(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कसबा संगमेश्वर

    रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते.

      February 28, 2023


  • ज्येष्ठ स्त्रियांकरिता आहार

    वयाची साठी ओलांडली की शरीराच्या क्रिया मंदावतात. शारीरिक क्रिया मंदावल्यामुळे शरीराला आहाराची कमी गरज भासते. अशा वेळी आवश्यतक तेवढाच पण संतुलित आहार घ्यायला हवा- जेणेकरून शरीराचं पोषण तर होईलच, पण शरीराला जडत्व मात्र येणार नाही. कसा असावा हा आहार? त्यांच्या वेळा कशा असाव्यात? ज्येष्ठांकरता असणाऱ्या आहाराचे विविध पैलू. .......

    एकदा का रजोनिवृत्तीचा काळ व्यवस्थितपणे पार पडला, की साठीची चाहूल लागते. जीवनाच्या निवृत्तीकडे वाटचाल सुरू होते.

    वृद्धत्व ही नैसर्गिक क्रिया आहे. शरीराची वाढ व वयात येणे होईपर्यंत शरीरातील जडणघडणीच्या क्रिया अधिक, तर पुढे विघटनाच्या क्रिया पेशींमध्ये अधिक होतात. म्हणून वृद्धत्व येते. साठीनंतर शरीरातील आवश्यसक पेशींचा ऱ्हास होत असतो. शरीरक्रमांमध्ये बदल घडून येत असतात. वयोपरत्वे ऐकणे, दृष्टी, चव, स्पर्श, वास वगैरे संवेदना कमी होऊ लागतात. शरीरात फिजिऑलॉजिकल पॅथॉलॉजिकल, मानसिक बदल होत असतात. याची कारणेही अनेक आहेत. शारीरिक हालचालींची कमतरता, भूक मंदावणे, आपली कोणाला गरज नाही याची सतत बोचणी असणे, एकटेपणाची भावना सतावणे, वगैरे! शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे बेसल मेटॅबोलिक रेट कमी होतो- ज्याकरिता आहाराचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे ठरते. तरीही तो संतुलित मात्र हवाच.

    आहारात सकाळचा नाश्तार घेणे अत्यंत आवश्याक असते. तो सकाळी ८ ते ९ पर्यंतच घ्यायला हवा. त्यात आपले जुने पारंपरिक पदार्थ हवेत. दुपारचे जेवण एक वाजता. त्यात चौरस आहार- ज्यात वरण, भात, भाजी, पोळी, दही, कोशिंबीर, फळ असावे. संध्याकाळी ५ ते ६ मध्ये हलका कोरडा नाश्ता्- ज्यात चिवडा, लाह्या, सत्तू, गोपाळकाला, रताळी असे पदार्थ चांगले. रात्रीचे जेवण ८ ते ९ दरम्यान व दुपारसारखेच! रात्री दही व फळ खाऊ नये. झोपताना दूध, हळद, अंजीर घ्यावे.

    अन्न घटकांची गरज

    कॅलरीज - हे नेहमी श्रमांच्या तुलनेत असतात. साठीमध्ये चयापचयाची गती कमी होते. म्हणून पूर्वीपेक्षा निदान ३०० कॅलरीज तरी कमी घ्याव्यात. शीतपेये, ब्रेड, बिस्किटे, साखर, पेस्ट्री वगैरे टाळावे.

    प्रोटिन्स - मानसिक ताणतणाव, इन्फेक्श्न, जुने रोग वगैरे असल्यास जरा अधिक, पण सहज पचणारे प्रोटिन्स घ्यावेत. भरपूर दूध, दही, ताक घ्यावे. डाळींमध्ये मुगाची डाळ पचायला सोपी. इतर कडधान्ये मोड आणून घेतल्यास चांगले.

    कार्बोहायड्रेट्‌स - शरीरात इन्शुलिनच्या होणाऱ्या कमतरतेमुळे रक्तशर्करा कमी-अधिक होण्याचे प्रमाण वाढते म्हणून व कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड्‌स रक्तातील वाढलेले असल्यासही आहारात साखर नसावी. त्याऐवजी संपृक्त कर्बोदके म्हणजे धान्ये, फळे, डाळी, दूध यांचे सेवन असावे. यातूनच चोथाही मिळतो. दातांचा त्रास असल्यामुळे पॉलिश तांदळाचे, ब्रेड-बिस्किटांचे अधिक आणि भाकरीचे कमी सेवन होते. यामुळे "ब' जीवनसत्त्वे मिळत नाहीत; पण आहारात ज्वारी, बाजरी, गहू, सोजी, हातकुटाईचे तांदूळ, कंदमुळे, फळे हवीत. जिभेवर ठेवल्यावर विरघळणारे पदार्थ टाळावे.

    स्निग्ध पदार्थ - रिफाइंड तेल, वनस्पती तूप, लोणी, साय, चीज, मिठाई, तळलेले पदार्थ, पुऱ्या, पराठे कमी होणे अत्यंत आवश्य क असते. दिवसभरात ३ चमचे घाणीचे ताजे तेल आणि दीड चमचा तूप आहारातून मिळावे. वनस्पतींपासून निघणाऱ्या तेलात कोलेस्टेरॉल नसते. ते पशूंच्या स्निग्धात, वनस्पती तुपात असते. कोरोनरी हार्ट डिसीजने येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मेनोपॉजनंतर अधिक आहे. म्हणून वनस्पती तूपही टाळावे. मांसाहार घेऊ नये.

    चोथा - साठीनंतर शरीराचे श्रम, हालचाली कमी होतात. म्हणून आतड्यांची कार्यक्षमताही कमी होते. आतड्यांतील स्नायूंचे आकुंचन-प्रसरण या क्रिया मंदावतात. अन्न पचणे कठीण होते. बद्धकोष्ठता सरसकट अनेकांमध्ये आढळून येते. याकरता गव्हाचा दलिया, पालेभाज्या, शेंगभाज्या, ज्वारी, बाजरी, फळे, ओवा, मेथीदाणा, नाचणी, हळीव, कारळी, कुळीथ, जवस यासारख्या गोष्टी रोजच्या आहारात असाव्यात.

    कॅल्शिअम -. रोज १/२ ते ३/४ लिटर दूध हे दही-ताकाच्या रूपात घ्यायलाच हवे. कॅल्शियमवर प्रोटिन्स जीवनसत्त्व "क'चे शोषणही अवलंबून असते. अन्नाचे पचन सुलभ होते. याशिवाय नाचणी, खसखस, हळीव, सोयाबीन, खजूर, पालेभाज्या रोज खाव्यात. भात शिजवताना त्यात चिमूटभर मऊ असा खायचा चुना घालावा.

    लोह - रक्तकण, हिमोग्लोबिन तयार होण्याकरिता या खनिजाची आवश्याकता असते. लोह सर्व पालेभाज्या, खजूर, बाजरी, नाचणी , मनुका, अंजीर, हळीव यात भरपूर असते. भाज्या, सलादवर लिंबू पिळूनच खावे.

    जीवनसत्त्वे - अ, ई, क, बीटा कॅरोटिन यांना अँटीऑक्सिाडंट्‌स म्हणतात. ते पेशींचा ऱ्हास होणाऱ्या रोगांपासून आपला बचाव करतात. दूध, दही, तेलबिया, गव्हांकुर, गव्हाच्या रोपांच्या रसातून, लाल भोपळा, गाजर, पपई, रताळं, तीळ, खसखस, खरबूज, टरबूज बियांतून मिळतात. जीवनसत्त्व "ड' हाडांच्या मजबुतीकरता, नितळ निरोगी त्वचेकरता आवश्यळक. ते दूध, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळतं. वृद्धांना हिंडणं-फिरणं कठीण होतं. तरी शक्यूतोवर सकाळच्या वेळी बाहेर येणं आवश्याक.

    झिंक - वृद्धांमध्ये या खनिजाची कमतरता होते, म्हणूनही रोगप्रतिकार शक्ती कमी होते. म्हणून धान्ये, डाळी वगैरे सालासकट खावे.

    बहुतेक ज्येष्ठांना उच्च रक्तदाबाच्या तक्रारी असतात. म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असणे आवश्यकक असते. हृद्रोकगातही ते कमीच हवे. जोडीला मॅग्नेशियम, पोटॅशियम हे क्षार वाढवायची गरज असते. त्याकरता हिरव्या भाज्या, पुदिना, कोथिंबीर, फळे, सुका मेवा या गोष्टी रोज खाव्यात.

    हिरड्यातून रक्त येणे, झालेल्या जखमा चिघळणे, हेही वृद्धांमध्ये आढळते. म्हणून नैसर्गिक स्वरूपात "क' जीवनसत्त्व घेणे फायदेशीर ठरते. मोतीबिंदू तयार होणे, पिकणे या गोष्टी "क' जीवनसत्त्वाने लांबविता येतात. म्हणून आवळा, लिंबू, फळे, सलाद भरपूर खावे. तसेच फोलिक ऍसिड, जीवनसत्त्व ब ६ याचीही कमतरता दिसते. रक्तातील होमोसिस्टीनचे वाढलेले प्रमाण, या जीवनसत्त्वांची कमतरता तर हृद्रोागाची नांदी दर्शविते. सहसा हातापायांना मुंग्या येणे, चक्कर येणे वगैरे गोष्टी जीवनसत्त्व ब १२ ची कमी दाखवतात. याकरता रोज भरपूर भाज्या, फळे, ताक व अंकुरित कडधान्ये व यीस्टच्या गोळ्याही घ्याव्यात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- जयश्री पेंढरकर
    आहारतज्ज्ञ

      September 28, 2016


  • भ्रष्टाचाराला ‘टाटा’ नाही !

    सध्याच्या उदारिकरणाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्याला विमान कंपनी उभी करण्यासाठी ठरावीक मंत्र्याला लाच देण्याचा सल्ला मिळाल्याचे सांगितले. उद्योगपती राहुल बजाज यांनी तर अशी लाच सर्रास दिली जाते असे सांगून आणखी एक गौप्यस्फोट केला. एकंदरित, भ्रष्टाचाराला ‘टाटा’ करण्याची कोणाचीच मानसिकता दिसत नाही.

      November 24, 2010


  • भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम

    अणुइंधन म्हणून वापरता येणाऱ्या मूलद्रव्यांपैकी युरेनिअमचे आपल्याकडील साठे मर्यादित तर आहेतच, पण ते कमी प्रतीच्या खनिजाच्या स्वरूपातलेही आहेत. थोरिअम या अणुइंधनाच्या बाबतीत मात्र आपण श्रीमंत असून, थोरिअमच्या वैपुल्यानुसार भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

      July 27, 2023


  • नवरत्नमालिका – ५

    कुण्डलत्रिविधकोणमण्डलविहारषड्दलसमुल्लस-
    त्पुण्डरीकमुखभेदिनीं च प्रचण्डभानुभासमुज्ज्वलाम् ।
    मण्डलेन्दुपरिवाहितामृततरङ्गिणीमरुणरूपिणीं
    मण्डलान्तमणिदीपिकां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ५॥

    आई जगदंबेच्या परमप्रकाशित, दिव्य रूपाचे वर्णन करतांना पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

    कुण्डलत्रिविधकोणमण्डलविहार- आई जगदंबेच्या कोणत्याही यंत्राच्या मध्यभागी असणाऱ्या त्रिकोण मंडल अर्थात स्थानामध्ये , कुंडल अर्थात आपल्याच आनंदामध्ये विहार करणारी,
    षड्दलसमुल्लसत्पुण्डरीकमुखभेदिनीं - षट्दल म्हणजे सहा पाकळ्यांचे, समुल्लसद्- प्रफुल्लित, पूर्णपणे उमललेल्या, पुंडरीक अर्थात कमळ.
    सहा पाकळ्यांच्या कमळाचे हे वर्णन स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित आहे. हे चक्र नवनिर्मितीशी संबंधित आहे.
    त्याचे मुखभेदन करणारी अर्थात कुंडलिनी स्वरूपात प्रवास करताना या चक्रातून वर जाणारी.
    प्रचण्डभानुभासमुज्ज्वलाम् - सूर्याच्या तेजा प्रमाणे अत्यंत देदीप्यमान असणारी.
    मण्डलेन्दुपरिवाहितामृततरङ्गिणी- चंद्र मंडलामध्ये प्रवाहित असणाऱ्या अमृत तरंगांप्रमाणे आल्हाददायक असणाऱ्या,
    अरुणरूपिणीं- अरुणा प्रमाणे लालबुंद अर्थात अत्यंत आकर्षक असणाऱ्या,
    मण्डलान्तमणिदीपिकां- सर्व निवासस्थानांचे अंतिम स्थान असणाऱ्या आपल्या मणिद्वीप नावाच्या लोकाला प्रकाशित करणाऱ्या,

    आई जगदंबेच्या निवासस्थानाला मणिद्वीप असे म्हणतात. जसा विष्णूंचा वैकुंठ, शंकरांचा कैलास तसा आई जगदंबेचा लोक आहे मणिद्वीप. शक्तीच्या उपासकांसाठी तोच अंतीम लोक आहे. परम गंतव्यस्थान आहे.

    मनसि भावयामि परदेवताम् - परमदेवता आई जगदंबेचे मी मनाने ध्यान करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 19, 2020


  • मरतुकडी गाय

    नुकतीच एक चिनी लोककथा माझ्या वाचण्यात आली.

    चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसकट प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या झोपडीजवळ गेले. तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली. ‘तुमचे कसे भागते?’ गुरुंनी त्या चिनी माणसाला विचारले. त्याने त्या मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला, ‘ही गाय रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो. उरलेल्या दूधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातुन इतर गरजेच्या वस्तु आणतो. आमचे कसेतरी भागते.’

    गुरु टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, ‘ताबडतोब ती मरतुकडी गाय मारून टाका!’ गुरुंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले. ज्या गाईवर त्या माणसाचे जिवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजी रोटी मिळते आहे ती गाय मारून टाकायची? शिष्यांना वाटले आपले गुरु किती निर्दय व निष्ठूर आहेत. कोणी शिष्य गाय मारायला तयार होईना. शेवटी हे काम गुरुंनी स्वतःच करायचे ठरवले. ‘बोला माझ्याबरोबर कोण येणार आहे?’ त्यांनी शिष्यांना विचारले. कसाबसा एक शिष्य तयार झाला. त्या रात्री गुरु त्या शिष्याला टेकडीवर घेऊन गेले, त्या मरतुकड्या गाईला टेकडीवरून खाली ढकलले व गाय मेल्याची खात्री करून घेऊन परत आले व आपल्या शिष्यांबरोबर पुढच्या प्रवासाला लागले.

    त्यांच्या बरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार ‘गिल्टी फिलिंग’ येऊ लागले. गुरुंनी जे केले ते पाप होते व त्या पापामध्ये आपण पण भागीदार होतो असे वाटून त्याच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली. काही वर्षे त्याने ही भावना दाबून ठेवली पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला. त्या कुटुंबाचे काय झाले हे पहाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. गुरुला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला.

    तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झाला होता. झोपडीच्या जागी एक आधूनीक, टोलेजंग बंगला उभा होता. बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनीक मोटारी उभ्या होत्या. बंगल्याभोवती सुरेख बगीचा केला होता. सगळीकडे हिरवळ होती व काही शेते पण दिसत होती. शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो. त्यांने तिथल्या एका माणसाला विचारले, ‘मा॑फ करा! मी कांही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता. वरती टेकडीवर एक झोपडी होती. आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात?’

    ‘तुमचे म्हणणे बरोबर आहे!’ त्या माणसाने उत्तर दिले. ‘त्या झोपडीतील माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात रहातात. हा त्यांचा बंगला आहे. आज त्यांच्याकडे फंक्शन आहे.’

    आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला. त्याने पाहीले की तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोफ्यावर बसले आहेत व त्याची तीन तरूण मुले उत्साहाने सगळ्यांचे स्वागत करत आहेत. तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वी मी माझ्या गुरुंबरोबर येथे आलो होतो. त्यावेळी तुम्ही एका मोडक्या, जिर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर रहात होतात. तुमच्याकडे एक हडकूळी गाय पण होती.’

    ‘अगदी बरोबर आहे.’ तो चिनी माणूस उत्तरला ‘एका रात्री आमची गाय टेकडीवरून खाली पडली व मेली. आमचा तर आधारच हरपला. जगायचे कसे हा प्रश्न उभा राहीला. कारण तोपर्यंत आम्हाला गायीच्या दुधावरच जगायची सवय होती. जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. हळू हळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की आमच्याकडे अनेक कौशल्ये आहेत जी आम्हाला ठाऊक नव्हती. आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरवात केली, उद्योग व्यवसायात पदार्पण केले. हे तीन तरूण ही माझी मुले आहेत. तुम्ही याचे परिणाम बघताच आहात. जर आमची गाय मेली नसती तर हे घडले नसते!’

    आता त्या शिष्याला कळले की गुरु गाय मारयला का सांगत होते. त्याला आपल्या गुरुंच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले व गुरुविषयींचा आदर कित्येक पटीने वाढला.

    अनेक मराठी माणसांच्या आयुष्यात अशीच एक गाय असते ज्याला ‘नोकरी’ असे म्हणतात. मराठी माणसांची नजर या अशा गायीवरच असते. या गाइचे जे दूध मिळते (म्हणजे पगार मिळतो) त्यावर भागवण्याची सवय लागते. कोणाच्या नशीबात धष्टपुष्ट गाय येते तर कांहीना किरकोळ गाय मिळते तर काहींच्या नशीबात अशी गायच नसते.

    मराठी माणसाचे सगळे कर्तृत्व त्याच्या नोकरीवर व नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ज्याला उत्तम नोकरी मिळते तो जास्त कर्तृत्ववान, ज्याला बरी नोकरी मिळते तो कमी कर्तृत्ववान व ज्याला नेकरीच मिळत नाही त्याला ‘कंडेम’ समजण्यात येते. मराठी माणसाची प्रगती ही त्याच्या नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ‘माझा नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला’ हे एखाद्या गृहीनीचे वाक्य मोठ्या कौतुकाने सांगीतले जाते व ऐकले जाते. जणू काही नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला म्हणजे त्याने फार मोठा पराक्रम केला असा थाट या वाक्याभोवती असतो. पण किती झाले तरी ‘नोकरी’ ही एक मरतुकडी गायच असते, कारण ही गाय पुरेसे दूध कधीच देत नसते.

    अशीच अजुन एक गाय असते ज्याला ‘जर्सी’ गाय म्हणतात. ही गाय भरपूर दूध देत असते पण ही गाय नेकरीवाल्यांच्या नशीबी नसते तर फक्त ‘उद्योग, धंदा, व्यवसाय’ करणार्याह माणसांच्या नशीबी असते. पण मराठी समाजात या गाईला कोणी फारसे महत्व देत नसते. ‘माझ्या नवर्या चा धंदा एका लाखाचा एक कोटी रुपये झाला.’ हे एखाद्या गृहीणीचे वाक्य फारशा कौतुकाने बोलले पण जात नाही व ऐकले पण जात नाही. ‘माझे वडील बँकेत मॅनेजर आहेत.’ हे वाक्य ज्या अभीमानाने मुलाकडून सांगीतले जाते त्याच अभीमानाने ‘माझ्या वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे’ हे वाक्य सांगीतले जात नाही. लग्न करणार्याा मराठी मुलींना तर फक्त नोकरी करणारीच मुले हवी असतात. मामलेदार कचेरीत शिपायाची किंवा पट्टेवाल्याची नोकरी करणार्या मुलाला हुंड्यासकट मुलगी मिळते. पण वर्षाला 50 लाख रुपये इन्कम असलेल्या पण धंदा करणार्याा मराठी मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते.
    नुकचीच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप’ साठी अनेक योजना जाहीर करून उद्योग व्यवसायाच्या संधीचे भले मोठे दार उघडून दिले आहे. याचा अर्थ अनेकांना ‘जर्सी गाई’ मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पण मराठी माणूस याचा किती फायदा करून घेणार आहे हा कळीचा मुद्दा आहे.

    ‘नोकरी’ च्या मरतुकड्या गाईवर जगायचे का उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात शिरून भरपूर दूध देणारी जर्सी गाय मिळवायची हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही कां?

    तुम्हाला काय वाटते?

    -- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631

      February 23, 2016


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग आठ

    अन्नाला ओलेपणा क्लिन्नपणा येण्यासाठी महत्त्वाचे काम करते ती लाळ. डोळ्यात ज्याप्रमाणे पाणी स्रवत असते, तशी लाळ तोंडात स्रवत असते. लाळेच्या बुळबुळीतपणामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते, आतड्यांना अन्न घासले जात नाही.म्हणून हा ओलेपणा एक प्रकारे वंगणाचे काम करत असतो.

    लाळेमधे टायलीन नावाचे हे एक प्रकारचे विकर म्हणजे एन्झाइम आहे. पचनाला मदत करणारी अन्य घटकद्रव्ये यात सामावलेली असतात. जेवढी लाळ जास्ती तेवढे पचन सुलभ. त्यामुळे प्रत्येक घास जेवढा अधिक वेळ चावला जाईल, तेवढीच जास्त लाळ तयार होते.

    शाळेत चौथीमधे असताना एक प्रयोग केलेला आठवतोय, भाकरीचा तुकडा जेवढा चघळला जाईल, जेवढी लाळ मिसळली जाईल, तेवढी भाकरी गोड होत जाते. पिष्टमय पदार्थांचे पचन करण्यासाठी लाळ मदत करते, असे अनुमान प्रयोगवहीत लिहिलेले होते.

    आज व्यवहारात मधुमेहाच्या अपथ्यामधे पिष्टमय पदार्थ सांगितले जातात. पिष्टमय पदार्थ पचले नाहीत तर मधुमेहासारखे आजार बळावतात, म्हणून मधुमेहामधे आपली लाळ हे आपले औषध ठरू शकते. घाईघाईने खाल्ल्यामुळे लाळ अन्नामधे चांगली मिसळली जात नाही. आणि पचन बिघडते.

    लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींची तोंडे नीट उघडी असतील तर लाळेचे स्रवण चांगले होते. गव्हापासून बनलेल्या मैद्याच्या लगद्याने लाळेची काही छिद्रे बंद होतात. याकरीता मैद्यापासून बनलेले पदार्थ रोज रोज खाणे बंद करायला हवेत.

    लाळ सुटण्यासाठी आंबट तिखट हे पदार्थ मदत करतात. चिंच म्हटली तरी तोंडात चिंच झरकन पाझरते. आवडीचे पदार्थ असतील तर तोंडाला पाणी सुटते. नारळाचा तुकडा, चार शेंगदाणे, दोन चिमूट बडिशेप, लवंग, वेलची, मसालापान यापैकी काहीही जेवणानंतर चघळल्यामुळे लाळ तयार होते आणि पचन सुधारते.
    तंबाखू, गुटका, मावा सारखे सतत काहीतरी चघळत राहाणे चुकीचे. हे लक्षात ठेवावे.
    नाहीतर आपण सोयीस्कर अर्थ काढण्यात पटाईत !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    23.03.2017

      March 23, 2017


  • यदृच्छता (Randomness)

    आज Randomness ही संकल्पना जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वापरावी लागते आहे. संगणकाच्या मदतीने हे सोपे झाले आहे. आपल्याला याची अनेक उदाहरणं सापडतील. एखादी व्यक्ती अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडण्याची शक्यता फार कमी असते. तरी यंदा बिहार व उत्तर प्रदेशात वीज पडल्यामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. तशीच आणखी एक आश्चर्यकारक घटना आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया पार्कमध्ये काम करणारा रेंजर, रॉय सलिव्हन याच्या अंगावर 1942 ते 1977 या काळात वेगवेगळ्या प्रसंगी सात वेळा वीज पडली. तो प्रत्येक वेळेस वाचला व पुढे 71 व्या वर्षापर्यंत जगला. अशा असतात यदृच्छतेच्या करामती.

      July 23, 2020


  • डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ५

    १८९५ ते १८९९ यादरम्यान रॉस व मॅन्सन यांच्यामधील १७३ पत्रांच्या माध्यमातून झालेला संवाद मलेरियावरील संशोधनाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. हजारो मैल एकमेकांपासून दूर असलेल्या या दोन संशोधकात पत्रांमधून संशोधनासंबंधीची अनुमाने, त्यावरील टिपणे, डासांची हाताने काढलेली चित्रे व रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतलेल्या काचपट्ट्या या सर्वांची देवाण-घेवाण होत असे. त्या काळात हे सर्व बाड पोहोचण्यास कमीत कमी चार आठवडे लागत, यावरून दोघांच्या चिकाटीची व जिद्दीची कल्पना येते. रॉस व मॅन्सन यांच्यामधील हा सर्व पत्रव्यवहार लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (London School of Hygine and Tropical Medicine) येथे व्यवस्थित जतन केलेला आहे. इकडे भारतात रॉसच्या मागील सरकारी शुक्लकाष्ट संपत नव्हते. हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये तो संशोधनात बुडून गेलेला असताना उच्च अधिकाऱ्याने त्याची बदली बंगलोर येथे कॉलऱ्याची साथ आटोक्यात आणण्यासाठी केली. कामाचा बोजा इतका होऊ लागला की रॉसला मलेरियावरील संशोधनास वेळ मिळेनासा झाला. रात्री कामावरून आल्यावर त्याच्या डोक्यात डासांबद्दलचे विचार थैमान घालीत. मात्र आता त्याच्या विचारांची दिशा मॅन्सनवर अवलंबून नव्हती. तोपर्यंत रॉसची अशी ठाम खात्री झाली होती की माणसाला चावताना डास त्याच्या शरीरातून काहीतरी द्रवपदार्थ त्या माणसाच्या शरीरात सोडतो ज्या द्रवामधून मलेरियाचे परोपजीवी माणसाच्या रक्तात पसरतात.

    १८९७ मध्ये उटकमंडलम् जवळील सिंगून गावातील तापाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी रॉस त्या रोजच्या कामगिरीवर रुजू झाला. परंतु त्यालाच मलेरियाने बेजार केले. खिडक्या बंद करून व मच्छरदाणीत झोपूनही डासांनी त्याला गाठल्याने तो अशा उद्विग्न मनस्थितीत पलंगावर पहुडला असताना, भिंतीवर ऐेटबाज पद्धतीने बसलेल्या एका गडद पिंगट रंगाच्या डासाने रॉसचे लक्ष वेधून घेतले. डासांच्या वेगवेगळ्या गटांचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे रॉसच्या मनाने उचलून धरले.

    सिकंदराबाद येथे जून १८९७ मध्ये त्याची बदली झाली. अजूनही रॉसपुढील अडचणी संपता संपत नव्हत्या. कामावर हजर होताच रॉसला स्वतःलाच कॉलर्‍याने गाठले. प्रचंड शक्तिपात झाल्याने कामात लक्ष लागेना. शेवटी एकेका उकळत्या चहाच्या कपाने का होईना, परंतु त्याची तब्येत सुधारू लागली. खंबीर मनाने रॉसने विविध जातीच्या डासांचा शास्त्रोक्त अभ्यास सुरू केला. आता आपल्या प्रयोगात वेगवेगळ्या गटांचे डास वापरताना असे लक्षात आले कि फक्त एकाच गटाच्या डासांमध्ये मलेरियाचे परोपजीवी दिसतात, तेव्हा आत्तापर्यंत आपण कोणत्याही गटाचे डास प्रयोगात वापरीत होतो, ती आपली फार मोठी चूक होती. त्या कारणामुळे रॉसच्या पदरी अपयश येत होते. मादी ऍनॉफेलीस हिच मलेरिया पसरविण्यात जबाबदार आहे या निरीक्षणाचा हळूहळू उलगडा होऊ लागला.

      March 19, 2019


  • देशाटन ते पर्यटन; माझ्या नजरेतून

    एकूणात गांव किंवा तिर्थयात्रा या पलिकडे त्या काळात देशाटन नव्हतं..परदेश तर खुप दुरची गोष्ट होती, आपला प्रान्त, आपला देश बघावा असंही काही फार जणांना वाटत नव्हतं. मुळात त्यावेळच्या बहुतेकांचं जग सिमित होतं. उत्पन्न मर्यादीत. एक जण कमावणार आणि दहा जण खाणार. महत्वाकांक्षाही सिमित, म्हणजे देन वेळचं जेवण, सणासुदीला एखादं लुगडं-कापड आणि मुलांची व गांवावरुन शिकण्यासाठी आलेल्यांचं शिक्षण, एवढीच.

      July 18, 2018