जरा बघ!

स्वतःचाच नव्हे इतरान्चाही विचार करुन बघ..।



नेहमीच जिन्कायचा अट्टहास का?
कधी हरण्याचा आस्वाद घेऊन तर बघ..
सुखाची सोनेरी स्वप्न सजविताना कधी
दुःखाची कडवट चव चाखून तर बघ..
म्रुगजळ भासणारया त्या स्वप्नान्ना
कधी सत्यात उतरवून तर बघ..
स्वतःच्याच विश्वात रममाण का?
कधी इतरान्च्या वेदनान्वर मायेचा
मोरपीस अलगद फिरवून तर बघ..

— श्वेता देशमुख

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →