(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रक्षाबंधन

    श्रावण महिन्यांत पौर्णिमेचे दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता. पूर्वी तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधून रक्षा अर्थात राखी तयार करीत. ती राखी मंत्र्याने राजाला बांधावी असे सांगितले आहे. असाच विधी भविष्य पुराणातही सांगितला आहे.

    इतिहास कालापासून याची नूतन प्रथा सुरु झाली. या काळात बहीण भावाला राखी बांधू लागली. यामुळे भावाचा उत्कर्ष व्हावा व बहिणीचे संरक्षण करावे अशी भूमिका झाली. इतिहासातील उदाहरण म्हणजे उदेपूरची राणी कर्मवती हिने हुमायूनाला भाऊ मानून राखी बांधली होतीं.

    सांप्रत सर्वत्र राखी बांधण्याची - पाठवण्याची प्रथा सुरु आहे. या राख्यांमध्ये सुध्दा अनेक नमुने येत आहेत. या सणामुळे भावाबहिणीचे प्रेम घनिष्ठ होते व समाजात भ्रातृभाव निर्माण होतो.

    जैन समाजात हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. या दिवशी जैन मंदिरात राख्या ठेवलेल्या असतात.

      August 30, 2023


  • सिस्मोग्राफ (भूकंपमापक)

    भूकंप होत असताना ज्या लहरी जमिनीखाली निर्माण होतात त्या पसरत जातात तेव्हा त्यांची नोंद आरेखन किंवा आलेखाच्या माध्यमातून घेतली जाते. हे काम ज्या यंत्राच्या मदतीने केले जाते त्याला सिस्मोग्राफ असे म्हणतात.

      October 14, 2023


  • निरंजन – भाग २० – गुंजन दोन मनांचे

    गुंजन दोन मनांचे म्हणजे, आपले मन एखाद्याच्या मनाशी गुणगुणणे, असा इथे अर्थ नव्हे….. तर आपले एक मन आपल्याच दुसर्‍या मनाची परीभाषा ओळखणे, असा इथे अर्थ आहे.

      August 6, 2020


  • एक नाणे, दोन बाजू: पर्यटन आणि पर्यावरण

    आपल्या भारतातील पयर्टन क्षेत्राचा आढावा घ्यायचा झाला तर जुन्या काळात आपल्याकडे जी तीर्थाटनाला जायची पद्धत होती तो भारतातील पर्यटनाचा उगम. पुढे ब्रिटिशांच्या काळात गोया साहेबाने इथला उन्हाळा सोसेना म्हणून अगदी माथेरानपासून मसुरीपर्यंत भारतभरातली हिलस्टेशन्स शोधून काढली आणि उन्हाळ्यात तिकडे जाण्याची पद्धत पडली.

      August 3, 2022


  • दादर चा जन्म आणि बारसं..!!

    मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहेमी एक गोष्ट खटकायची. ती ही, की मुंबईतलं आजचं सर्वात महत्वाचं ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही.

      August 7, 2018


  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री सोमनाथ

    सोमनाथचे हे देवालय म्हणजे स्थापत्य व शिल्पकलेच्या क्षेत्राचा एक उत्तम नमुना आहे आणि आम्हा भारतीयांची श्रद्धा आणि भक्तिभावना याचे हे द्योतक आहे. सौराष्ट्राच्या पुण्यभूमीत असलेल्या या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ असं नाव पडण्याविषयीची कथा आपल्या स्कंदपुराणात आहे.

      August 25, 2015


  • मोरया माझा – ४ : श्रीगणेशांना वक्रतुंड का म्हणतात ?

    मराठी व्याकरणाने या शब्दाचा अर्थ कसा लावणार? मग अडचण लक्षात आली की लोक गंमत करतात ते म्हणतात की मोरया आणि त्याची सोंड वळवलेली आहे म्हणून ते वक्रतुंड. तर नाही. कारण प्रतीक रूपात हत्तीचे मस्तक स्वीकारायचे तरी सोंड हे हत्तीचे नाक आहे तोंड नाही. शब्द वक्रनासिका असा नाहीतर वक्रतुंड आहे. मग वक्रतुंड याचा नेमका अर्थ काय?

      September 5, 2019


  • पुण्यातील सेवासदन संस्था

    रमाबाईं रानडेचं आजपर्यंत चालू असलेलं महत्त्वाचं काम म्हणजे सेवासदन संस्था. रमाबाई रानडे यांच्या ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली.

      October 2, 2021


  • परदेशी खाद्यपदार्थ वाईट असतात का?

    ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?’ अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण थोड्क्यात देतो.
    १. वरील पदार्थ वाईट आहेत असे विधान सरसकट नसून ते आपल्या देशातील वातावरण, लोकांच्या पूर्वापार चालत आलेल्या सवयी इत्यादी लक्षात घेता ‘आपल्या देशात खाण्यासाठी अयोग्य आहेत’. जिथे जे पिकतं तिथे ते खावं हा सर्वमान्य सिद्धांत आहे. जिथे भुईमूग, तीळ यांचं तेल उपलब्ध होतं तिथे ऑलिव्ह ऑइल वा सोयाबीन ऑइलची आवश्यकता नाही. कोकणात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गहू खाण्याची सुरु झालेली प्रथा आणि त्यामुळे वाढलेले रोग यांबद्दल जुन्या जाणत्या लोकांना विचारून पहा. मी काय म्हणतोय ते सहज लक्षात येईल. एक अमेरिकन माणूस वर्षभरात सरासरी जितके चीज खाऊन फस्त करेल तितकं चीज आपणही वर्षभरात खाल्लं तर पचन बिघडून रोग कसे निर्माण होतात हे प्रयोग म्हणून आपापल्या जबाबदारीवर करून पहावा! ताहिनी ही गोष्ट इस्राईल, लेबनन यांसारख्या देशांत आवर्जून खाल्ली जाते. आपल्या देशात खाल्यास मात्र त्याने रक्तपित्त नावाचा रोग होतो असे आयुर्वेद सांगतो. इतका अभ्यास आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे.
    २. आम्ही भारतीय परदेशी गोष्टींचे आपल्या सोयीने अनुकरण करण्यात पटाईत आहोत. इटलीत बनवला जाणारा पास्ता हा बहुतांशी ताजा बनवलेला तर आमच्याकडे मिळणारा पॅकेटबंद असतो. युरोपीय देश वा मध्य आशियामधील देशांत मिळणारा ब्रेड हा पदार्थ कोरडा खाणे अपशकुन मानले जाते! त्याला बटर वा ऑलिव्ह ऑइल लावूनच खावे असा प्रघात आहे. आपल्याकडे मात्र ब्रेड खाणे हे स्टेट्सचे लक्षण मानले जाते; मात्र आम्ही ‘ऑइल फ्री; घी फ्री’ आहार घेण्यात धन्यता मानतो. फ्रान्ससारख्या देशांत जेवणासह वाईन घेण्याची पद्धत आहे. ही वाईन नशा करण्यासाठी घेण्याचा उद्देश नसून प्रामुख्याने मांसाहार पचण्यास तिचा उपयोग होतो. आमच्याकडे मात्र ‘बसणे’ हा प्रमुख कार्यक्रम असतो. पिणं हे झिंगण्यासाठी नसेल तर त्यात मजाच काय? असा होरा असतो. दारूसोबत जमलंच तर आम्ही काहीतरी खातो; तेदेखील चटपटीत आणि तेलकट!!
    ३. याशिवाय असे कित्येक परदेशी पदार्थ आहेत जे मुळातच वाईट आहेत; ते कोणत्याही देशात खाल्ले गेले तरी दुष्परिणाम दाखवणारच. उदाहरणार्थ किण्वीकरण करून तयार केलेला ब्रेड किंवा चायनीज पदार्थांत वापरले जाणारे व्हिनेगर, सोया सॉस, अजिनोमोटो यांसारखे पदार्थ. ही यादीदेखील बरीच वाढवता येईल; मात्र विस्तारभयास्तव थांबतो. त्या त्या देशांतदेखील हे पदार्थ खात असलेल्या लोकांना कोणत्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते हे जाणून घ्यायचे असल्यास त्या देशांतल्या आरोग्य विभागाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचना वा WHO शी संलग्न संशोधने अवश्य पहावीत.
    बहुतांशी पारंपरिक आहार संस्कृती ही त्या त्या देशातील वातावरणासाठी पोषक आहे. त्यामुळे आपल्या मातीत जे पिकतं तेच शक्यतो खावं; हाच आरोग्याचा मूलमंत्र जगातील प्रत्येक देशासाठी आहे. याकरताच अमेरिका नामक तुलनेत नव्याने जन्माला आलेल्या देशाने जी स्वतंत्र खाद्यसंस्कृती निर्माण केली ती सर्वाधिक घातक मानली जाऊन जगभरातील खाद्य संस्कृतीबद्दल सजग असणाऱ्या देशांत अमेरिकन आहार पाहून तोंड मुरडले जाते. आम्ही भारतीय मात्र देशी गायींचे दूध, तूप सोडून टेबल बटर आणि देशी जव सोडून पिवळ्या-गुलाबी पाकिटातील ओट्ससारख्या निकृष्ट पदार्थांचा आस्वाद (?) मिटक्या मारत घेत आहोत हे दुर्दैव.
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 27, 2016


  • लोकांनी करावे तरी काय ?

    जगातील आश्चर्यांची माध्यमांत नेहमीच चर्चा होत असते. मागे एकदा एका संस्थेने जगातील सात आश्चर्यांची निवड करण्यासाठी विश्वव्यापी जनमत नोंदणी अभियानदेखील राबविले होते. आपला ताजमहालदेखील त्या स्पर्धेत होता, अर्थात नंतर तो एकूण प्रकारच अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले; परंतु लोकांची उत्सुकता चाळविण्यात ती मोहीम नक्कीच यशस्वी झाली होती.

      January 31, 2010