तारूण्याच्या उंबरठ्यावरी,
ज्योत प्रेमाची पेटून जाते,
बाह्यांगाचे आकर्षण परि,
वयांत त्या भुरळ घालते ।।१।।
प्रेमामधली काव्य कल्पना,
शरीर सुखाच्या नजीक ती,
किंचित होतां देह दुर्बल
त्याच प्रेमाची घृणा वाटती ।।२।।
प्रेम हवे तर प्रेम कर तूं,
मूळे असावी अंतर्यामी,
मना मधली ओढ खरी ती,
येईल अखेर तीच कामीं ।।३।।
अंतर्मनातील प्रेम बंधन,
नाते त्याचे अतूट असते,
देहामध्यें बदल घडूनही,
प्रेम मनींचे फुलत राहते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 27, 2016
April 19, 2010
माणसाला वाटत राहतं
पाखरं त्यांना घाबरतात
म्हणून पिकात
बुझगावणं उभारतात
अाळशी माणसाच्या
सवयी त्यांना माहीत होतात
बुझगावण्याच्या अंगाखांद्यावर
पाखरं मस्त खेळत राहतात.
छानपैकी दोस्ती करतात....
-- श्रीकांत पेटकर
March 7, 2019
काही असले नसले,तरी आनंदातच जगावे,
काय आणले, काय न्यायचे, सर्वांनाच आहे ठांवे ,--!!!
,मी मी करत करत,
कमरेला बांधून गोष्टी,
पैसाअडका, सोने-नाणे,
सारे ठेवायाचे पाठी ,--!!!
शेतीवाडी, जमीनजुमला,
भाईबंद हक्क सांगती,
भाऊबंदकी होऊन निव्वळ,
तुटतात सगळी नाती गोती,--!!!
हे माझे ते तुझे,
कशासाठी, आपपरभाव,-?
स्वार्थ आपमतलब शेवटी,
करून दु:खी होतो मानव,--!!!
सख्खे, सख्खे न राहती, परस्परांच्या जिवांवर उठती,
आपल्या पोळीवर तूप ओढुनी, दुसऱ्यास वाईट ठरवती,-!!!
काय मिळते असे करून,
जीवनी फक्त ताण तणाव,
शरीर मन नसते धड,
दुखण्यानाही चढतो भाव,--!!!
जगण्यातलानिखळआनंद निसर्गात खूप दडला असे,
पदोपदी शिक्षण देई ,
निसर्गासारखा गुरु नसे,--!!!
प्रत्येक घटक त्याचा,
त्याग समर्पण शिकवे, माणूस राही किती अडाणी, त्याचीभाषा समजत नसे,
हिमगौरी कर्वे.©
April 22, 2019
आठवावे तव नाम हे गुरुराया
शीणवटा मनाचा घालवाया ...।। धृ ।।
रहाटगाडगे हे रोजचे चाले
रेटूनी रेटूनी मन हे थकले
एकचित्त होऊनी आता बसलो
स्मरण करी तुमचे गजानना ।।१।।
उपदेशपर तुम्ही जे सांगितले
मनात हो साठवुनी ठेवियले
विपरीत वर्तमानात आजच्या
वागण्या बल द्यावे गजानना .....।।२ ।।
किंमत हरवुनी बसली माणसे
हरवून बसले बोलते शब्दही
बदलणे बरे नव्हे रंग नाना
हे भान तुम्हीच द्यावे गजानना ....।।३ ।।
-- अरुण वि.देशपांडे - पुणे.
9850177342
January 29, 2019
मित्रांनो, "तुझिया एका नजरेने" ही मराठी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.
"माझी डायरी " या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा.
"माझी डायरी" आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.
https://youtu.be/chxQ8JTYXys
June 23, 2018
युगा मागुनी युगे संपली सुर्याभोवती फिरते अवनी
मिलन त्यांचे कधी होईना सूर्याची ती पाठ सोडेना ।।१।।
October 4, 2025
उगवता सूर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला ||धृ||
ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख
बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती
माना डोलावती, डामडोलाला ||१||
उगवता सूर्य. नमन करती त्याला
प्रथम हवे दाम, तरच होई काम
पैशाच्या भोवती, सारेच फिरती
पैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२||
उगवता सूर्य, नमन करती त्याला
सत्तेची नशा, दाखवी जना आशा
स्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर
हांजी हांजी करती, बघता सत्तेला ।।३।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला
अधिकाराची रीत, बघती स्वहीत
गरजवंता अडविती, शोषण तयांचे करती
सलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला ।।४।।
उगवता सुर्य़, नमन करती त्याला
कालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ
डोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी
जवळ करती, उमलणाऱ्या फुलाला ।।५।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 23, 2020
November 20, 2021
मूल्य नाही कुणा,
तूं दिल्या वेळेचे,
गमावून टाकी,
जाणूनी फुकाचे ।।१।।
लागत नसते,
दाम वेळेसाठीं,
म्हणून दवडे,
अकारणा पोटीं ।।२।।
वस्तूचे मूल्य ते,
पैशांनीच ठरते,
परी वेळेची किंमत,
कुणा न समजते ।।३।।
वेडे आहोत सारे,
कसे होई मूल्य
वेळ जातां मग,
आयुष्य जाईल ।।४।।
आयुष्य खर्चणे,
हेच वेळेचे मुल्य ठरते,
जीवनांतील यश,
त्यावरुन कळते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 17, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti