(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भ्रमातून डोकावणारे वास्तव

    हिंदुस्थानला जगाच्या पाठीवर एक अद्भुत देश म्हणून ओळखले जाते. ‘अद्भुत’ हे विशेषण आपल्या देशापुढे लागण्याची असंख्य कारणे देता येतील. इथली संस्कृती, इथल्या परंपरा, इथली विविधता एक ना दोन शेकडो कारणे आहेत.

      August 10, 2003


  • पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना

    ६ ऑगस्ट १९२० साली पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना झाली. याच बरोबर कलकत्ता, मद्रास, व रंगून स्थानिक सेन्सॉर बोर्डची स्थापना केली गेली.

    पहिले सेन्सॉर प्रमाण पत्र गोउमुंट कंपनी ला देण्यात आले.

    अमेरिकेत हॉलीवूडमध्ये चलचित्राच्या सेन्सॉरशिपची पहिली घटना घडली १८९७ मध्ये जेव्हा जेम्स कॉर्बेट व रॉबर्ट फिट्झसिमन्स यांच्यातील हेवीवेट वजनी गटातील सामना दाखवायला बंदी घातली गेली होती. १९१५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्युच्युअल फिल्म कॉर्पोरेशन वि. इंडस्ट्रिअल कमिशन ऑफ ओहायो यांच्यातील खटल्यात सिनेमा हा तद्दन व्यवसाय असल्याने त्यावर सेन्सॉरशिपला विरोध दर्शविला होता. मात्र, १९१५ ते १९५२ या काळात स्थानिक, राज्य व केंद्र सरकारी पातळीवर सेन्सॉरशिप लागू करण्याचे बरेच प्रयोग झाले. अमेरिकन शासनाने सेन्सॉर बोर्ड स्थापन करू नये यासाठी १९२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा वकील व वजनदार अशा विल हेज याच्या नेतृत्वाखाली प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन (PDA) ही संघटना स्थापन झाली जिने शासनाने हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच काही बंधने घालून घेतली. १९३४ साली जोसेफ ब्रीनच्या नेतृत्वाखाली प्रॉडक्शन कोड अॅडमिनिस्ट्रेशन (PCA) या संघटनेने १ जुलै, १९३४ पासून पुढे येणाऱ्या सर्व सिनेमांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. ब्रीनने हा कायदा अतिशय कडक व त्रासदायक केला.

    तथाकथित नैतिकता व धार्मिकता पाळणे हे अक्षरशः बंधनकारक केले. पुढे १९५२ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात PCA चा अधिकार खूपच कमी केला. हा निर्णय 'मिरॅकल' या सिनेमाशी संदर्भित खटल्याशी संबंधित असल्याने त्याला 'मिरॅकल डिसीजन' (जादुई निर्णय!) म्हटले जाते. यानंतर 'द मून इज ब्ल्यू' या १९५३ च्या सिनेमात Virgin, Seduce इ. शब्दांचा प्रथमच वापर करण्यात आला. जगभरातील बहुतांश देशांत चित्रपटाच्या सेन्सॉरशिपशी संबंधित कायदे व बोर्ड अस्तित्वात आहेत. भारतात पहिला सिनेमा १९१३ साली आला आणि सेन्सॉर बोर्डाची स्थापना १९२० साली झाली.

    सिनेमेटोग्राफ एक्टच्या खाली सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेन्सॉर ची १९५२ मधे स्थापना झाली. कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून १९८३ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं. आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’, ’यु/ए’, ’ए’ आणि ‘एस’ अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स, शब्द, वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 6, 2021


  • अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग १

    मी पेशाने पशुवैद्यक (Veterinary doctor) आहे. मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून १९८६ साली, ‘पशुप्रजनन’ शास्त्रामधे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, बरीच वर्षं गुजरातमधे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ह्या प्रसिद्ध संस्थेच्या, ‘गाई म्हशींमधे कृत्रिम गर्भारोपण’ (Embryo Transfer), ह्या प्रकल्पावर डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करत होतो. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती, पण प्रयत्न करूनही योग जमत नव्हता. शेवटी २००० सालच्या अखेरीस, युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट मधे Ph.D. करण्यासाठी संधी मिळाली. डॉ. जेरी यॅंग सारखा, ‘क्लोनिंग’च्या क्षेत्रातला नावाजलेला संशोधक, गाईड म्हणून मिळत होता आणि असिस्टंटशिप द्यायलाही तयार होता. अशी संधी परत मिळणार नव्हती. घरच्यांच पाठबळ होतं. मी नोकरीचा राजीनामा दिला आणि ४ जानेवारी २००१ ला, वयाच्या चक्क अडतिसाव्या वर्षी, Ph.D. करण्यासाठी अमेरिकेत येऊन दाखल झालो.

    पहिली सेमीस्टर झाल्यावर, माझ्या संशोधन प्रकल्पासाठी, डॉ यॅंगने मला आयोवा राज्यातल्या, ‘गायींमधे कृत्रिम गर्भधारणा’ करण्याच्या क्षेत्रातल्या, अमेरिकेतील सर्वात मोठया कंपनीत पाठवायचा निर्णय घेतला. अमेरिकेतील बहुतेक भारतीय, पूर्व किंवा पश्चिम किनारपट्टी किंवा दक्षिणेकडच्या मोठमोठया शहरांत रहात असल्यामुळे,‘आयोवा’ म्हटल्यावर त्यांना नकाशाचा आधार घ्यावा लागतो. पूर्व/पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रगत राज्यांच्या आणि मोठमोठ्या शहरांच्या तुलनेत, अमेरिकेच्या मध्य भागातील (midwest) राज्ये, ही कमी प्रगत आहेत. दक्षिणेला टेक्सास राज्याच्या निमुळत्या मुठीसारख्या (pan handle) भागापासून, उत्तरेला कॅनडापर्यंत आणि पश्चिमेला रॉकी पर्वतराजीपासून पूर्वेकडे इंडियाना राज्याच्या सीमेपर्यंत, अमेरिकेचा प्रचंड मोठा भाग सपाटसा आहे. यात अमेरिकेच्या सोळा राज्यांचा आणि कॅनडाच्या तीन प्रॉव्हीन्सेसचा समावेश होतो. १४९२ साली जेंव्हा कोलंबसची गलबतं या नवीन जगाच्या किनार्‍यावर येऊन थडकली, तेंव्हा युरोपियनांना अनभिज्ञ अशा अमेरिका या प्रचंड भूखंडाचा एक तृतीयांश भाग (सुमारे १० लाख चौरस मैल) -आजचा ‘मिडवेस्ट’ - कुरणांनी आच्छादलेला होता.

    अमेरिकेचं भौगोलिक वैविध्य असं आहे की तिच्या पूर्वेकडच्या निम्या भागाकडे बघून, पश्चिमेकडच्या उरलेल्या निम्या भूभागाची अजिबात कल्पना येत नाही. इंडियाना राज्यामधून आपण पश्चिमेकडे जाऊ लागलो की विस्कॉनसीन, मिनेसोटा, इलिनॉय, आयोवा, मिसुरी, अर्कान्सास ही दक्षिणोत्तर पसरलेली राज्ये लागतात. यांचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे, उंच सळसळणार्‍या गवताळ कुरणांनी आच्छादलेल्या, सर्वदूर पसरलेल्या छोटेखानी टेकडया. हा भूभाग म्हणजे ‘प्रेअरी’. एकेकाळच्या उंच सळसळणार्‍या गवताची जागा, आता तशाच उंच मक्याच्या पिकाने घेतली आहे. त्यामुळे प्रेअरीचं आताचं स्वरूप म्हणजे मका आणि सोयाबीनच्या पिकांनी भरलेली शेतं आणि त्यात मधे मधे विखुरलेले गायी आणि डुकरांचे फार्मस्‌. अशाप्रकारे मका, सोयाबीन, गो-पालन आणि वराह-पालन ह्या चार मजबूत खांबांवर प्रेअरीचा सारा भूभाग तोललेला आहे.

    इथून आणखी पश्चिमेकडे सरकावं आणि नॉर्थ डकोटा, साउथ डकोटा, नेब्रास्का, कान्सास, ओक्लाहोमा आणि टेक्सास अशी पुढची, उत्तर दक्षिण पसरलेली राज्यांची फळी लागते. या राज्यांचा पूर्वेकडील साधारण एक तृतीयांश भाग देखील प्रेअरीमधेच मोडतो. या सार्‍या राज्यांतून, १०० अक्षांश उत्तर दक्षिण जातं आणि या नैसर्गिक भौगोलिक सीमेपाशी, अचानक भूभागात बदल जाणवायला लागतो. या अक्षांशापासून जसजसं पश्चिमेकडे जावं तसतशा छोटेखानी टेकड्या नाहीशा होतात आणि जमीन सपाट होत जाते. सळसळत्या गवताची जागा खुरट्या गवताने घेतली जाते. या राज्यांचा पश्चिमेकडचा भाग आणि त्याही पलीकडची मॉंटेना, वायोमींग, कोलोरॅडो, न्यू-मेक्सिको ही राज्ये म्हणजे ‘ग्रेट प्लेन्स’. पूर्वी या भागात बायसनचे क्षितीजापर्यंत पसरलेले कळप असायचे. आता तिथे मुख्यत्वे बीफ गायींचे मोठमोठे चराऊ रॅंचेस आहेत. त्यामुळे ‘प्रेअरी’च्या भागात मुख्यत्वे शेती आणि ग्रेट प्लेन्सच्या भागात मुख्यत्वे ‘चराऊ कुरणे’ अशी सध्याची विभागणी दिसून येते.

    बदलणार्‍या भूभागानुसार केवळ शेती / पशूपालनाच्या पद्धतीत फरक पडतो असं नाही. जसजसं आपण अधिक पश्चिमेकडे जावं, तसतशा counties (जिल्हे) मोठ्या होत जातात, रस्ते अधिक सरळसोट होत जातात, गावं तुरळक होत जातात. गावकर्‍यांच्या टोप्यांकडे बघून देखील थोडाफार अंदाज बांधता येतो. शेतकरी साधारणपणे शेतकी अवजारांच्या कंपन्यांच्या किंवा जनावरांच्या breeding कंपन्यांच्या बेसबॉल कॅप्स वापरतात. मोठमोठ्या कुरणांचे मालक (ranchers) बहुदा काउबॉय हॅट्स वापरतात. साधारण १०० अक्षांशाच्या आसपास सुरू झालेल्या या अमर्याद सपाट जमिनीचा चढ, पश्चिमेकडे दर मैलामागे १० फुटांनी वाढायला लागतो तो थेट रॉकी पर्वतराजी सुरू होईपर्यंत.

    अमेरिकेच्या अतिप्रगत अशा पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांच्या दृष्टीने, हा सारा भूभाग म्हणजे फक्त विमानात बसून, माना वाकड्या करून खिडक्यांतून खाली बघून पाहाण्यापुरता. त्याच्यावरून ३०,००० फूटांवरून उडत जायचं म्हणून त्याला कुत्सितपणे ‘Fly over country’ असं म्हटलं जातं. उगाच नाही आयोवा किंवा मिडवेस्ट म्हटलं, की इतर अमेरिकन लोकं नाकं मुरडत ! मुंबईच्या खार, पार्ल्याच्या किंवा पुण्याच्या डेक्कन, कर्वे रोडच्या लोकांना इचलकरंजी, वीटा किंवा बुलढाण्याचं नाव ऐकून कसं वाटतं, साधारण तसंच बाकी अमेरिकन्सना मिडवेस्टबद्दल वाटतं.

    आयोवाच्या उत्तर पश्चिम कोपर्‍यात, ‘सू सेंटर’ नावाचं एक छोटंस गाव आहे. बर्‍याचशा नकाशांत त्याचं नामोनिशाणही नसतं. उच्चाराप्रमाणे स्पेलिंग लिहिताना हमखास चुकायला होतं. खरं स्पेलींग आहे Sioux. गोर्‍या लोकांनी अमेरिकेचा कब्जा घेण्यापूर्वी, या भागात Sioux जमातीचे रेड इंडियन लोकं रहात होते. त्यावरून या सर्व भागाला (आयोवाचा उत्तर-पश्चिम भाग, मिनेसोटाचा थोडासा दक्षिण भाग आणि साउथ डाकोटा राज्याचा दक्षिण-पूर्व भाग) Sioux land म्हणतात. त्यामुळे या भागात सू सेंटर, सू सिटी, सू फॉल्स, सू रॅपीड्स अशी बरीच गावं / शहरं आहेत. या भागातून वहाणार्‍या नदीचे नाव देखील big Sioux river असंच आहे. तर अशा या सू सेंटरची वस्ती आहे केवळ सहा हजार. पण या छोट्याशा गावात, गायींमधे कृत्रिम गर्भधारणा आणि तत्सम क्षेत्रामधे संशोधन व काम करणारी, Trans Ova Genetics नावाची, अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी आहे. माझ्या प्रकल्पाच्या कामाच्या निमित्ताने, मी या कंपनीत २००१ च्या जुलै महिन्यात दाखल झालो. माझ्य़ा पाठोपाठ दोन आठवडयात, माझी बायको मृणालिनी आणि आमचा ६ वर्षांचा मुलगा सिद्धार्थ, मुंबईहून सरळ सू सेंटरला आले; आणि बघता बघता, १४ दशलक्ष लोकवस्तीच्या मुंबई शहरात आयुष्य काढलेलं, एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंब, अमेरिकेच्या मध्यावर, गाईगुरांच्या कुरणांमधे आणि मक्या-सोयाबीनच्या शेतांमधे, सहा हजार लोकवस्तीच्या एका खेडेवजा गावकुसाचं रहिवासी झालं.

      June 29, 2015


  • अर्थसंकल्प अंतर्गत सुरक्षेकरता समाधानकारक पण बाह्य सुरक्षेसाठी ?

    अर्थसंकल्प अंतर्गत सुरक्षेकरता समाधानकारक पण बाह्य सुरक्षेसाठी ?

    देशाची अंतर्गत सुरक्षा खर्च गृहमंत्रालयाच्या बजेट मधून केला जातो. बाह्य सुरक्षेचा खर्च डिफेन्स मिनिस्ट्रीच्या बजेट मधून केला जातो. म्हणुन या वर्षी जरी संरक्षण मंत्रालयाचे बजेट फ़ारसे वाढले नसले तरी गृह मंत्रालयाचे बजेट हे पुष्कळ वाढले आहे.याचाच अर्थ अंतर्गत सुरक्षेचे धोके आणि आतल्या शत्रुंचा हिंसाचार वाढत असल्यामुळे सरकारने अंतर्गत सुरक्षावर लक्ष केंद्रित केले आहे.

      February 20, 2020


  • वसंतोत्सवात नादब्रह्माचा अविस्मरणीय आविष्कार

    वसंतोत्सवात नादब्रह्माचा अविस्मरणीय आविष्कार

      January 22, 2011


  • मराठी कलाकारांचा वाङमयीन स्पर्श

    आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवताना, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, योग्य शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी उपयुक्त पडते. उल्लेख करता येतील असे अनेक नामवंत कलाकार मंडळी मराठी मनोरंजन विश्वाला लाभले ज्यांनी मराठी वाङमय कृतीचं अक्षरश: सोनं केलं.

      March 4, 2013


  • नसेल स्पर्धा तर माणूस ‘अर्धा’

    आजचे युग स्पर्धेचे युग आहे असे नेहमी म्हटले जाते. पण मला ते तितकेसे पटत नाही. स्पर्धा हा काही केवळ आजच्या युगाचाच युगधर्म नाही. तर स्पर्धा हा निसर्गचक्राचाच अविभाज्य घटक आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून स्वतःचे अस्तित्व राखण्याच्या स्पर्धेत अवघी सजीव सृष्टी धडपडताना दिसते. जे या स्पर्धेत यशस्वी झाले ते टिकले आणि मागे पडले ते नामशेष झाले. “सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट” या तत्वातून हीच गोष्ट तर स्पष्ट होते. -डायनॉसोरसारखे अजस्त्र, महाकाय प्राणी नष्ट झाले पण डासांसारखे बचावले कारण अस्तित्व टिकविण्याच्या स्पर्धेत ते यशस्वी झाले. एकाच जागी उभी राहून वाढणारी झाडेसुद्धा अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी एकमेकांपेक्षा उंच वाढण्याची स्पर्धा करतात मग अशा सर्वव्यापी स्पर्धेपासून मानवी जीवन मुक्त कसे असेल?

    स्पर्धा ही वैश्र्विक चैतन्याचे प्रतिक आहे असे मला वाटते. गुणवत्ता यादीत येण्यासाठी झटणारे विद्यार्थी, वर्ल्डकप मिळवण्यासाठी क्रीडागंणावर झुंजणारे विविध देशाचे क्रिकेटचे संघ, आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनाचा खप वाढावा म्हणून परिश्रम करणारे उद्योजक. चित्रपटसृष्टीतील आपले आघाडीचे स्थान अबाधित रहावे म्हणून धडपडणारे सिनेस्टार्स इतकेच काय ९.५२ च्या लोकलमध्ये विंडोसीट पकडण्यासाठी धावपळ करणारा सामान्य माणूस देखील या चैतन्याचा भाग आहे. जे पुढे जाते ते जीवन आणि पुढे जायचे म्हणजे स्पर्धा आलीच म्हणून तर शिक्षण, राजकारण, कला, क्रीडा, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात स्पर्धा आढळते आणि ती असायलाच हवी. ती जर नसेल तर एक प्रकारचे साचलेपण येउन त्या क्षेत्रावर मरगळ पसरेल.

    स्पर्धा म्हणजे चालना. स्पर्धा म्हणजे गती. प्रगती साधण्यासाठी गती अनिवार्य असते. पण ही गोष्ट लक्षात न घेता अनेकजण स्पर्धेचा विनाकारण बाऊ करतात. स्पर्धेमुळे निर्माण होणारी चुरस गतीला पूरक, पोषकच असते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किमान गुणवत्ता जोपासणे आवश्यकच असते. .आणि स्पर्धेत आघाडी मिळविण्यासाठी कमाल गुणवत्ता राखणे अपरिहार्यच असते. म्हणजे त्या त्या क्षेत्रातील सेवा, उत्पादनाचा दर्जा राखण्यात आपोआपच ढिलाई येते. आणि समाधान होत नसतानाही नाईलाजाने समाज ती सेवा ते उत्पादन स्वीकारतो. पण संधी मिळताच अशा उत्पादनाकडे पाठ फिरवतो. दूरध्वनी सेवेबाबतचा अनुभव याबाबत पुरेसा बोलका आहेच.

    इतरांपेक्षा अधिक चांगले असे काही करून दाखविण्याची भावना स्पर्धेमुळे निर्माण होते. ही भावनाच विकासाची वाट दाखवते. काही जणांना असे वाटते की, स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होतो. त्यांची शक्ती स्पर्धेत अनाठायी खर्च होते. विशेषत: मार्कांची संधी - गुणवत्ता यादी - विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. असा विचार करणाऱ्यांना स्पर्धेचे तत्व उमगलेले नाही असे मला वाटते. स्पर्धा कोणाबरोबर आणि कशासाठी याचे भान जरुर राखायला हवे. प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ शकणार नाही. पण प्रत्येकाने त्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न केले तर त्याची कामगिरी निश्चितच सुधारेल. धावण्याच्या स्पर्धेत फक्त तीन खेळाडूच पुरस्कार प्राप्त ठरतात म्हणून इतरांनी स्पर्धेत भाग घ्यायचाच नाही किंवा स्पर्धाच भरवायची नाही हा विचारच अपरिपक्व आहे. स्पर्धेचे दडपण आणि त्यातून येणारा ताण काहीवेळा विद्यार्थ्याच्या बाबतीत अनुभवायला मिळतो खरा पण त्याला पालकांचा दुराग्रह, अवाढव्य अपेक्षा असे इतर घटकच जास्त जबाबदार असतात. आपल्या मुलांची शारीरिक, बौद्धिक क्षमता ओळखण्याची कुवत पालकांमध्ये नसेल तर त्याचा दुष्परिणाम मुलांवर निश्चित होतो. पण दोष मात्र स्पर्धेवर ढकलला जातो.

    म्हणून आपली स्पर्धा कोणाबरोबर आहे हे ओळखणे जरुरीचे आहे. तुल्यबळ स्पर्धकांमध्येच खरी स्पर्धा रंगत असते. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्या क्रिकेट संघात स्पर्धा संभवतच नाही कारण दोन्ही संघाच्या गुणवत्तेत अफाट फरक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या दृष्टीने बांगला देशचा संघ स्पर्धकच नाही. पण बांगला देशच्या संघासाठी मात्र वेगळया अर्थाने स्पर्धा आहे - ऑस्टेलियाविरुद्ध याआधी केलेल्या खेळापेक्षा जास्त चांगला खेळ करून दाखवण्याची स्पर्धा आणि हीच स्पर्धा त्यांच्या खेळांचा दर्जा उंचावयाला मदत करणारी ठरेल. म्हणजे स्पर्धा नेहमी इतरांशीच असते असे नाहीतर कधीकधी ती स्वत:शी देखील असते. आणि अशी स्वत:शी 'असलेली स्पर्धा हीच सर्वोकृष्ट
    स्पर्धा असते. इथे तुम्हाला ज्याच्यावर मात करायची त्याची बलस्थाने आणि कमजोर जागा पूर्ण माहीत असतात. त्यामुळे कमजोर जागा नष्ट करून स्पर्धा जिंकण्याची संधी तुम्हाला सहज उपलब्ध असते. या संधीचा जे फायदा घेतात ते आपोआपच इतरांबरोबरच्या स्पर्धेत पुढे येतात.

    स्पर्धा मग ती स्वत:शी असो की इतरांशी, त्यात भाग घ्यायचा तो जिंकण्यासाठीच. पण अपेक्षित यश मिळाले नाही तर नाराज, निराश व्हायचे नाही. मिळालेल्या अनुभवातून शहाणे होऊन अधिक जोमाने पुढल्या स्पर्धेची तयारी करायची. यश मिळण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब मात्र कधीच करू नये. स्टिरॉईड घेऊन एखादा धावपटू सुवर्णपदक मिळवू शकेल किंवा पेपर फोडून विद्यार्थी भरघोस मार्क मिळविलही पण हे यश निर्भेळ नसेल. शिवाय जगाला माहीत नसले तरी, त्यांच्या अंतर्मनाला नक्की माहीत असते की तो या यशाला खऱ्या अर्थाने लायक नाही. अशा फसवणूकीमुळे स्पर्धेचा हेतूच नष्ट होतो. गैरव्यवहार फोफावतात आणि खऱ्या गुणवत्ता धारकांवर अन्याय होतो.अशा अपप्रवृत्तीमुळे स्पर्धा बदनाम होते. ह्या अपप्रवृती दूर करून निकोप स्पर्धा जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्पर्धेची भीती न बाळगता, खुल्या दिल्याने आणि अथक परिश्रमांसह स्पर्धेला सामोरे जायला शिका. तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली स्पर्धेतच दडलेली आहे. तुमच्या गुणवत्तेला दाद स्पर्धेमुळेच मिळणार आहे तेव्हा स्पर्धेतील, जीवन जगा आणि जीवनाची स्पर्धा जिंका.

    -चिंतामणी कारखानीस

      December 16, 2015


  • मोरया माझा – ५ : एवढे विशाल गणपती इवल्याशा उंदरावर कसे बसतात?

    श्री गणेशाबद्दल बाह्यरूप पाहून जनसामान्यांना जे प्रश्न पडतात त्यापैकी नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, एवढे मोठे विशाल देहधारी मोरया एवढ्या लहानशा उंदीरावर कसे बसतात? उंदीरावर बसता तरी येते का?

      September 6, 2019


  • नरेंद्र मोदींचा हिट नेपाळ दौरा; भारत नेपाळ संबधात एक नवीन सुरवात

    परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा नुकताच पार पडलेला नेपाळ दौरा भारताच्या संरक्षण आणि आर्थिक हितसंबधांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. भारताची नेपाळविषयीची असंवेदनशीलता आणि नेपाळचा भारताविषयीचा वाढता संशय यामुळे उभय देशांमधील संबंधात गेल्या काही वर्षांपासून प्रगती दिसत नव्हती.

      August 6, 2014


  • ऐतिहासिक ओरेब्रो किल्ला: वैभव आणि अंधाऱ्या कोठड्यांचा प्रवास

    ऐतिहासिक ओरेब्रो किल्ला: वैभव आणि अंधाऱ्या कोठड्यांचा प्रवास

    ओरेब्रो किल्ला (Örebro Castle) हा स्वीडनच्या मध्यभागातील ओरेब्रो शहरात स्वारटॉन नदीच्या एका बेटावर उभा असलेला एक अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला गेल्या ७०० वर्षांहून अधिक काळ स्वीडनच्या राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार राहिला आहे.

      June 16, 2026