जगी भेटली माणसे
अनभिज्ञ ती सारी...
जोडली नाती
निराशाच पदरी...
नव्हता जिव्हाळा
भावशून्य सारी...
नाही कुणी कुणाचे
छळे सत्य जिव्हारी...
जखमांचे झिरपणे
नि:शब्द वाहते अंतरी...
असले कसले जगणे
प्रीत उदास हृदयांतरी...
हा कल्लोळ असह्य
भावनांचे रुदन भीतरी...
रचना क्र ७०
१०/७/२०२३
वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
July 19, 2023
कौशल ईनामदार एक प्रसिद्ध संगीतकार म्हणतात..
एकदा एक विचार मनात आला.
कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधायचा प्रयत्न तर कुठला गायक कुठलं पेय असेल..?
मुकेश हे लिंबू सरबत आहेत.
जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. पण ताज्या लिंबू सरबताची चव इतर कशालाही येणे केवळ अशक्य..!
मन्ना डे हे दूध आहेत.
पौष्टिक आणि शक्तिवर्धक.
पण ब-याचजणांना नुसते दूध पचत नाही !
गीता दत्त कडक फिल्टर कॉफी आहेत.
येवू घातलेली झोप उडवतात.
आशा भोसले या अतिशय उंची वाइन आहेत. जिभेवर आवाज रेंगाळत ठेवावा आणि फक्त नशा अनुभवावी.
महम्मद रफ़ी हे स्कॉच व्हिस्की आहेत.
सोनेरी, उत्तम दर्जा आणि ...!
तलत मेहमूद...म्हणजे उसाचा रस..!
एकदम गोड आणि थंड पण एक किंवा
जास्तीत जास्त दोन ग्लास बस्स.
जास्त घेवू शकणे अशक्य...!
महेन्द्रकपूर..म्हणजे ताक..!
जमलं तर एकदम फक्कड नाहीतर जावू दे.
किशोर कुमार चहा आहेत.
कधीही, कसाही आणि कितीही अनुभवावा.
दुधात, दुधाशिवाय, तल्ल्फ येते म्हणून,
जाग येते म्हणून, सवय म्हणून, तजेला येतो
म्हणून, कामात, रिकाम्या वेळात, घरचा,
इराण्याचा, टपरीवरचा. कुठल्याही रुपात तो मस्तचं वाटतो.
शिवाय माझंही ते आवडतं पेय आहे..!
आणि शेवटी....
लता मंगेशकर. त्या पाणी आहेत..!
नितळ,पारदर्शक, स्वच्छ,शुद्ध..!
तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागत नाही. प्राण वाचवू शकणारं हे एकमेव पेय..!
धन्यवाद
March 27, 2017
March 10, 2022
November 19, 2021
-- स्वाती ठोंबरे.
December 5, 2021
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण
त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही
उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण
साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार
देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना
उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना
सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान
प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई
तीच प्रभूसी अर्पण होई
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar@gmail.com
January 4, 2019
पुढे मुंबईलाच परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात (Bombay Veterinary College) १९८० ते १९८४ मधे पशुवैद्यक पदवी शिक्षण पूर्ण केले. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे एशिया खंडातले सर्वात जुने (१८८६ साली ब्रिटीशांनी सुरु केलेले) पशुवैद्यकीय महाविद्यालय. त्याला जोडूनच असलेले सुसज्ज पशु इस्पितळ. जुन्या दगडी इमारती आणि भरपूर झाडीने भरलेल्या या महाविद्यालयाच्या प्रांगणामधे (Campus) आल्यावर आपण मुंबईत आहोत यावर चटकन विश्वास बसत नाही. पूर्वी हे कॉलेज मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. कृषी विद्यापिठांची स्थापना झाल्यानंतर हे कॉलेज दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न झाले.
पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे कृषी / पशुवैद्यक या शाखांना येणारा विद्यार्थी वर्ग हा प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणारा. बर्याच जणांकडे थोडी बहुत शेती असायची. बहुतेकांच्या घरी शेतीच्या कामासाठी बैल आणि थोडया फार गायी, म्हशी वगैरे जनावरे असायची. काही जणांचा कोंबडयांचा व्यवसाय असायचा. बहुतेकांनी ग्रामीण भागातलं पशुवैद्यकाचं जीवन जवळून बघितलेलं असायचं. या सगळ्या पार्श्वभूमी लाभलेल्या विद्यार्थ्यांमधे आमच्यासारखी नावापुरती थोडी शहरी मुलं / मुली असायची. पूर्वी पशुवैद्यक शाखेकडे जाणार्या मुलींचा कल फारच कमी होता. ७५ विद्यार्थ्यांच्या बॅचमधे क्वचित असली तर एखाद दुसरी मुलगी असायची. आमच्या आधीच्या बॅचमधे आणि आमच्या बॅचमधे १४-१५ मुली आल्या होत्या. आता सारं चित्रच बदलून गेलंय आणि वर्गातील जवळ जवळ निम्या किंवा थोडया अधिकच मुली विद्यार्थिनी म्हणून असतात.
पशुवैद्यकीय महाविद्यालयात मित्र मिळाले ते शहरी तसेच ग्रामीण भागातले. त्यातला १५-२० जणांचा जिगरी दोस्तांचा ग्रूप तर आयुष्यभरासाठीचं मित्र मंडळ देऊन गेला. त्यांच्यातल्या बर्याच जणांमुळे ग्रामीण महाराष्ट्राची आणखी ओळख होत गेली. पुढे ६ महिने इंटर्नशिपसाठी ग्रामीण भागातच विविध ठिकाणी जाऊन काम केलं. वेगवेगळ्या NSS Camps आणि extension work निमित्ताने खेडयापाडयातून फिरुन ग्रामीण भागाशी अधिक जवळीक निर्माण झाली. आमच्या बॅचमधले बरेच जण पदवी घेऊन, महाराष्ट्र सरकारच्या सेवेत दाखल होऊन, महाराष्ट्रातल्या गावांत आणि खेडोपाडी पांगले.
आपल्याकडे पशुवैद्यकीय पेशाला अजूनही म्हणावा तसा मान नाही. गावाकडे तर गाई म्हशींचा डॉक्टर म्हटला की “ढोर डॉक्टर” म्हणूनच संभावना व्हायची. नाटकं सिनेमामधे देखील माणसांच्या डॉक्टर ऐवजी ‘ढोर डॉक्टराला’ आणून एक हमखास हशा मिळवण्याची सोय केलेली असायची. यातून सुटका व्हायचा मार्ग म्हणजे पाळीव प्राण्यांचा, ‘कुत्र्या मांजरांचा’ डॉक्टर व्हायचं. त्यामुळे शहरात प्रॅक्टीस करता येते आणि समाजात थोडा अधिक मान मिळतो. माझ्या बहुतेक सार्या शहरी मित्रांनी सूज्ञपणे एकतर हा मार्ग पत्करला किंवा मार्केटींग सारखे पांढरपेशी क्षेत्र निवडले. मी मात्र पशुप्रजनन या विषयामधे पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग पत्करून गाई, म्हशी, घोडयांसारख्या मोठया जनावरांच्या जगामधे प्रवेश केला. त्या निर्णयाबरोबरच माझं पुढचं बरचसं आयुष्य गाई घोडयांच्या फार्मसवर आणि ग्रामीण वातावरणात जाणार हे देखील नक्की झालं.
पुढे नोकरीच्या निमित्ताने पुण्याजवळ तळेगावला घोडयांच्या फार्मवर दीड वर्षे आणि गुजराथमधे आणंद जवळ गाई म्हशींच्या फार्मवर साडे सहा वर्षे घालवली. फार्मवरचे कामगार म्हणजे आसपासच्या खेडयांतले गरीब खेडूत. त्यांच्याबरोबर एक होऊन दिवस रात्र काम केलं. रात्री बेरात्री त्यांच्या खांद्याला खांदा लावून गाई म्हशींची आणि घोडयांची बाळंतपणं केली. उन्हातान्हात त्यांच्याबरोबर जीपमधून फिरलो. त्यांच्या खोपटांमधे, झोपडयांमधे बसून त्यांनी प्रेमाने दिलेला गुळाचा चहा आणि चटणी भाकरी खाल्ली. भुकेच्या वेळेला जीप थांबवून रस्त्याकडेच्या टपर्यांमधे त्यांच्याबरोबर जे मिळेल ते खाणं खाल्लं. महाराष्ट्र, गुजराथ आणि पंजाबमधे कामानिमित्त खेडयापाडयांत खूप भटकलो. खेडयातलं जीवन जवळून पाहिलं, अनुभवलं.
या सगळ्या पार्श्वभूमीमुळे सर्वसाधारण शहरी माणसापेक्षा मला ग्रामीण भागाची अधिक जान पेहचान झाली. कदाचित याच पार्श्वभूमीमुळे अमेरिकेच्या ग्रामीण भागाशी माझी तार लवकर जुळली असावी. अमेरिकेतलं ग्रामीण जीवन मी भारतातल्या ग्रामीण जीवनाच्या चष्म्यातून पाहू शकलो, समजू शकलो. कदाचित भारतीय आणि अमेरिकन ग्रामीण जीवनात काही समान धागा दिसल्यामुळे, मी तो पकडायचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय हे वाचकांनी ठरवायचं आहे. अर्थात मी कितीही ग्रामीण भागाशी जवळीक दाखवायचा आव आणला तरी शेवटी मी एक जातीवंत मुंबईकर आहे. माझ्याजागी जर एखादा खराखुरा गावकरी किंवा हाडाचा शेतकरी असता, तर कदाचित त्याच्या लेखणीतून ही ‘गावाकडची अमेरिका’ अधिक अस्सल उतरली असती.
June 24, 2015
पर्वत शिखरीं जाऊन,खोदून आणली माती
कौशल्य पणास लावून,केला मी गणपती ।।१।।
मुर्ती बनली सुरेख,आनंद देई मनां
दाम मिळेल ठिक,हीच आली भावना
घेऊन गेलो बाजारीं,उल्हासाच्या भरांत
कुणी न त्यासी पसंत करी,निराश झालो मनांत
बहूत दिवस प्रयत्न केला,कुणी न घेई विकत
कंटाळून नेऊन दिला,गणपती मी शाळेत
भरले होते भव्य प्रदर्शन,हस्तकला कौशल्याचे
नवल वाटले गणपती बघून,दालनातील सुरवातीचे
चकीत झालो जाणूनी,मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
गणपतीच्या भव्यतेनी,मिळवीला हा अधिकार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 7, 2017
कोण दिसे हा पाण्यामध्ये,
असावा माझाच भाईबंद,
चोच बांकदार, रूप देखणे,
मनाने दिसतोय स्वच्छंद,
गुबगुबीत पांढरी पाठ,
कोरीव वर काळ्या रेघा,
नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका ,
सुळकन जो वर येईल,
मटकावेन आधी त्याला,--!!!
कळणारही नाही याला,
कधी गिळले मी माशाला,-?
डोळे तीक्ष्णमाझे,
नजरही अगदी करडी,
पाण्यातील या पक्ष्याची,
मात्र भासे मज बेगडी,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
April 2, 2019
कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,
हात-पाय गार, काटे अंगी येती
नकोसा वाटतो, मजला हिवाळा,
वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा
सुकूनची जाते, हिरवे रान
शरिर राहते, घाम निथळून
लाही लाही होता, त्रस्त होई जीव,
शोधण्या ढग, मन घेई धाव
थांबवितो कामे, वादळी वारा,
पर्जन्याचा मारा, पडताती गारा
पाणी चहूकडे, वाटते सुकावे,
वर्षा जावूनी, सुक्यात खेळावे
आपल्या जे हाती मन नसे त्यात
सुख त्याच्यांत पाही, नसे जे हातात
September 2, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti