(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग दुसरा

    असंच एक देखणं हिलस्टेशन म्हणून महाराष्ट्रातल्या माथेरानला नावाजलं जातं. माथेरानचा अर्थही 'डोंगरमाथ्यावरील जंगल' असाच आहे. या हिलस्टेशनचा शोध 'चौक' या गावातून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला लागला. नेरळकडून माथेरानकडे जाण्यासाठी अनेक वर्षे घोडे व पायवाटेचा मार्ग होता. नंतर अनेक वर्षांनी नेरळ माथेरान रेल्वे बांधली गेली. या रेल्वेबांधणीचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. सन १९००च्या सुमारास या रेल्वेबांधणीची कल्पना एका एतद्देशियाच्या मनात आली. त्याचे नाव अब्दुल हुसेन. सर आदमजी पीरभॉय या यशस्वी उद्योजकाचे ते चिरंजीव. माथेरानचं वर्णन ऐकून त्यांचं कुतूहल जागं झालं..दोघे बापलेक मुंबईहून लोकलनं थेट नेरळला उतरले, परंतु त्यांना वर माथेरानला जाण्यास ना बग्गी होती ना घोडा होता! काहीच न मिळाल्याने हिरमुसले होऊन ते दोघे नेरळहून थेट मुंबईत परतले. या एका घटनेमुळे नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाची आखणी सुरू झाली. या परतीच्या प्रवासात अब्दुल्लांनी मनात निश्चय केला, की ते पुढच्या वेळी 'स्वत: बांधलेल्या रेल्वे मार्गाने' माथेरानला पोहोचतील आणि मग खरोखर भगीरथ प्रयत्नांनी 'माथेरान रेल्वे प्रकल्प' साकारला गेला. या प्रकल्पाला प्रत्यक्ष प्रारंभ व्हायला १९०४ साल उजाडलं. प्रथम वडलांच्या मागे लागून त्यांनी १० लाख रुपयांचं भांडवल उभारलं. हळूहळू सर्व थरांतून पैसे जमा होऊ लागले. अतिशय घनदाट जंगल, वेडेवाकडे डोंगरकडे आणि अवघड असलेल्या दऱ्या यांतून मार्ग काढणं फार मुश्कील काम होतं. अशा वेळी नुकताच कलका-सिमला रेल्वे मार्ग बांधून झाला होता. त्याचा अनुभव गाठीला असलेल्या रावसाहेब हरिचंद्र यांना बोलावून घेण्यात आलं. अब्दुल्ल हुसेन स्वत: जातीने नेरळमध्ये वास्तव्यास गेले व हे सर्व काम त्यांनी स्वत:च्या देखरेखीखाली सुरू केलं. मार्गात सापांची अनेक बिळं होती. अंधश्रद्धेमुळे कामगार सापांना मारण्यास तयारही होत नसत. अखेर साप मारण्याकरता एका सापामागे एक रुपया बक्षिसी देण्यास सुरुवात झाली आणि मार्ग सापमुक्त झाला. ब्रिटिश सरकारनं पुणे-मुंबई येथून सैन्याची मदत पाठवली. कामानं वेग घेतला. या रेल्वेमार्गाचं स्वप्न पाहणारे, अब्दुल हुसेन हे स्वत:च या छोट्या मार्गावर चालणारी छोटी इंजिनं आयात करण्याकरता जर्मनीला गेले. डब्यांची बांधणी भारतातच झाली आणि हा स्वप्नवत मार्ग तयार झाला. गाडी सज्ज झाली, पण एक अडथळा यानंतरही समोर उभा, ठाकलाच. उभ्या कड्याच्या बाजूनं जाणाऱ्या गाडीवर भुताटकीचा प्रयोग होईल या भीतीपोटी कोणी प्रवासी तयार होत नव्हते. शेवटी इंजिनमध्ये ड्रायव्हरसोबत स्वतः अब्दुल हुसेन बसले आणि लोकांची भीती त्यांनी दूर केली. सर्व कामगार रुळांच्या दोन्ही बाजूला उभे राहून गाडीचं संरक्षण करत होते. पहिल्याच प्रवासात अब्दुल यांच्या अंगातील कोट फाटला, परंतु तसाच प्रवास करीत ते माथेरानला उतरले. मार्गावरील कामगारांना त्यांनी प्रेमापोटी आपल्या खिशातील सर्व नाणी वाटली. गंमत अशी, की पैसा आदमजींचा (वडलांचा), मेहनत अब्दुल्लांची (मुलाची) व लाभ मात्र पर्यटकांना मिळाला. या मार्गाच्या उद्घाटनाचं साल होतं १९०७ आणि महिना होता मार्च.

    हा प्रवास करताना, वॉटर पाईप व जुम्मापट्टी स्टेशनांजवळ स्वागताला उभी असलेली माकडांची फौज, करवंदं-जांभळांचे वाटे पानातील द्रोणात घेऊन खिडकीशी लटकून चालत्या गाडीत शिरणारी आसपासच्या खेड्यांतील मुलं-मुली, त्यांच्या चेहऱ्यांवरचे निरागस भाव, हे चित्र मनावर खोलवर कोरलं जातं. माथेरान जवळ येऊ लागतं, तसे दोन्ही बाजूंनी तांबड्या मातीचे रस्ते, घोडेवाले, माणसांनी ओढल्या जाणाऱ्या रिक्षा, हिरवी गर्द झाडी, हिल स्टेशनचा जाणवणारा थंडगार वारा, हे वातावरणच मोहित करत सामोरं येतं. त्यात इंजिनाची दीर्घकाळ वाजणारी शिटी सुरू झाली, म्हणजे माथेरान स्टेशन जवळ आल्याची खूण पटते. अडीच तासांचा प्रवास कसा संपतो ते कळतच नाही.

    श्रीमंत लोकांसाठी स्पेशल रेल्वे मोटारकोच लावण्याचा मान प्रारंभकाळात या गाडीला मिळाला होता. मुंबईहून शुक्रवारी पुण्याकडे जाणारी डेक्कन क्वीन व सोमवारी पुण्याहून मुंबईकडे येणारी डेक्कन क्वीन नेरळला थांबत असे, कारण बडे रईस लोक त्या काळात शनिवार-रविवारी माथेरानला जाऊन आपल्या बंगल्यावर आराम करीत असत.

    पावसाळ्यात हा मार्ग बंद असे, पण हळूहळू या मार्गावर अनेक दरडी कोसळल्याने वीस-पंचवीस वर्षांपूर्वी हा मार्ग पूर्णपणे बंद पडला व पुढे तर तो कायमचाच बंद पडण्याची शक्यता वाटू लागली. रेल्वेला हा मार्ग चालू ठेवण्याचा खर्च परवडत नव्हता, मात्र 'जागतिक वारसा' यादीमध्ये ‘माथेरान टॉय ट्रेन'चं नाव झळकलं, चक्रं वेगात फिरली आणि आता नेरळ ते माथेरान गाडीचा मानाचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे...

    नॅरोगेज ट्रेनचं विश्वच निराळं आहे आणि ते एकदा अनुभवलं, की पुन:पुन्हा साद घालणारं आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

      July 1, 2022


  • सरकार आहे तरी कुठे?

    देशातल्या साठ टक्के जनतेची सातत्याने उपेक्षा करणे सरकारला महागात पडू शकते. हे लोक उद्या रस्त्यावर उतरले, तर त्यांचा क्षोभ केवळ सत्ताधार्‍यांविरोधातच नव्हे, तर सगळ्याच राजकीय पक्षांच्या विरोधात उफाळून येईल आणि त्यातून कदाचित इथली प्रचलित व्यवस्थाच उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.

      December 11, 2011


  • मनाचे श्लोक – १२१ ते १३०

    महा भक्त प्रल्हाद हा कष्टवीला | म्हणोनी तयाकारणे सिंह जाला |
    न ये ज्वाळ वीशाळ संन्नीध कोणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||121||

    कृपा भाकिता जाहला वज्रपाणी | तयाकारणे वामनु चक्रपाणी |
    द्विजाकारणे भार्गवू चापपाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||122||

    अहिल्ये सतीलागि आरण्यपंथे | कुढावा पुढे देव बंदी तयाते |
    बळे सोडिता घाव घाली निशाणी | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||123||

    तये दोपदीकारणे लागवेगे | त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागे |
    कळीलागी जाला असे बौध्द मौनी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||124||

    अनाथा दिनाकारणे जन्मताहे | कलंकी पुढे देव होणार आहे |
    जया वर्णिता शीणली वेदवाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||125||

    जनाकारणें देव लिलावतारी | बहूतांपरी आदरे वेषधारी |
    तया नेणती ते जन पापरूपी | दुरात्मा महानष्ट चांडाळ पापी ||126||

    जगी धन्य जो रामसूखे निवाला | कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला |
    देहेभावना रामबोधे उडाली | मनोवासना रामरूपी बुडाली ||127||

    मना वासना वासुदेवी वसो दो | मना कामना कामसंगी नसो दे |
    मना कल्पना वाउगी ते न कीजे | मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे ||128||

    गती कारणे संगती सज्जनाची | मती पालटे सूमती दुर्जनाची |
    रतीनायिकेचा पती नष्ट आहे | म्हणोनी मनातीत ह्ऊोनि राहे ||129||

    मना अल्प संकल्प तोही नसावा | सदा सत्य संकल्प चिती वसावा |
    जनी जल्प विकल्प तोही त्यजावा | रमाकांत एकांतकाळी भजावा ||130||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 14, 2016


  • किचन क्लिनीक – काही दुधांचे गुणधर्म

    आयुर्वेदामध्ये अनेक दुधांचे गुणधर्म सांगितले आहेत.पण त्यातील जे दुध मानव प्राणी प्यायला वापरतो तेवढ्याच दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखात पहाणार आहोत.

    १)गाईंचे दुध:

    हिचे दुध चवीला गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,शरीरात क्लेद व चिकटपणा अल्प प्रमाणात निर्माण करते,कफकर,वातपित्त कमी करणारे, संडासला व लघ्वीला सुकर करणारे,मानसिक आजारबरेकरणारे,दाहनाशक,शक्तिवर्धक, विषनाशक(असे म्हणतात कि जर गाईने चुकून एखादी विषारी वनस्पती खाल्ली तरी त्याचे विष हे गाईच्या दूधात उतरत नाही).

    २)म्हशीचे दुध:

    चवीला गोड,थंड,पचायला गाईच्या दुधापेक्षा जड,स्निग्ध,भरपूर क्लेद व चिकटपणा निर्माण करणारे,बलकारक,शुक्रधातूची वाढ करणारे,झोप आणणारे,संडास व लघ्वी बांधून ठेवणारे,भुक कमी करणारे आहे म्हणून भस्मक रोगात हे द्यावे असे सांगितले जाते.

    ३)शेळीचे दुध:

    गोड,तुरट,थंड,पचायलाहल्के,स्निग्ध, पित्तनाशक,बलदायक,पौष्टीक,शुक्रधातू वाढविणारे,भुक वाढविते,संडास बांधून ठेवणारे असून टिबी ह्या आजारात अत्यंत पथ्यकर आहे.

    ४)मेंढीचे दुध:

    गोड,पचायला जड,वातनाशक,कफ व पित्त वाढविणारे,उष्ण असते.हे दुध दमा असणाऱ्या व्यक्तिंनी मुळीच पिऊ नये.

    ५)स्त्रीचे दुध:

    वातपित्त नाशक,डोळ्यांनाहितकर,रक्तदोषनाशक,गोड,तुरट व पचायला हल्के असते.

    असे हे वेगवेगळ्या दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखामध्ये पाहिले.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 7, 2017


  • नक्की काय करावं?

    कुणी नोंद घेतलीय की नाही हे कळायला काही मार्ग नाही, पण गेले काही दिवस एक जाहिरात इलेक्ट्राॅनिक मिडीयावर झळकतेय. ही जाहिरात आहे ‘सहारा श्री’ श्री. सुब्रतो राॅय सहारा यांची. तेच सुब्रतो राॅय सहारा, ज्यांच्यावर गुंतवणूकदारांचे हजारो करोड रुपये लुटल्याचा आरोप सिग्ध झालाय. त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना कारावासही भोगायला लागलाय. त्यातही त्यांचा आडमुठेपणा सुरुच होता. विविध कारणं दाखवून त्यांनी गुंतवणूकधारकांच्या पैशांतून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलाव टाळण्याचे त्यांचे उद्योग सरु आहेतच. याला माज म्हणतात आणि हा माज सुप्रिम कोर्टाने बरोबर ओळखून त्यांना काट्यावर पकडलंय आणि कोर्ट त्यांना वेळोवेळी फटकारतंयही.

      September 22, 2017


  • मराठी साहित्यातील साठोत्तरी समीक्षाप्रवाह

    साठोत्तरी समीक्षाप्रवाहात साहित्यप्रकारांचा, अनेकविध जाणिवांचा विकास झाल्यामुळे समीक्षाविचारांचे काही ठळक प्रवाह दिसून येतात. जीवनवादी, कलावादी, आदर्श मूल्यांवर आधारलेला, नैतिक मूल्यांचा, सत्य, शिव व सौंदर्याचा पुरस्कार करणारी समीक्षापद्धती मागे पडली आणि साम्यवादी, ऐतिहासिक, मानसशास्त्रीय, अस्तित्ववादी, ग्रामीण, दलित, प्रतीकवादी, आदिवासी, स्त्रीवादी, चरित्रात्मक व आदिबंधात्मक समीक्षाविचारांचा प्रवाह खळखळू लागला.

      March 23, 2022


  • धन्वंतरी जयंती

    भगवान धन्वंतरींनी काय-बाल-ग्रह-उध्र्वाग-शल्य-दष्ट्रा-जरा-वृषान या आठ शाखा निर्माण केल्या. आज या आठ शाखांच्या उपशाखा होऊन अनेक डॉक्टर ‘पदव्या’ घेऊन समाजाचे आरोग्य राखत आहेत.

      November 2, 2021


  • कोरफड

    कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

    रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तयस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते. शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.

    कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

    संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते. याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      February 9, 2017


  • गोरं करणारा साबण

    गोरं करणाऱ्या क्रीम आणि गोरं करणाऱ्या साबणांचा खप फार मोठ्या प्रमाणात होतो. त्वचेला रंग कशामुळे येतो? आपल्या त्वचेमधील मेलेनॉसाइट पेंशींमधून स्त्रवणाऱ्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. खरं तर याच मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला अतिनील किरणांपासून सुरक्षा मिळते म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या सावळी त्वचा असणं ही एक निसर्गाने आपल्याला दिलेली भेट आहे.

      November 18, 2023


  • मधुमेहींसाठीचा आहार

    मधुमेहींनुसार हा विकार कर्करोगापेक्षा धोकादायक आहे. या विकाराने तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकत नाही. ज्यांनी आपले आयुष्य चपाती, पराठा, आमटी आणि भात खाण्यात घालवले आहे, ते अचानक काहीच खाऊ शकत नाहीत. आयुष्यात झालेल्या या नव्या बदलांमुळे खूप मानसिक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरासाठी काही पदार्थ न खाणे हेच योग्य आहे, हे स्वीकारण्यास वेळ लागतो. कारण त्यांचे स्वादुपिंड इन्सुनिलची निर्मिती करणे थांबवते. शरीरात केवळ ग्लुकोज (शर्करा) तयार होत असल्याने अनेक समस्या उद्भवतात. आपण या लक्षणांना मधुमेह असे म्हणतो. मूळात स्वादुपिंडामधून होणारा स्त्राव हा यकृतातर्फे नियंत्रित केला जातो, म्हणूनच मधुमेह हा यकृताचा विकार आहे. असे काही पदार्थ आहेत, जे यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणतात. कडीपत्त्यामध्ये खूप चांगले गुणधर्म असतात. दिवसातून तीनवेळा कडीपत्त्याची ४-५ पाने खाल्ली तर यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. सकाळी उठल्यावर अर्धा चमचा तुळशीच्या बिया, मोड आलेली कडधान्ये, दही आणि तूप खाल्याने यकृत अधिक कार्यक्षम होते. मधुमेहींनी साखर, दूध, प्रिझर्व्हेटिव्हज (पदार्थ नासू नयेत, यासाठी घालण्याचा पदार्थ) आणि अधिक मेद असलेले पदार्थ टाळावेत. मधुमेही भात, बटाटा आणि केळे इत्यादी खाऊ शकतात, असे शेकडो गैरसमज मधुमेहींच्या आहाराबद्दल आहेत. पण हे पदार्थ योग्यवेळी आणि योग्य संयोगासह खाल्ले तरच चालू शकतात. सुमारे तीन तासांची भूक भागेल, असा आरोग्यदायी न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आहार मधुमेहींनी घ्यावा. क्रॅशन डाएट (लवकर परिणाम मिळविण्यासाठी केलेले आहार नियोजन) करू नका, कारण ते जास्त अपायकारक ठरू शकेल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मधुमेहींसाठी पाककृती
    गव्हाच्या दलियाचा उपमा
    साहित्य- २ वाट्या दलिया, १ वाटी खोवलेला नारळ, मीठ, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टी. स्पू. गरम मसाला, २ हिरव्या मिरच्या, ४-५ लसणाच्या पाकळ्या आणि १ टी. स्पू. साखर.
    कृती - हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट बनवावी. दलियामध्ये चार वाट्या पाणी, मीठ-मिरची लसूण पेस्ट, गरम मसाला आणि साखर घालावी. हा दलिया कुकरमध्ये शिजवून घ्यावा. शिजल्यावर दलियात खोवलेलं नारळ आणि थोडं पाणी टाकून तो वाफवून घ्यावा. दलियाचा उपमा वाढताना त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मशरूम बार्ली रिसोटो
    साहित्य- १ कप भिजवेलेली बार्ली, १ टीस्पून ऑलिव्ह तेल,१ चिरलेला कांदा,१/२ कप चिरलेली लीक (कांद्यासारखी फळभाजी), १ लवंग, बारीक तुकडे केलेली लसूण,काही स्प्रिग्स रोसमेरी पाने,काही स्प्रिग्स थीम पाने, ३ कप भाज्यांचे स्टॉक (पनीर पाणी), १ टीस्पून चिली फ्लेक्स,टोबॅस्को सॉसचा एक डॅश, स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी पावडर.
    कृती:- जाड तळ असलेल्या कढईत ऑलिव्ह तेल तापत ठेवा. त्यात कांदा, लसूण, लिक्स घालून परतवा. त्यानंतर त्यात मशरूम घालून व्यवस्थित परतवा. आता त्यात बार्ली आणि स्टॉक घालून व्यवस्थित मिश्रण करा. कढई झाकून ठेवून हे मिश्रण सुमारे १० मिनिटे शिजू द्या. अधूनमधून पळी फिरवा. आवश्यकता असल्यास थोडा अजून स्टॉक घाला. बार्ली शिजल्यावर त्यात टोबॅस्को, परमेसन (एक प्रकारचे पनीर), चिली फ्लेक्स, रोझमेरी, थाइम, मीठ आणि काळी मिरी घाला. त्याचे व्यवस्थित मिश्रण करा आणि त्यावर लसणाची पात घालून वाढा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    लिंबू आणि कोथिंबीरीचे सूप
    साहित्य- स्टॉकसाठी लेमन ग्रासचे दोन तीन धुतलेले तुकडे, उभ्या चिरलेल्या 1-2 लाल मिरच्या, इतर घटक- १/४ कप गाजराचे काप, १/४ कप मशरूमचे काप, १/४ कप बारीक चिरलेला कोबी, २ चिरलेल्या कांद्याच्या पाती,मीठ आणि काळी मिरी पावडर स्वादानुसार.
    कृती:- लेमन ग्रास आणि मिरच्या ३ कप पाण्यात टाकून १५ मिनिटे उकळू द्या. हे मिश्रण गाळून बाजूला ठेवून द्या. थोडेसे पाणी घालून कांद्याची पात परतवून घ्या. त्यात कोबी, मशरूम आणि गाजर घालून 2 मिनिटे शिजवा. त्यात स्टॉक ओतून भाज्या मऊ होईपर्यंत उकळा. त्याच्यासोबत मीठ, काळी मिरी पावडर आणि लिंबू देऊन कोमट स्थितीत वाढा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    कोबीचे रोल
    साहित्य- कोबीची ५-६ पाने,एक कप बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, फरस्बी, फ्लॉवर, मटार),अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप टोमॅटोची ग्रेव्ही, २५ ग्रॅम पनीर/ मोड आलेली कडधान्ये, २ टीस्पून तेल,मीठ आणि मिरी पावडर स्वादानुसार.
    कृती:- पाण्यात मीठ टाकून कोबीची पाने १ मिनिटापर्यंत शिजवून घ्या. पाणी पूर्ण काढून टाका.
    तेल तापवा. काही सेकंद कांदा परतवा. त्यात हिरव्या मिरच्या घालून पुन्हा एकदा काही सेकंद परतवा. त्यात भाज्या, मोड आलेली कडधान्ये, मीठ आणि मिरी पावडर घाला. भाज्यांचे हे मिश्रण कोबीच्या कोबीच्या प्रत्येक पानावर ठेवा, वरून थोडीशी टोमॅटोची ग्रेव्ही घाला. प्रत्येक पान गुंडाळून घ्या आणि ते तूप लावलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. शिल्लक राहिलेली टोमॅटो ग्रेव्ही उकळून घ्या आणि ती रोल्सवर ओता.. ओव्हनमध्ये 225 अंश सेल्सिअस तापमानावर 10 मिनिटे ठेवा आणि गरगरम खायला द्या.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    राजगिरा डोसा
    घटक - रात्रभर भिजवून ठेवलेला 1/2 कप राजगिरा, १/२ कप चणा डाळ ४-६ तास भिजवलेली, १-२ हिरव्या मिरच्या, बारीक तुकडे केलेल्या (आवश्यकता असल्यास) स्वादानुसार मीठ, दीड टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,शिजविण्यासाठी तेल.
    कृती:- राजगिरा, चणाडाळ, हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करून त्याचे मिक्सरमध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून मिश्रण करून घ्यावे. ते बाऊलमध्ये काढून त्यात कोथिंबीर घालावी आणि व्यवस्थित मिसळून घेऊन, डोसा घालण्यासाठी योग्य असे मिश्रण तयार करावे.
    नॉन स्टिक तव्यावर पातळ डोसे घालावेत. हिरवी चटणी आणि सांबार यांच्यासह ते खायला द्यावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      May 5, 2017