वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रासायनिक खतांच्या विषारी अवगुणांपासून आपली सुटका तर नाहीच.
ती तर प्रत्येक अन्नामधे, भाज्यांमधे, साखरेमधे, दुधामधे, औषधांमधे, हवेमधे, आणि आता विचारांमधेदेखील आली आहे.
गरज आहे ती शुद्धीकरणाची !
अंतर्बाह्य शुद्धीकरण !
अगदी प्रसन्न आत्मा इंद्रीय मनापर्यंत.
जेवढे आपापल्या परिने शुद्ध रहाता येईल तेवढे रहायचे.
जेवढे शक्य आहे तेवढे सर्व प्रयत्न मनापासून करून अशुद्धी बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा.
एवढंच आपल्या हाती.
समुद्रासारखं व्हायचं.
समुद्र आतमधे काहीही घाण सामावून घेणारच नाही. जे काही आत नको असेल, ते ते सर्व बाहेर किनारपट्टीवर आणून टाकायचे !
अगदी अनावश्यक विचार सुद्धा !
मनापासून केलं तर नक्कीच यश मिळते,
खाताना जेवढे शुद्ध सात्विक खाता येईल तेवढे खायचे.
म्हणून तर आपण अन्नावर वेगवेगळे संस्कार करतो, ते त्यातील विष निघून जाण्यासाठीच. !
धान्यांच्या बाबतीत, वारवणे म्हणजे वारा देणे, निवडणे, आसडणे, पाखडणे, चाळणे, घोळणे, धुणे, हे झाले प्राथमिक शुद्धी संस्कार.
नंतर चिरणे, कापणे, फोडणे, वाफवणे, उकडणे, शिजवणे, तळणे, परतणे, गाळणे, फुलवणे, फुगवणे, आंबवणे, भाजणे, बेक करणे, हे सर्व संस्कार आपण अन्नावर दररोज अगदी सहजपणे करत असतो.
कशासाठी ?
अन्न सहज पचावे, याकरता सोयीचे व्हावे म्हणून केलेले जाणारे हे शुद्धी संस्कार !
प्रत्येक पदार्थातील विष वेगळे. त्यामुळे त्याची शुद्धी वेगळी. जसे मोहोरी धुण्यासाठी माझी आई मोहोरी पाण्यात घोळून धुवायची.
एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन एक वाटी एका हातात, त्या पाण्यात धरून ती हलवत रहायची. दुसर्या हाताने मूठमूठ मोहोरी घेत त्या वाटीत वरून हलकेच सोडायची. म्हणजे मोहोरीतले बारीक दगड पाण्यात घोळल्यामुळे, वाटीत आपोआपच तळाला बसायचे. वरची शुद्ध मोहोरी पातेल्यात यायची. दगड वाटीत जमा व्हायचे.
आणि नंतर पातेल्यातील मोहोरी वाळवायची.
काही पदार्थांची शुद्धी होऊच शकत नाही, म्हणजे जर्सी गाईच्या दुधाची शुद्धी कशी करणार ?
दूध ऊकळून किंवा सुंठ, आले मिरी बाळशेप इ. औषधे घालून देखील या दुधाची शुद्धी होणारच नाही. अशावेळी या पदार्थाना आपल्या आहारातून कायमचे हद्दपार करणे, हाच सर्वोत्तम उपाय ठरतो.
अशी शुद्धी जर प्रत्येक पदार्थाची करायची ठरवले तर अन्नशुद्धी फार कठीण नाही.
पण वेळच नाही हो, कसं जमणार, जागाच नाही, माहितीच नाही, आईने शिकवलेच नाही, करायचं कुणी, अश्या वैचारिक द्वंद्वात सतत राहिल्यामुळे आयुष्य कमी झालं तरी चालेल, पण हे असलं कालबाह्य काही करायची आमची मानसिक आणि शारिरीक तयारी नाही, असं म्हणून कसं चालेल ?
कुछ (100 बरस ) पाने केलिए
कुछ खोना पडता है !
जिंदगी पाने केलिए
गंदगी को हटाना जरूरी होता है !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
26.08.2016
August 26, 2016
भ्रष्टाचार आणि बेईमानीचा देशात सुकाळ आला असताना, एखाधा प्रामाणिकपणाचा प्रसंग अनुभवास आल्यास आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. छोट्या मोठ्या कामाच्या प्रसंगांची वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या माणसांचीही आज कमतरता नाही. परंतु प्रामाणिकपणाने जगतांना या हाताचे दुसऱ्या हाताला कळणार नाही याची काळजी घेणारे माणसे बघून, ‘जीवंत माणुसकीचा प्रत्यय येतो’.
पाच आणि दहा रुपयांसाठी माणसाचे मुडदे पडणाऱ्या या जगात, हजारो रुपयांना स्पर्श न करणाऱ्या माणसांमुळेच आज माणुसकी आणि विश्वास जीवंत आहे.
March 17, 2011
आपण सर्व भाविक छोट्या मोठ्या समस्यांमुळे काहि सेवा करत असतो. उपासना करत असतो. त्या अंतर्गत आपले सद्गुरु आपल्याला काहि मंत्र पठण करवयास सांगतात. ते स्तोत्र, मंत्र, उतारे , तोडगे करत असताना मनात श्रद्धा भाव हा खुप महत्वाचा असतो.
पण काही लोक त्याला अंधश्रद्धेचे नाव देऊन ढोंग ठरविण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ही हळू हळू त्यांच्या बोलण्याने भुलु लागतो. पण आपण हे विसरतो की आपल्या ऋषि मुनी यांनी निर्मित केलेले हे सर्व स्तोत्र मन्त्र यांना केवळ आध्यात्मिक कारण नसून एक वैज्ञानिक पार्श्वभूमी ही असते. ती समजून घेतली तर आपल्या हजारो लाखो वर्षाचा इतिहास असलेल्या हिन्दू धर्माचा अभिमान तर वाटेलच. पण आपण करत असलेली सेवा ही लवकर फलद्रुप होईल व देवाला न मानणाऱ्या लोकांना सडतोड़ उत्तर देता येईल.
त्याच साठी आपण आज काहि मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण करणार आहोत.
ऐक्य मंत्र :- ऐक्य मंत्राच्या पठणाने ओक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते.
नवार्णव मंत्र :- मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. नऊ अक्षरांचा या मध्ये समावेश आहे.
मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा active होतात.
रामरक्षा स्तोत्र :- राम रक्षा स्तोत्रातील 'र ' च्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम balance होते.
गायत्री मंत्र :- गायत्री मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स (Epinopnrins) नावाचे हार्मोन तयार होते. रोग प्रतिकारक शक्तीची वाढ होते.
काल भैरावाष्टक :- कालभैरावाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे vibrations तयार होते त्यामुळे आपले ३ इंच पर्यंत संरक्षण होते. मुलांनी गंध टिळा लावल्याने भृकुटीमध्या वरील आज्ञाचक्र active होतात.
प्रज्ञा विवर्धन स्तोत्र :- याच्या पठणाने पिनियल gland ला धक्का बसून मेमरी चार्जेस ची निर्मिती होते. स्मृतीभ्रंश चे आजार होत नाहीत.
सरस्वती मंत्र , सुर्य मंत्र , गणपती अथर्व शीर्ष :- मेंदू मध्ये cortex नावाचा भाग असतो त्यात Cortizone नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धीमत्तेत वाढ होते सदबुद्धी वाढते.
विद्याप्राप्तीकारक स्तोत्र :- या स्तोत्राच्या पठणाने DHA नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोन मुळे होतो.
दत्त महाराजांचा मंत्र :- "द्रां " हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने (सेल टिश्यू फॉरमेशन ) cell tissue formation चे काम प्रॉपर होते (जखम भरून येण्याचे काम ).
शाबरी मंत्र - Dopamine हार्मोन ची निर्मिती होते. विशेष महत्वाचे म्हणजे या हार्मोन चा balance राखला जातो.जर हार्मोन्स वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्य.
May 16, 2017
पाचेक वर्षे झाली.. जवळपास टीव्ही पाहताच नाही! अगदी खास असं कारण नाही, पण वडिलांच्या हातातला रिमोट माझ्याकडे येता येता टीनेज मुलाच्या हाती गेला, मग बातम्या आणि फुटबॉल मॅचेसच्या मध्ये माझ्या आवडीच्या प्रोग्रॅमचं सँडविच व्हायला लागलं! त्यातच टॅब घेतला होता, त्यावर आवडीचं सगळं हेडफोन कानाला लावला की बघता यायला लागलं..
March 11, 2023
मुख्यमंत्री.......
शरद पवार ( मराठा )
अशोक चव्हाण ( मराठा )
पृथ्वीराज चव्हाण ( मराठा )
यशवंतराव चव्हाण ( मराठा )
शंकरराव चव्हाण ( मराठा )
विलासराव देशमुख ( मराठा )
वसंतराव नाईक ( मराठा)
सुधाकरराव नाईक ( मराठा )
शिवाजीराव निलंगेकर ( मराठा )
वसंतराव दादा पाटील ( मराठा )
पी.के. सावंत ( मराठा )
बाबासाहेब भोसले ( मराठा )
नारायण राणे ( मराठा )
येवढे मराठी मुख्यंमत्री होऊन गेले तरी मराठ्यांना 1 टक्का सुद्धा आरक्षण का देता नाही आलं?
ते हे तेरा जण का करू शकले नाहीत !!!
आणि आता यांना आरक्षण हवे ते फडणवीस कडून काय छान योग आणि मुहूर्त शोधुन काढलाय के हा नाही म्हणाला कि लगेच फडणवीस बामण होता म्हणून आरक्षण दिले नाही म्हणून आख्या महाराष्ट्राला vede pana लावायला हे मोकळे
विचार करा मित्रानों.......
Forwarded message in public interest ....
September 28, 2016
१८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.
October 31, 2021
ज्ञानाला विवेकाची जोड असेल तरच त्यातून प्रज्ञा निर्माण होऊ शकते. आणि जोपर्यंत प्रज्ञा ही व्यक्तीच्या व्यावहारिक आणि सामाजिक सुरक्षा आणि विकास यात रूपांतरित होत नाही तोवर ती कोळशामधील आग आहे एवढेच. केवळ कोळसा खाली ठेवून अन्न शिजणार नाही.
May 26, 2026
कुटुंबे समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगैरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे. जमीन हलकी असेल तर किमान १५ ते २० सेंटिमीटर खोल माती राहील इतकी गाळाची वा काळी कसदार माती या क्षेत्रात टाकून घ्यावी. शेणखताबरोबरच तिसरा हिस्सा कोंबडी खत व तिसरा हिस्सा लेंडी खत मिसळून टाकले तर अधिक फायदा होईल.
November 5, 2023
देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.
October 27, 2021
मुंबईत व उपनगरांमध्ये दर दिवशी कुठे ना कुठे बाजार भरण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे, म्हणून मुंबई सात बेटांची असल्यापासून अर्थात त्याकाळी त्याचा आवाका निम्मा असेल पण तो त्या काळानुसार व तिथल्या वस्तीनुसार असायचा आज तर देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरांमध्ये अनेक बाजार भरतात, यामध्ये खाद्यपदार्थांपासून, टाचणी व राई असे सर्व वस्तू उपलब्ध असतात.
September 2, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti