वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एखाद्या महिलेचा अभियांत्रिकी दृष्टिकोन चांगला असेल तर तिच्याकडे तुम्हाला कलिंगड किंवा पपईसारखं मोठ्ठ फळ कापण्यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्त लांब पाते असलेली सुरी आढळेल. तसंच त्या सुगृहिणीकडे तुम्हाला पिझ्झा किंवा तत्सम पदार्थ कापण्यासाठी गोल पातं असलेली सुरी आढळेल…
May 15, 2023
गुरुगीतेमध्ये महेशानी अंबेला सांगितले, “जीवीत तेही समर्पिजे” म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेऊ नकोस. “जीवात्मा अर्पण केलास कि शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगत होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे.
September 16, 2011
प्रत्येक तिथीला आनंद झाला ….तसे हे तिथींचे शुभदिन आपल्या जीवनात आनंद घेऊन येवोत. आजच्या दिव्यांच्या अमावास्येच्या निमित्ताने एका आजीने सांगीतलेली गोष्ट……
July 23, 2017
शंभर कसोट्या सर्वप्रथम पूर्ण करणारा खेळाडू आणि शंभर कसोट्या खेळणारे खेळिये
December 21, 2010
दयाघना नको आता पुन्हा येरझार।।धृ।।
ध्यास! केवळ आता तव दर्शनाचा
सुखावला या जन्मी जीव हा अपार
भोगले भोग, सारेसारे गतजन्मांचे
जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।१।।
सांगशील कां ? तूं रे जगतनियंत्या
सत्य! तुजविण दूजे कोणते सुंदर?
धावलो संसारी सदैव मृगजळापाठी
जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।२।।
सत्य त्रिलोकी! तुझीच सत्ता केवळ
सृष्टीतही साक्षी, तुझेच रूप निरंतर
अविरत स्मरण, तुझेच या स्पंदनात
तुझ्या नामात सुखावतो जीव चिरंतर।।३।।
मुक्ती, मोक्ष, स्वर्ग सारे तुझ्याच ठाई
या युगी भौतिक सुखात दंगले चराचर
वोखटी! प्रीती, भक्ती, वात्सल्य सारे
उबगलो इथे आता, नको पुन्हा येरझार।।४।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१४६.
९ - १२ - २०२१.
December 14, 2021
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे सत्तावन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग पंधरा
दातांनी नखे कुरतडू नयेत.
काही वेळा सवय म्हणून तर काही वेळा शरीराची आवश्यकता म्हणून नखे खायची सवय जडते. जी चुकीची आहे.
नखांमधे घाण साठलेली असते. नखे दातानी कुरतडल्यामुळे ती सर्व घाण आपल्याच पोटात जाते, हे आपण इयत्ता तिसरीत शिकलेलो आहोत.
कुरतडण्यापेक्षा आणखी वाईट सवय म्हणजे नखे खाणे. काही जणांना एवढी वाईट्ट सवय असते की त्यांच्या नखांचे खाऊन खाऊन पार धनुष्यच करून टाकलेले असते.
नखावरून अनेक गोष्टींची परिक्षा होत असते. शरीरीतील अस्थि धातूचे संहनन किती आहे,संहनन म्हणजे शक्ती, अंदरूनी ताकद ! आजच्या भाषेत कॅल्शियम लेव्हलचा अंदाज बांधता येतो. अर्वाचीन शास्त्रानुसार ह्रदयरोगाची पूर्वस्थितीचे अनुमान करता येते. कामाचे स्वरुप समजते. रक्तधातुची क्षमता समजते. तुकतुकीतपणावरून शरीरातील स्निग्धत्व समजते, त्यावरुन वाताच्या स्थितीचा अंदाज बांधता येतो.
नखांना सुस्थितीत ठेवावे. प्रसंगी नखांचा शस्त्र म्हणून वापर करता येतो तेवढी ती पाजळून तयार ठेवावीत. म्हणजे लांब वाढवू नयेत. शस्त्र म्हणून जेव्हा नखे वापरायची असतात, तेव्हा ती वाढलेली असता नयेत, नाहीतर ती तुटण्याचीच शक्यता जास्ती असते.
सध्या नेलआर्ट नावाची कला व्हायरल म्हणजे प्रसारीत होत आहे. पूर्वी निदान एकच रंग लावला जाई. आता मल्टीकलर. त्यावरील रंग घातक असतात. ते रंग पोटात जातात, एकवेळ नखं खाणं परवडलं पण हा रंग ? ना रे बाबा ना ! पोटात जाऊन अनेक व्याधी होण्यापेक्षा नखं न वाढवणं बरं.
आता तर नखं पण कृत्रिमरीत्या बसवता येतात. कृत्रिमरीत्या नखे वापरायची एवढीच हौस असेल तर शिवरायच व्हावे. प्लॅस्टीकची वापरण्यापेक्षा चक्क पोलादी वाघनखेच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१५.०९.२०१७
September 15, 2017
आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीगला सुरूवातीला खूप वाहवा मिळाली. पण, ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यातील वादानंतर आयपीएलचे खरे स्वरूप लोकांसमोर आली. त्या आधी आयपीएलकडे व्यवस्थापन विद्यार्थ्यासाठी आदर्शभूत मॉडेल म्हणून पाहिले जाऊ लागले होते. पण, भ्रष्टाचाराच्या आगीत या व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ झाला.
April 21, 2024
सामान्य व्यवहारात देखील कोणत्याही माणसाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला तर उत्तर सामान्यतः त्याचे नाव असे देता येते. कोणी आपले नाव घेतले की आपल्याला मोठा आनंद होतो. त्यां नावाच्या प्रसिद्धीसाठी कीर्ती साठी आपण किती कामे करतो.
October 14, 2020
निवडणूकांना आता फक्त वर्ष राहीलंय. मतदारांना फितवण्याचे आणि भडकवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. तरी डोकं शांत ठेवा. तुमच्या जीवावर पोळी भाजायचा सर्वांचा कावा लक्षात घेऊन, या निवडणूकीत तुमचा पक्ष कोणता असं कुणी विचारलं, तर ‘देश आणि देशहित’ हाच आमचा पक्ष असं ठणकावून सांगायला कचरू नका..
April 6, 2018
भारतीय गणेश उत्पत्ती विषयी असलेली कल्पना डावलून नेपाळ संस्कृतीने आपले गणेश दर्शन घडविले आहे. गणेश हा शिवपुत्र न मानता तो स्वयंभू असून एका सूर्य किरणात त्याचे दर्शन आले आहे असे मानून सूर्य-विनायक हे अधिष्ठान दिले आहे. जगातील इतर राष्ट्रात सुर्यपुत्र हा मान्य असलेला संकेतही नेपाळ संस्कृतीला मान्य असलेला दिसत नाही. ह्या सूर्य विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगांव येथे आहे. ते भव्य आहे. नेपाळच्या चित्रांकित नृत्यगणपतीच्या सभोवती चार गणपती असतात. त्यातील भव्य व मुख्य देवता सूर्य विनायक होय.
February 21, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti