वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बाहुबली’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाने ॲनिमेशन तंत्रज्ञानाचाच एक भाग असलेले व्हीज्युअल इफेक्ट्स चे अनेक पैलू भारतीय प्रेक्षकांसमोर नव्याने आले आहेत.
October 28, 2021
भुसावळच्या गणेशोत्सवाचे पाच पदर असायचे- चार ठळक आणि एक आमचा लुडबुडवाला ! ठळक म्हणजे- गावातला, घरचा, शाळेचा आणि आमचा – पण गल्लीतला (खरंतर तीन इमारतींपुरता), लुडबुडवाला म्हणजे मोठया स्तरावरील चिरा गल्लीतील (जेथे आम्हांला कोणी विचारत नसे).
September 6, 2022
रेल्वेचा पगार घेणारे रेल्वेचे कर्मचारी हा जितक्या सहजतेनं कुतूहलाचा विषय होतो, तेवढ्याच सहजपणे रेल्वेशी अतूटपणे बांधले गेलेले मुंबई शहराचे डबेवाले, रेल्वेतले फेरीवाले, लाल डगलेवाले हमाल, प्लॅटफॉर्मवरची निराधार मुलंमुली यांच्या आणि रेल्वेच्या नात्याबद्दलही कमालीची उत्सुकता वाटते. या लोकांचं जगं, त्यांचे व्यवसाय रेल्वे'शिवाय अगदी कोलमडून पडतील असे असतात आणि म्हणून वेगळ्या अर्थाने ही मंडळी रेल्वेची मंडळी' असतात. यापैकी 'मुंबईचा डबेवाला' हे व्यवस्थापनशास्त्रातलं नेमकं उदाहरण.
जगप्रसिद्ध असलेला हा 'मुंबई शहरातील डबेवाला' म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरापासून त्याच्या जेवणाचे डबे त्याच्या कामाच्या जागी घेऊन जाणारी अत्यंत योजनाबद्ध व कल्पक अशी एकमेव यंत्रणा आणि संघटना. या योजनेकरता इंधन लागत नाही, संगणकाची गरज नाही आणि आधुनिक यंत्रंही लागत नाहीत. शोधूनही उणीव सापडणार नाही अशी ही कौशल्यपूर्ण यंत्रणा केवळ मनुष्यबळावर उभी आहे. पांढरा लेंगा-शर्ट, पांढरी टोपी, सायकल, डोक्यावरून सहजपणे वाहून नेता येणारे डबे ठेवलेले लाकडी पसरट खोके आणि मुंबई शहराची लोकल सेवा हेच ह्या धंद्याचे भांडवल. गेल्या १२५ वर्षांत एकदाही संप न झालेली ही एकमात्र संघटना असेल. मुंबईच्या डबेवाल्याची ही डबेवाटप योजना स.न. १८९० मध्ये सुरू झाली आणि १९२५ सालापासून लोकल गाड्या सुरू झाल्यावर त्यात आमूलाग्र बदल घडत गेले. दररोज ४५०० ते ५००० डबेवाले डब्यांच्या नेण्याआणण्याचे काम पाहतात. यामध्ये अंदाजे १,७५,००० ते २ लाख इतक्या मोठ्या संख्येनं जेवणाच्या डब्यांची उलाढाल चालते. या लाखोंच्या आकड्यातील डबे पोहोचविण्यात एखादीही चूक न होणं यासारखी अचूकता अन्यत्र कुठे सापडेल?
नाहीच सापडणार! म्हणूनच फोर्बस कंपनीने त्यांना 'सर्वोत्तम गुणवत्ता क्रमांक' दिला आहे. इंग्लंडचे राजे फिलीप यांनी मुंबईत डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या कामाला जगप्रसिद्धी मिळाली. बी.बी.सी.नं तर त्यांच्यावर एक माहितीपटदेखील काढला होता.
जागतिक मॅनेजमेंट संस्थेनं या डबेवाल्यांच्या संघटनाप्रमुखाकडून त्यांचं काम कसं चालतं हे विस्तृतपणे समजून घ्यावं म्हणून खास भाषणाकरता त्यांना आमंत्रित केलं होतं.
मोबाईलवर एस.एम.एस. येण्यापूर्वीच्या जमान्यात घरचे महत्त्वाचे निरोप जेवणाच्या डब्यांतून चिठ्या ठेवून पोहोचविले जात. डब्यांच्या झाकणांवर तांबड्या-काळ्या रंगात उभ्या-आडव्या रेषा, आकडे व इंग्रजी मुळाक्षरं असतात. त्यांचे संदर्भ लावण्याचं कौशल्य प्रत्येक डबेवाल्यानं आत्मसात केलेलं असतं. कोणत्या भागातून डबा उचलायचा, कोणत्या रेल्वेमार्गानं जाऊन कोणत्या स्टेशनवर उतरवायचा व पुढे ऑफिसचा रस्ता बरोबर शोधून तो डबा योग्य वेळी, योग्य व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवायचा या सर्वांचं प्रशिक्षण डबेवाल्यांना दिलेलं असतं. हीच प्रक्रिया दुपारी उलट्या मार्गानं करीत संध्याकाळपर्यंत रिकामा डबा योग्य घरी पोहोचतो. डबेवाले व लोकल गाड्या यांचं गणित अचूक असतं. केवळ ४० सेकंदांत आपल्या लाकडी खोक्यांसकट गर्दीत डबे चढविणे हे डबेवाल्यांसाठी एक महान दिव्यच असतं. त्यात प्रवाशांची भांडणं, आरडाओरडा हे सर्व सहन करीत पुन्हा योग्य त्या स्टेशनात उतरणं हेही तितकंच कठीण असतं.
हल्ली काही वर्षांपासून सकाळी १० ते १२ या वेळात चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस) व नंतर दुपारी २ ते ४.३० या वेळेपर्यंत सामानाचा खास डबा या डबेवाल्यांसाठी राखून ठेवण्यात येतो. त्यामुळे त्यांचे हाल बरेच कमी झाले आहेत.
दोन्ही रेल्वे प्रशासनांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून ही अंमलबजावणी केलेली आहे. पावसाळा, संप, दंगली या सर्वांना तोंड देत डबेवाल्यांची सेवा अखंड चालू आहे. एक गोष्ट मात्र तितकीच सत्य आहे, की हे डबेवाले आज मुंबई लोकल रेल्वेवर पूर्णपणे अवलंबून आहेत. रेल्वे व डबेवाल्यांची मेहनत या दोन्ही गोष्टींमुळे ही योजना लोकांसाठी जिवाभावाची झाली आहे.
जगामध्ये अशा प्रकारची व्यापक सेवा अन्यत्र कुठेही नाही.
डॉ. अविनाश वैद्य
July 28, 2022
‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल.
January 4, 2025
आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे पहाणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे.
December 3, 2016
जगात भाषाच नसती तर? भाषेशिवाय जगाची कल्पनाच होऊ शकत नाही. माणसाला भाषा अवगत नसती तर माणसात आणि जनावरात फरकच उरला नसता…
June 23, 2011
यदा पश्यतां मामसौ वेत्ति नास्मान्
अयं श्वास एवेति वाचो भवेयुः |
तदा भूतिभूषं भुजंगावनद्धं
पुरारे भवंतं स्फुटं भावयेयम् ‖ २४ ‖
अंतिम तारक असणाऱ्या भगवान शंकरांच्या त्याच स्वरूपाला वेगवेगळ्या अंगाने आळवतांना आणि आपल्यासमोर स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी माणसाच्या अंतिम समयीच्या अवस्थेचे विविध पैलू आधारभूत मानले आहेत.
आचार्यश्री म्हणतात,
यदा पश्यतां माम्- ज्यावेळी मला पाहणारे, अर्थात त्या अंतिम समयी माझे जे नातेवाईक माझ्या आजूबाजूला जमलेले असतील, माझ्या कडे पहात असतील,
असौ वेत्ति नास्मान्- हा आपल्याला ओळखत नाही.
अयं श्वास एवम्- बस हाच शेवटचा श्वास,
इति वाचो भवेयुः - असे बोलत असतील.
अर्थात एखाद्या मरणासन्न व्यक्तीच्या अंतिम समयी जेव्हा त्याचे नातेवाईक त्याच्या जवळ उभे राहतात त्या वेळी तो त्यांच्यापैकी कोणालाही ओळखत नाही.ही जवळपास अंतिम अवस्था असते. यावेळी बाकीचे लोक फक्त त्याचे श्वास मोजत असतात. शेवटचे काही श्वास राहिले असे म्हणत असतात.
तदा - त्यावेळी
भूतिभूषं - भूती म्हणजे विभूती अर्थात भस्माने विभूषित असणारे,
भुजंगावनद्धं- सर्प वेष्टित अशी
पुरारे - हे त्रिपुरासुराच्या विनाशका !
भवंतं - आपले
स्फुटं - स्फुट या शब्दाचे संस्कृत भाषेत मुक्त, व्यापक, स्वच्छ, अस्तित्व, क्षमतायुक्त असे वेगवेगळे अर्थ आहेत. तसेच दृश्य, संवेद्य असाही अर्थ आहे. लक्षार्थाने स्फुट म्हणजे मूर्ती.
आपले सगुण-साकार स्वरूप. स्फुट चे वर दिलेले सर्व अर्थ भगवंताच्या मूर्तीला, सगुणरूपाला लागू पडतात.
भावयेयम् - मी त्या मूर्तीचे ध्यान करो.
घरदार, नातेवाईक इतकेच काय तर श्वास देखील मागे पडून मला आपल्या चरणी स्थान मिळावे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 3, 2020
कोणतीही निर्मिती होताना प्रत्यक्ष त्याचं साक्षिदार असणं, हा विलक्षण आनंदाचा भाग असतो. निर्मिती, मग ती कोणतीही असो, ती देखणीच असते असं मला वाटतं. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर एक सुतारकामाचा कारखाना होता. माझं लहानपण हे लहानपणी जसं असावं तसंच होतं, आतासारखं ते मोठ्यांसारखं झालेलं नव्हतं. अभ्यास, तोही चोख, शाळेच्याच वेळेत करायची पद्धत होती. तो एकदा केला, की मग पुढचे अनेक तास गंमतीचेच असतं. क्लास ह्या शब्दाचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा. त्यामुळे अभ्यास हा शाळेतच करायचा असतो, असं तेंव्हा आम्हाला वाटे. शाळेचे दोन-पाच तास सोडले, तर रात्री झोपेपर्यंतचा वेळ हा मजेचाच होता.
August 22, 2017
कचरा आणि खरकटे आपल्या घराबाहेर फेकले की आपले घर स्वच्छ होते असा, बऱ्याच नागरिकांचा (गैर) समज झालेला आहे. त्यामुळे होते काय की, उंदीर, घुशी, कावळे, कुत्रे, मांजरी वगैरेंना तो आयताच मिळतो आणि त्यांची प्रजा वाढते.
August 22, 2014
…. अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात.
January 24, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti