(चाल : आरती साईबाबा)
जयदेवी मंगलमाता, मनोभावे पुजू आता,
महिन्यांचा श्रावण राजा, मंगळवारी करती पूजा
फळे फुले, नानापत्री, हळदी कुंकू नारळ खण,
धूप दिप उजळोनी ओवाळती निरांजन ।। जय......
सोळा घरच्या सोळा जणी, व्रत करती सुहासिनी
नानापरी नैवेद्याच्या, थाट असे उत्सवाचा,
झिम्मा फुगड्या, गोफविण, करती रात्री गाजरण ।। जय......
नाग आणि कलश दान, साडी चोळी सौख्यदान,
मायमाता तोषवोनी, लेक करी उद्यापन
अखंडित सौभाग्याचे मागतसे वरदान ।। जय......
October 18, 2018
आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे
रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?
निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं
निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं
केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य
आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य
मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें
निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 14, 2017
जीवनात नाहीच ,माझ्या जागा त्याला कोठेही
धावावे लागतेच मला उगाच त्याच्यासाठी...
नसत्या माझ्या गरजा, जर साऱ्याच निगडीत त्याच्याशी
तरी जगलो असतो, जीवनच मी राजेशाही...
विनाकारणच नसता, झाला माझा संघर्ष कोणाशी
बळी द्यावाच नसता, लागला मज प्रेमाचाही...
माझ जगणंच झालाय , आज ते तर निगडीत त्याच्याशी
त्याच्याच शिवाय जगण , घंटा ठरतेय धोक्याची...
त्याच्या मागे धावत, अखेर ही होणार जीवनाची
मागचे साधतीलच, मग की जवळीक त्याच्याशी...
कवी - निलेश बामणे
December 17, 2013
माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर
अन् वाढली आता माझी पॉवर...
लिफ्टने आता मी होणार लिफ्ट
गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट...
टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश
इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश...
चुरगळले कपडे आता होणार हद्दपार
सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार...
एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर
मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर...
मुंबई होणार आता झोपडी मुक्त
उरलेल्या मराठी माणसाला करून फस्त...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
June 5, 2017
बालपणात
एकत्र खेळतात सगळे मुलंमुली
वय वाढत जाते भवतालचं
मुलीचं वय जरा लवकरच वाढत असते .
'आता तू मोठी झालीस ' ऐकू येते
वेळीच एकत्र खेळणं थांबवावं
.......असं वाटणं अनुभवाचं .
कसं सांगावं
वेगळे असतात आतून सगळे
वेगळे असतात स्पर्श
वेगळे असतात खेळ
वेगळ्या असतात नजरा
आणि
मुलात माणूस
अन माणसात नरपण , पशूपण वाढत असते .
-- कौशल ( श्रीकांत पेटकर )
March 11, 2019
नवरंग नवरात्रीचे !
प्रतीक शक्ती-भक्तीचे !!
पिवळा रंग सोन्याचा !
शुद्ध तेजस क्षणांचा !
हिरवा रंग सृष्टीचा !
वृध्दी,सुख-समृध्दीचा !!
करडा रंग भाग्याचा !
निरामय आरोग्याचा !!
केशरी रंग निर्मितिचा !
राजमंगल पताकांचा!!
पांढरा रंग शांतीचा !
एकोपा अन मैत्रीचा !!
लाल रंग कुंकवाचा !
सर्व मांगल्य मांगल्याचा !!
निळा रंग अस्मानाचा !
निर्मळशा हृदयाचा !!
गुलाबी रंग प्रितीचा !
अबोधशा यौवनाचा !!
जांभळा रंग नवलाईचा !
सखी रेणुका अंबाबाईचा !!
-- जयश्री दाणी
https://www.facebook.com/jayshri.dani.14
October 24, 2018
बकुळ प्रांगणात गंधाळलेला
July 9, 2021
१० वर्ष आईची.. पुढली
१० बाबांची.
१० दिली नवऱ्याला..
१० दिली मुलांना..
सर्वार्थाने केवळ त्यांची.
आता मात्र मुक्त हो...
ही १० स्व:तःची...
वाच, नाच, मौज कर...
हवे ते ते स्वैर कर.
पुढील १० आहेत मग
त्याच्या-आपल्या तब्येतीची...
त्या पुढील १० वानप्रस्थ...
संसारातून निवृतिची.
म्हणून म्हणते...
हीच १० वर्षे फक्त तुझी
नाहीत दुसऱ्या कुणाची
सूनेच्या संसारातही
नाक न खुपसण्यायची
आताच मस्त जगून घे
खळखळून हसून घे
प्रेमात पड स्वतःच्याच
लाड कर स्वतःचेच
स्वतःवरच रुसून घे
नवऱ्याला मार काखोटीला
जग सारे फिरुन घे
देव करो तुला मिळावी
१० वर्षे स्वैर सुखाची.
देव करो तुला कळो
महती स्वत:च्या एका क्षणाची....
March 17, 2017
अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार ।
कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार ।।
खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी ।
वादळ वारा ऋतू बदले, चूक न होई त्यांत जराशी ।।
घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत ।
हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत ।।
प्रत्येक कालक्रमणाच्या आखून, दिल्या मर्यादा ।
ठेवी अडकवून त्यामध्ये, सर्वाना नियती सदा ।।
जरी भासे नवीन कुणा, नाविन्य सारे त्याचेसाठी ।
बघत नाही जूनेपण तो, येई नंतर त्याचे पाठी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 6, 2021
कवितेचा कवी
कविते
आहेस प्राण तू
या वेडया कविचा
कवितेविणा
चालेल कसा श्वास
या वेडया कविचा
कवितेसाठीच
आहे देह जगी
या वेडया कविचा
कवितेमुळेच
होतो कवितेचा कवी
म्ह्णोनी सन्मान कविचा !
© कवी – निलेश बामणे ( एन.डी. )
August 10, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti