(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डीएनए आणि अमिनो आम्ल

    डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी. डीएनए हा पेशीतील अतिशय महत्त्वाचा आणि अति कार्यरत असा बहुआयामी रेणू आहे. पेशीतील प्रथिनांच्या बांधणीत याचा मोठा सहभाग असतो.

      October 21, 2023


  • सॅल्युट

    आजही मरीन इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) म्हणजेच आमच्या मेरी मुंबई येथील प्री सी ट्रेनिंगचा पहिला दिवस आठवतोय. पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चर मध्ये भारतीय नौदलातील रिटायर्ड झालेले एक अधिकारी इंस्ट्रक्टर म्हणून आमच्या वर्गावर आले होते. त्यांनी मग सगळ्यांना विचारले की तुम्हाला माहिती आहे का आर्मी, एअरफोर्स आणि नौसेना या तिन्ही दलांमध्ये सॅल्युट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.

      October 17, 2019


  • बँक ऑफ महाराष्ट्रचा स्थापना दिन

    मराठी लोकांची आणि या लोकांच्या घराघरात पोचलेली एक राष्ट्रीयीकृत बॅंक म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रची एक वेगळी ओळख आहे. तिचे मुख्यालयही पुण्यासारख्या शहरात दिमाखदारपणे उभे आहे.

      September 16, 2021


  • हरवलेल्या पत्त्यांचा बंगला

    हे एक “झोपमोड ” करणारे नाटक आहे (संदर्भ -लोकसत्ता परीक्षणातील शब्दप्रयोग ) म्हणून २६ जानेवारीचा दुपारचा प्रयोग झोपमोड करून आम्ही बालगंधर्वला पाहिला. अल्पावधीतला रौप्यमहोत्सवी प्रयोग त्यामुळे सनई -चौघडे , उत्सवी धावपळ , चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक), मोहन आगाशे वगैरे दिसले. आमच्या यादीत हे नाटक होतेच , पण अचानक २५ ता. ला रात्री ” गुलजार -बात पश्मीनेकी ” हा कार्यक्रम रांग मोडून दांडगाईने पुढे घुसला.

      February 6, 2022


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १८

    भवान्यै भवायापि मात्रे च पित्रे
    मृडान्यै मृडायाप्यघघ्न्यै मखघ्ने |
    शिवांग्यै शिवांगाय कुर्मः शिवायै
    शिवायांबिकायै नमस्त्र्यंबकाय ‖ १८ ‖

    शिवशक्ती हे अभिन्न ऐक्य. अर्धनारीनटेश्वर स्वरूपात त्यांचे एकरूपत्व वंदिले जाते. भवं भवानीसहितं नमामि ! अशा स्वरूपात आपण या युगुलाला वंदन करतो. प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री देखील असे युग्मवंदन करीत आहेत.
    हे वंदन करीत असताना देखील आचार्यश्री दोघांच्याही बाबतीत समान स्वरूपाची विशेषणे वापरत आहेत. जणूकाही त्यातूनही ते या दोघांच्या एकरूपत्वाचेच निर्देशन करीत आहेत.
    भवान्यै भवायापि - आई भवानीला आणि भव असणाऱ्या आपणाला,
    मात्रे च पित्रे - मातेला आणि पितृ स्वरूप आपल्याला,
    मृडान्यै मृडायापि- मृडाणीला आणि मृड असणाऱ्या आपणास, भगवान शंकरांना मृडअसे म्हणतात. या संस्कृत धातूचा अर्थ संतुष्ट करणे असा आहे. संपूर्ण विश्वाला संतुष्ट करणारी भगवान शंकर मृड तर देवी पार्वती मृडाणी रूपात वंदिली जाते.
    अघघ्न्यै मखघ्ने - अघ म्हणजे पापाचा, कलंकाचा विनाश करणाऱ्या आईला आणि मख म्हणजे यज्ञाचा विनाश करणार्‍या आपल्याला, भगवान शंकरांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विनाश केला होता. त्या पौराणिक कथेचा येथे संदर्भ आहे.
    ते दक्षयज्ञाचा विनाश करणारे आहेत असे वर्णन केल्यामुळे समानता दाखवण्यासाठी आई जगदंबेच्या पाप विनाशक रूपाला आचार्य वंदन करतात.
    शिवांग्यै शिवांगाय- जिचे अंग,शरीर म्हणजे मूर्ती अतीव शिव म्हणजे पवित्र आहे अशा शिवांगी आणि शिवांग अशा आपल्याला,
    शिवायै
    शिवाय- शिव म्हणजे मंगल,पवित्र असणाऱ्या,
    अंबिकायै त्र्यंबकाय - अंबिका जगज्जननी ला आणि त्र्यंबक अशा आपणाला हात,
    नमस्कुर्म:- आम्ही वंदन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 27, 2020


  • कतक/केवडा

    कतक/केवडा

    ।। विनायकाय नम: केतकीपत्रं समर्पयामि।।

    केवड्याचे बन हे जंगलात पाण्याच्या जवळपास आढळतात.ह्याचा वास सापांना आवडतो अशी मान्यता आहे.ह्याचे ३-४ मीटर उंचीचे गुल्माकृती बेट असते.काण्ड वाकडे अनेक शाखा प्रशाखायुक्त असते.त्यापासून निघणारे अंकुर वडा प्रमाणे जमिनीत घुसतात.

    पाने १-२ सेंमी लांब,सरळ वाढतात व टोकाकडे खाली झुकलेले स्निग्ध असतात.कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळे सुगंधी,टोकदार,तीक्ष्ण दंतूर कडा असलेले असते.फुल एक लिंगी असते व फळ १०-२५ सेंमी लांब,१०-२० सेंमी व्यासाचे व १२-१५ सेंमी लांबीच्या वृन्तावर येते.

    केवड्याचे उपयुक्त अंग आहेत फुल,मुळ व सिध्द तेल.हे चवीला कडू,गोड,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के व स्निग्ध असते.केवडा त्रिदोष शामक असला तरी प्रामुख्याने कफपित्तनाशक आहे.

    आता आपण ह्याचे उपयोग पाहूयात:

    १)केवड्याच्या तेलाचा उपयोग आमवात,कंबरदुखी,डोकेदुखीत उपयुक्त आहे.

    २)त्वचारोगामध्ये तसेच त्वचेचा वर्ण सुधारण्यास देखील केवडा उपयुक्त आहे.

    ३)केवड्याचे तेल हे शरीरदुर्गंधी कमी करायला उपयुक्त आहे.

    ४)केवड्याचा सुगंध मन प्रसन्न ठेवतो.

    ५)केवड्याचे मुळ हे वंध्यत्वामध्ये उपयुक्त आहे.
    सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 15, 2017


  • संयुक्त अरब अमिरातीचा ५० वा राष्ट्रीय दिवस

    २ डिसेंबर १९७१ या दिवशी, संयुक्त अरब अमिराती ची स्थापना करण्यात आली व अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या सात अमिरातींनी संयुक्त अरब अमिराती या नावाने एक संघराज्य बनवले.

      December 2, 2021


  • जिवाला ओढ लावणारी “वर्षाअखेर!”

    जाणार्‍या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाला आनंदाने सामोरं जाताना , या वर्षांत जे जे धन आपण गमावलं ( माझ्यालेखी धन म्हणजे ही अमूल्य अशी माणसं! ) ते जरूर आठवा , त्यांच्या घरच्यांसाठी दोन हात परमेश्वरापाशी जोडा आणि म्हणा : Happy New Year !

      December 31, 2023


  • हिन्दू : संस्कृती की धर्म?

    हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने या लेखात उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे, नव्हे आपण हिन्दूंच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तसं होणं आवश्यक आहे, असंही मला वाटतं.

      September 19, 2017


  • विदेशींना मोत्याचा चारा, देशींना मात्र सडका घास!

    हा देश महान करायचा असेल तर आधी या देशाची अस्मिता जागृत करावी लागेल, ज्या वस्तुंचे, पिकांचे उत्पादन या देशात होते, अशा सगळ्याच वस्तुंच्या आयातीवर बंदी घालावी लागेल, संसदेपासून ते प्राथमिक शाळेपर्यंत सगळीकडे इंग्रजीला कायम तृतीय किंवा त्याही खालचे स्थान द्यावे लागेल, क्रिकेटसहीत सगळ्या विदेशी खेळांची हकालपट्टी करावी लागेल आणि त्यासाठी आधी आपल्या मनात खोलवर रूजलेली गुलामीची पाळेमुळे निखंदून काढावी लागतील.

      November 6, 2011