हे भूत संशयाचे छळते कसे मनाला ।
करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला ।।
एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे ।
डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते ।।
गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा ।
कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा ।।
येता मनी संशय आपलाच ज्या घडीला ।
शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 19, 2020
झाले प्रसन्न मातेवरी। ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर। मार्ग भक्तीचा देण्याकरिता। अवतरले रुप दिगंबर॥
November 20, 2025
आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर
आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर
काठी सोडून हाती घेतला
तिचा सुरकुतलेला हात
तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ
नाना-नानी पार्क सोडून
धरली चौपाटीची वाट
जूने दिवस आठवले, पाहून झेपावणारी लाट
ओलसर वाळूचा बसायला घेतला पाट
दुखत नव्हते आता, कंबर-ढोपे-पाठ
अहो दात नाहीत तरी घेतले
चणे-दाणे चघळायला
गजराही घेतला आजोबांनी
तिच्या ईवल्या आंबाडयांत माळायला
आजूबाजूच्या तरुणाईची दखल कुठली दोघांना?
निसटून नव्हत दयायच नं ह्या मोरपंखी क्षणांना
बोलता बोलता क्षितीजावर
चढू लागली लाली
आणि साक्षीला चंद्राची स्वारी देखील आली
आता खट्याळपणाला रंग चढला
आजोबांच्या रोमरोमात
आजीला म्हणती नभीचा चंद्र , दिसतोय तुझ्या डोळ्यात
अहो आज नाही तुमचा माझा
वा वाढदिवस लग्नाचा
मग शिळ्या कढीला म्हणते मी
एवढा ऊत आलाय कशाचा?
अग, फार दिवसाची इच्छा होती
तुला माहीत नसेल वेडे
जाण्यापूर्वी वाटल, आपणही साजरा करावा कि
एखादा व्हॅलेंटाईन डे, एखादा व्हॅलेंटाईन डे
-- सौ. अलका वढावकर
February 13, 2016
माझी माय माऊली
पांडुरंग रंगी सावळा
भक्ती सागर अथांग
कृपा करीशी दयाळा!!१!!
तुझ्या अभंगांची गोडी
अशी लागली जीवाला
हरी नाम मुखी फक्त
आत्मा जाणितो सुखाला !!२!!
टाळ मृदंगाचा नाद
वारकरी दंग होती
तुझ्या चरणी विठ्ठला
भाव रंग उधळती!!३!!
नको आता पुन्हा तेच
प्रपंचाचे सुखदुःख
स्थैर्य लाभले तुझ्यात
भक्ता लोचनी श्रीमुख!!४!!
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 18, 2026
May 20, 2013
ब्रम्हांडातील ग्रहतारे, दुरून मजसी दिसती,
सारे सवंगडी माझेच,
राहती दूर अंतरी,--!!!
नाव माझे वसुंधरा,
माझ्यावरच जगते सृष्टी,
सृजनाची किमया न्यारी,
पाहता पाहता झाली मोठी,--!!!
खाली मी एकटी, एकाकी,
आभाळा पाहत राहते,
भास्कर करतो वंचना तरी,
सारखी सहज सहत राहते,--!!!
सहनशीलता का माझ्यागत,
सांगा आहे कोणामध्ये,
अंतराळातून वेगळे काढले,
दुःख माझ्या काळजामध्ये,--!!!
माता म्हणून स्वीकारले,
मी माझे एकटेपण,
लेकरांसाठी जन्म अवघा,
वहायाचा आता ठरवून,--!!!
माझ्या मातीत सारी जगती,
सकल चराचर सृष्टी,
मानवप्राणी वृक्षवेली,
यांसाठी ती खरी संजीवनी,--!!!
मातीतून जन्मती,--
मातीतच जाती,---
पुन्हा कालांतराने वर येती,
अखंड असे चक्र चालू राही, मानवांना मात्र कदर नाही,--!!!
जो उठे तो घाव घाले,
माझिया हृदयावरी,
करत सारखी भाऊबंदकी, नात्यातही मोजमाप करी,--!!!
मानवाइतुका स्वार्थी,
कोणी बघितला नाही,
आईवर घाव घालायां,
कमी जराही करत नाही,--!!!
जमिनीच्या तुकड्यांसाठी परस्परांच्या जिवावर उठती,
*तीव्र शूळ उठे उरी,
माझे जगणे माती माती*,--!!!?
हिमगौरी कर्वे.©
May 23, 2019
मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी
झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।
शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,
लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला तो मनी ।।
तूच दिसला नयनी, आई-बापा मांडी देऊनी,
माझे लक्ष तुझकडे, परि तू बघेना थोडे, ।।
आई – बापाच्या सेवेत, गुंगलास तूं सतत,
तुझी शक्ति मला छळे, तें तुला कांहीं न कळे, ।।
थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,
तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो ।।
टाकलेल्या विटेवरी, उभा राहिलो मी दूरी,
परि तू गेला निघूनी, मजला उभा करूनी ।।
होऊनी गेली अठ्ठावीस युगे,
आज देखील मी वाट बघे ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 10, 2018
March 16, 2022
वाऱ्यावरती हलती तरुलता,पाने,फळे त्यातून बहरती,
निसर्गाची किमया सारी,
मानवा तू शिकणार कधी,-!!!
सारी संपत्ती निसर्गाची,
तुझा देह ही केवळ माती,
का एवढी अहंता बाळगी,
मातीमोल सारे,मिळता गती,-!!
मी, माझे, माझे करत राहशी,
वृत्ती का नसावी समाधानी,--?
धरातली नच तुझे काही, ---
तुज याची जाणीव नाही,--!!!
त्याग शिकवतो निसर्ग केवळ,
दातृत्व त्याचे मोठे किती,
कळले ज्याला तो कधीही,
स्वतःची न गाणार महती,--!
काय देशी तू झाडांना,
कचरा म्हणुनी खतपाणी,
झाड काय देते तुज,
विचार कर ध्यानीमनी,--!!!
ओरबाडशी तू त्यांना,
सरळ सरळ घाव घालीशी,
जे हवे ते तोडून नेशी,
निर्घृणता ही कायमची,--!!!
तरीही देती थंड सावली,
तक्रार त्यांची कुठलीच नाही,
अत्याचार त्यांच्यावर करशी,
बळी जाशी ना तूच शेवटी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 15, 2019
February 17, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti