच्यावर अवलंबून नाही ||३||

    सराईत हात दिसणार नाहीत
    चिमटीतून कधी सुटणार नाहीत |
    त्यांच्या खोल तव्यामधून
    कोणी बाहेर पडणारच नाही ||४||

      July 27, 2015


  • असीम, अपार, अमाप

    असीम, अपार, अमाप उदंडा, कुठून आणावे मापदंडा, विशाल विस्तीर्ण जगड्व्याळां तूच बनतोस गुरु आभाळा-!

    तुझ्यासारखा नाही दाता तुझ्यासारखा नाही त्राता,
    तूच एकटा तुझ्यासारखा,
    अतुल अजोड तूंच अनंता,--!!

    तूच घालशी जन्मा,
    पृथ्वीवरील संजीवनी,
    तूच राखीशी जलसाठा ,
    सांभाळुनी अजस्त्र मेघां,--!!!

    तुझ्यातूनच उठते दामिनी,
    तूंच निसर्गाची करणी,
    तूच देशी तूच सावरशी ,
    धरेवरील अखिल चराचरा,--!!

    वास करे भगवंत जिथे,
    जागा देशी पुण्यवाना,
    बघे त्रैलोक्याचे राज्य सारे,
    ही मृत्यूनंतरची कल्पना,--!!!

    ओढ वाटून ही धरा,
    तुझ्यासाठी तरसत राहते
    मग कधीतरी तुझी दया,
    तिच्यावरती बरसत राहते, तुझ्यामुळे ती बनते सजीव,
    पाझरत रहावे कृपाळा,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 20, 2019


  • ३ – गजानना, तव स्तवन चहुंकडे सुरूं

    गजानना, सृष्टि ही चराचर तुझेंच प्रिय लेकरू

    विश्वपसारा तुझी कृती, तव स्तवन चहुंकडे सुरूं ।।

    ‘न’ चें रक्षी द्वित्व. नारि-नर, भूचर, तरु-लतिका

    ‘ज’कार रक्षी, गजानना, जलचर अन् कृमि-कीटकां

    ‘ग’कार तव रक्षी गगनींचें प्रत्येकच पाखरूं ।।

    संथ करत तव मंत्र-पठण, गायी ‘ॐ गँ गणपती’

    नित करतो तव जप पोपट, कुक्कुट काकड-आरती

    कोकिळ-कंठा लागे सुमधुर अथर्वशीर्ष स्फुरूं ।।

    शिशूमुखातुन भाषेआधी ‘गँ’ उच्चार फुटे

    दर कंठीं निद्रेत, लयीनें ओंकारच उमटे

    नाद-अनाहत मृत्युपथीं ‘गँ गँ’ लागे बहरूं ।।

    गातें जग, तूं मातृ-पिता, सर्वस्वच गणदेवा

    मित्र-बंधु तूं, तूं विद्या , तूं ओजस ज्ञानदिवा

    ने मोक्षाप्रत, हे गजमुख पथदर्शक परमगुरू ।।

    - - -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      September 6, 2016


  • दान दयाघनाचे

    हितगुज तुझिया मनीचे
    मी सारे ओळखून आहे
    छान मधाळ बोलतेस तूं
    मी सारे ओळखून आहे।।

    मी कां? धरु मौन आता
    बावरल्या,काळजात या
    तुझी अव्यक्त भावप्रिती
    मी आज ओळखून आहे।।

    प्रियतमे! नकोस गं लाजु
    प्रीतीच! सार्थक जन्मांचे
    एक अलौकीक सुखानंद
    त्या दयाघनाचे दान आहे।।

    -- विगसातपुते (विगसा)

    9766544908

    रचना क्र २२.

      February 1, 2022


  • विहीण

    माझ्या विहीणाई बाई
    तुम्हा बहीण मानते
    जपली जी अमानत
    तुम्हा हाती सोपवते

    द्यावी मायेची सावली
    पुन्हा पुन्हा विनवते
    कधी सोसलेना तिने
    उन्हातान्हाचे चटके

    तिच्या सोनपावलांची
    दारी उमटली नक्षी
    आनंदाने भारारला
    गगनात तेव्हां पक्षी

    अशी अंगणी खेळता
    कधी झाली पहा मोठी
    अजूनही सान बाळी
    तिच्या बाबा दादासाठी

    कन्या परक्याचे धन
    किती सांगू या मनाला
    हृदयाच्या हुंदक्याला
    आता बांध मी घातला

    कांही चुकले माकले
    माय सांभाळून घेई
    आता माझी न राहिली
    तुम्हीच व्हा तिची आई

      October 16, 2018


  • गोंड आदिवासी समाजातील परंपरेचे बळी – कुरमाघर (कथा ४)

    वास्तविक निसर्गपूजक माडियागोंड जातीच्या आदिवासीत मातृसत्ताक पद्धत असून  घर चालविण्यात स्त्रीचा मोठा वाट आहे .ती दिवसभर घर व शेतीकामात गढलेली असते,अशा स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी मात्र कुरमाघरात राहते घर सोडून राहण्यास जावेच लागते.

      February 17, 2022


  • जशा संध्याछाया येती

    जशा संध्याछाया येती, नयन माझे भिजतात ,
    आठवणींचे माणिक-मोती,
    सर सर खाली ओघळतात,--!!!

    हात तुझा धरुनी हाती,
    प्रेमाची केली वाटचाल,
    नियतीने पण चाल खेळली, प्रितीची दुधारी वाट,--!!!

    निळ्याशार गहिऱ्या लोचनी, वाचली प्रीतीचीच *आंण,--
    तनामनात सामावून गेली,
    तव ओढीला नच वाण,--!!!

    आज कितीदा स्मरली,
    प्रीत फुले ती सुगंधी,
    परस्परांवर सारी उधळत,
    करायचो रे नजरबंदी,--!!!

    वाद अबोल्यांच्या त्या क्षणी, तरुणपणाचा सगळा जोश,
    शब्द जरी कठोर बोलती,
    श्वासात गुंतले सदा श्वास,--!!!

    ऋतू सारे सारखे बदलती,
    स्मरण यात्रेचा काळ लोटत,
    इकडून तिकडे वारे वाहती,
    त्यात आठवांचे ओले साद,--!!

    किती काळ पुढे जाई,
    अजूनही उभे तिथेच आपण,
    पाणी पुलाखालून जाई,
    हृदयी तरी आठवणी धरून,--!!

    © हिमगौरी कर्वे.

      February 10, 2020