(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बघून सूर्यपूजा पावन झालो

    हांसत आली सूर्य किरणे
    झरोक्यातून देव्हारयांत
    नाव्हू घालूनी जगदंबेला
    केली किरणांची बरसात

    पूजा केली किरणांनी
    जगन्माता देवीची
    प्रकाश स्पर्शुनी चरणाला
    केली उधळण सुवर्णांची

    तेजोमय दिसू लागले
    मुखकमल जगदंबेचे
    मधुर हास्य केले वदनी
    पूजन स्वीकारते सूर्याचे

    रोज सकाळी प्रात:काळी
    येउनी पूजा तो करितो
    भाव भक्तीने दर्शन देउन
    स्रष्टीवर किरणे उधळतो

    कोटी कोटी किरणांनी
    तो देवीची पूजा करितो
    केवळ त्याची पूजा बघुनी
    मनी पावन मी होतो

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      October 29, 2018


  • जरा बघ!

    स्वतःचाच नव्हे इतरान्चाही विचार करुन बघ..।

      July 7, 2010


  • गळावी अहंता

    गळावी अहंता भिनावी नम्रता

      July 12, 2026


  • नशिब

    नाही मज मायबाप
    नसे कुठे घरदार
    घर हे अनाथालय
    होतो उकीरड्यावर ।।१।।

    आता बघा झालो मोठा
    वावरतो समाजात
    विचारता जन्मदाता
    प्रश्न हे अनुत्तरीत ।।२।।

    थोर नशिबाचे फेरे
    छत्र खंबीर लाभले
    इथे वाढलो घडलो
    नाही काही बिघडले ।।३।।

    बद्धि अचाट अफाट
    माझे कवच कुडलं
    तिच्या जोरावर आज
    उच्च स्थान मिळवलं ।।४।।

    बळी कुमारीमातेचा
    शाप भोगतो जनाचा
    चेष्टा करीते जनता
    पूर वाहतो अश्रूंचा ।।५।।

    याला म्हणावे नशीब
    गुन्हा असतो कुंतिचा
    भोग असतो बाळाचा
    कथाभाग या कर्णाचा ।।६।।

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      November 12, 2019


  • आनंद घट

    देहमनाचा आनंद औरची, नसे तयाला दुजी कल्पना ।

    जीवनामधले मिळता सारे, उरे न तेथे कसली तुलना ।। १

    आनंदाचा घट भरूनी हा, तन मन देयी पिण्यासाठी ।

    आनंदाला नसे सीमा मग, अनेक घट अन् अनेक पाठी ।। २

    एक घटातूनी आनंद मिळता, दुजे घट हे जाती विसरूनी ।

    अनेक घटांतील आनंद हा, लूटाल कसा तृप्त होवूनी ।। ३

    दुजामध्ये समरस होवूनी, लुटूनी घ्या तुम्ही आनंद सारा ।

    ‘मी’ ‘तू’ ह्यांच्या पलीकडला तो, आनंद घटाचा भव्य पसारा ।। ४

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      March 30, 2021


  • आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती…

    व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली प्रतिभा सराफ यांची हि कविता


    जुन्या पुस्तकातून शिकते नवीन खूप काही
    भावाच्या शिक्षणासाठी कधी सोडते शाळाही
    जे मिळते, जसे मिळते, घेते ती...
    आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
    का तरीही मग दुःखीकष्टी ती ?

    चार भांड्यातही चालवते छान संसार बाई
    ना उरले खाण्यास तरी तिची तक्रार नाही
    कोंड्याचा मांडा सहज करते ती...
    आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
    का तरीही मग दुःखीकष्टी ती ?

    दबून राहते..तरी करते कौतुक ठाई ठाई
    तापट, दारूडा वा असो नवरा गुंडाभाई
    कष्टाने पोसते परिवारास ती...
    आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
    का तरीही मग दुःखीकष्टी ती?

    कधी लटकला कर्जबाजारी होऊन तोही
    सावरते संसार... घरदार... मुलेबाळेही
    ना लटकते, ना लटपटते कधी ती...
    आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
    का तरीही मग दुःखीकष्टी ती ?

    कधी उच्चपदस्थ, कधी राजकारणी
    खोचून पदर सदा संसार भार वाही
    आत्मबळ देत असते ती...
    आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
    का तरीही मग दुःखीकष्टी ती?

    कोणत्याही परिस्थितीत फुलवते वनराई
    घरात बाईचे अस्तित्व म्हणजेच हिरवाई !
    समजली का कुणास कधी 'ती' ?
    आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
    व्हावी सुखाचीही भागीदार ती...

    - प्रतिभा सराफ

      December 22, 2023


  • पदर नात्यांचे

    चालले, चालले, चालले
    आयुष्य चालले, चालले

    सर्वात, जीव हा गुंतलेला
    शोधित सुखा मन दंगलेले

    ऋणानुबंध, हे गतजन्मांचे
    जपता,जपता दिवस संपले

    आठवांचे, आभाळ लोचनी
    भावनांचे ओघळ ओघळले

    किती स्मरावे किती उसवावे
    नात्यांचे पदर,आज विरलेले

    या मनाला किती समजवावे
    जग सारे मृगजळी हरवलेले

    दृष्टांत हा वास्तव जीवनाचा
    भौतिक सुखात मन रमलेले

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ११०.

    ११ - ४ - २०२२

      April 27, 2022


  • नशीब

    का असा धांवतोस तूं ,

    नशिबाच्या मागें मागें,

    यत्न होता भगिरथी,

    नशीब येईल संगे ।।१।।

    प्रयत्न होतां जोमाने,

    दिशा दिसताती तेथें,

    यशाचे ध्येय सदैव,

    योग्य मार्गानें मिळते ।।२।।

    प्रयत्न करूनी बघा,

    ईश्वर देखील मिळेल,

    इच्छा शक्ती प्रभावानें,

    नशीबही बदलेल ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 9, 2020


  • अभंग

    तुमचे नाम संकीर्तन ।
    हेचि माझे संध्या-स्नान ।।
    तुमच्या पायाचे वंदन ।
    हेचि माझे अनुष्ठान ।।
    तुमच्या पायाचा साक्षेप ।
    हा चि माझा काळ क्षेम ।।
    तुमच्या प्रेमे आली निद्रा ।
    हीच माझी ध्यान-मुद्रा ।।
    एका जनार्दनी सार ।
    ब्रह्म रुप हा संसार ।।

      June 11, 2026


  • कधी कधी थकत जातं मन

    कधी कधी थकत जातं मन
    विचारांच्या अगणित काहूरात
    तरीही उरतात अनेक प्रश्न सारे
    अर्धवट अनाकलनीय गूढ आवर्तनात
    मनाला क्षीण होतो हलकासा
    आणि विखुरतात आवेगांचे वारु
    पडझड होते अनंत कथांची
    उरतात मागे वेदनांचे तेच वारु
    खोल तळाचा गाभा अंधारुन जातो
    उध्वस्त मनात काट्याचा घाव बोचतो
    तरीही राहतात अनेक प्रश्न अनुत्तरित काही
    उत्तरांची काजळ रेघ निसटते त्या घनगंभीर रात्री
    मन हरवत की हरकत कळत नाही
    आईच्या शब्दांची मात्रा अल्लड वयात उलगडत नाही
    उशीर होतो वेळ निसटून अलगद जाते
    या मनाचे त्या मनाला उलगडत नसते
    पैलतीरी संध्या अवचित आयुष्यात येते
    सांज दिवा लावतांना वेळ सरत जाते
    नको होतात साठवणी हरवून जाणाऱ्या
    आयुष्यात येणाऱ्या चिंता जातात वाढणाऱ्या
    मनःशांती ढळत जाते अलगद काळ डोहात
    दूर हरवतात वाटा आल्हाद पाचोळ्यात
    रडवून जाते वेळ कातर संध्या धूसर होते
    आईच्या आठवणीत मग नयन पैल लागते
    -- स्वाती ठोंबरे.

      April 29, 2022