(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग

    मानवजातीच्या आयुष्यातील हा एक ऐतिहासिक क्षण होता. हा प्रसंग जेव्हा टेलिव्हिजनवर दाखविण्यात आला, तेव्हा जगातील १/५ लोकांनी तो बघितला. अपोलो-११ या यानाने १६ जुलै १९६९ रोजी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली.

      July 20, 2021


  • बाळक्रीडा अभंग क्र.२७

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 7, 2018


  • “नोटबंदि…एक हजाराची नोट’ – एक अनुभवकथन

    लासलगावला दवाखाना चालवणाऱ्या डाॅक्टर मित्राला आलेला अनुभव,”नोटबंदि…एक हजाराची नोट.!खरंच विचार करणारी हि गोष्ट आहे. आपल्या देशात अजूनही गावागावात अशिक्षित, अडाणी तसेच आंगठे बहादूर लोक आहेत. कितीतरी स्वार्थी लोक या भोळ्या भाबड्या लोकांना आर्थिक व्यवहारात फसवतात.

      October 17, 2017


  • मंत्रपुष्पांजली

    खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन. मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे-

    या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः

    श्लोक - १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्
    तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:

    श्लोकाचा अर्थ - देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.

    श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः

    श्लोकाचा अर्थ - आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो.

    श्लोक ३ (प्रथमार्थ) ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।

    श्लोकाचा अर्थ - आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

    श्लोक ३ (द्वितियार्थ)

    समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति।

    श्लोकाचा अर्थ - आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.

    श्लोक ४ तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।

    श्लोकाचा अर्थ - या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.

    संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना.
    लहानपणापासून वरील श्लोक आपण सर्व आरती नंतर चेवाने बोलत आलोय, त्याचा अर्थ वरील प्रमाणे आहे.

      November 11, 2016


  • शिवधनुष्य प्रशासकीय सुधारणांचे

    आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणावरुन राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य के. लाला यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर राज्यात मोठे प्रशासकीय फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले. वास्तविक प्रशासकीय सुधारणा ही केवळ निवड-नियुक्ती या पुरती मर्यादित बाब नाही. त्यासाठी अनेक गोष्टींचा विविध पातळ्यांवर विचार करावा लागेल. तरच हे शिवधनुष्य पेलणे शक्य होईल.

      January 10, 2011


  • सुधीर फडके – ललित गायनातील प्रतिष्ठित घराणे

    शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, प्रचंड मेहनत हीच सुधार फडक्यांची प्राथमिक अशी ओळख करून घेता येईल. सुरवातीलाच पंडित वामनराव पाध्यांकडे शिस्तशीर शिक्षण तसेच त्याकाळातील कोल्हापूरमधील वास्तव्य असल्याने अनेक शास्त्रीय संगीतकारांच्या प्रभाव.

      August 23, 2018


  • बाळक्रीडा अभंग क्र.१०

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 21, 2018


  • चहाची मात्रा

    किती कप चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे ?

    अनेकांच्या दिवसाची सुरवात कपभर चहाने होते. आरोग्यासाठी प्रमाणात चहा पिणे फायदेशीर आहे. त्यामुळे आरोग्य सुधारायला मदत होते. त्यामध्ये गवती चहा, चक्रफूल असे मसाल्याचे पदार्थ मिसळून आस्वाद आणि आरोग्यदायी फायदेदेखील वाढवता येतात. पण केवळ दिवसातील दोन कप चहाने शरीराला आवश्यक फायदे होतात का ? तसेच दिवसातून नेमका किती कप चहा पिणे योग्य आहे अशा सार्याफ प्रश्नांना आहारतज्ञ प्रिया काथपाल यांनी दिलेली उत्तरं नक्की पहा. वजन घटवण्यासाठी किती आणि कसा प्याल ‘ग्रीन टी’ हे देखील अवश्य जाणून घ्या.

    दिवसाला 3-4 कप चहा पिणेच आरोग्यदायी आहे. युनिव्हरसिटी ऑफ मेरीलॅंड मेडीकल सेंटरच्या जर्नलमधील अहवालानुसार 4 कप चहातून शरीराला आवश्यक कम्पाऊंड्स मिळतात. मात्र त्याहून अधिक चहा पिणे शरीराला त्रासदायक ठरू शकतो.

    कॅफीनच्या सेवनाचा तुम्हांला त्रास होत असल्यास छातीत जळ्जळ होणे, मन अस्वस्थ्य होणे, चिडचिड होणे, हृद्याचे ठोके वाढणे, निद्रानाश होणे, सतत गोंधळ होण्याची शक्यता वाढते.

    चहाच्या अतिसेवनामुळे डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

    चहा अतिप्रमाणात प्यायल्यास युरीनमधून कॅल्शियम निघून गेल्याने हाडं ठिसूळ होतात.

    चहातील टॅनिनिस घटक फॉलिक अॅ्सिड शोषून घेण्याची क्षमता कमी करतात. यामुळे बर्थ डिफेक्ट्स होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे बाळाचा विचार करत असाल तर चहाने सेवन नियंत्रणात ठेवा.

    चहामुळे शरीरात आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील कमी होते. त्यामुळे जेवताना चहा पिणे किंवा जेवणानंतर लगेचच चहा पिणे टाळा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 2, 2017


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३

    भगवान वैकुंठनाथांच्या हातातील शंख आणि चक्राचे वर्णन केल्यानंतर त्यांच्या आणखी एका दिव्य अस्त्राची वंदना करताना आचार्य श्री भगवान श्रीविष्णूंच्या शार्ङ् नामक धनुष्याचे वर्णन करीत आहेत.

      December 6, 2020


  • रताळी

    रताळे हे कंदमूळ आहे. रताळी हे एक उपवासाचे पदार्थ. तसेच रताळे हे प्रत्येक माणसाला आवडतेच. लहान मुलांना भूक लागली तर आई लागलीच दूध व साखर घालून मुलाला देतात. रताळे हे प्रत्येकासाठी अत्यंत पौष्टिक अन्न आहे. बटाट्याप्रमाणेच रतळ्याचेही उपयोग आहेत. भरपूर जीवनसत्त्वे त्याचप्रमाणे भरपूर खनिजे तसेच भरपूर प्रथिने यात आहेत. रताळ्याचा उगम कसा व कुठून झाला हे अज्ञात आहे. मात्र रताळ्यात अमेरिकेमध्ये तयार होते तसेच आफ्रिका व काही ठिकाणी दक्षिण आशियातही मिळते. मात्र फार पूर्वीपासून रताळा हे भारताला परिचित आहे. तसे बघितले तर फूड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन (एफ.ए.ओ.) यांनी सर्व जगात संवर्धन केल्याप्रमाणे संबंध जगात रताळ्याचे उत्पादन जास्त असते. चीनमध्ये जगात दुसऱ्या नंबरवर रताळ्याचे उत्पादन होते.. अगदी नवीन अमेरिकन शेतकरी डॉ. मॅथ्यू मॉरिसन याने रताळ्याचे अनेक पृथ्थकरण करून त्यातील उपयोगाकरिता पुढे आणली. रताळे ही कोणीही कुठून आणले तरी अत्यंत पौष्टीक असे जाहीर केले. याचे कारण म्हणजे रताळे कोठेही कोणत्याही हवामानात वापरता येते. आश्चर्य म्हणजे रताळी अनेक देशात निर्यातही करतात, हे विशेष.

    आता रताळी सर्वत्र उपलब्ध असल्याकारणाने रताळ्याचे अनेक प्रकार करण्यात येतात. अगदी बटाटे उकडून बटाट्याची भाजीदेखील उपवासाला चालते म्हणजे ते एक पूरक अन्न चालू शकते. रताळ्याची कापा बटाट्यासारखी तेलात अगर तुपात तळून चांगल्या लागतात. रताळे किसणीने किसून त्याची पॅटीस अथवा अनेक प्रकार उपयोग करता येतो. तसेच लहान मुलांचे अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखत असल्यास रताळ्याचा उपयोग अवश्य करता येतो. थोडक्यात रताळे हे एक चविष्ठ आणि निरनिराळ्यात प्रकारात केलेली अपूर्व देणगीच म्हणावे लागेल.

    रताळ्यात सगळे आढळते. त्यात जेजे आहे ते ते सर्वत्र मिळते.

    १०० ग्रॅम रताळ्याचा गुणधर्म खालीलप्रमाणे आहे.

    – मदन देशपांडे

      December 4, 2023