वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गॅसनामा
गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.
फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "
हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.
या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.
गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !
हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.
वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.
या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.04.2017
April 4, 2017
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.
January 25, 2018
संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केल्यानुसार २००० सालापासून जगभर २२ मे हा दिवस ‘जागतिक जैवविविधता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.या वर्षीची जैवविविधता दिनाची संकल्पना ‘आपल्या प्रत्येक समस्येचे उत्तर निसर्गात आहे’ ही आहे.
पृथ्वीवर वनस्पती व प्राण्यांच्या लाखो प्रजाती आहेत. जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे. प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, कीटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत! जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेच्या जपणुकीचे महत्व आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.
जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनवला आहे. तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात. 'जैवविविधता मंडळे' स्थापन करून कामे वाटून घेतली जातात. स्थानिक पातळी वरील जैवविविधता मंडळे आपल्या परिसरातील वृक्ष, फुले, फळे, वेली, झुडपे, नदी, ओढे, नाले, विहिरी, तळी तसेच एकूण वृक्षाच्छादित प्रदेश यांची माहिती असणारी नोंदवही ठेवतात. परिसरात आढळणारे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, पावसाचे प्रमाण, पिके, स्थानिक वाण, चवी, औषधी वनस्पती यांचीही माहिती संकलित केली जाते. जैवविविधतेला क्षती पोहोचवणाऱ्या बाबी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवरही त्या टाळल्याने फरक पडू शकतो. अधिवास जपणे, प्रदूषण कमी करणे, शाश्वत शेतीच्या पद्धती, सेंद्रिय शेती अवलंबणे, हरित क्षेत्राची वाढ करणे, पशु पक्षांच्या प्रजाती जपणे इत्यादी पाऊले उचलून आपण जैवविविधता सांभाळू शकतो.
पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे ह्या जीवांना व वनस्पतींना क्षती पोहोचते. तो बदल नियंत्रणात ठेवणे मानवाच्या हातात आहे. आपण संकल्प करुया की तंत्रज्ञानाच्या अधिक आहारी न जाता अधिकाधिक नैसर्गिक जीवन जगू आणि पृथ्वीवरील जैवविविधता जपू. जागतिक जैवविविधता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पुणे.
May 22, 2022
समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.
October 6, 2002
येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, पाच वर्षात त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. एका बंगल्याचे पाच बंगले होतात, पाच वर्षात पाच पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्रोल पंप विकत घेता येतात….
August 22, 2014
८८ वर्षापूर्वी १६ मे रोजी पहिला ऑस्कर पुरस्कार दिला गेला. कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत ऑस्कर मिळवण्याकरता चढाओढ लागलेली असते.
१६ मे १९२९ रोजी ऑस्कर पुरस्कार म्हाणजेच अकॅडमी पुरस्कार हे हॉलिवूडच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्डर या सायन्स चलचित्र या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ’ऑस्कर’ असे नाव पडले.
अमेरिकेतील हॉलिवुड रुझवेल्ट हॉटेलमध्ये पार पडलेल्याच पहिल्याप पुरस्का्र सोहळ्याला असे झाले नव्हसते. त्याुवेळी या सोहळ्याला केवळ २७० व्य्क्तीरच उपस्थिहत होत्या,. या सोहळ्याला पाच डॉलर तिकिटाचा दर होता. त्याुवेळी अमेरिका, यूरोपच्या् वृत्तीपत्रांतून त्यालला अपेक्षित अशी प्रसिद्धीसुद्धा दिली गेली नव्ह ती. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली. तेच या पुरस्कायराचे संस्थाीपक आहेत. पहिल्या सोहळ्यात ऑस्कर विजेत्यांची नावे सोहळ्याच्या तीन महिने आधीच जाहीर केली गेली होती. पहिल्या सोहळ्यात १५ ऑस्कर पुरस्कार दिले गेले होते.
सवोकृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जॅनिंग्ज यांना, तर सवोकृष्ट अभिनेत्रीचे पहिले ऑस्कर जेनेट गेनर यांना मिळाले दिले गेले होते. यात दोन विशेष ऑस्कर पुरस्कार दिले गेले. वॉर्नर ब्रदर्स यांना जॅझ सिंगर चित्रपटाची निमिर्तीसाठी चार्ल्स चॅप्लिन यांना दी सर्कस चित्रपटाचे निर्माता लेखक आणि अभिनेते यासाठी हा पुरस्कातर दिला गेला होता. मात्र, पुढील वर्षापासून विजेत्यांची नावे पुरस्कार सोहळ्यापर्यंत गुप्त ठेवण्यात येऊ लागली. सोहळ्याच्या आधीच विजेत्यांची यादी वर्तमानपत्रांकडे पाठवली जायची आणि सोहळ्याच्या दिवशी रात्री ११ वाजता ती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करायची, असे ठरवण्यात आले. ही पद्धत १९४० पर्यंत पाळली गेली. परंतु, लॉस एंजेलिस टाइम्सने ऑस्कर विजेत्यांची यादी सायंकाळीच प्रसिद्ध केली. त्यामुळे सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांना ती सहज उपलब्ध झाली. या मुळे पद्धत बदलणे भाग झाले.
१९४१ पासून बंद पाकिटात विजेत्यांची नावे देण्याची पद्धत सुरू झाली. १९५३ मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा पर्यंत दाखवला गेला. १९६९ पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित केला जाऊ लागला. सध्या हा सोहळा २०० पेक्षा अधिक देशात पाहता येतो. या पुरस्कारर सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. जवळपास जगातील सर्वच प्रमुख वृत्तयवाहिन्याा, वर्तमानपत्रे त्याोला ठळक प्रसिद्धी देतात. याच सिनेजगतातील सर्वोच्चप मानला जाणारा ऑस्कयर पुरस्कापर तर सर्वांच्याठच आक र्षण, उत्सुीकतेचा विषय. मराठी, हिंदी, तमीळ आणि बंगाली; तसेच देशातील इतर भाषांतील सर्वोत्कृष्ट ३५ चित्रपटांमधून एका चित्रपटाची अधिकृत निवड केली जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 16, 2017
आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजे त्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते. यासंबंधीच या लेखात चर्चा केली अअहे.
December 17, 2016
या जगातला प्रत्येक व्यक्ती व्हॉटसअप स्टेटस स्वतःच्या पद्धतीने वापरत असतो. जसे एखादा नाराज असलेला व्यक्ती आपले दुःख त्याला कोणाला सांगायचे असेल तर तो इंटरनेट वर जाऊन त्याचा दुःखाचा संबंधित फोटोज् स्टेटस वर टाकतो. त्यातून त्या व्यक्ती अनेक अर्थ त्याचा ओळखीच्यांना सांगायचे असतात. त्यात अनेक प्रकार आहेत. जसे कोणाचे प्रेम संबंध मध्ये भांडण झाले असेल तर त्याचा लगेच आजकल चे मुल मुली व्हॉटसअप स्टेटस वर त्या संबंधित लिहितात किंवा नाराजीचा emoji टाकतात.
July 8, 2024
या कफाला शत्रूप्रमाणे वागवावे. अजिबात दयामाया नको. जरा ढील मिळाली की, काही खरं नाही. डोक्यावर बसलाच म्हणून समजा.
याचा अत्यंत आवडता अवयव म्हणजे जीभ. खाण्याची एकही संधी अजिबात सोडणार नाही. चवीनं खाणार, पण त्याचा गाजावाजा नाही करणार. वात एवढुंस खाईल आणि आव आणेल हे एवऽढं खाल्याचा ! पण कफाचे याच्या नेमके ऊलटे. खाईल हेऽऽ एवढं, आणि सांगेल, खाणारा, तो मी नव्हेच !
म्हणून वारंवार उपवास करण्याची शिक्षा या कफाला करावी लागते. पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नको, असं निक्षून सांगावं लागतं. पण आपलं याचं चालूच, कळतंय पण वळत नाय. एकदा खायला सुरवात केली की थांबायची बात नाय, साधा भूकेचा अंदाजसुद्धा याला घेता येत नाय.
आणि म्हणून जातो फुगत, जातात पोटावर टायर वाढत !
आपण खाणार आणि डाक्टर च्या औषधाला गुण नाय म्हणून ओरडणार.
याला पथ्य युक्तीनेच सांगावे लागते. लाह्या, काॅर्नफ्लेक्स, फुलवलेले पोहे, राजगीरा, चुरमुरे. त्यावर थोडेसे जिरेपूड, काळे मीठ घालून खा, असे सांगावे लागते. दिसायला भरपूर, पण मुळात ऐवज कमी असे, भाजून फुलवलेले धान्य ! बस खात किती ते.
याच्यासाठी पाणी कमी, तेल कच्चेच चांगले, तिखट झणझणीत खाल्ले तर अधिक चांगले. पाणी गरम प्यायला आवडणार नाही, पण तेच द्यावे.
मुख्य म्हणजे याला खाल्ल्यावर झोपायला अजिबात द्यायचे नाही. नाहीतर मग आणखीनच फुगला म्हणून समजा. आधीच झोप प्रिय असलेला, खाल्याजेवल्यावर कुठेतरी टेकायला, झोपायला मिळते का, हे पहाणारा. याच क्षणाला सांभाळले की, झाले. नाहीतर मधुमेहाचा सख्खा सखा कधी होईल हे कळणार देखील नाही.
वाताचा सख्खा भाऊ असून देखील, वागणे मात्र वाताच्या अगदी ऊलटे.
पण दया नको माया नको, भरपूर घाम येईपर्यंत कामाला लावायचे, घाम आला की पंखे बंद करायचा, आंघोळ झाल्यावर तर पांघरूण घेऊन बसायचे, पोहोणे, धावणे, पळणे, कष्टाची कामे करणे, दंड, जोर बैठका, लोटांगण, सूर्यनमस्कार, जाॅगिंग हे सर्व झाल्याशिवाय तुला नाश्ता काय पाणी सुद्धा मिळणार नाही, असे काळजावर दगड ठेवून सांगावे लागते.
मुळात स्नेहाची आवड असल्याने, थोडेसे गोड बोलून, बेमालूमपणे आपले काम करून घेणार्या या उस्तादाला कुस्ती खेळून नमवावेच लागते.
याला कसली चिंता, कधीच नसते. नवीन (सकारात्मक ) चिंता निर्माण करून दिली तरच हा आटोक्यात रहातो. बरं हे सगळं तो प्राकृत असतानाच करायचे. एकदा विकृत झाला की म पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत औषधेच घ्यावी लागतात.
पण याला आयुर्वेदात उत्तरे मिळतात बरं का....
शोधलं की सगळं सापडतं...!
-- डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
9820584716
May 17, 2017
1] Big-bang Theory_ (विश्वाची उत्पत्ति सांगणारा सिद्धांत):
हे विश्व एका महा स्फोटातून निर्माण झाले .हे सांगणारा हा सिद्धांत आहे. हजार /लाखो वर्षांपूर्वी एक भयंकर स्फोट झाला त्यातून जी काही energy व particles बाहेर पडले त्यातून हे विश्व निर्माण झाले . ते कसे हे सिद्ध करण्यासाठी Dark matter, String theory आणि काही Dimensional concept पूर्ण व्हायला हव्या. पण जर प्रश्न विचारला Big-bang पूर्वी काय होते ? काहीच नसेल तर शून्य म्हणावे वे लागेल पण science Big-bang’ पर्यंत थांबते पुढे जाण्यासाठी सद्या काही समीकरण उपलब्ध नाही research चालू आहेत. असे scientist सांगतात.
पण अध्यात्म याचे उत्तर देते जसे “ पाहिजे कवण हे अवघे विए | तव मूळ ते शून्य || ” (ज्ञाने 8.24) वरील वाक्य ज्ञानेश्वरी मधले आहे त्याचा अर्थ – हे सर्व कोणी निर्माण केले पहाता मुळातून शून्यातून निर्माण झाले असे दिसते .(It means the world is created
by out of nothing), असेच गीतेतील एक श्लोक आहे” अव्यक्तात व्यक्त: सर्वा: प्रभवत्न्हयहरागमे “| (भ.गी:8.18) अर्थ – हे विश्व अध्यात्मिक द्रष्ट्या अव्यक्तातून दिसते. अर्थात हे विश्व शून्यातून निर्माण झाले परंतु हे अध्यात्माचे बोल आहेत आणि विज्ञान अध्यात्माला मानत नाही. कारण स्वाभाविकच आहे या Theory चाच विचार करूया ; विज्ञान हे अस्तित्वाची सुरवात शोधत आहे पण का ? कारण त्याला असे वाटते म्हणजे विज्ञाना अनुसार सर्वच गोष्टींची सुरवात आणि शेवट असते वाक्य तार्किक असल्याने बुद्धीला पटते पण कारण प्रत्येक गोष्टीची सुरवात पाहायला मिळते , माणूस जन्मतो-मरतो , वस्तु तयार होतात/बनतात पुन्हा नष्ट होतात . पण बनणे किंवा मिटणे म्हणजे सुरवात वा शेवट नव्हे . जे नष्ट होते किंवा बनते ते त्या पूर्वी दुसर्या form/state मध्ये असतेच जसे बर्फ नष्ट झाल्यावर त्याचे अस्तित्व नष्ट होत नाही फक्त स्वरूप बदलते, त्याहून पुढे पाण्याला नष्ट केले तरी ते वाफ होईल पण अस्तित्व राहते अवस्था मात्र बदलेल. तसेच इतर सर्व गोष्टी बाबत आहे आपल्याला सुरवात आणि अंत दिसतच नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टी बनू शकतात मिटू शकतात पण सुरवात ठरवता येणार नाही कारण ते अस्तित्व असतं ते हमेशा असतचं काही नसणं हे सुधा काहीतरी अस्तच. आपण भारतीय जे नाही त्याला शून्य म्हणतो म्हणून अस्तित्वाची निर्मिती शून्यातून झाली असे अध्यात्म सांगते आणि यालाच Quantum theory सुधा आधार देते .
पूर्वी ठीक होतं पण आज मात्र विज्ञानाला हे पटत आहे. कारण ज्या पदार्थाचा सर्वात लहान Particle- Atom हा दृश्य स्वरुपाचा होता त्यामुळे हे जग दृश्य स्वरुपाचे होते . आज Atom च्या पुढे नवीन Particle-Quark व Sub-quark ,String. इत्यादि हे अदृश्य स्वरुपाचे आहेत . मग हे जग दृश्य कसे होईल . आणि यामुळेच Dimensional concept आली आणि अदृश्य जगाची / विज्ञानाची सुरवात झाली And therefor this is a beginning of invisible world and Science.
खाली next theory दिली आहे.
To be continued … In next Article /PART:3 Starting from MULTIVERSE & DIMENTIONS…
April 12, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti