February 2, 2022
February 22, 2022
आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे
सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे....१
प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने
बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२
तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला
दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३
जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत
वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व ते येई ध्यानात...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 17, 2015
ध्यान कसे लावावे, मार्ग असे मनोहर,
सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार ।।१।।
स्वच्छ एक आसन, शांत जागी असावे,
मांडी त्यावर घालून, स्थिर ते बसावे ।।२।।
लक्ष्य केंद्रीत करा, तुमच्या श्वासावरी,
कसा फिरे वारा, आत आणि बाहेरी ।।३।।
साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत,
शांत करील मना, बघून प्राण ज्योत ।।४।।
काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान,
करण्यास तुम्ही जावे, जाईल सारे बिघडून ।।५।।
ध्यानात झोपे शरीर, शांत करूनी मन,
आंत शोधते ईश्वर, करूनी आत्मचिंतन ।।६।।
वेळ थोडा जाता, ध्यान सहज लागते,
अंतरीचा प्रकाश दिसता, मन आनंदात डुबते ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 19, 2016
उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,
धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,
धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,
अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 16, 2019
डॉ. संकेत शरद पेडणेकर याची कविता...
स्वप्न स्वप्न स्वप्न
स्वप्न नेहमी बघायचं असतं
पण काळजीने की ते विकृत स्वप्न नसते
स्वप्नामुळे होतात आपले सुविचार पूर्ण जागे
त्याचमुळे मरतो आपला आळस ज्याच्यामुळे आहोत आपण मागे
त्याचमुळे होते तयार आपली सारी जिद्द
त्याचमुळे होते एक शक्ती संपूर्णपणे सिद्ध
ती शक्ती म्हणजे झेलायचे घाव आणि वळ
मगच मिळते हाती विजयाचे मधुर फळ
पण, पण स्वप्न तुटलं तर अश्रुंच्या समुद्रात डुंबायचे नसते
त्या समुद्रात पोहून किनाऱ्याला पोहचायचे असते
व पुन्हा एक लक्ष ठरवून एक विजयी हेतू गाठायचं असतो
व सर्वांत जास्त मोठे म्हणजे कुठलाही गर्व कधीही दाखवायचा नसतो
कारण असेच जगायचे असते
असच स्वप्न बघायचे असते.
-- डॉ. संकेत शरद पेडणेकर
DR. SANKET SHARAD PEDNEKAR
MA PHD ECONOMICS
MBA (HR) MA LABOUR MANAGEMENT
MA ENGLISH LITERATURE
PH: 9967297770
EMail : sanketpednekar4876@gmail.com
July 8, 2023
दोन ग्रंथ ते अप्रतीम बनले,
ह्या जगावरती,
रामायण महाभारत ह्याहूनी,
श्रेष्ठ काही नसती ।।१।।
धन्य जाहले वाल्मिकी व्यास,
ज्यांनी ग्रंथ लिहिले,
मानवातील विविधतेचे,
दर्शन ते घडविले ।।२।।
विश्वामधला प्रत्येक विषय,
हाताळला दोघांनी,
शोधून काढण्या काही,
निराळे समर्थ नाही कुणी ।।३।।
आद्य कवी वा लेखक म्हणूनी,
मान तयांना आहे,
अनुकरण ते त्यांचे करिता,
पुष्प तयांना वाहे ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 2, 2020
दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने ।
तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने ।।
कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी ।
प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी ।।
शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी ।
आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी ।।
खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो ।
सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 6, 2019
February 5, 2014
कधी आठवण अशी येते
सारा जीव व्याकुळ होतो
प्रियजनाची ओढ़ अनावर
अश्रुंना अंतरी महापुर येतो
ऋणानुबंधी,जीवलगाला
बघण्या जीव आतुर होतो
वास्तवताच ती दुर्भलतेची
क्षण, अनावर कातर होतो
विज्ञान प्रतापी, गरुडपंखी
वैभवाला सहज कवेत घेतो
अंतरी मायेची ओढ़ आगळी
स्पर्शासाठी जीव तडफडतो
सांगा, कसे सावरावे मनाला
अधीर लोचनांना महापुर येतो
जगणेच केवळ हाती असते
हतबलतेला या पर्याय नसतो
कलियुगाचा हा दृष्टांत सारा
पदोपदी प्रत्ययास येत असतो
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १७१
१८ - ७ - २०२२
August 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti