वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज अश्विन पौर्णिमा,अर्थात् कोजागिरी पौर्णिमा !!सणांचा विचार करताना देखील आपल्या पूर्वजांनी आरोग्याची किती छान काळजी घेतली आहे पहा....शरद ऋतु चालू आहे. निसर्गतःच पित्त वाढण्याचा हा काळ...आटीव दूध आणि शीतल चांदणे या दोन्ही गोष्टी पित्त कमी करणाऱ्या आहेत...याव्यतिरिक्त; मौजमजा आणि गप्पाटप्पा यांमुळेदेखील पित्ताचे शमन होते.सध्याच्या काळात जिथे तिथे stress दिसत असताना याहून अधिक चांगली Stress Buster Therapy काय बरे असेल??? हाच तर आयुर्वेदाचा मोठेपणा आहे!!
असे म्हणतात की या रात्री जागून लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केल्यास वैभव मिळते...अहो; वैभव जरूर मिळेल..पण कोणाला??? जो निरोगी आहे त्यालाच. म्हणून तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही आपण म्हणतो की; "जीवेत् शरदः शतम् |"....शरदच का?? इतर कुठला ऋतु का नाही??? कारण सर्वाधिक रोग शरदातच होतात म्हणुन !! याकरताच आयुर्वेदातील एक वचन प्रसिद्ध आहे- " वैद्यानां शारदी माता|" शरद ऋतु हा अधिक रुग्ण देणारा असल्याने वैद्यांना आपल्या आईसारखा वाटतो!! अर्थात; यातील मजेचा भाग सोडून द्या! लक्षात ठेवण्याची गोष्ट हीच की; आपण अशा संस्कृतीचा घटक आहोत जिच्यातील प्रत्येक प्रथेमागे काही ना काही अर्थ दडलेला आहे.विनाकारण टाईमपास म्हणून काही करणाऱ्या रिकामटेकड्या लोकांपैकी नाही आपण..त्यामुळेच अभिमान बाळगा या प्रथांचा..फुकट त्यांची नास्तीकवादाने कारणमीमांसा करुन हाती काहीच लागणार नाही..धु म्हटलं की धुवावं म्हणतात; असंच का धुवू आणि पाण्यानेच का धुवू हे वाद केवळ रिकामटेकडेच घालू शकतात...आपण कशाला त्या भानगडीत पडायचं???
गच्चीवर जा ; मस्तपैकी दूध आटवून त्यात छानपैकी केशर वगैरे घालून; आपल्या मित्रपरिवारासोबत गप्पा मारत-मारत त्याचा आस्वाद घ्या!! आरोग्याचे वैभव नक्की प्राप्त होईल.संपत्ती पण त्यालाच मिळेल ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असेल!! आणि पित्त शांत असल्याशिवाय या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत!! सर्वांना कोजागिरीच्या शुभेच्छा!!
वैद्य परीक्षित शेवडे; MD *(Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
October 14, 2016
योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं.......
1) जॉब हेक्टिक आहे
( कुणाचा नसतो ?)
2) वेळच मिळत नाही
( सर्वांनाच 24 तास मिळतात !)
3) खूप काम असते
( रिकामटेकडा कोण असतो ?)
4) अभ्यास खूप असतो कॉलेजात
( काय दिवे लावणार आहात ?)
5) घरी जाऊन पण काम असते
( आम्ही पण कामं करतो !)
6) लग्न झालं आता
( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !)
7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो
( तेवढा योगा - प्राणायाम, व्यायाम पुरेसा वाटतो का ?)
8) आता कोण बघतंय आमच्याकडे ?
( मग घराबाहेर पडूच नका !)
9) मला गरजच नाही योगा-प्रणायाम, व्यायामाची
( सर्वात मोठा गैरसमज ...)
10) हे जिम , व्यायाम योगा-प्रणायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत
( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?)
11) योगा प्राणायाम क्लास ची फी परवडत नाही
( घरी करायला किती पैसे लागतात ?)
12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं
( अर्धा एक तास काढता येत नाही स्वतःसाठी ?)
13) घरी आल्यावर आराम करायचा की योगा-प्रणायाम करत बसायचं ?
( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?)
हुश्श !!!
यापेक्षा मोठी लिस्ट होईल.
मित्रांनो , कारणं खूप देता येतील. पण आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर पुढचं आयुष्य निरोगी जगाल. नंतर हा पैसा , मालमत्ता , हुशारी , कशाचाच उपयोग होणार नाहीय. तंदुरुस्त शरीर हीच सर्वात मोठि मालमत्ता आहे तेव्हा आतापासूनच स्वतःची काळजी घ्या.
April 7, 2017
रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. 'प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते', 'ते लाचखाऊ असतात' असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो.
प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. (मेल, एक्सप्रेस गाड्यांचे) नेहमी वकिलांसारख्या काळ्या कोटात असतात. स्टेशनच्या मुख्य दरवाजावरील व लोकलवरील टी.सी. मात्र बऱ्याच वेळा साध्या कपड्यात असतात. अचानक धाडीची मोहीम असेल, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक टी.सी. साध्या कपड्यांत शांतपणे उभे असतात. प्रवासी उतरताच त्यांना घेराव घालून ते आपले काम पार पाडतात. मुंबईत पूर्वी लोकलगाडीत चढणाऱ्या टी.सी.ना 'मामा' म्हटलं जाई.
या तिकीट तपासनिसांची मुख्य कामं अशी असतात:
१. प्रवाशांची तिकिटं तपासून ती योग्य आहेत किंवा नाही ते पाहणं.
२. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं, व पैसे नसल्यास रेल्वे पोलिसांच्या मदतीनं त्यांना तुरुंगात टाकणं. असे प्रवासी शोधून काढणं हे कौशल्याचं काम तर असतंच, परंतु यामध्ये काही वेळा मारामारीच्या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं.
३. जमा झालेली रक्कम, तिकिटं, पासेस, कार्यालयात सुपुर्द करायचे असतात.
४. रेल्वेतील जुने, नवे असे लाखो कर्मचारी पासवर प्रवास करीत असतात.
ते सर्व व्यवस्थितपणे पडताळून पाहावं लागतं.
५. शाळा, कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना पासवर मिळणारी सूट, ५ वर्षांखालील मुलामुलींचं अर्धं तिकीट यांवर नजर ठेवावी लागते.
६. मेल व एक्सप्रेस गाड्यांतील प्रवासी आरक्षण यादीप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे पाहणं, रिकाम्या अनारक्षित (बर्थवर) प्रवाशांची भाड्याचे पैसे भरून घेऊन सोय करून देणं, ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांवरील वय तपासून घेणं.
७. लोकसभा-सदस्य प्रवास करत असताना त्यांचा वेगळा फॉर्म भरून घेणं.
८. अनेकदा तिकिटं काढलेल्या दिवसानंतर तिकिटांच्या दरात वाढ होते. त्यावेळी जास्तीचे पैसे प्रवाशांकडून गोळा करावे लागतात आणि हे काम तर तिकीट तपासनिसांची परीक्षा पाहणारं असतं.
९. साधू, भटकी मुलं, गरीब स्त्रिया व मुलं अनेकदा तिकीट न काढता जागा अडवितात, त्यांना गाडीतून बाहेर करावं लागतं.
१०. जागेवरून प्रवाशांत होणारे तंटे ताबडतोब मिटविणं.
११. प्लॅटफॉर्म तिकिटं तपासणं.
१२. स्त्रियांसाठीच्या डब्यांत तिकिटांची तपासणी.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये या तिकीट तपासनिसांना झोपण्यासाठी एक बर्थ ठेवलेला असतो; परंतु या प्रवासात मध्यरात्री, भल्या पहाटे वाटेतील येणाऱ्या स्टेशनांवर एखादा प्रवासी उतरणार असेल तर त्याला उठवण्याची (जागेवरून त्यांच्या उतरण्याच्या स्टेशनावर उतरवण्याची जबाबदारी टी.सी.वरच असते. प्रत्येक स्टेशनवर नव्यानं चढणाऱ्या प्रवाशांची सोय पाहणं हेही टी.सी.लाच बघावं लागतं.
बारा ते चौदा तासांची ड्युटी व त्यात स्वत:च्या घरी जाण्यास होणारा विलंब, यांमुळे त्यांना घराकडे लक्ष देता येत नाही. राजकारणी लोक प्रवासात असताना त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असतात. अशाप्रसंगी लक्ष पुरविताना टी.सी. मंडळींची अगदी दुहेरी पातळीवर दमछाक होते; कारण, ते कार्यकर्ते सर्व नियम धाब्यावर बसवितात व त्यांच्याविषयी इतर प्रवासी तक्रारी करतात. रेल्वे खातं हे आपल्याला वेळी अवेळी होणाऱ्या झोपण्याच्या गैरसोईबद्दल व शिव्या खाण्यासाठी पगार देत' अशी टी.सी. कर्मचाऱ्यांची तक्रार असते.
मनुष्यस्वभावाप्रमाणे व परिस्थितीनुसार काही तिकीटतपासनीस संधीचा फायदा घेऊन खाबुगिरी करीतही असतील, परंतु बरेच टी.सी. कामात दक्ष असल्यामुळे दर महिन्याला विनातिकिटाच्या दंडातून कोट्यवधी रुपये जमा करतात. २०१४ या वर्षात व्ही.टी. स्टेशनवरील धर्मेंद्रकुमार या तिकीटतपासनिसानं एका महिन्यात १२ लाख रुपये एवढी रक्कम निव्वळ दंडामधून वसूल केली होती. हा एक विक्रम आहे. तरीही, मनुष्यस्वभावातील फसविण्याची वृत्ती वाढतच आहे व रेल्वेला आपली टी.सी.ची फौज वाढवावी लागते आहे.
डॉ. अविनाश वैद्य
July 23, 2022
अशी यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे ज्याद्वारे दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांचे त्वरित ऑडिओ सत्यापन करता येईल. म्हणून, दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांची पडताळणी करण्यास सक्षम बनविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये “इमेज टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्जन” ही प्रणाली समाविष्ट केली पाहिजे.
June 25, 2021
कॅरिबिअन बेटांवरिल बार्बडोसमध्ये जन्मलेला हा क्रिकेटमधिल एक प्रसिद्ध कलाकार.
February 20, 2011
दैनंदिन जीवनात वावरताना खूप बदल घडवून आणलाय MPSC ने माझ्यात … मला कोणी विचारलं की तू एका वर्षात ठोस काय मिळवलं रे… त्याच उत्तर “शून्य” असू शकतं … पण मी काय मिळवलं ते मला माहितेय… कारण मला “दृष्टीकोन ” मिळालाय!! खूप up n downs येतात … कधी कधी चिडायला होतं तर कधी रडायला पण येतं… पण तेवढ्या पुरतं … कारण तेपण शिकवते की MPSC …!!!
September 15, 2017
पीडीपीचे सरकार आल्यापासून फुटीरतावाद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. कारण, देशाच्या विरोधात युद्ध पुकारणारा फुटीरतावादी मसरत आलम याच्या सुटकेनंतर आता मुख्यमंत्री सईद यांनी आशिक हुसेन फक्तू या फुटीर नेत्याला सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सईद यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच जी भीषण वक्तव्ये केली आहेत ती धक्कादायक आहेत.
March 12, 2015
या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा तरी करावा लागेल, तेव्हा कुठे हे “परम्युटेशन काॅम्बीनेशन ” थोडेफार जुळेल. हे दहा घटक जुळतील, असा ग्रंथोक्त आहार, एका घरात सुद्धा घेणे, असे जेवण रोज बनवणे शक्य होणारे नाही.
August 22, 2016
कडू चव म्हणजे फक्त मधुमेहवाल्यांसाठीच आहे, आमचा काही संबंध नाही, असं नाही. मधुमेह होऊ नये यासाठी देखील रोज खाण्यात कडू असावे.
जसे तिखटाचा अॅण्टीडोट आंबट आहे, तसे गोडाचा कडू असे समजावे. ज्यांना गोड खूप आवडते त्यांनी अगदी तेवढ्या प्रमाणात नाही, पण कडू जरूर खावे. गोड खाऊन मधुमेह झालाय ना, आता तेवढेच कडू खातो, म्हणजे गोड " नील " होईल, असं नाही हां !
कडूपणा कमी होण्यासाठी लवण रस उपयोगी होतो. कारल्याची भाजी जास्त कडू व्हायला नको असेल तर फोडींवर मीठ पेरून ठेवतात, मीठामुळे त्याला काही वेळाने पाणी सुटते. फोडी पिळून हे पाणी काढून टाकले तरी थोडा कडूपणा कमी होतो.
कडू खाताना पण जरा काळजी घ्यावी लागते.
अति प्रमाणात जर कडू चवीचे पदार्थ पोटात गेले तर पित्त हमखास वाढते. जेवणाच्या पानात कडू चवीची जागा डाव्या बाजूला असते, एवढे लक्षात ठेवावे.
कारल्याची भाजी किंवा भजी, काही महाभाग तर रोज सकाळी कारल्याचा ज्युसदेखील पितात. मेथीची भाजी अथवा पराठे, मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी पिणे, किंवा मेथी पावडर घेणे, भाकरीच्या किलोभर पीठात, दोन तीन चमचे मेथीची पावडर घालणे, शेवग्याच्या शेंगा आणि केळफूलाची भाजी देखील कडवटच असते. असा कडू आहार आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळा ठीक आहे, याने लिव्हर म्हणजे यकृताचे काम सुधारते. पित्ताला उद्दीपना मिळते, पाचक रस नीट पाझरायला मदत होते, जीभेला चव येते. आतड्यातील आमाचे गोळे हलायला, पुढे ढकलायला मदत मिळते.
पण रोज रोज एवढे कडू खाल्ले तर स्नायुंची ताकद कमी होते. शुक्रजंतु कमी होतात, हे पण लक्षात ठेवावे. अति सर्वत्र वर्ज्ययेत् असे म्हणतात ते चुकीचे नाही.
किराईत या कडू औषधाप्रमाणेच आणखी एक सुप्रसिद्ध कडू औषध म्हणजे कुमारी, कोरफड, अॅलोवेरा. याचा रस आटवला की त्यालाच काळा बोळ किंवा सबर म्हणतात. बाळऔषधात हा असतो.
बाळगुटी हल्ली गायबच झालेली दिसते. त्यातील बहुतेक औषधे ही कडूच असतात. अगदी दररोज नको पण आठवड्यातून दोन वेळा, रविवारी आणि बुधवारी बाळाला दोन दोन वळसे अवश्य उगाळून द्यावी. उगाळून झाल्यावर ही गुटीतील कडू औषधे नीट पुसुन, कोरडी करून, ठेवावीत, म्हणजे बुरशी येत नाही.
जे डाॅक्टर बाळाला बाळगुटी अजिबात देऊ नका, असे सांगतात, त्यांच्या "सिलॅबस" मधे बाळगुटी नसल्याने, त्या औषधांचा त्यांना अभ्यास नसतो, म्हणून त्यांना तसे सांगावे लागते. यात त्यांचा काहीच दोष नाही. हे सर्व डाॅक्टर्स लहानाचे मोठे होत असताना, कडू चवीची बाळगुटी खाऊनच मोठे झालेले आहेत, हे पण लक्षात ठेवावे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
22.11.2016
November 22, 2016
…1996 च्या विश्वचषकात त्याचा एक चेंडू सीमापार धाडल्यानंतर पाकिस्तानच्या आमीर सोहेलने त्याला उद्देशून काही अ-प-शब्द उच्चारले होते. पुढच्याच चेंडूवर वेंकीने त्याच्या यष्ट्या तीनताड उडवून दिलेला ‘दांडेतोड’ जवाब अनेकांना आठवत असेल.
August 4, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti