(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आनंदाने नाचत गात

    आनंदाने नाचत गात,घेत हृदयाचे ठाव ,
    चाललो मी पुढे पुढे ,
    झरा माझे नाव,--!!!

    कपारीत डोंगराच्या,
    जन्म होई माझा,
    झुळझुळ वाहत जाता,
    होत असे मी मोठा,--!!

    शांत निर्मळ पाणी,
    हळूहळू पुढे जातसे ,
    पारदर्शक थेंब लोलक,
    नजरेत ना भरती कसे,--!!

    असे धवल थेंब धावती,
    त्यांची बनते सुरेख नक्षी,
    ती बघण्यास उत्सुक हा,
    सारखे येती माझ्यापाशी,--!!

    अशांत, अस्वस्थ चित्ता,
    क्षणार्धात करतो शांत ,
    मनस्ताप होता क्षणी,
    धावती इथे निवांत,--!!

    अवतीभोवती वृक्षराजी,
    अन पक्ष्यांचे मंजुळ कूजन,
    माझ्या पाण्याची धून मंजुळ,
    हा पक्षीगान ते मधुर,-?-!!

    मंद वारा संगतीला,
    अखंड नित्य वाहे,
    जो येईल तो आजूबाजूस,
    निसर्गचित्रच पाहे,---!!!

    तहान भागवण्या येती,
    लहानथोर कित्येक पक्षी,
    गोड पाण्याने तृप्त होतां
    रमती बघा माझ्या वक्षी,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 5, 2019


  • धागा

    तू काय ? ती काय ? मी काय ?
    सारेच एका माळेचे मणी
    वेगवेगळ्या रंगाचे
    एकाच धाग्यात गुंफलेले
    कोणी आधी गुंफलेले
    कोणी नंतर
    धागा तुटता सारेच पसरलेले
    अपघाने दोन मणी जवळ येतात
    हलकासा वारा येताच
    विलग होण्यासाठी ...

    ©निलेश बामणे

      June 12, 2017


  • कठीण खेळ

    चंचल केलंस मन, स्थिर करण्यासांगे ।

    दिलेल्या गुणाची मग, बदलेल कशी अंगे ?

    निसर्ग नियमाच्या, कोण विरूद्ध जाईल ।

    फायद्याचे ते का त्याचे परि होईल ?

    चपळता जसा गुण, स्थिरपणा असे दुजा ।

    आगळ्यातील आनंद, हिच त्यातील मजा ।।

    देहा ठेवून चंचल, सांगे स्थिरावण्या मन ।

    हा उलटा खेळ कसा, खेळण्या भासे कठीण ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 24, 2016


  • रात्र सरकता आल्हाद

    रात्र सरकता आल्हाद
    तुझी आठवण नित्य येते,
    तुझ्या अव्यक्त मिठीत
    तुझी सल मनात बोचते
    येशील का तू अवचित कधी
    मला सहज सख्या भेटायला,
    घेशील मिठीत अलवार तेव्हा
    डोळ्यांत अश्रू होतील जमा
    तुझ्या मिठीत मी पुरती
    हलकेच मोहक गुंतून गेले,
    दूर जरी मी अलगद जाता
    सय तुझी रोज आताशा येते
    कसे सहज विसरावे तुला
    मोह तुझ्या मिठीचा होता,
    वाट पाहते तुझी अधर हृदयी
    दोष कसा देऊ अबोल माझ्या मनाला
    -- स्वाती ठोंबरे.

      June 6, 2022


  • व्यथेच्या कथा

    घराघरातील व्यथा सांगते तुमची नि माझी कथा.,
    व्यथा लहान असो वा कितीही मोठी.
    एकमेकांना देऊ या सांत्वनाची आधार काठी
    सगळ्यांचीच अर्जुनासारखी झाली आहे मनस्थिती
    कुणाचीही चालेनाशी झाली आहे कोणतीही मती.
    देऊ या मायेचे आपुलकीचे पंखातील बळ.
    तेव्हा नक्कीच. निराशेचे विचार काढतील पळ
    एक विनंती करते सर्वांना हात जोडून.
    चेहर्यावरचा खोटा मुखवटा द्या दूर फेकून
    खरं बोलून मोकळेपणाने घ्या मोकळा श्वास.
    फिटे व्यथेच्या अंधाराचे जाळे मोकळे होईल आकाश
    -- सौ कुमुद ढवळेकर.

      December 17, 2021


  • तूच माझी राधिका

    तूच माझी राधिका,तूच माझी प्रेमिका,
    मोहिनी माझी तू ,
    तूच माझी सारिका, --!!!

    मुसमुसते प्रेम तू ,
    सौंदर्य ओसंडून वाहे,
    मदनाची रती तू ,
    भित्र्या डोळ्यांनीच पाहे ,--!!!

    कमनीय सिंहकटी तुझी,
    बाहूत माझ्या सामावे,
    लाल कोवळे ओष्ठद्वज,
    डाळिंबीची जणू फुले,--!!!

    मोहक बांधा तुझा,
    जाता-येता खुणावे ,
    कुंतलाचे मानेवर ओझे,
    पाठीवरचा तीळ झाके, --!!!

    आरस्पानी रंग-गोरा,
    काळजां घायाळ करतो,
    गोड गुलाबी कायेवर,
    लज्जेचा गेंदा फुलतो,--!!!

    मिटून घेशी शृंगारात,
    संकोची तू कासवी,
    मदनाची बाधा होता,
    फुलून येते रातराणी,--!!!

    *ऐहिक तू भोगिनी,
    मजसाठी मात्र योगिनी,
    भोग--योगाच्या संयोगी,
    अलौकिक तू कामिनी*,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      April 9, 2019


  • वळून पहा

    उडून गेली दूर दूर तू

    झेप घेउनी आकाशी

    बघू लागलो चकीत होऊनी

    पंखामधली भरारी कशी

    नाजूक नाजूक पंखाना

    आधार होता मायेचा

    चिमुकल्या त्या हालचालींना

    पायबंध तो भीतीचा

    क्षणात आले बळ कोठून

    विसरुनी गेलीस घरटे आपुले

    बंधन तोडीत प्रेमाचे

    आकाशासी कवटाळले

    कधीतरी उडणे, आज उडाली

    बघण्या साऱ्या जगताला

    किलबिल करून वळून पहा

    दाणे भरविल्या चोंचीला

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 30, 2020


  • देहाच्या बाहेर मन आसक्त होते

    देहाच्या बाहेर मन आसक्त होते
    गात्रे शांत शिथिल डोळे विरक्त होते
    मोहाच्या सावरीत तुझ्यात फुलून गेले
    श्वासात बंद लय अंतरी सरगम उमलून गेले
    ओठ तुझ्या ओठांसाठी आरक्त व्हावे
    तुझ्या स्पर्शासाठी भाव मुग्ध व्हावे
    मिठीत तुझ्या अलवार चांदणे मोहून जावे
    तुझ्या बाहुत अलवर विरघळून जावे
    न सोसवते रात्र बेरात्र तुझ्यात मन गुंतावे
    तुझ्या भेटीत कितीक भाव अबोध गुंतावे
    मिठीत तुझ्या स्पर्श माझे अबोल लाजून मिटावे
    कितीक क्षण जातील असे भान तुझ्यात मिटावे
    अंतिम प्रवासी जाईल नौका मरणं सांगून न येते
    अनंतात विलीन होईल देह वेळ न सांगून येते
    आरक्त मन लोचनात जाणिव विरक्त आहे
    भेट तू लवकरी व्यक्त राधा साद घालत आहे
    तुझ्या ओढीत मन अबोल अलगद लाजले
    तुझ्यात माझे भाव विरघळून हृदयस्थ लाजले
    कुंजवनात ऋतुराज बहरुन वेळ लुब्ध दाटे
    भेट तू सांजसमयी तुझ्याविना व्याकुळ क्षण दाटे
    -- स्वाती ठोंबरे.

      November 28, 2021


  • रिक्त प्रेमाचा घट

    रिक्त प्रेमाचा घट
    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट //

    भावंडाचे संगोपन
    रमवूनी त्यांचे मन
    आईच्या कामी मदत देऊन
    आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट //१//
    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट

    लक्ष्य संसारी
    प्रेम पतीवरी
    मुलांची जोपासना करी
    संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२//
    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट

    होता मुले मोठी
    संसार त्यांचा थाटी
    राहुनी त्यांचे पाठी
    सुखासाठी त्यांच्या, करी देहकष्ट //३//
    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट

    ईच्छा उरली नसे मनी
    लक्ष्य सारे प्रभू चरणी
    सर्वस्वी त्यासी अर्पुनी
    विनवी ईश्वारासी, डोळे आता मिट //४//
    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 12, 2017


  • गुरूजींची बदली

    जून महिना. शाळा सुरू झाली. नवा वर्ग.नवा मित्र. नवा संवाद. नवा खेळ. नवा अभ्यास. पावसाळी ढगाळ वातावरण. हिरवे झालेले डोंगर.

      November 29, 2018